‘रानमेवा’ काव्यसंग्रह.

Submitted by अभय आर्वीकर on 11 November, 2010 - 23:58

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.

‘रानमेवा’

११२ पृष्ठे असलेल्या ‘रानमेवा’ या कविता संग्रहात कविता, गझल, लावणी, विडंबन, तुंबडीगीत, अंगाईगीत, बालकविता, बडबडगीत, देशभक्तीगीत आणि नागपुरी तडका या काव्यप्रकांरातील रचनांचा समावेश आहे.
‘रानमेवा’ या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.
* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवून मागणी नोंदवावी.
* मुल्य म.ऑ ने किंवा चेकने पाठवले तरी चालेल. किंवा बॅंक खात्यात जमा करता येऊ शकेल. त्यासाठी संपर्क करावा.
* मुळ किंमत पाठवावी. पोस्टेज खर्च प्रकाशकाकडे.
* ‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.
......................................................
Ranmewa-Pdf.jpg

रानमेवा Pdf स्वरुपात वाचण्यासाठी/डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
.....................................................

धन्यवाद!
. आपला स्नेहांकित
. गंगाधर मुटे
.....................
Ranmewa-1.JPG
रानमेवा काव्यसंग्रहाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.
....................
Ranmewa-2.JPG
रानमेवा काव्यसंग्रहाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.
....................
Ranmewa-3.JPG
रानमेवा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.
....................
Ranmewa-4.JPG
रानमेवा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी. व्यासपीठावर
रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी
...................
Ranmewa-5.JPG
रानमेवा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी. व्यासपीठावर
रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी
..................
Ranmewa-6.JPG
थोडा हास्यविनोद. मा. शरद जोशी, कवी इंद्रजित भालेराव, गंगाधर मुटे व अन्य.
..................
Ranmewa-7.JPG
उपस्थित जनसमुदाय.
..................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सकाळ'ने घेतली 'रानमेवा' ची दखल.
.
आज 'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीने' 'रानमेवा' ची दखल घेतली.
.
थोडा ’रानमेवा’ खाऊ चला!
..................................................

’रानमेवा’

.................................................

मनःपूर्वक अभिनदंन !

व्यक्तिशः खूप आनंद झाला सगळ वाचून. फोटो डोळे भरून पाहीले. या मित्राचा मला अभिमान वाटतो, वाटत राहील.

गंगाद्गर मुटे झिंदाबाद...!!!

Pages