तो.पा.सु की नाही ?

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 November, 2010 - 05:02

चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचीतच आढळतील. मी लहान असताना भरपुर चिंचा खायचे. शेताच्या बांधावर जाऊन झाडावर दगड माडून चिंचा पाडायच्या आणि तिथेच झाडाखाली बसुन घरुन पुडीत बांधून आणलेला मिठ मसाला लावुन खायचा हे उद्योग बर्‍याचदा चालायचे. असे खाउन मन नाही भरायच तेंव्हा त्याच चिंचा घरी नेउन परत त्याची चटनी बनवायची आणि खायची. गोबोळी चिंचा शोधायलाही मजा यायची. चिंच हलवायला खास माणूस यायचा तेंव्हा मग त्या पिकलेल्या चिंचेत एखादी गाबोळी चिंच मिळाली की खुप आनंद व्हायचा. पिकलेल्या चिंचा आई-आजी घरात ठेवायच्या आणि संध्याकाळी फोडत बसायच्या आणि फोडून त्याचे जाड्या मिठात मिसळून गोळे करायच्या तेंव्हा त्यातही जाउन हात मारायचे. मग मात्र आई ओरडायची. अग किती चिंचा खातेस ? जास्त आंबट खाउ नकोस, आत्ता मजा वाटते खायला वय झाल की त्रास होईल. आणि आता तेवढ वय न होताही खरच मला संधीवाताचा त्रास होतो मधुन मधुन आणि आईचे ते शब्द आठवतात. पण आईला आता हे सांगण्याची हिंमत होत नाही. आई अजुनही ह्या चिंचा फोडत असते वय झालय तरी पण मी वय न होताही चिंचा खाण बंद केलय. (दु:खी बाहुली). फक्त जेवणातल्या काही पदार्थात तेही खुप कमी प्रमाणात चिंच घालते.
ह्यात चिंचेचा दोष काहीच नाही. माझ्या हट्टिपणाचा आणि कंट्रोलही नही होताचा आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही हे आई हजारवेळा सांगुनही मी तिच्यापासुन चोरून खायचे कधी कधी.

Chinch.JPGChinch1.JPG

ह्या फुलांवरून हेही आठवत की चिंचा पाडून झाल्या की एखाद महिन्यातच लगेच दुसरी फुले येतात मग ती फुले आणि झाडाचा कोवळा पालाही मी खायचे. आणि झाडाला नुकतीच पकडलेली चिंच तर मला खुपच आवडायची.

Chinch2.JPG

हे पाहुन तुमच्याही काही लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील त्या आपण शेअर करुया.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आमच्या घरासमोरच चिंचेच झाड होत त्यामुळे चिंचेचा कोवळा पाला, फुल आणि कच्च्या हिरव्या चिंचा ह्यांच वरच आवरण हिरव असत आणि गराला चिकटलेल असत (ठार आंबट असतात आणि मिठाबरोबर भन्नाट लागतात) आणि गाभुळलेल्या चिंचा खुप खाल्ल्यात. थाइ चिंचा मात्र मला फारश्या आवडत नाहित, जी आंबट नाहि तिला चिंच तरी का म्हणावे ? :). जागु लहानपणीच्या आठवणिंना उजाळा दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद!

चिंचा खाऊन संधिवाताचा त्रास होऊ शकतो तसंच चिंचा खाऊन किडनी स्टोन टाळता येऊ शकतो, ह्या दोन्ही माहित्या नवीन आहेत माझ्याकरता.
<< सायो, दुसर्‍या बद्दल माहिती नाही पहिल्या बद्दल सांगु शकते.
माझ्या मामे भावाला लहान पणी लहान मुलांच्या संधीवाताचा भयंकर म्हणजे अशक्य त्रास होता!
त्याची आयुर्वेदिक ट्रिटमेन्ट चालु असताना त्याला इतर पथ्य बरोबर आंबट गोष्टी खाणे टोटली बन्द होतं.
अगदी चतकोर लोणच्याची फोड जरी पोटात गेली तरी भयानक त्रास होयचा त्याला :(, इतक्या सिरियस लेव्हल चा त्रास कि ५ मिनिटापूर्वी चालणार्‍या मुलाला एकाएकी इतका त्रास सुरु होयचा कि एका खोलीतून दुसर्‍या खोलीत उचलून न्यावे लागायचे Sad , शाळा वगैरेला दांडी मारून घरी बसावे लागायचे , आई वडिलंना चिंता होती कि हा शालेय शिक्षण तरी पूर्ण करु शकेल कि नाही ! Sad
सगळ्या डॉक्टरांनी हात टेकल्यावर सगळ्यात शेवटी आयुर्वेदाकडे वळले आणि पुण्यातल्या एका सुप्रसिध्द वैद्यांच्या ट्रिटमेन्ट्नी मुलगा ३-४ वर्षात १००% खडखडीत बरा झाला :).
वैद्य म्हंटले पण कि दुर्दैवानी सगळ्या ट्रिटमेन्ट्स चालेनाश्या झाल्या कि मग अयुर्वेदाकडे येता !
असो, अता मामे भाउ ३० च्या पुढी असेल पण पुन्हा कधीही हा त्रास उद्भवला नाही, उच्च्शिक्षित, यशस्वी करिअर करून मोठ्या designation वर आहे! :).

पथ्य तर होतच गं सायो ,
पण त्याला असलेला त्रास सिव्हयर होयचा चुकुनही काही आंबट गेलं तर!
अर्थात असलेला संधीवात जास्त त्रास देउ शकतो हे म्हणाणं योग्य होईल, नॉर्मल माणासानी चिंच खाऊन हा त्रास सुरु होतो हे नाही सिध्द होत मी दिलेल्या उदाहरणातून.

लाजो, रैना, आर्च, रचु, सायली, मधुरिमा, पन्ना, रुणुझुणु, सायो मुग्धा धन्यवाद.

चातक मीच घेतले आहेत ते फोटो. माझ्या आईच्या घरासमोरच आहे ही चिंच. आईच्या छप्परावर ह्याच्या फांद्या येतात. टेरेस वर जाऊन मी काढायचे. अजुनही ती फांदी आहे.

अरुंधती मजा वाटली वाचायला तुमचा अनुभव.

डॉ. कैलास छान आठवणी ते नेरुळ गाव आता कोणि गाव म्हणू शकणार नाही. खुप सुधारीत शहर झालय आता ते. तुमच गाव आहे का ते ?

श्री, रमा,
दिपांजली नुसत्या चिंचेने नाही ग होत त्रास त्याला इतरही कारण असतात. पण चिंचेने वात वाढतो त्यामुळे बंद करावी लागते किंवा प्रमाण कमी कराव लागत. पण माझ्यासाठी चिंच हा जेवण बनवण्यातला मुख्य घटक आहे. मी त्याचे प्रमाण कमी केले आहे. तसा काही मोठ्या प्रमाणावर नाही माझा त्रास. मधुन मधुन पाय दुखतात. पण पुढे जास्त त्रास नको म्हणुन आत्ताच खबरदारी घेतलेली बरी.

हो...माझं गाव आहे,नेरुळ. आता खूप बदललंय. गावतही आता गावची निशाणी शिल्लक नाहिये. सगळं शहरीकरण झालंय. दोन गाववाले भेटले तरी आगरीत बोलत नाहीत. मी जेव्हा माझ्या पेशंटांशी आगरीत बोलतो,तेव्हा माझा स्टाफ आ वासून बघतच राहातो. Happy मी नवी मुंबईचे खूप जुने फोटो ठेवले आहेत. वेळीच पोस्ट करेन. Happy

जागू, आमच्या सोसायटिच्या दारात चिंचेचे झाड आहे अन माझ्या मुलाबरोबर त्याचे मित्रही चिंचा काढून देतात कशा कशावर चढून. अन नाही तर फुलं असतातच कट्ट्यावर पडलेली Happy
लहानपणापासून आता पर्यंत लांब न गेलेली माझी मैत्रीण - चिंच Happy
अन हो भाजलेले चिंचोके... कित्ती वर्षे झाली खाले नाही, बरी आठवण केलीस, थांब उद्या खातेच भाजून Wink

आंबट चिंबट पदार्थापासून मी लहानपणापासूनच लांब.

फक्त लाल चिंच खायची घाबरत घाबरत... कधी तरी.
मजह्या बहिणी, रतांबे(चिंचेपेक्षा आंबट असतो) सारखे फळ मिटक्या मारत खायची. मला उगीच बघून काटा यायचा.. इतकी ती झाडावरची चिंच खायची.

बाकी,संधिवाताच्या माणसाने कुठलेही आंबट वा आंबवलेले पदार्थ सुद्धा टाळावेच. चिंच आंबट असल्याने ती टाळावी.

पण चिंच थोडीफार जेवणात असावीच. पचनाला मदत करते. नसली तर फरक नाही पण एका रीतीने पचनाला मदत करते डायजेस्टीव ज्युसेसला मदत करून.
खूप खाल्ली तर शौचास होते. पोट साफ करते बेसिकली. Happy

कमाल आहे ? हा लेख चिंचवडच्या नितीन शिवाय कसा लिहला ? चिंचवडला चिंचेची झाड जास्त वडाची कमीच. चिंचेचा सिझन एप्रिल मे मध्ये सुरु होतो. पिवळट रंगाच्या फुलांपासुन याची सुरवात होते. ही फुल सुध्दा आंबट गोड चविची असतात. मे महिन्याच्या सुट्टीत दररोज ही फुले खाणे मला आवडायचे.

मग पावसाळ्यात अगदी बारिक बारिक चिंचा या झाडाला लागतात. चिंचवडमधे अशी बरीच झाड होती जिथे चिंचा सहज हाताला लागायच्या.

मला झाडावर चढता यायच नाही मग ज्याला चढता यायच अशा मित्रांना मी हरभर्‍याच्या झाडावर चढवायचो मग पुढे तो चिंचेच्या झाडावर.

चिंचेचे फळ साधारण या मोसमात म्हणजे दिवाळिच्या सुमारास पुर्ण मोठे होऊन त्याची वाढ संपते. पुढे ते झाडावरच पिकते आणि साठवणी साठी योग्य होते.

साधारण मार्च मध्ये चिंचवड देव संस्थान त्याच्या मालकीच्या झाडांचा चिंचफळ लिलाव पुकारे. त्यात आजुबाजुचे व्यापारी बोली लाउन साधारण १०० झाडांची चिंचफळे उतरवत.

लिलाव घेतलेल्या व्यापार्‍याचा एक माणुस झाडावर चढे आणि काठिने चिंचा पाडे. आमच्या सारखी मुले ती गोळाकरुन देत असु. बदल्यात पिकलेल्या २०-२५ चिंचा सहज मिळत.

जागु, तुमच्या या ललितमुळे गतस्मृतीमग्न व्हायला झाल.

मला चिंचेपेक्षा चिंचेचा कोवळा पाला खायला जामच आवडायचा. माझ्या मैत्रिणीच्या घराशेजारीच झाड होते. आमच्या हाताच्या उंचीपर्यंतचा पाला गायब असायचा.....

झाडावरची चिंच सोडली तर मी विकायला येणारी चिंच कधीच एकटी पाहिली नाही. लहानपणी घाटकोपरला आजीच्या घरी जाताना, रेल्वे स्टेशनातून बाहेर पडले की, एक हातगाडीवाला उभा असायचा. त्याच्याकडे या चिंचा, साधी बोरं, सुकवलेली आणि खारवलेली 'चन्यामन्या' बोरं, करमळं, आणि ओल्या बडिशेपेचे ताजे ताजे झुपके असा खजिना असायचा. हमखास खरेदी व्हायची.

छान! सारं बालपण उभ झाले डोळ्यासमोर. चिंचा कोवळ्या असताना त्या खाताना मजाच असायची. पण त्यापेक्षा मजा त्या चोरून खाताना असायची. म्हणजे कुणाच्या कुंपणावर चढून काढून नंतर शिव्या मोफत. धमाल. एक करुण आठवण .. भूक लागली की आम्ही नदीवरच्या शिवारात जाउन खूप चिंचा काढत असू.मित्र असत ३-४ जण. मग गावात देवळासमोर वाटे करून ( खडूने चौकोन आखून) त्यात त्या चिंचाचे ढीग ठेऊन विकत असू. आलेल्या पैश्यातून खाऊ आणून पोट भरले की संध्याकाळी घरी परतत असू. त्यावेळी टीमवर्क,सहकार्य वगैरे गोष्टी रक्तात भिनल्या आणि पैश्याचे महत्व !!

कैलास जुन्या मुंबईचे फोटो नक्की मेल करा.

आरती, मनस्विनी, नितिनचंद्र, मामी, सुनिल, दाद्, स्मिता धन्यवाद. तुमच्या आठवणीही आवडल्या.

>>>अहाहा चिंचा. पूर्वीही खायचे. अजूनही खूप चिंचा खाते.
चोरून/ ओरडा खाऊन खाण्यात मज्जा.>>>
रैना, अगदी अगदी..आई ने स्वयपाकासाठी चिन्चेचा गोळा आणून दिलाय..आमटी/भाजीत घालताना कधीतरी पटकन थोडीशी तोन्डात टाकते..नवरा आसपास असेल तर डोक्याला हात लावतो.. >>>

सेम पिंच. आताही तोंडाला पाणी सुटलंय. Happy

Pages