गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १२

Submitted by बेफ़िकीर on 12 November, 2010 - 10:03

संजयच्या दृष्टीने आजचा दिवस म्हणजे खरे तर सुट्टीच होती. सकाळी काहीच काम नाही. ऑफीसलाही जायचे नाही. दुपारी एक वाजता निघायचे. आणि थेट पाचगणी!

रॅव्हाईन हे नवीन झालेले हॉटेल पाचगणीचे त्यातल्यात्यात असे हॉटेल होते जेथे मोनाने थांबावे.

संजय आरामात एस क्लास मर्सिडीझ चालवत होता. कात्रज घाट, खंबाटकी घाट, वाई फाटा आणि पसरणी घाट ओलांडून आता गाडी रॅव्हाईनच्या पार्किंगमध्ये येऊन थांबली आणि रॅव्हाईनच्या स्टाफमध्ये एकच गडबड उडाली. नाही म्हंटले तरी गाडी पाहिल्यावर आतमध्ये कुणीतरी बिग मॅन असणार याचा अदाज सगळ्यांनाच आला होता. मॅनेजरही धावला तेथे! कोण उतरले तर पंचवीस, सव्वीस वर्षांची एक मुलगी! एकटी!

कुणाकडे धुंकूनही न पाहता ती कुणीतरी दिशा दाखवलेल्या व्हॅली साईड रेस्टौरंटकडे तरातरा चालत निघाली. रॅव्हाईन किंवा पाचगणी या बाबी आत्ता तिचे मन आकर्षून घेऊ शकतच नव्हत्या.

दुपारचे पावणे तीन वाजले होते आणि आता पंधरा मिनिटांनी ती भेट सुरू होणार होती.

मोनाने फ्रेश लाईम मागवले आणि शांतपणे दरीकडे पाहात ती बसून राहिली.

अचानक कुणीतरी समोर येऊन बसले.

मोना - आय अ‍ॅम फाईव्ह.. नंबर फाईव्ह..

सिवा - आय नो... आय अ‍ॅम सिवा...

हा माणूस आपल्याला इमेल्स पाठवत असेल यावर विश्वासच बसेना मोनाचा! पण तसे नसते तर तिच्यापुढ्यात तिथे येऊन बसण्याचे इतर कुणाचे धाडसच झाले नसते.

सिवा केवळ साडे पाच फुटी होता. सावळा रंग, शार्प डोळे, दाढी आणि एखाद्या सेल्स एक्झिक्युटिव्हसारखा फॉर्मल पोषाख! डोळे हासरे होते. जणू समोर बसलेली व्यक्ती ही आपल्या कंपनीची क्लाएंट आहे आणि आपल्याला तिच्याचकडून एक मोठ्ठी ऑर्डर मिळू शकणार आहे अशा पद्धतीचे भाव त्याच्या चेहर्‍यावर होते.

हा अभिनय होता. आणि हा अभिनय होता हे लवकरच मोनालाही समजून चुकणार होते. कारंण सिवा तिच्याशी काहीतरी फार फार गंभीर बोलायला पार मुंबईहून आला होता.

मोना - how can I identify you?

सिवा - कार्ड...

सिवाकडे त्याच्या सिक्युरिटी एजन्सीचे कार्ड होते. अर्थातच, त्याचा वरवरचा धंदा विविध ठिकाणी सिक्युरिटी स्टाफ पुरवणे हाच होता.

मोना - ओके... ज्यूस??

सिवा - चहा...

चहा, कुकीज आणि आणखीन एक फ्रेश लाईम आले आणि मग मोनाने तोंड उघडले.

मोना - तुम्हाला काय माहिती आहे ते मला सांगाल काय?

सिवा - नाही. तुम्ही माझ्या क्लाएंट नसल्यामुळे मी ते सांगू शकणार नाही.

मोना - पण तुम्ही मला इमेल मात्र केलीत रणजीत श्रावास्तव येणार असल्याची!

सिवा - त्याचे कारण असे आहे की तुम्ही पाठवलेले फायनल पेमेंट अकरा हजाराने अधिक होते. ते तुम्हाला परत देऊन गरीब होण्यापेक्षा मी माझ्याकडे असलेल्या माहितीचा एक पीस तुम्हाला इमेल केला.

मोना - अच्छा! थोडक्यात तुम्हाला मी क्लाएंट व्हायला हवी आहे..

सिवा - आग्रह नाही..

मोना - त्या शिवाय इतक्या लांब, पाचगणीला कसे काय याल तुम्ही?

सिवा - अर्थातच तुम्ही क्लाएंट व्हावेत याचसाठी... पण... मी मार्केटिंग एजन्ट नाही...

मोना - तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देण्यात माझा फायदा काय?

सिवा - माहिती...

मोना - आणि नंतर ती माहिती मला निरुपयोगी किंवा जुनी वाटली तर...

सिवा - पैसे परत...

मोना - कशावरून?

सिवा - विश्वास.. या एकाच गोष्टीवर माझा धंदा चालू शकतो...

मोना - पण माझ्याकडे काही कारण तर असायला पाहिजे ना एजन्सी नेमण्याचे...

सिवा - अर्थातच.. आणि ते आहे असे मी समजत आहे...

मोना - काय कारण आहे??

सिवा - मॅडम... मला इथे भेटायला तुम्ही बोलावले आहेत... मी तुम्हाला बोलावले नाही....

मोनाला आजवर मिळाले नसे असे सडेतोड आणि उद्धट उत्तर मिळाले. एकदा हे व्हायला हवेही होते. मोहन गुप्तांनी प्रोव्हाईड केलेल्या सुरक्षित वातावरणात ती एक महान व्यक्ती जरूर होती. पण बाहेरच्या जगात तिच्या हेलिक्सची एम डी असण्याला काहीही महत्व नव्हते. ते तिला आत्ता लक्षात आले.

हा सामान्य माणूस आपल्याला असे उत्तर तोंडावर देईल हा तिचा अंदाजच नव्हता. तिला वाटत होते की तो पार मुंबईहून येत आहे याचाच अर्थ त्याला आपल्याकडून भली मोठी फी हवी आहे आणि त्या बदल्यात तो आपल्याला माहिती पुरवणार किंवा आपल्यासाठी काम करत राहणार!

पण काल त्याने इमेलच्या माध्यमातून टाकलेला बॉम्ब फारच संहारक होता. आपल्या आईला कोणती टॅब्लेट वापरून मारले हेही सिवाला माहीत होते. आणि ते त्याने फुकट सांगीतलेले होते. त्यमुळे आपणच आज सकाळी त्याला इमेल करून तातडीने पाचगणीला बोलावले आहे आणि आता तो आपल्याला नेमके तेच ऐकवत आहे हे लक्षात आल्यामुळे मोना काही क्षण कृद्ध झाली. पण सिवा योग्यच बोलतो आहे हे लक्षात आल्यावर तिने स्वतःचा इगो जरा दूर ठेवला.

मोना - तुमचे चार्जेस कसे असतात?

सिवा - कामाच्या स्वरुपावर अवलंबून आहे. आम्ही देशाबाहेरचे काम स्वीकारूच शकत नाही. कारण मर्यादा आहेत. तसेच काश्मीर, अतिरेक्यांनी नियंत्रणात घेतलेला प्रदेश व अ‍ॅक्सेस अशक्य आहे असा भारतातील कोणताही प्रदेश आम्ही कव्हर करत नाही. जेथे समुद्रातून, नदीतून किंवा तलावातून ट्रॅव्हल आहे तेथेही आम्ही जात नाही. डोंगर, दर्‍या, जंगले अशा ठिकाणी आम्ही जात नाही. आमच्याकडे निष्णात खबरे, पाळत ठेवणारे, विविध क्षेत्रातील जुजबी ज्ञान असणारे व शारीरीक दृष्ट्या तंदुरुस्त असे साधारण पन्नास लोक आहेत. एखाद्या क्लाएंटला, उदाहरणार्थ, फक्त स्वतःच्या नवर्‍यावर लक्ष ठेवायचे असते. त्यात हेतू असा असतो की नवरा आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही हे तपासायचे असते. अशा वेळेस फार तर दोन माणसे किंवा बहुधा एकाच माणसाकडून ते काम केले जाऊ शकते. मॅडम, आपल्याला आश्चर्य वाटेल, पण माऊथ टू माऊथ पब्लिसिटीतून मला अशी कामे मिळतात. मी कधीही डिटेक्टिव्ह एजन्सीची अ‍ॅड करत नाही. आणि आश्चर्याची बाब म्हणजे एकट्या मुंबईतच, माझा पार्टनर दुसर्‍या कुणामध्येतरी गुंतलेला आहे का हे तपासण्यासाठी बहुसंख्य क्लाएंट्स माझ्याकडे येतात. माझी बहुतेक सर्व माणसे सध्या मुंबईतच असल्याच गोष्टींचा तपास घेण्यासाठी फिरत आहेत. नंबर झिरोची केस ही गेल्या सहा वर्षातील एकच अशी केस होती ज्यात काहीतरी चॅलेंजही होते आणि ज्यात खूप मोठ्या रकमेसाठी अनेक व अनेक प्रकारचे गुन्हे होण्याची शक्यताही होती आणि ते गुन्हे झालेही!

असे गुन्हे झाल्यास पोलिसांना सांगणे हे आमच्या कार्यकक्षेत आम्ही ठेवलेले नाही. खरे तर शासनाची मदत करायला हवी. पण आम्ही ते करत नाही याचे कारण ते गुन्हे आहेत हे मुळात फिर्यादी पक्षाकडच्या कुणाला स्वतःलाच मान्य नसते.

म्हणजे, समजा एखाद्या माणसाचा खून झाला, तर त्याचे नातेवाईक स्वतःच तक्रार दाखल करतील. पण त्याचा खून झालेला आहे हेच त्यांना माहीत नसले तर ते कशाला त्या भानगडीत पडतील? नाही का? अशा वेळेस आम्हीही ते लावून धरत नाही. मात्र, मोहन गुप्तांची केस अशी आहे की तिची व्याप्ती फक्त तुमच्या कंपनीतील सूडनाट्यापुरती मर्यादीत नाही. ती बाहेरही फोफावू शकते. अजूनही मी 'बझट' बद्दल शासनाला काहीही सांगू शकत नाही. कारण मी बेकायदेशीर डिटेक्टिव्ह आहे. पोलिसांना ते माहीत आहे. पण त्यांना मी मॅनेज करतो. इतकेच नाही तर माझी संघटना अनेकदा मी त्यांच्यासाठी फुकटही राबवतो. त्यामुळेच मी तगून आहे. पण बझटबद्दल मी काही सांगणे हा माझाच घात ठरेल. कारण तसे असेल तर जया गुप्तांची केस मला संपूर्णपणे माहीत असूनही मी ते शासनाच्या निदर्शनास आणले नाही असा माझ्यावरच ठपका ठेवला जाईल.

तर, आमच्या संघटनेबद्दल! आमच्याकडे असलेले लोक अर्थातच केवळ भरपूर पैसे मिळतात म्हणूनच काम करतात. ते आम्हाला कसे मिळत गेले ही बाब आत्ता डिस्कस करण्यात अर्थ नाही. ते चांगले पदवीधारक असतात, कधी दाणगट असतात तर कधी सुर्रकन इकडून तिकडे वेगवान प्रवास करू शकणारे असतात. त्यात तेरा स्त्रियाही आहेत. यातील अनेक लोकांना बिझिनेस, बॅकींग, शिपिंग, कम्युनिकेशन इंडस्ट्री, अनेक शहरे, काही भाषा असे अनेक प्रकारचे जुजबी ज्ञान असते. उदाहरणार्थ, एखादा संशयीत जर रेस्टौरंटमध्ये एकटाच बसून कॉफी पीत असेल व नंतर त्याला कुणी भेटायला आले तर ते इंग्लीशमध्ये काय बोलले आणि बिझिनेसबद्दल बोलले असतील तर त्यातील महत्वाचे काय होते हे समजण्याची क्षमता आमच्या लोकांमध्ये असू शकते.

मॅडम, अर्थातच आमचा कुणीही माणूस कुणाच्याही घरी कधीही जाऊ शकत नाही. बाहेरच जे काय समजून घेता येईल तेवढे! पण मी स्वतः मात्र अनेक पातळ्यांवर प्रचंड लढत असतो. आज मी शासन दरबारी माझे वजन टिकवले आहे. अनेक बॅन्का, अनेक हॉटेल्स, काही सरकारी ऑफीसेस येथे माझी स्वतःची खूप ओळख व खूप चांगले संबंध आहेत. एखाद्याने महाराष्ट्र बॅकेतून बॅन्क ऑफ बरोडाशी काही ट्रॅन्झॅक्शन केले तर बॅन्क ऑफ बरोडाच्या तिसर्‍याच एखाद्या ब्रॅन्चमधला माणूस मला संगणकावर ते पाहून माहिती देऊ शकतो.

याचा फार फार उपयोग होतो. सगळीकडेच माझ्या ओळखी असू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक केसगणीक जेथे जेथे जावे लागेल तेथे तेथे पुढे माझा एक कॉन्टॅक्ट निर्माण करून ठेवतो. त्यामुळे पुढे एखाद्या केसमध्ये जर मला तिथलीच काही माहिती हवी असली तर मी ती मिळवू शकतो.

लक्षात घ्या की हे सगळे तुम्हाला सांगण्याची जरूर नसली तरी मी केवळ याचसाठी सांगत आहे की तुम्हाला आमच्या कार्यपद्धतीचा निदान अंदाज तरी यावा!

आमचे चार्जेस खूप हाय असतात. उघड आहे, एवढी मोठी संघटना आणि जगातील इतके सगळे कॉन्टे़ट्स मेन्टेन करणे म्हणजे खर्च करावा लागणारच! त्यात पुन्हा पोलीस खातेही आहेच!

आम्ही फक्त माहिती विकतो. माहिती मिळवून ती क्लाएंटला देण्याचे पैसे मिळतात आम्हाला! आम्ही दिशा दाखवत नाही, मार्गदर्शन करत नाही किंवा सल्लाही देत नाही.

एखाद्या बाईचा नवरा आज दिवसभरात कुठे कुठे गेला हे आम्ही तिला सांगू शकतो. पण तो जर त्याच्या ऑफीसमध्ये दिवसभर बसून राहिला तर तो कुणाशी फोनवर बोलला हे कसे सांगणार! ते सांगता यावे म्हणून मुंबई, पुणे, नागपूर आणी काही महत्वाच्या शहरांमधल्या टेलिफोनच्या ऑफीसेसमध्ये आम्ही जबरदस्त संपर्क करून ठेवलेले असतात. त्या लोकांना खुष करण्यासाठी आम्ही पाण्यासारखा पैसा वाहवू देतो मॅडम! आत्ता तुम्ही इथे आहात पाचगणीत, तिकडे तुमच्या बंगल्यावरून कुणाकुणाला कॉल्स केले गेले याची साद्यंत हकीकत मी तुम्हाला आजच केवळ दोन तासांनी इमेलवर सांगु शकतो.

पण दोन माणसे जर बंदिस्त खोलीत एकमेकांना भेटली तर ती काय बोलली ते आम्हाला अर्थातच समजू शकत नाही. आम्ही कोणाच्याही घरी, कोणत्याही हॉटेलच्या रूममध्ये जाऊ शकत नाहीच!

फोटो! फोटो काढणे अत्यंत अवघड आहे. पण ते काही प्रमाणात आम्ही करू शकतो. तसेच बोलणे टेप करणे हेही अवघड आहे. परिस्थिती अगदीच सुलभ असली तरच बोलणे टेप करू शकतो. पण बहुतेकवेळा ते नाहीच!

नाऊ कमिंग टू मोहन गुप्ताज केस! मोहन गुप्ता हे गेले दिड वर्षे आमचे अशील होते. बहुधा त्यांना आमचा सुगावा कंपनीतीलच कुणाकडून तरी लागलेला असावा. त्यांची रिक्वायरमेन्ट नक्की काय होती हे मी तुम्हाला तोपर्यंत सांगू शकत नाही जोपर्यंत त्याच इन्टरेस्टने तुम्हीही मला एक स्वतंत्र कॉन्ट्रॅक्ट देता! अर्थातच, पुन्हा सांगतो की माझे सर्व काम विश्वासावर चालते. मी सुरुवातीलाच ऐंशी टक्के अ‍ॅडव्हान्स घेतो. काम झाले किंवा नाही झाले तरीही हे पैसे मी परत देऊ शकत नाही. कोणतीही लिखापढी नाही. तुमच्याकडून पैसे घेण्याची पद्धतही फार वेगळि असते.

तुम्ही जरी मला कोन्ट्रॅक्ट दिलेत तरी मी त्याला 'मोहन गुप्तांची केस' असे ट्रीट करू शकणार नाही. म्हणजे, समजा गुप्तांनी मला पुर्वी कोणत्यातरी माणसाचा पाठलाग करायला सांगीतले असेल तर त्याचा पाठलाग मी आज तुमच्याहीसाठी करेन असे मुळीच नाही. मी तुमची केस स्वतंत्रपणे ट्रीट करेन! म्हणजे, तुम्हाला ज्या माहितीची आवश्यकता आहे त्यासाठी त्या माणसाची जर जरूर नसली तर मी त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. तसेच, ज्या माणसाची जरूर मोहन गुप्तांना अजिबात नव्हती त्याची जरूर तुमच्या केसमध्ये लागू शकेलही!

आम्ही एका अशीलाची जरूर दुसर्‍या अशीलाला कधीही सांगत नाही. तुमच्याच बाबतीत प्रोअ‍ॅक्टिव्हली मदत करण्याचे कारण इतकेच आहे की मोहन गुप्तांनी एकेकाळी दिलेल्या पैशांमुळे मी एका मोठ्या प्रकरणातून वाचलेलो होतो. हे खरे तर त्यांना माहीतही नव्हते. त्यांनी ते पैसे माझी फी समजून पाठवले होते. पण मी ते स्वतःला वाचवण्यासाठी वापरलेले होते. अर्थात, त्या बदल्यात मी त्यांचे भरपूर कामही केले! तर, त्यांना काय हवे होते हे माहीत असताना तुम्हाला मी टिप्स देण्याचे कारण इतकेच होते की गुप्तांमुळे मी एकदा वाचलो होतो.

एकाच केसमध्ये दोन माणसे आमची अशीले असू शकतात हे कृपया निट समजून घ्या! बायकोला नवर्‍याबद्दल असलेला संशय आणि त्याच नवर्‍याला पत्नीबद्दल असलेला संशय! अशा दोन्ही केसेस मी घेऊ शकतो. तुमच्याही केसमध्ये मी कदाचित एकाहून अधिक अशीले स्वीकारली असती! पण एक तर मला तशी ऑफर कधी आलीच नाही. आणि महत्वाचे म्हणजे, जरी कितीही बेकातदेशीर धंदा असला तरी तो उभा आहे तो माणुसकीच्याच अधिष्ठानावर! म्हणजे, मला जर माहीत आहे की गुप्ता ट्रॅप होत आहेत व मुळात ते सज्जन आहेत तर त्यांना ट्रॅप करणार्‍याचे कॉन्ट्रॅक्ट मी घेऊच शकणार नाही. पतीपत्नीच्या केसेस दोघांनाही हार्मफुल नसतात. पण हेलिक्सची केस अत्यंत डेलिकेट आहे. त्यातील माहितीच्या एका लहानश्या धाग्याचा दुसर्‍या कुणालातरी फार वाईट हेतूसाठी उपयोग होऊ शकेल. आणि मुख्य म्हणजे बझट हा प्रकार फैलावला तर सगळ्यांनाच खूप धोका आहे.

पेमेंट मी कॅश घेतो. माझा एक माणूस ते माझ्याच दुसर्‍या माणसाकडून घेतो. दुसरा तिसर्‍याकडून! अशी चेन वापरली जाते. माझा तब्बल चौथा किंवा पाचवा माणूस ते प्रत्यक्षात तुमच्या माणसाकडून घेतो. या चेनच्या प्रत्येक टप्यावर रक्कम निम्मी केली जाते. म्हणजे तुम्ही दिलेले दोन लाख माझ्याकडे येईपर्यंत कदाचित फक्त सव्वा सहा हजार असू शकतात. मग दिड महिन्याइतक्या दीर्घ कालावधीत उरलेले पैसे हळूहळू माझ्याकडे येत राहतात! आजवर एका पैशाचीही अफरातफर झालेली नाही.

माझ्या क्लाएंट्समध्ये अनेक प्रतिष्ठित नागरीक असू शकतात. कुणीही असू शकते. मात्र, अर्थातच ती असामी जबरदस्त श्रीमंत मात्र असते. माझा कोणताही माणूस क्लाएंटला डायरेक्ट रिपोर्टिंग करत नाही. मी इमेल्सचा वापर आजवर फक्त चारच केसेसमध्ये केलेला आहे. त्यापैकी तीन केसेस सोडवूनही आज तीन वर्षे झाली. चौथी केस गुप्तांचीच होती. मी माझ्या ऑफीसमधून हार्डली इमेल करतो. काल रात्री तुमच्या इमेलचे उत्तर दिले. अशा गोष्टी फारच अपवादात्मक! बहुधा मी विविध सायबर कॅफेंमध्ये जाऊन इमेल्स करतो. मुळात इमेलवर रिपोर्टिंगच अत्यल्प असते.

माझ्याकडे असलेल्या पन्नास एक जणांचा माझ्या सिक्युरिटीच्या बिझिनेसमधल्या एकाशीही काहीही संबंध नसतो.

पूर्ण गुप्तता आणि अधिकाधिक माहिती या दोन गोष्टींवर आमचा धंदा चालतो. त्यात विश्वास हा पाया असतो.

गुप्तांच्या केसमध्ये आजही इन्टरेस्ट घेण्याचे कारण एकच.... ते म्हणजे... बझट...

माझे बोलणे झालेले आहे. तुम्हाला काही बोलायचे असले तर विचारा....

मोना - हं...

कितीतरी वेळ मोना दरीकडे पाहात लाईम ज्यूस सिप करत बसली होती. सिवाही दरीकडेच पाहात होता. पण तो टेबलवरच्या टिश्यू पेपरवर जणू दरीचे चित्र काढतो आहे असे आविर्भाव करत होता. चित्रही खरच काढत होता, पण तो काही चित्रकार नव्हता. हे दोघे असे काय नुसतेच बसलेत असे कुणाला वाटू नये म्हणून ही शक्कल लढवली होती त्याने!

मोनाने तोंड उघडले.

मोना - डॅडचा इन्टरेस्ट नेमका काय होता??

सिवा - नाही सांगू शकत....

मोना - माझा इन्टरेस्ट काय असायला हवा??

सिवा - तेही नाही सांगू शकत...

मोना - समजा मी क्लाएंट झाले तर सांगाल??

सिवा - नाही... नक्कीच नाही.. तुम्हाला क्लाएंट होताना तुमचा इन्टरेस्ट स्वतःच सांगावा लागेल...

मोना - माझा इन्टरेस्ट तोच आहे जो डॅडचा होता असे सांगीतले तर??

सिवा - सॉरी...

मोना - मग मला बझट बिझट च्या इमेल्स का पाठवता??

सिवा - सरळ आहे.. त्यात समाजाचेही भले आहे आणि गुप्तांनी एकदा मला वाचवलेले होते आणि तुम्ही फायनल पेमेंट म्हणून पाठवलेल्या रकमेत मी तेवढी माहिती दिली... तुम्हाला आठवेल की तुम्ही माझ्याशी संभाषण सोडल्यानंतर तुम्हाला मी स्वतःहून पाठवलेली एकमेव इमेल आहे ती!

मोना - मी तुम्हाला एंगेज केले तर चार्जेस किती असतील??

सिवा - केसचे स्वरूप काय असेल??

मोना - व्यक्तीशः माझे आणि गुप्ता हेलिक्सचे शत्रू काय काय करत आहेत ते मला सांगणे...

सिवा - शत्रू माहीत आहेत तुम्हाला??

मोना - अंदाज आहे.. पण... मला वाटते की तेही तुम्हीच शोधावेत..

सिवा - हं... महिना तीन लाख...

मोना - काय???????

सिवा - तीन लाख... महिन्याला...

मोना - का??

सिवा - का म्हणजे???

मोना - फक्त ते काय करत आहेत ते सांगण्याचे तीन लाख???

सिवा - कोण शत्रू आहेत ते सांगा.. दिड लाखावर आणतो...

मोना - छे छे.. दिड लाख महिना तरी काय झाले??? उपयोग काय त्या माहितीचा??

सिवा - तुम्ही एक पाऊल पुढे राहाल..

मोना - आणि त्या लोकांनीही एखादा डिटेक्टिव्ह नियुक्त केला की तेही दोन पावले पुढे राहतील..

सिवा - तो माझा प्रश्न नाही...

मोना - सॉरी... मी इतके चार्जेस फक्त इन्फर्मेशनसाठी देऊ शकत नाही...

सिवा - ओके.. नो प्रॉब्लेम...

मोना - कारण मी स्वतःची माणसे लावली तर तेच काम मी काही हजारात करू शकते...

सिवा - शक्य आहे... निघू???

मोना - होप ... नो मिसअंडरस्टँडिन्ग्ज...

सिवा - नॉट अ‍ॅट ऑल..

सिवा सरळ जायला उठला. कित्येक तास फुकट गेले होते दोघांचेही! सिवासाठी ती एक बिझिनेसची संधी असल्यामुळे पाचगणिला येणे ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच होती त्याच्यादृष्टीने... पण मोनासारख्या महत्वाच्या व्यक्तीचा एक दिवस फुकट जाणे म्हणजे फारच होते....

मोनाने पुन्हा हाक मारली त्याला...

तो येऊन बसला...

सिवा - येस...

मोना - मी जर फक्त... काही विशिष्ट माणसांनी केलेले फोन कॉल्स मागीतले तर???

सिवा - किती कालावधीसाठी???

मोना - समजा... आजपासून पुढील काही महिने...

सिवा - देऊ शकेन... किती माणसांचे?? उदाहरणार्थ??

मोना - सहा माणसे???

सिवा - पंचेचाळीस हजार... महिना..

मोना - हेही फार आहे...

सिवा - हो... आमचे चार्जेस खूपच आहेत... पण.. लक्षात घ्या की.. नंबर एक आणि नंबर दोन जर अजूनही एकमेकांशी सतत संपर्कात आहेत असे तुम्हाला समजले तर तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकाल..

हादरून मोना सिवाकडे पाहात होती.

मोना - अजूनही म्हणजे???

सिवा - नंबर दोनना घालवलेत की तुम्ही काही महिन्यांपुर्वी... पण...

मोना - पण???

सिवा - पण ते जर अजूनही इन्व्हॉल्व्ह्ड असले तर??

मोना - कॅश कुठे द्यायची???

सिवा - एकवीस नंबरला उद्या बंडगार्डनपाशी एक माणूस भेटेल.. सहा वाजता संध्याकाळी... कोड वर्ड 'मस्त आहे की नाही मर्सिडीझ??' आणि त्यावरचे उत्तर 'मर्सिडीझ मस्तच असते'! निळा शर्ट, माझ्याइतकीच उंची, फेअर कलर, पुलाच्या सुरुवातीला नदीकडे पाठ करून सिगारेट ओढत असेल...

मोना - .... एकवीस?? एकवीस म्हणजे कोण??

सिवा - संजय... तुमचा आत्ता आलेला ड्रायव्हर...

मोना - हं.. (मोना मनातच चरकली होती. संजयलाही सिवाने नंबर दिला आहे????)

सिवा - निघतो....

मोना - ... मला... गेल्या आठ दिवसांपासूनचे फोन डिटेल्स हवे आहेत...

सिवा - कुणाकुणाचे??

मोना - एक, दोन, तीन, चार, सहा, नऊ, अकरा, सोळा....

मोनाने लोहिया, अर्देशीर, जतीन, सुबोध, सायरा, शर्वरी, पराग म्हणजे जुना ड्रायव्हर आणि इरफान अब्दुल्लाह कव्हर केलेले होते...

सिवा - आणि तुमचा बंगला???

मोना - अरे हो...

सिवा मंद हासला.

सिवा - एवढ्याजणांचे एकदम अशक्य आहे... परवापासूनच मिळू शकतील.. फार तर...आणि कालपासूनचे सगळे...

मोना - कधी कळवणार???

सिवा - पुण्यात पोचलो की इमेल करतो... सायबर कॅफेतून...

मोना - तुम्हाला इथून पुण्यात पोचेपर्यंत ते सगळे समजेल???

सिवा - मला वाईपर्यंतच समजेल... पण वाईत सायबर कॅफे नाही आहे...

मोना - कसे आलायत??

सिवा - मी बसनेच जातो जवळच्या ठिकाणी... कार डोळ्यावर येते लोकांच्या...

मोना - मी ड्रॉप करू शकते तुम्हाला.. पुण्यापर्यंत...

सिवा - आणि ते एक नंबरला कळूही शकते... नाही का??

हादरून मोना त्याच्याकडे पाहात असतानाच शिवा रॅव्हाईनच्या दारातून बाहेर पडलाही होता.

आणि बरोब्बर साडे तीन तासांनी आरामात बंगल्यावर पोचलेल्या मोनाने पीसी ऑन करून सिवाची इमेल आली आहे का हे चेक केले तेव्हा..

४४० चा धक्का बसला होता तिला...

काल कधीतरी.... रात्री साडे नऊच्या सुमाराला... नंबर झिरोकडून.. नंबर दोनला कॉल गेला होता... आणि... साधारण त्याचनंतर तीन एक मिनिटांनी... नंबर दोनकडून जो कॉल लागला होता.. तो ब्ल्यू डायमंडचा आहे हे मोनाने फटकन डिरेक्टरीतून कन्फर्म करून घेतले होते...

आपण बंगल्यावर असतानाच... डॅनियल बॅरेटबरोबरचे सगळे कॉल्स झाल्यानंतर... आणि सायरा लोहियांकडे निघून गेल्यानंतर... आपल्या बंगल्यावरून कुणीतरी अर्देशीर सरांना कॉल लावलेला होता... आणि पाठोपाठ अर्देशीरांनी लोहियांना...

कुणीतरी मनात आणले तर आपण आज रात्रीसुद्धा मरू शकतो याबाबत मोना या क्षणी ठाम झालेली होती...

आणि त्याचवेळेस मागून सायरा सांगत होती...

"मॅम.. लोहिया सरांचा कॉल आहे..."

आवाजात अत्यंत आपुलकी ओतत मोनाने विचारले...

मोना - हाय अंकल.. हाऊ आर यू???

लोहिया - व्हेरी वेल बेटा... हाऊ अबाउट यू??

मोना - आय अ‍ॅम फाइन टू.. बोला अंकल..

लोहिया - बेटा... मोहन गुप्ता आज असते तर त्यांना तुझा किती अभिमान वाटला असता...

मोना - का??

लोहिया - डॅनलाईन तू हेलिक्सम्ध्ये आणलंस... आय अ‍ॅम रिअली प्राऊड बेटा.. रिअली प्राउड..

मोनाने अत्यानंदाने चीत्कार व्यक्त केला फोनवर! खूप वेळ दोघेही प्रेमाने बोलत होते एकमेकांशी! नंतर लोहिया म्हणाले..

लोहिया - आता डॅनलाईन तूच हँडल कर स्वतंत्रपणे.. काही लागले तर मी आहेच...

मोना - हे काय हे अंकल??

लोहिया हसू लागले.

लोहिया - अगं तू इतकी कर्तृत्ववान आहेस... रागावतेस कसली?? मी खरंच म्हणतोय...

मोना - तुम्ही नसाल तर मला काय आनंद आहे???

लोहिया - मी काय काय बघायचे बेटा??

मोना - ते ही खरं आहे अंकल... ठीक आहे.. बघू.. मला वाटते जरा फ्रेश कुणीतरी हायर करूयात...

लोहिया - चांगली आयडिया आहे.. कुणी आहे डोळ्यासमोर??

मोना - अं... एक जण आहे खरा.. पण बघते...

लोहिया - कोण??

मोना - रिको म्हणून आहे...

रेजिनाला त्याच्या घरचे लोक रिको म्हणतात हे मार्केटमध्ये कुणाला माहीत नसले तरीही सिमल्याला ते मोनाला माहीत झालेले होते...

लोहिया - कोण आहे तो???

मोना - आहे एक.. सांगेन मी... तुमच्याकडेच पाठवेन...

लोहिया - राईट बेटा.. ठेवू??

मोना - हं.. बाय अंकल... बाय द वे... सरांचा फोन येतो कधी तुम्हाला??

एक क्षणभराची भीषण गॅप निर्माण झाली फोनवर...

लोहिया - छे.. कधीच नाही... तुला??

मोना - अंहं.. रागावलेत ते...

लोहिया - एकदा भेटायला पाहिजे त्यांना..

मोना - हं... बाय अंकल..

फोन ठेवल्यावर मोनाने क्षणभरच फोनकडे हिंस्त्र नजरेने पाहिले. अर्देशीरांचा फोन मला अजिबात येत नाही हे लोहिया साफ खोटे बोललेले होते.

===============================================

समोरच्या माणसाकडे हतबुद्ध होऊन लोहिया पाहात होते. हा इथे?? का? मोनाला वेड लागले बहुधा!

लोहिया - हाय... सो यू आर द न्यू हेड..

रेजिना - यॅह..

तब्बल अर्धा तास दोघेही गिअर्स मार्केटबद्दल बोलत होते. रेजिना आज मुंबईला लोहियांना भेटायला आला होता. येथून पुढे तो पंधरा दिवस मुंबईतच राहणार होता. शिपिंगचे विविध नियम, कस्टमच्या फॉर्मॅलिटीज, शासकीय ऑफीसेसमधल्या मीटिंग्ज वगैरे!

पहिल्या दिवशी तो लोहियांशी जे गिअर्सबद्दल बोलला ते शेवटचे! त्यानंतर विषय फक्त डॅनलाईनचा!

काही म्हणा, पण लोहियांमधला बिझिनेसमन अत्यंत खुष होता. भयंकर डायनॅमिक माणूस होता रेजिना! रोज फोन करून लोहिया मोनाला त्याच्याबद्दल सांगायचे.

मात्र मोना अधिकाधिक खचू लागली होती. कारण रोजच्या इमेलवर सिवाकडून डिटेल्स येत होती. रोजच अर्देशीर आणि लोहिया बोलत होते. जतीन, सुबोध हेही रेग्युलर टचमध्ये होते. मात्र या सर्व दिवसांमध्ये बंगल्यावरून अर्देशीरांना एकही कॉल गेलेला नव्हता.

आणि त्यातच शर्वरी कुंभार एक दिवस पुण्याला आली होती. मोनाला भेटायला!

रेजिना जोईन झाल्यानंतर बारा दिवसांनी आज शर्वरी मोनासमोर बसली होती.

मोना - येस शर्वरी...

शर्वरी - मॅडम... मी खरे तर लोहिया सरांना सांगणार होते. पण.. कसं सांगायचं तेच समजत नव्हतं...

मोना - काय झालं??

मोनाला वाटले बहुध हीपण सोडून चाललेली दिसतीय!

शर्वरी - मुंबईला जाऊन मला खरे तर ... जरा... जरा सुटकाच झाली माझी...

मोना - म्हणजे??

शर्वरी - मला इथे खूप.. हॅरॅसमेन्ट व्हायची मॅडम...

मोना - इथे?? कसली हॅरॅसमेन्ट??

शर्वरी - म्हणजे.. खूप पर्सनल स्वरुपाची...

मोना - कोण त्रास द्यायचं???

शर्वरी - प्लीज मॅडम.. मी नाव सांगते.. पण.. त्यात मला घेऊ नका...

मोना - अंहं.. काळजी करू नकोस... बोल..

मोनाला खरे तर धक्काच बसलेला होता. हिला काय प्रॉब्लेम होता इथे असताना???

शर्वरी - मला.. हेच कपडे घालत जा.. यातच चांगली दिसतेस... आज संध्याकाळी मीटिंगला तूही ये.. असे म्हणायचे....

मोना - कोण??

शर्वरी - मेहरा सर...

खाडकन उडलीच मोना! मेहरांची नजर अशीकधीच नव्हती. एक स्त्री म्हणून मोनाला ते व्यवस्थित माहीत होते. मेहरांचे वागणे कायम एका मोठ्या भावासारखे किंवा वडिलांसारखेच होते. मेहरा डॅडना जवळचे वाटत होते. लोहियांचे आणि मेहरांचे मतभेद खूप होते. नक्कीच शर्वरीच्या तक्रारीत काहीही दम नव्हता.

मोना - हे तू... आत्ता... आज इतक्या दिवसांनी का सांगतीयस???

शर्वरी - धाडसच होत नव्हते मॅडम...

मोना - हं... किती दिवस चालले होते हे??

शर्वरी - खूप दिवस मॅडम... मी सायरालाही एकदा म्हणाले होते....

मोना - अच्छा? ... हं... ठीक आहे...

शर्वरी - मॅडम... मी... मी तक्रार करू शकते लेखी???

आत्ता मोनाला गेम समजली. मेहरांचे स्थान धोक्यात आणण्यासाठी चाललेले होते तर सगळे! याचाच अर्थ मेहरा आपल्याला हवे आहेत. कंपनीला हवे आहेत.

मोना - तक्रार जरूर करू शकतेस... पण माझ्यामते तू ही तक्रार माझ्याकडे थेट करू नयेस! तू ही तक्रार भसीनकडे पाठवायची असली तर पाठव! कंपनीच्या पॉलिसीज आहेत त्याबाबतीत! त्या फॉलो करायलाच हव्यात! मी तुला फक्त एक अ‍ॅश्युअरन्स देऊ शकते, की त्यात काही तथ्य आढळले तर योग्य ती कारवाई केली जाईल.

शर्वरी उठली. तिचे काम जवळपास झाल्यातच जमा होते. एच आर च्या भसीनकडे लेखी़ तक्रार पाठवली की नाही म्हंटले तरी कंपनीला दखल घ्यावीच लागणार होती. एच आर मधून लीक होत होत सर्वत्र ती बातमी पोचणार होती आणि नंतर मेहरा बदनाम होणारच होते. शर्वरीसारख्या स्त्रीला लोहिया आणि सुबोध हे कवच लाभल्यामुळे तिच्या बदनामीचा प्रश्न तिला स्वतःला नव्हताच!

शर्वरी दाराकडे जायला निघली तसे मोनाने तिला थांबवले..

शर्वरी - येस मॅडम...

मोना - तुला ... मुंबईला काही त्रास वगैरे नाही ना व्हायचा??

शर्वरी - नाही मॅडम... कधीच नाही होत असलं काही तिथे...

मोना - मग ठीक आहे... मला वाटायचे सुबोधही तुला मालाडच्या राज इन्टरनॅशनलमध्ये बोलवायचा ते हॅरॅस करण्यासाठीच....

मुळापासून उखडले जाणे याचा अर्थ काय असतो ते आत्ता शर्वरीला समजत होते. तोंड दाबून बुक्यांचा मारही बरा म्हणायची वेळ होती ही!

मॅडमन आपल्याबद्दल संपूर्ण माहिती आहे हे पाहून ती गर्भगळीतच झाली होती. आत्ता मोनाने केलेल्या विधानावर काय प्रतिक्रिया द्यायची हेच तिला समजत नव्हते.

मोना - ठीक आहे.. ठीक आहे.. तू कर कंप्लेन्ट योग्य वाटले तर... हं???

शर्वरी मान हालवून बाहेर पडली तेव्ह मोनाला निट समजले होते. भसीनकडे शर्वरी कोणतीही तक्रार पाठवणार नाही हे! उलट.. पाठवलाच तर राजीनामाच पाठवेल...

आणि अंदाज खरा निघाला. सायंकाळी पाच वाजता मोना लोहियांनी पाठवलेली इमेल वाचत होती. शर्वरीचा राजीनामा स्वीकारल्याची!

हा गड सर झाला हा जरी आनंद असला तरीही एक मोठे दु:ख आत्ता दारात उभे होते.

खोबरेल तेलाच्या तीव्र वासाने मोनाची केबीन व्यापली.

"नमस्कार म्याडम... आज पहिल्यांदाच भेटतोय आपण.. काय?? बरं चाललंय ना बिझ्नेस्चं??"

वरकरणी तरी हसायला लागणारच होतं! मोनाला हा माणूस कधीच आवडलेला नव्हता. पण आजवर त्याच्याशी डायरेक्ट बोलायची वेळहि आलेली नव्हती. पण लवकरच येणार हे मोना जाणून होती. कारण वर्कर्सच्या अ‍ॅग्रीमेन्टचा महिना जवळ आला होता.

नाना सावंत! बिनदिक्कत मोनासमोर येऊन बसला होता. येऊ का विचारणे नाही, बसू का विचारणे नाही!

मोनानेही आता हेड ऑन घ्यायचे ठरवले. कोण कुठला मच्छर हा सावंत! आणि सरळ मित्राकडे आल्यासारखा अघळपघळपणे येऊन बसतो??

मोना - बोला सावंत.... काय म्हणताय??

नाना - आम्ही काय म्हणणार म्याडम.. आम्ही आपले कामगार... पगारी... हा हा हा हा ....

त्याच्या बोलण्यात एक गुंडगिरीचा दर्प होता... उगाचच! वास्तविक कोणत्याही कामगाराचे वाईट चाललेले नव्हते. पण ते अत्यंत वाईट चालले आहे असे कामगारांना पटवून देत राहण्यावर नाना सावंतची खुर्ची अवलंबून होती.

मोना - बोला...

नाना - काय नाय म्हंटलं अ‍ॅग्रीमेन्ट आलंय जवळ... बोलणी व्हायला हवीत...

मोना - हं... अ‍ॅग्रीमेन्ट करायचंच आहे... दिड महिना आहे अजून... काय म्हणताय?? काही ठरवले असलेत तर सांगून ठेवा...

नाना सावंतला मोनाशी बोलणे हाच एक अपमानास्पद भाग वाटत होता. एवढीशी चिमुरडी! हिला काय मागण्या सांगायच्या?

नाना - आता काय आहे म्याडम.. जग चाललंय पुढे पुढे... अन हेलिक्सचे कामगार राहतायत मागे...

भाषण ऐकावं लागणार हे समजलं होतं मोनाला... तिने समोरचे काम सरळ बाजूला ठेवले अन दोन्ही हातांची बोटे हनुवटीवर ठेवून नानाकडे संपूर्ण लक्ष पुरवले.

मोना - बोला बोला... मी ऐकतीय....

नाना - आज साधा टी.व्ही. नाही घेता येत आपल्या कामगारांना...

मोना - हंहं...

नाना - तुम्हाला सांगतो... परवाच एकाही म्हातारी वारली... तिला डायलिसीसवर ठेवावे लागायचे सारखे.. एका वेळेस वीस हजार... शेवटी मला म्हणाला.. उपचाराला पैसे नाहीत म्हणून म्हातारीला मरावे लागणार आहे.. म्याडम.. त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून मला इतकं वाईट वाटलं... हेलावलो मी... बायका धुणी भांडी करतात अजून आपल्या कामगारांच्या... भागतच नाही पगारात...

मोना - मागण्या तर सांगा??

नाना - हा हा हा! एकदम मुद्याचं बोलता तुम्ही... पण बरं वाटलं... गुप्तासाहेब आमचं जुन्यांच प्रेमाने ऐकून घ्यायचे.. पण आता फुल्ल स्पीडचं जग आहे.. तेव्हा.. मुद्यावर येतो... आम्हाला या वर्षी आठ हजार महिना वाढवून पाहिजेत... आणि दोन सुट्या जास्ती... लंच टाईम अर्ध्या तासावरून पाउण तासावर... गिअर्सची संख्या न मोजता मशीन अपटाईम मोजायचा...

मोना - बापरे....

नाना - काय थट्टा करताय म्याडम... ६४ करोड प्रॉफिट झालाय... कामगारांना नको होय मिळायला...

मोना - अर्थातच मिळायला पाहिजे... बघते मी... हं?? सांगते काही दिवसात...

नाना - ठीक आहे.. आम्ही पेपर तयार करून सादर करतो एक आठ दिवसात.. तुम्हाला टायम असेल तेव्हा चर्चेला बसू...

मोना - हो .. चालेल..

नाना - बाकी...

मोना - ???

नाना - आता बाहेर गेलो की सतरा जण विचारतील.. काय म्हणाल्या म्याडम.. तर.. साधारण काय अंदाज सांगायचा??

मोना - नाना.. तुम्हाला माहीत आहे की मी अजून नवीन आहे.. तुम्ही जुने लोक आहात... लोहिया सरांशी बोलायला लागेल.. या सगळ्याला वेळ लागेल..

नाना खुष झाला. 'म्याडम' स्वतःचा उल्लेख नवीन असा करत आहेत हे पाहून!

नाना - नाही म्हणजे आम्ही तर हे घेतल्याशिवाय राहणारच नाही आहोत..

मोनाची नजर करारी झाली. नानाच्या नजरेला भिडवून तिने विचारले.

मोना - नाना... मी तुम्हाला म्हणाले ना.. जरा वेळ लागेल म्हणून.. अजून दिड महिना आहे...

नाना - नाही नाही.. सावकाश सावकाश... तसं काही नाही... फक्त या वेळेस कामगारांच्या 'भौना' फार तीव्र आहेत.. म्हणून म्हणालो...

मोना - का? तीव्र का आहेत?? कंपनी करतेच की दर वर्षी नवीन अ‍ॅग्रीमेन्ट.. बाकीच्या कंपन्या तर तीन वर्षांनी करतात...

नाना - अहो पण पुरेसे मिळायला हवे ना? दिड अन दोन हजाराने काय होतंय??

हे बोलताना नानाचा टोन फारच उद्धट होता.

मोना - ओके ओके.. बघते मी हं?? काही दिवसातच भेटू पुन्हा..

नाना - हा! कारण मी समजावतो कामगारांना परोपरीने.. पण शेवटी त्यांच्या पोटाचा प्रश्न आहेच ना.. मी तरी किती वेळ नियंत्रण ठेवणार??

नाना सावंत पुन्हा संपाची गर्भीत धमकी देतो आहे हे मोनाच्या लक्षात आले. तिच्या तापट डोक्यात तिडीक आली. समोर येईल त्याला कोलायचा अशी तिची पॉलिसी होती आयुष्यात! भंकस चालायची नाही तिला अजिबात!

मोना - नियंत्रण म्हणजे काय?

नाना - शेवटी कामगारालाही 'भौना' आहेतच ना म्याडम??

मोना - नियंत्रण म्हणजे काय??

नाना - आता त्यांना नाही परवडले काम करायला तर मी तरी किती थोपवणार??

मोना - स्ट्राईक करताय??

नाना - काय म्याडम?? बास का?? आम्ही एवढे प्रेमाने भेटायला आलो अन तुम्ही सरळ स्ट्राईक बिईक बोलताय...

मोना - एक मिनीट.. तुम्ही नियंत्रण म्हणताय ते कशावरचे नियंत्रण?? ते आधी सांगा मला..

नाना जरा चरकलाच! ज्या पोरीने अर्देशीर, जतीन आणि सुबोधचे पत्ते कट केले ती काय इतकी साधी असेल काय? आपण जरा जास्तच बोलायला गेलो.

नाना खोटे खोटे हासला.

नाना - नाही नाही नाही नाही... तसलं काही नाही... पण त्यांना थोपवून धरताना नाकी नऊ येतात.. शेवटी कधी समाधानी न होणारी जात हो ती?? आठ हजार काय दहा हजार दिलेत तरी बोंबलणारच...

मोना - हं... पण मला तसं नाही वाटत...

नाना - म्हणजे??

मोना - आपले सगळे कामगार मनापासून काम करतात...

नाना - मागच्या वर्षी संप नाही होय केला??

मोना - संपाची कारणे बरीच असतात नाना...

नाना - हॅ हॅ हॅ! आता आम्हालाच सांगा..

मोना - तसं नाही... असो... बोलू काही दिवसांनी....

नाना सावंत उठला.

नाना - बाकी... या खुर्चीत शोभता बर का म्याडम?? योग्य जागी योग्य माणूसच पाहिजे...

मोनालिसाने मोकळेपणाने हसून नानाकडे पाहिले. नंतर हासणे थांबवून अचानक म्हणाली...

"अगदी बरोबर... योग्य जागी ... योग्य माणूसच पाहिजे..."

टरकलेला नाना केबीनच्या बाहेर चालला होता.

==============================================

आणि बरोब्बर सोळाव्या दिवशी पुल्मन बार्सिलोना स्किपर या स्पेनमधील पंचतारांकित हॉटेलच्या प्रिव्हिलेज स्विटमध्ये सकाळी आठ वाजता जागी झाल्यानंतर मोनालिसा बेडवरच पडून लांब, दिडशे मीटर्सवर असलेल्या समुद्राकडे पाहात होती. ब्रेकफास्ट किती वाजता सर्व्ह करायचा असा कॉल आल्याने तिला जाग आली होती.

गेल्या दोन दिवसात जे काही झाले ते फार म्हणजे फारच सुखद होते.

डॅनियल बॅरेटच्या वरिष्ठ अधिकार्‍याने आणि डॅनीयलने डॅनलाईनतर्फे करारावर सह्या केलेल्या होत्या. हेलिक्सतर्फे मोनालिसा आणि रेजिनाने! एका अत्यंत भव्यदिव्य, फायदेशीर अशा कराराला सुरुवात झालेली होती. शुभशकुन म्हणून मोनाने खरच डी एन ३२० च्या दोन मशीन्सची पहिली ऑर्डर दिलेली होती. हे करताना तिला तिचा मूर्खपणा जाणवत होता. आधीच वीस मशीन्सची ऑर्डर इनिशियेट करावी लागली होती भारतातून! मगच ही व्हिजिट करता आली. एकंदर बावीस मशीन्स कुठे कुठे विकायची यावर काल संपूर्ण दिवसभर रेजिनाबरोबर इतकी चर्चा झलेली होती की बास! रेजिनाने भर दुपारी अनेकांना स्पेनहूनच फोन केले होते. घसा अक्षरशः कोरडा झाल्यानंतर भारतातील सहा ठिकाणी त्याला मशीन्स विकली जायची जोरदार आशा वाटू लागली. त्यातच त्याने सेलमध्येही एक फोन केला होता एका वरिष्ठाला! त्या माणसाला आणि त्याच्या सहाजणांच्या टीमला स्पेनमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवू हेही सांगीतले होते. बोलता बोलता तो माणूस सेलच्या प्लॅन्ट्सना अशी मशीन्स घ्यायची आहेत असे सर्क्युलर काढता येईल का बघतो असेही म्हणाला होता. आणि ते ऐकून फोन ठेवून रेजिनाने भर दुपारी बीअर वगैरे न मागवता सरळ ब्ल्यू लेबल उघडली होती.

आणि मोनाने आणि रेजिनाने ग्लास किणकिणवताना एकमेकांकडे पाहिले होते.

काहीतरी होते खरेच! परवा सकाळी मुंबईहून निघाल्यापासूनच इतके मस्त वाटत होते. तीन दिवस स्पेनमध्ये राहायचे. रेजिनाशी बोलतानाही मोनाच्या चेहर्‍यावर लाजरे हसू होते फ्लाईटमध्ये! रेजिनाही गोंधळून गेलेला होता.

स्पेन! स्पेनचे वैभव पाहून तर डोळेच दीपले होते. रेजिना मागे एकदा आलेला होता, पण मॅद्रिदमध्ये! बार्सिलोना तोही पहिल्यांदाच पाहात होता.

आणि दोन दिवसांमध्ये मोनाला जाणवल्या होत्या अनेक गोष्टी ! सगळ्याच चांगल्या, आशादायक!

डॅनलाईन ही खूपच स्ट्रोंग बेस असलेली कंपनी होती, फेअर डील्समध्येच इन्टरेस्टेड होती.

रेजिना हा अत्यंत बोलघेवडा, हसतमुख आणि पारदर्शक व्यक्तीमत्वाचा उमदा माणूस होता. तो मोनाला सतत हासवत होता. मधूनच काँप्लिमेन्ट पास करत होता. पण तेही अशा पद्धतीने की तिला आनंदच वाटावा! त्यात कोणताही छुपा अजेंडा वाटत नव्हता. 'तू सुंदर दिसतेस' हे वाक्य बोलताना पुरूष कोणत्या दृष्टीकोनातून म्हणत आहे हेही स्त्रियांना समजू शकत असावे. मोनालिसाच्या मते रेजिनाला ती खूप आवडली होती, पण पदाची जाणीव असल्यामुळे तो फक्त एखाद्या काँप्लिमेन्टवर थांबत होता आणि तिच्याबरोबर असणे एन्जॉयही करत होता.

डॅनलाईनबरोबरच्या चर्चेत मात्र तिला जाणवले रेजिना हा काय प्रकार आहे! रेजिना एखाद्या बिझिनेसमध्ये पोचलेल्या माणसाप्रमाणे डिस्कस करत होता सगळ्या गोष्टी! मोना थक्क होऊन पाहातच राहिली होती त्याच्याकडे! इतकी हुषारी, इतके नॉलेज आणि इतका अनुभव हा माणूस आपल्यासाठी वापरणार? त्याने सर्व चर्चा स्वतःच्या नियंत्रणात घेतली होती. मोनला अक्षरशः माना डोलावण्याव्यतिरिक्त काम राहिले नव्हते. तिने विचारही केलेला नव्हता इतक्या घटकांवर तो डॅनलाईनशी बोलत होता आणि तो त्या मीटिंगला अत्यंत वेलप्रिपेअर्ड आलेला आहे हे मोनाला जाणवत होते. क्षणभर तिला वाटून गेले... डॅडना हा माणूस मिळाला असता तर??

रेजिनाची आपण समजतो त्यापेक्षा अधिक व्हॅल्यू आहे हे तिला परवा आल्याआल्या पहिल्या मीटिंगमध्येच समजले होते.

आणि फ्लाईटमध्ये रेजिनाने तिला सांगून टाकले होते. मला घरचे लोक आणि जवळचे मित्र वगैरे 'रिको' म्हणतात, तुम्ही म्हणालात तरी चालेल. मोनाला अगदी वाटले होते, 'मला मोनी म्हणतात' असे सांगावेसे! पण एम डी असल्याचा आब राखून ती गप्प बसली होती.

किती मजेशीर परिस्थिती होती. हा माणूस संपूर्णपणे आवडला आहे हे माहीत असूनही त्याच्याशी अंतर ठेवून वागावे लागत आहे कारण त्याला आपणच आपल्याकडे पगारावर नेमलेला आहे. आपण उगाच जवळीक असल्याप्रमाणे बोललो तर चढून जाईल! म्हणून गप बसायचे. आणि मीटिंग जिंकायची त्याच्याच जोरावर! आइ इतके होऊन तो आपला नम्रपणेच वागणार! दिलखुलासपणे म्हणणार... तुमचे नाव तुम्ही नाही सांगीतलेत तरी लोक ओळखतीलच.... हाहाहाहा... मजेत म्हणतोय बर का??

पण व्हायचे ते झालेच होते. जाणवायचे ते दोघांनाही जाणवू लागले होते. गेल्या दोन दिवसांमध्ये नजर एकमेकांमध्ये जरा क्षणभर अधिकच मिसळत होती. मोनाला खळखळून हासताना पाहणे हा जणू रेजिनाचा छंदच झालेला होता. आणि याचे लक्ष नसताना त्याच्या आत्मविश्वासाने भारलेल्या चेहर्‍याकडे हळूच पाहून घेणे हा मोनाचा! आणि काल डॅनलाईनने दिलेल्या डिनर नंतर आपापल्या स्विटमध्ये जाण्याआधी 'व्हेरी सक्सेसफुल ट्रीप धिस इज ना? गुड नाईट मॅम' असे म्हणून रेजिनाने आपला हात हातात घेतला तेव्हा तो सोडवूनही घ्यावासा वाटत नव्हता हे मोनाला आत्ता आठवले.

रेजिना!

त्याचा विचार करत असतानाच मोनाला फोन आला..

"मॉर्निंग मॅम... डिड आय डिस्टर्ब यू?"

"नॉट अ‍ॅट ऑल..."

"ब्रेकफास्ट??"

"हाफ अ‍ॅन अवर... आय'ल कम देअर..."

"ग्रेट... आय अ‍ॅम वेटिंग..."

चक्क तासाने गेली मोना त्याच्या स्विटमध्ये! आज तिने तिचा आवडता ती शर्ट आणि जीन्स घातली होती. रेजिनानेही!

मोना - हाय...

रेजिना - हाय..ऑम्लेट्स वाट पाहतायत...

मोना - ओह... म्हणजे तुम्ही नाही पाहात आहात...

रेजिना - मीही पाहतोय... भूक लागलीय...

मोना - आज निघायचंय...

रेजिना - हं.. खरे तर मला एक्स्टेन्ड करावेसे वाटत आहे...

मोना - का??

रेजिना - किती छान देश आहे हा... कामही मनासारखे झालेले आहे.. जरा फिरावेसे वाटत आहे..

मोना - हेलिक्सचे पैसे वाया जातील..

रेजिना - ओह... मग मला एक दिवसाची रजा द्या... आजचा दिवस मी इथे माझ्या पैशाने राहतो...

मोना हसायला लागली.

मोना - ठीक आहे ठीक आहे... एक दिवस हेलिक्सतर्फे तुम्हाला स्पॉन्सर करते मी आजचा...

रेजिना - थॅन्क्यू... थॅन्क्यू व्हेरी मच... आता तिकीट बदलून मिळतय का पाहिले पाहिजे..

मोना - तिकीट म्हणजे???

रेजिना - लुफ्तान्सा?? .. माझं एअर टिकेट...

मोना - ओह.. मला वाटलं मी ही राहतीय इथे एक दिवस...

रेजिना - अहो काय हे?? तुम्ही राहा हे तर मी म्हणतोच आहे.. पण तसे म्हणण्याचा मला अधिकार नाही म्हणून गप्प बसलो...

मोना - अच्छा? ... हंहं...

तासभर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मोना पुन्हा आपल्या स्विटमध्ये निघून आली.

आज थांबायचा प्रस्ताव अर्थातच मजेमजेत डिस्कस झालेला होता. इतकी कॉस्ट बेअर करून थांबणे रेजिनालाही पटत नव्हते. कंपनीनी दिले म्हणून काय झाले?

लंच घ्यायचा, तीन तास मस्त झोपायचे आणि रात्री दहा वाजता चेक आउट करून विमानतळावर जायचे असे ठरले.

लंचही रूममध्येच घ्यायचा असे ठरले! पण मोनालिसाच्या...

आणि साडे बारा वाजता रेजिना फोनवर परवानगी मागून मोनाच्य स्विटमध्ये आला.

स्पेनमध्ये प्रसिद्ध असलेली एक स्कॉच ओपन होण्याच्या प्रतीक्षेत टीपॉयवर थांबलेली होती.

रेजिना - ओलियाहो....

मोना - हं... इथे मिळाली... बघू कशी आहे...

रेजिना - नाहीतर स्ट्राँग असायची...

मोना - हं.. आणि फ्लाईट चुकायची...

दोघेही हासले. हासताना एकमेकांकडे पाहिले. क्षणभर दोघांच्या नजरा नजरांमध्ये मिसळल्या. लगेच वेगळीकडे गेल्या.

आणि दिड पेग्ज झाल्यावर चर्चा सुरू झाली.

मोना - व्होट डू यू फील?? हाऊ कॅपेबल अ वूमन कुड बी?

रेजिना- म्हणजे??

मोना - स्त्री आणि पुरुषाच्या कर्तबगारीत काही फरक असतो??

रेजिना - असे काहीच नाही?? का??

मोना - अंहं...

रेजिना - असे का म्हणता??

मोना - विशेष काही नाही... काही वेळा तसे जाणवते... की स्त्री कमी कर्तबगार आहे असे पुरुषांचे मत असते...

रेजिना - छे? आता तुम्ही जर कर्तबगार नसतात तर डॅनलाईनशी मीटिंग ठरलीच नसती...

मोना - असे काही नाही... तुम्ही बरीचशी मीटिंग हॅन्डल केलीत...

रेजिना - हो पण त्याचा मला अनुभव आहे म्हणून... तुम्हाला अनुभव आल्यावर तुम्हीही करालच की... आणि मुख्य म्हणजे स्त्रिया खूप मुद्देसूद बोलतात अशा वेळेस... अनेकदा कर्टली बोलतात... आणि त्यांच्यासमोर गप्पही बसावे लागते... तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण अनेक व्यापारांमध्ये, जेथे स्त्रिया आधी नव्हत्या, तेथे आता स्त्रिया आल्यानंतर भ्रष्टाचार घटला आहे... ट्रॅफिक पोलीस, बस कंडक्टर स्वरुपाचे व्यवसाय...

मोना - त्याचे काय कारण??

रेजिना - घाबरतात लोक भ्रष्टाचार करायला.. आणि असभ्यपणाही करत नाहीत...

मोना - हं...

रेजिना - काय झाले?? का हासताय??

मोना - अंहं..

रेजिना - सांगा ना...

मोना - डॅड असते अन त्यांना समजले असते की मी अन तुम्ही रोज ड्रिंक घेतोय तर ते याला असभ्यपणाही म्हणाले असते...

रेजिना - हा हा हा! नाही नाही.. तसे काही नाही.. दिवस बदललेत आता... आणि मुळात मी एक सभ्य माणूस आहे.. गरीब बिचारा...

मोना - हंहं??

रेजिना - हंहं काय?

दोन पेग्ज आता बोलू लागले होते स्वरांमधून! किंचितशी जवळीक निर्माण झालेली होती. सिवा परदेशात काहीही लक्ष ठेवू शकत नाही हे माहीत असल्यामुळे आणि ही भूमीच पूर्णतः वेगळी असल्याने मोनाहीखूपच निर्धास्त झालेली होती. आणि का कुणास ठाऊक, तिला आज रेजिनाबरोबर खूप हास्यविनोद करावेसे वाटत होते.

लहान होती बिचारी वयाने! आणि या वयात नको ते प्रॉब्लेम्स सोसावे लागत होते. मृत्यूचीही भीती वाटावी अशी परिस्थिती येऊ शकत होती. आजूबाजूला सगळी गिधाडे आणि लांडगे होते. जे इस्टेटीचा लचका तोडण्यासाठी वाटेल ते करू धजत होते. एकही माणूस असा नव्हता की जो फक्त... फक्त मोनाचा आहे...

किती धीर धरणार एखादजण??

आत्ताही मोनाला अंधुक आठवतच होते ओलियाहोच्या नशेतही... सायरा आणि लोहियांची रिलेशन्स, लोहिया आणि अर्देशीर यांची चालूच असलेली मैत्री.. सगळे... सगळे तिच्या विरुद्ध होते.. अगदी तो जुना ड्रायव्हरसुद्धा!

अचानक शांतपणे पीत असताना मोनाच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळले. दु:ख वाटले तिला! काहीही चूक नसताना, आपण कुणाच्याही अधिकारावर गदा आणणार नसताना आपल्याशी असे का वागतायत सगळे!

मोनाची ती अवस्था रेजिनाच्या अनुभवी नजरेने हेरली.. तो उठला आणि तिच्या जवळ आला..

तिला अपेक्षा नसतानाच त्याने आपला उजवा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला...

"तुम्ही.. बहुतेक खूप दु:खी आहात अस वाटले मला कशामुळेतरी.. तसे असेल तर... मी तुमच्या पर्सनल आयुष्याबाबत काही बोलू शकत नाही.. पण... कामाची वेळ सोडली तर.. तुम्ही खरेच मला एक चांगला माणूस आणि चांगला मित्र समजू शकता मॅडम... मी... मी कधीही गैरफायदा घेणारा माणूस नाही.. इतकेच काय.. तुम्ही मला मित्र मानलेत तर ते मी... मला स्वतःलासुद्धा कळवणार नाही...

'स्वतःलासुद्धा कळवणार नाही' या तीन शब्दांवर खुदकन हासली मोना! त्या स्पर्शात तिला मैत्रीच जाणवली. तीही उठून उभी राहिली.

मात्र, अचानक धीर सुटला. कुणीतरी आहे ही भावना प्रबळ झाली आणि आजवर जे करायचे होते ते तिने.. भारतापासून इतक्या लांब... स्पेनमध्ये... एका.. तुलनेने नव्या तरुणासमोर केले...

एकदम हुंदकाच आला तिला... आणि ते पाहून रेजिनाला समजेना.. आपण काय करावे.. पण.. साहस करून त्याने किंचितच तिच्या दोन्ही खांद्यांवर आपले हात ठेवले... आणि .. अगदी अलगद आपल्या दिशेने थोडासाच फोर्स दिला...

मोनालिसा मोहन गुप्ता... आजवरच्या आयुष्यात जिला एक मुलगाही आवडलेला नव्हता... जी एका मोठ्या साम्राज्याची सम्राज्ञी होती... तिने तिच्याच साम्राज्यात पगारी नोकर असलेल्या रेजिनाच्या छातीवर डोके टेकवले... आणि हमसून हमसून रडली...

रेजिना... रेजिना खलास झालेला होता... त्याला एकाचवेळेस स्वतःचा अभिमानही वाटत होता, मोनाबद्दल वाईटही वाटत होते आणि भीतीही!

रडण्याचा काहीसा जोर ओसरल्यानंतर मोनाने अचानक वर पाहिले. रेजिनाने विचारले..

"डॅनलाईनचे अ‍ॅग्रीमेंट झाले म्हणून रडलात?????"

डोळ्यातील पाणी गालांवर वाहिलेले असतानाच मोना खुदकन हासली.

'फॉर यू हनी'! आजवर विमानात शेजारी बसल्यावर येणार्‍या या परफ्युमचा मॅनली सुवास मोनाच्या मनावर व्यापलेला होता.. अगदी जवळून...

मात्र... ती हासल्यावर रेजिनाचा तोल सुटला...

त्याने उभ्याउभ्याच मोनाला घट्ट मिठीत घेतले आणि काही कळायच्या आत तिच्या अश्रूंनी ओथंबलेल्या गालांवर ओठ टेकवले.... हे काय होते आहे याची जाणीव होईपर्यंतच मोनाच्या ओठांवर त्याचे ओठ आले...

... आणि मग मात्र दोन तीन सेकंदातच मोनाचे नियंत्रण संपले स्वत:वरचे...

वॉव्ह... असे असते किसिंग??

रेजिनाच्या मिशांचे केस तिच्या नाकाखाली बोचत होते. पण आता जिभाही एकमेकामध्ये गुंतलेल्या होत्या. पुरुषी स्पर्श आणि पुरुषी गंधाचा इतक्या जवळून परिचयच नव्हता मोनाला.. त्यामुळे ती काही क्षणातच बाजूला झाली... पण आता रेजिनामधील पुरुष जागा झालेला होता.. त्याने तिच्याभोवतीचे हात काढलेच नाहीत.. तिनेही सुटायचा प्रयत्नच केला नाही... फक्त जमीन्कडे पाहात राहिली... त्याने तिला पुन्हा करकचून आवळले आणि पुनःप्रत्यय घेऊ लागला..

पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात असल्याप्रमाणे मोनाने अंग ढिले सोडले. त्याच्या केसाळ छातीमुळे तिला चेहर्‍यावर गुदगुल्या होत होत्या. पण तिकडे लक्षच जात नव्हते तिचे!

मोहातून बाहेर पडण्याचा क्षण निघून गेलेला होता मगाशीच! हळुच मोनाने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले. धुंद नजरेने त्याच्याकडे पाहात तिने पुन्हा ओठांचा चंबू केला आणि त्याच्या निकट गेली.

राकटपणा आणि धसमुसळेपणा हे रेजिनामध्ये असलेले घटक आहेत याची डॅनलाईनच्या मीटिंगपर्यंत कल्पनाच नव्हती तिला!

एक अत्यंत रांगडा पुरुष होता तो बेडमध्ये! मोनाला काहीही समजायच्या आत पार घुसळली गेली ती उभ्या उभ्याच!

आपल्याला हे आवडते आहे की नावडते आहे याचा विचारही आत्ता तिच्या मनात शिरू शकत नव्हता.

रेजिनाने अलगद उचलून तिला बेडवर ठेवले. दचकून उठली मोनालिसा!

मोना - स्टॉप...

रेजिना - आय वूड... बट आय कान्ट सी यू अनहॅपी... आय लव्ह यू...

वाक्य पुरे झाले तेव्हा रेजिना तिच्या अंगावर रेललेलाही होता.

मोनाची ताकद अर्थातच खूपच अपुरी पडलेली होती. आणि मिनिटाच्या आत तिचा टी शर्ट लाब फेकला गेलेला तिने पाहिला.

दोन तासांनी दोघेही श्रान्त होऊन एकमेकांच्या शेजारी पडलेले होते. मोनालिसा! सर्वस्व हरवून बसलेली होती. पण सर्वस्व मिळाल्यासारखा चेहरा होता आत्ता तिचा! भर एसीमध्ये दोघेही भिजलेले होते..

काय म्हणावे तेच कळत नव्हते दोघांनाही.. रेजिना स्वतःवरच चकीत झाला होता....

आणि मोनालिसा नुसतीच धपापत होती....

एकाचवेळेस दोघांनी एकमेकांकडे वळून पाहिले.. थक्क होऊन रेजिन मोनाकडे बघत असतानाच मोना अचानक... अचानक हासली..

मोना - नालायक...

रेजिना - आय लव्ह्ड इट..

मोना - सो डिड आय...

पुन्हा एकमेकांना मिठी मारली दोघांनी!

मोना - निर्लज्ज आहेस तू...

रेजिना - मलाही माहीत नव्हते ते....

त्याही परिस्थितीत तो विनोद करू शकतो हे पाहून मोना खदखदून हासली त्याच्या मिठीत!

रेजिना - तुला... तुला माहीत होते??

मोना - इतका निर्लज्ज असशील याची कल्पना नव्हती...

रेजिना - मला तर हे असे असते याचीच कल्पना नव्हती...

मोना - असे म्हणजे??

रेजिना - असे म्हणजे... इतके... स्पीडी.. इतके... समाधान देणारे...

मोना - ऑहाहाहा.. मैत्रीण असेलच की एखादी...

रेजिना - बर्‍याच आहेत... पण...

मोना - पण??

रेजिना - जाड आहेत..

फस्सकन हासली मोना!

मोना - म्हणजे बारीक असत्या तर चालले असते ना??

रेजिना - छे.. त्या बारीक होईपर्यंत मी गलितगात्र नाही का होणार??

मोना - हं.. आत्ता झालायस तसा...

रेजिना - आत्ता?? चॅलेंज??

मोना - चॅलेंज...

रेजिना पुन्हा पिसाटला.

मोना - बाSSSSSSSSSSSSस!

रेजिना - चॅलेंज स्वीकारले होते मी...

मोना - मी परत घेतले माझे चॅलेंज...

रेजिना - याला काय अर्थ आहे?? राहायचे आज???

मोना - .. हं....

रेजिना - हेलिक्सतर्फे???

खूप जोरात हासली मोना...

मोना - तुझी इच्छा म्हणून राहायचे आहे ना?? मग तुझ्यातर्फे...

रेजिना - मग माझा पगार तरी वाढवा... महिन्याला एक स्पेनची ट्रीप स्पॉन्सर्ड...

मोना - आहा.. एलेकॉनला लाव की बिल..

रेजिना - एलेकॉनला??

दोघेही हासू लागले.

मोना - जा आता... पडूदेत मला..

रेजिना - काय करणार आहेस???

मोना - जप...

रेजिना - कुणाचा??

मोना - कुणाचाही करेन... सोड...

रेजिना - मग मी इथेच थांबतो...

मोना - काही नको... मला बाथ घ्यायचाय...

रेजिना - अरे? मी विसरलोच होतो.. मलाही घ्यायचाय...

मोना - मग जा....

रेजिना - चला.. दोघेही घेऊ..

मोना - आर यू अ फूल??

रेजिना - आय वॉज... यू मेड मी वाईझ...

बोलेपर्यंत रेजिनाने तिला उचलले आणि बाथरूममध्ये नेले तिच्याच स्विटच्या...

सहा नळ होते टबला! दिड मिनिटात भरू शकणारा प्रचंड डबल टब होता तो!

रेजिनाने हॉटेलने प्रोव्हाईड केलेल्या सगळ्या जेल्स ओतल्या त्यात! आत्तापर्यंत आत बसलेली मोना अर्ध्याहून अधिक पाण्यात गेलीही होती!

रेजिनाही आत आला... दोघे पुन्हा हासत हासत बोलू लागले..

मोना - डॅनलाईनला समजले तर???

रेजिना - ते म्हणतील अ‍ॅग्रीमेन्ट कॅन्सल...

मोना - का???

रेजिना - म्हणतील हे मशीन्स विकायला भारतात जातच नाहीत...

मोना - हे काय?? काय आहे हे??

रेजिनाने भिंतीवरचे एक बटन पुश केलेले होते. भर दुपारीसुद्धा बाथरूमचे छत अंधारातल्या आकाशाप्रमाणे झाले होते केवळ दहा सेकंदात! भरपूर चांदण्या असलेले!

मोना - वॉव्ह...

रेजिना - ओपन टू स्काय...

मोना - थांब... फोन वाजतोय...

रेजिना किंचितसा बाजूला झाला.

मोनाने टबशेजारी असलेला रिसीव्हर उचलला.

"व्हाय आर यू नॉट चेकिग इमेल्स??? "

आपण फक्त सायरा आणि सिवा या दोघांनाच हॉटेलचा नंबर दिला होता हे तिला आठवले. सिवाचा आवाज होता.

"व्हॉट हॅपन्ड??"

"सायरा डझ नॉट मेक्स कॉल्स टू नंबर टू... इट्स दॅट ओल्ड लेडी... शामा....अ‍ॅन्ड टूडे शी इव्हन मेट हिम"

गळूनच पडला होता रिसीव्हर मोनाच्या हातातून...

रेजिना तिच्या छातीत आपले डोके घुसळत असताना मोना वरच्या चांदण्यांनी युक्त आकाशाकडे निराश होऊन पाहात होती.

शामा अर्देशीरांना फोन करू शकत असेल ही कल्पनाच आली नव्हती मनात....

केसमध्ये आता नंबर बावीसही आला होता तर!

गुलमोहर: 

हा भाग ही मस्तच !
निलिमा, मोना double triple cross प्रतिसाद मधेही करतेय असा वाटला का?? Happy आज इतकी शान्तता कशी इथे?

मस्त...

ह्या कादंबरिचि पहिलि प्रिंटेड कॉपि मला.... आणि हा माझा कॉपिराईट(प्रेमाचा आग्रह...... बाकि तुमचि मर्जि) Happy
हा सिवा काय ग्रेट माणुस आहे...... जबरदस्त....
स्पेन ट्रिप टु गुड....
आणि शेवटि पुन्हा एकदा बेफिकिर ट्च.
hats$20off.gif

बेफिकीर.............
"श्रीनिवास पेंढारकर -एक बाप" यानंतर तुम्ही आता पुन्हा त्याच touch मध्ये दिसत आहात............

सोलिड मजा येतेय आता.....
थोडा technical part जास्त वाटतो कधी कधी..... (gear बद्दलची माहिती आणि चर्चा....)
कारण आम्ही धोंडे त्या क्षेत्रातले... आम्हाला(स्वताला आदरार्थी संबोधन करत आहे) जास्त काही कळत नाही....\\
थोडी मोनाची "बेव्डेगिरी" जास्त वाटतेय , पण श्रीमंत घरात असे प्रकार होत असावेत........

बाकी कादंबरीचा वेग भन्नाट........
पु.ले.शु .

जबरदस्त!!!!! सिवाच्या कामाचे स्वरुप फार मस्त समजावून दिलेत.
मोनाची स्पेन ट्रिप एक सुखद धक्का होती... हॉलिवूड फिल्म पाहात असल्याचा भास होत होता... मोना-रेजिना जोडी आत्तापर्यंतच्या कादंबर्‍यांमधल्या जोड्यांमधली सगळ्यात मॅच्युअर्ड आणि म्हणूनच खुप आवडली... क्रिस्पी लव्ह स्टोरी... Happy
इतकी रंगतदार कथा आहे ही... की तिचा वाचत असलेला भाग संपणे आणि कथेतून बाहेर पडावे लागणे अगदी जीवावर येते... प्रत्येक भागानंतर हिच परिस्थिती असते... ही कथा कधीच संपू नये असं वाटतंय...
ग्रेट् बेफिकीरजी, मस्त मस्त मस्त!!!! चाबूक Happy