पार्थ चिटणीस - आकाशदिवा

Submitted by दीपाली on 12 November, 2010 - 04:45

नाव- पार्थ
वय- सात वर्ष
माझी मदत- थर्माकोल च्या पट्ट्या कापून देणे, टिकल्या आणून देणे, आणि बेसिक प्रोसिजर सांगणे.
बाबाची मदत - चक्क जाऊन नवा आकाशकंदिल घेउन येऊयात म्हणून सांगणे Proud

ह्या दिवाळीला आकाशकंदिल मला घरीच करायचाय असा फतवा सहामाही परिक्षेच्या पहिल्याच दिवशी निघाला. कला आणि कुसरीच्या बाबतीत माझं ज्ञान औरंगजेबाच्या तोडीचं असल्यामुळे, मग इथे तिथे सर्च करणं आलं. अगदी पुपु वरही विचारून झालं.

मग आकाशकंदिलाच्या दुकानात जाऊन उगाच काहीही घ्यायच नसूनही सगळे आकाशकंदिल आतून बाहेरून पाहून घेतले.(हो निदान बाहेरुन तरी डिझाईन निट दिसावं).

आणि मग परिक्षेच्या शेवटच्या दिवशी थर्माकोल चा शीट घेउन घरी जाईपर्यंत स्वारी हातात कात्री घेऊन तयार. नुसत्या पट्ट्या कापून जोडून होताहेत तोवरच "ह्या आख्ख्या जगात असला घाणेरडा आकाशकंदिल कोणी तयार केला नसेल" वगैरे मापं काढून झाली. Proud पण मग जस जसा आकार यायला लागला, तस तसा चेहरा बदलायला लागला. फायनली टिकल्या लावून झाल्यावर मात्र कळी खुलली.:)

akaashakandil_1.jpgakaashakandil_2.jpgakaashakandil_3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाला आहे.पण त्याच्या दृष्टीने कॉम्प्लिकेटेड वाटतोय....वाटतोय कि नुसता दिसतोय? कृती टा़क ना प्लिज Happy

मस्तच!
स्टेप बाय स्टेप लिहिण्याला अनुमोदन.

हिम्या, तुझेही चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, माश्याच्या आकाराचे आकाशकंदील कसे करायचे ते लिही प्लिज.

हिम्या, तुझेही चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, माश्याच्या आकाराचे आकाशकंदील कसे करायचे ते लिही प्लिज.>>> लिहिणार नक्की लिहिणार.. पण आता पुढच्या दिवाळीच्या आधी काही दिवस... आत्ताच करुन ठेवले घरात तर जागा नाही पुरणार.. आणि आधी जेव्हा केले होते तेव्हा फोटो वगैरे काढून ठेवण्याची अक्कल नव्हती... आकाश कंदिल करुन विकण्याचे प्रतापपण केले होते तेव्हा.... ते तयार करायला लागणार्‍या यंत्राची पण माहिती लिहिन..

मस्त झालाय. स्टेप बाय स्टेप रेसिपी येऊ देत दिमडू.

हिम्सकूल मुलांना माझ्याकडे पाठवा म्हणतोय खरा पण त्याची हस्तकला बघायचा योग काही आलेला नाहीये. Wink

सही आहे!!

""ह्या आख्ख्या जगात असला घाणेरडा आकाशकंदिल कोणी तयार केला नसेल" वगैरे मापं काढून झाली. "

बाप्रे.. ह ह पु वा
मला ही कधीच कलाकुसर जमत नाही.. मला माझ्याच लहन पणी ची आठवण झली :ड

लोकहो... ह्या वेळची दिवाळी जवळ आलीच आहे.. तर मागच्यावर्षी म्हणल्या प्रमाणे यंदा आकाशकंदील करण्याचा विचार आहे.. आणि त्याच बरोबर एक कार्यशाळा पण घ्यायचा विचार आहे.. पार्थच्या वयोगटातील बरीच मुलं आहेत.. ती पण यंदा घरी स्वतः केलेला आकाशकंदील लावूया असे म्हणतील..

लिहिणार नक्की लिहिणार.. पण आता पुढच्या दिवाळीच्या आधी काही दिवस... आत्ताच करुन ठेवले घरात तर जागा नाही पुरणार.. आणि आधी जेव्हा केले होते तेव्हा फोटो वगैरे काढून ठेवण्याची अक्कल नव्हती... आकाश कंदिल करुन विकण्याचे प्रतापपण केले होते तेव्हा.... ते तयार करायला लागणार्‍या यंत्राची पण माहिती लिहिन..>>हिम्सकूल , कधी लिहिणार?

थर्माकोल ऐवजी दुसरे इको-फ्रेंडली साहित्य वापरून घेता येइल का कार्यशाळा?