गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग ११

Submitted by बेफ़िकीर on 11 November, 2010 - 04:59

कोरेगाव पार्क ते ब्ल्यू डायमंड अंतर असेल फार तर बारा मिनिटांचे कारने! एक जुनी अ‍ॅम्बॅसॅडर बंगल्यावर होती जी सायरा वापरायची. आत्ताही ती त्याच गाडीतून निघाली होती. रात्रीचे सव्वा नऊ झालेले! सायराचा पोषाख पाहून ब्ल्यू डायमंडमध्ये तिला कुणीच विचारणार नव्हते की कुणाला भेटायचंय! कारण एक तर तारांकित हॉटेल्समध्ये असे विचारता येत नाहीच, त्यात तिचा पेहेराव आणि चेहर्‍यावरील आत्मविश्वास पाहून कुणी तिच्याकडे लक्षही दिले नसते ती कोणत्याही रूममध्ये गेली असती तरीही!

पण आज... ! आज तिच्या चेहर्‍यावरील भाव जरी नेहमीप्रमाणेच असले तरी त्याच्या आत असलेल्या मनावर एक भयानक सावट होते.

पोटात असलेल्या गर्भाचे अस्तित्व अलीकडे अधिक जाणवू लागलेले होते. एक नवीच संवेदना चोवीस तास मनावर व्यापलेली होती. कुणापासूनही गर्भ राहिलेला असला तरी आपल्याच शरीरात आकार घेऊ पाहणारा तो गोळा आपल्याच शरीरावर पूर्णतः अवलंबून असण्याची भावना फारच सुखद होती.

सायराने सर्वात पहिल्यांदा अल्कोहोल सोडले होते. आहारात बदल केले होते. काहीसा व्यायामही सुरू केलेला होता. मात्र अजूनही एखादा डॉक्टर तिने गाठलेला नव्हता. शामा तिला बरेच मार्गदर्शन करायची.

एक मोठेच धर्मसंकट समोर उभे होते. वाहतुकीकडे अजिबात लक्ष नव्हते सायराचे, गाडी चालवताना! कारण मनावर ताण होता तो कुणा एकाशी निष्ठावान होताना दुसर्‍याला फसवावे लागणार आहे या भावनेचा!

रेकॉर्डर अगदीच लहान होता. त्यात फार तर वीस मिनिटांचे बोलणे टेप झाले असते असे तिला वाटत होते. मात्र तो अतिशय शक्तिशाली रेकॉर्डर आहे हे तिला माहीत नव्हते. त्याची क्षमता बरीच जास्त होती.

लोहियांबरोबर मुंबईत सप्ततारांकित हॉटेल्समध्ये घालवलेल्या रात्री आत्ता तिला आठवत होत्या. पाण्यासारखा पैसा वाहिला होता त्या रात्रींमध्ये! पैशाचा अर्थातच काही प्रश्नच नव्हता. केवळ पैसा खर्च झाला म्हणून लोहियांशी एकनिष्ठ राहायला हवे अशा खुळचट विचारांची ती नव्हतीच! प्रश्न वेगळाच होता.

लोहिया पन्नाशीच्या पुढे पोचलेले होते. पण त्यांचा बेडमधील परफॉर्मन्स त्यांच्या प्रोफेशनल म्हणून असलेल्या परफॉर्मन्सपेक्षा कित्येक पटींनी चांगला होता. त्यांच्या स्पर्शात अनोखी जादू होती. पण... पण प्रश्न हाही नव्हता. वासना आणि प्रेम यांच्या सीमारेषेवर कुठेतरी सायर होती. लोहिया कुठे होते याबद्दल तिच्या मनात धाकधुक होती.

प्रश्न हा होता की आपले भवितव्य लोहियांबरोबर सुरक्षित आहे की मोनाबरोबर! हे ठरवणे अशक्य वाटत होते तिला! कारण मोना नक्की किती पोचलेली आहे हे माहीत नव्हते. त्यात ती हेलिक्सची सर्वाधिकारी आहे हे तर कुणीही सांगू शकले असते. आज झालेल्या मीटिंगमध्ये जतीन आणि सुबोधला तिने ज्या पद्धतीने उडवले त्यावरून तिची भीती बाळगायलाच हवी होती.

पण लोहिया? लोहिया हे सरळ सरळ स्टार होते हेलिक्सचे! त्यांच्याशिवाय मोनाचे पान हालणार नाही हे तितकेच सत्य होते. लोहिया हे मोनासाठी मोहन गुप्तांच्या पातळीचे आहेत हे सायरा जाणून होती. त्यातच, मोनाला लोहियांचा सूड घ्यायचा आहे हेही तिला माहीत होते.

रेकॉर्डर चालू करायला काहीच हरकत नव्हती खरे तर! पण आपण स्विटमध्ये पोचल्यानंतर लोहियांचा जो आवेग असेल त्यातून रेकॉर्डर चालू करायला जमले तर पाहिजे? आणि समजा जमले तरी त्यात नेमके नको ते टेप झाले तर?

आणि सर्वात महत्वाची भीती! रेकॉर्डर ऑन आहे हे लोहियांना समजले तर?

आपण कॅरिंग आहोत हे कळल्यावर काय रिअ‍ॅक्शन असेल त्यांची? त्यांना आपल्या मुलाचे बाप व्हायची इच्छा तरी असेल का? इतक्या हाय लेव्हलचा तो माणूस! पन्नाशीच्या पुढचा! त्यचा स्वतःचा मुलगाच आता तेवीस चोवीस वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत, इतके प्रचंड स्टेटस असताना लोहिया आपले मूल हे त्यांचे मूल म्हणून स्वीकारतील का?

समजा स्वीकारले तर काय? ते फक्त खर्च करतील आणि मुलाचे भवितव्य सुरक्षित करून ठेवतील! आपण थोडीच हेलिक्सच्या जॉईंट एम डी ची पत्नी म्हणून वावरू शकणार आहोत? म्हणजेच त्यांच्या स्वीकारण्या न स्वीकारण्याला काही अर्थच नाही. आपल्याला आपले मूल हवे आहे, कुणीतरी अगदी फक्त आपले असे या जगात असावे असे आपल्याला वाटते आहे इतकेच सत्य आहे. आय कॅन नॉट बी मिसेस लोहिया अ‍ॅट ऑल! हे आपल्याला माहीत असूनही आपण इतक्या मूर्खासारख्या कशा वागलो?

यावर विचार करण्याची ही वेळच नाही. समजा लोहियांनी 'हे मूल त्यांचे आहे' ही बाब उडवून लावली तर? तर आपण काय करणार? पिंजोरला तोंड दाखवू शकणार नाही आपण! आणि मुंबईत राहून हेलिक्समध्ये तर निश्चीतच आपली नोकरी राहणार नाही. कारण लोहियांना सतत डोळ्यासमोर एक टेन्शन कधीच नको असणार! त्यांना आपली भीतीही वाटणारच की! आपण कुठे बोललो तर त्यांची इज्जत काय राहिली? त्यामुळे लोहियांनी जरी अगदी स्वीकार केला मुलाचा तरीही ते आपल्याला निक्षून सांगतील की यावर कुठेही अक्षर बोलायचे नाही. कदाचित ते आपले कुणाशी तरी लग्नही लावून देतील.

लग्न! आपण लग्न का नाही केले? कुणाशीही? एका म्हातार्‍याबरोबर बेडमध्ये रंगढंग करण्यापेक्षा एका कोणत्याही सरळ स्वभावाच्या तरुणाशी लग्न करण्यात काय प्रॉब्लेम होता? आपण श्रीमंतीवर भाळलो. आपल्याला भवितव्य नाही. लोहियांना आपण प्रेग्नंट आहोत हे सांगणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारण्यासारखे आहे. ते निश्चीतच आपल्याला हेलिक्समधून तरी काढतील किंवा....

.... किंवा??? ... किंवा जगातून... ही इज दॅट कॅपेबल.. दॅट बास्टर्ड इज सर्टनली दॅट कॅपेबल..

आपण... आपण असुरक्षित आहोत... मोना... मोनालिसा कॅन ओन्ली सेव्ह मी.. लोहियांपासून.. नो वन एल्स...

पण... पण मग आपला स्वीकार कोण करणार? मुलासकट? असतील म्हणा माणसे तशी.. पण.. मोना काय दर वेळेला आपल्याला थोडीच वाचवू शकणार आहे?? आणि लोहियांचा... लोहियांचा तो स्पर्श..

एकाचवेळेस संपूर्ण अंगावर गोड शिरशिरी आणणारा आणि .... त्या लहरींमध्ये आपण स्वतःपासूनच वेगळ्या व्हायचो... आपण स्वतःला विसरायचो... आपण त्या क्षणी असायचो फक्त एक प्रेमिका... जिला वय नाही.. शरीर नाही.. अस्तित्व नाही.... कणाकणावर फक्त लोहियांची व्याप्ती...

त्य दिवशी ओबेरॉयमध्ये आपल्या अंगावर वाईनची बाटली उपडी केली होती त्यांनी... आणि मग... आपल्यासकट वाईन प्यायली.. एखादा.. एखादा पंचवीशीचा तरुण तरी हे करू शकेल का??

शी.. thats not the only thing.... the reality is far far away from this..

lohiya is just an opportunist.. if not Saayaraa... someone else..

आले की ब्ल्यू डायमंड!

सायराचा निर्णय होता नव्हता... लोहिया की मोना???

पण.. गाडी पार्क करताना मात्र झाला... निर्णय झालेला होता.. आता तिला खूपच शांत शांत वाटत होते...

सायराचा मादक सुगंध रिसेप्शनवर पसरला आणि काउंटरवरचा एक्झिक्युटिव्हही क्षणभर दीपलाच तिला पाहून! लोहियांच्या स्विटची माहिती घेऊन सायरा सरळ लिफ्टने पाचव्या मजल्यावर गेली.

"कम्मीSSSSSSन"

सायरा आत आली आणि लोहिया क्षणभर मुग्धच झाले तिला पाहून! त्यांना खात्री नव्हती की ती येईल! पण ज्या अर्थी ती आली होती त्याचा अर्थ सरळ होता... शी वॉज जस्ट लव्हिंग हिम...

बेदिंग गाऊनमध्ये असलेल्या लोहियांनी सायराला करकचून आवळले. तिच्या केसांमध्ये तोंड घुसळताना त्यांना अचानक जाणवले.. समथिंग इज राँग.. सायरा... सायरा इज नॉट रिअली हॅपी टू बी हिअर... पाहिले तर सायरा मुसमुसून रडत होती..

लोहिया - काय झाले??

सायरा - I love you... I love you...

लोहिया - I love you too.. पण... रडतीयस का तू??

सायरा - मला.. नाही राहायचे तिथे...

लोहिया - का? .. आणि मी कुठे म्हणतोय तू तिथे राहा?? in fact I am dead egar to bring you back to bombay

लोहियांच्या गाऊनमधून दिसणार्‍या त्यांच्या छातीवर डोके टेकवत सायरा म्हणाली...

सायरा - what will I do ... if I come there??

लोहिया - meaning? ... love.. love and only love...

गुप्ता हेलिक्सचे जॉईंट एम डी हायलॅन्ड पार्कच्या अडीच पेग्जनी आत्ता बेधुंद झालेले होते. त्यातच स्विटमध्ये हे लावण्य अचानक आल्यामुळे त्यांचा कंट्रोलच राहू शकत नव्हता स्वतःवर... ultimately, every one is an animal... if allowed to be so...

लोहियांचे हात सायराच्या पाठीवरून वेगाने फिरत होते.

सायरा - You know something?? ....

लोहिया - I know everything... Mona must be harrasing you...

सायरा - अंहं... I am pregnant....

एक क्षण! तो एक क्षण फार फार महत्वाचा होता. त्या क्षणाला लोहियांच्या डोळ्यातले भाव वाचणे अत्यावश्यक होते. त्यामुळे हे वाक्य बोलण्याआधी सायराने स्वतःचा चेहरा लोहियांकडे वळवला होता. त्या क्षणातील भाव जर आनंदाचे असले तरच लोहियांना खरा आनंद झाला असे ती समजणार होती. क्षणभर विचारात पडून नंतर व्यक्त केलेल्या आनंदाचे महत्व तिच्या दृष्टीने शुन्य होते.

पण! लोहिया तिच्यापेक्षा कितीतरी पुढे पोचलेले होते. त्यांनी त्या क्षणाचे रुपांतर क्षणाच्या हजाराव्या भागात केले. आणि उरलेल्या नऊशे नव्याण्णव भागांमध्ये त्यांच्या चेहर्‍यावर आनंदच होता. तो एक हजारांश सेकंद सायराला नोटच करता आला नाही.

फसली होती सायरा! तिने घट्ट मिठी मारली लोहियांना! तिच्या स्पर्शाने आधीच पागल झालेल्या लोहियांनी तिला तसेच उचलले आणि स्वतःच्या खुर्चीवर बसून तिला स्वतःच्या मांडीवर बसवले.

दोन नजरा! एकमेकींमध्ये घट्ट गुंफलेल्या दोन नजरा! जणू पत्नीनेच पतीला सांगीतले असावे.. मी प्रेग्नंट आहे असे! लोहिया अत्यानंदाने पाहात होते सायराकडे! सायराच्या चेहर्‍यावर पारंपारिक सलज्ज भाव आलेले होते. स्विटमध्ये निळा मंद लाईट होता. हायलॅन्ड पार्कचा तिसरा अर्धवट पेग टीपॉयवर होता. पुढची ऑर्डर स्विटमधून येईपर्यंत ब्ल्यू डायमंडच्या स्टाफची लोहियांना डिस्टर्ब करायची हिम्मतही नव्हती.

लोहियांनी सायराला आणखीन जवळ ओढले. सायराच्या ओठांवर आपले हायलॅन्ड पार्कमध्ये भिजलेले ओठ टेकवले. अत्यंत आवेगाने लोहियांनी सायराच्या ओठांमध्ये स्वतःचे ओठ रुतवले. हवाही जाऊ शकणार नाही इतके कमी अंतर होते त्यांच्या आलिंगनात! गुंगले होते दोघे एकमेकांच्या चुंबनात! कित्येक दिवसांनी दोन प्रेमिक भेटत होते जणू! लोहियांच्या नुकत्याच बाथ घेतलेल्या शरीराचा पुरुषी गंध सायराच्या मनावर व्यापलेला होता. आणि सायराचा रेशमी गंध लोहियांच्या!

सायराने आपल्या उजव्या हाताची नखे लोहियांच्या पाठीत रुतवली. डाव्या हाताने ती त्यांचा उजवा हात थोपवत होती. लोहिया बेभान झालेले होते. त्यांनी स्वतःचा उजवा हात सोडवून घेतला आणि दोन्ही हातांनी सायराला स्वतःच्या चेहर्‍यावर ओढून घेतले.

याच क्षणाची सायरा वाट पाहात होती. डावा हात मागच्यामागे लांब करून तिने पर्समध्ये घातला. हाताला रेकॉर्डर लागतच नव्हता. अधिक हालचाली केल्यास लोहियांना संशय आला असता. त्यामुळे तिने लोहियांना सात देत आहे याचे बेमालूम नाटक सुरू ठेवले. कधीतरी अचानक.. हाताला रेकॉर्डर लागला.

सायराने रेकॉर्डर ऑन केला होता. आता ती वाचणार होती. कारण वीस मिनिटात फक्त लोहियांच्या आणि तिच्या जवळीकीचे काही आवाज झाले तर तेवढेच रेकॉर्ड होणार होते. आणि ते ऐकण्यात मोनाला काहीच इन्टरेस्ट नसणार होता. किमान अर्धा तास लोहियांपासून बाजूलाच व्हायचे नाही हे सायराने ठरवलेले होते.

तेवढ्यात शेजारीच असलेला इन्टरकॉम वाजला.

"this bloody room service" म्हणत लोहियांनी सायरावरचे लक्ष किंचित दूर करून फोन उचलला. सायरा खुदखुदत होती.

"She is carrying a recorder with her"

फोनवर फक्त एकच वाक्य ऐकू आले. नुकताच बाथ घेतलेल्या लोहियांना त्या एसी स्विटमध्येही घाम फुटायची वेळ आली. पण पुन्हा निमिषार्धातच त्यांच्यातील पोचलेला बिझिनेसमन जागा झाला. क्षणार्धात त्यांनी उत्तर दिले.

"No no, I shall tell when to bring the food.. ok???"

एक क्षणही न दवडता, जणू काय हा फोनचा व्यत्यय असे भाव तोंडावर आणून लोहियांनी पुन्हा सायराच्या गळ्याखाली आपले ओठ टेकवले.

लोहिया - you are looking beautiful .. much more.. now a days..

सायरा - oh really?? how much beautiful??

लोहिया - like a flower... it's a son or a daughter??

सायरा - तुम्हाला काय हवे??

लोहिया - both..

सायरा - हट ... बोथ म्हणे...

लोहिया - पण तू आत्ता आलीस कशी काय? मोना??

सायरा - मॅडमना सांगीतले...

लोहिया - काय??

सायरा - की मी प्रेग्नंट आहे आणि लोहियांपासून आहे.. त्यामुळे त्यांना भेटायला चाललीय...

लोहियांच्या आणि सायराच्या हासण्याने ती खोली दुमदुमली.

सायराची साडी आता खाली कारपेटवर घरंगळून पडलेली होती. लोहियांच्या बेदिंग गाऊनच्या शेजारी! हायलॅन्ड पार्कचा ग्लास हातात घेत लोहिया म्हणाले...

"टोस्ट... "

"अंहं.. मी नाही घेत आता..."

"हं... पण आंघोळ तरी करशील की नाही??"

"हायलॅन्ड पार्कने?? ... सांगा हाऊसकीपिंगला... बाथ टब भरायला.. स्कॉचने..."

वासना सवार झालेली दोन्ही शरीरे जोरजोरात हासत होती..

"You yourself are a scotch darling.."

"oh... which one??"

"black label..."

मोहन गुप्तांच्या फेवरिट ब्रॅन्डचे नाव काढल्यामुळे दोघे पुन्हा हसायला लागले.

"Is it here???"

"अंहं... just below that.."

"here??"

"yaah..."

"oh... feels like it's a son..."

"बाहेरून कळते तुम्हाला??"

"न कळायला काय झाले??"

"सांगा बरे कसे कळते??"

"पोटात मुलगा असेल तर आई अधिक सुंदर दिसते... मुलगी असेल तर विशेष नाही..."

"आहाहाहा... गायनॅक एक्स्पर्ट..."

"हं.... हे घे..."

"शी.. कपड्यांवरून काय ओतताय..."

लोहियांनी हायलॅन्ड पार्कची बाटली तिच्या अंगावर उपडी केली होती. आणि आता दोघेही हासत हासत बेडकडे चाललेले होते.

तासाभराने आवेग नियंत्रणात आला तेव्हा ब्ल्यू डायमंडमधे आजवर नसेल इतके खुष झालेले एक जोडपे बेडवर पडून आढ्याकडे बघत होते.

सायरा - बंगल्यावर कशी जाऊ?

लोहिया - का?

सायरा - साडीला स्कॉचचा वास येतोय...

लोहिया - ओह... ती आता झोपलीच असेल..

सायरा - आज ती गिरकी घेऊन खिदळत होती आठ वाजता...

लोहिया - का??

सायरा - कुणाशीतरी सारखी बोलत होती फोनवर... सारख्या मेल्स चेक करत होती...

लोहिया - मूर्ख मुली... कुणाशी बोलत होती ती?? ते ऐकले नाहीस???

सायरा - रागावता काय?? सगळे सांगते ना मी नेहमी तुम्हाला???

लोहिया - काय बोलत होती??? काही ऐकू आले???

सायरा - काहीतरी वीस मशीन्स.. तीन महिन्यात.. असं काहीतरी...

लोहिया - वेड लागलंय तिला... आधीच शेव्हिंग मशीन्सच्या गोत्यात आलेलीच आहे...

सायरा - सर... मला.. मला खूप भीती वाटते...

लोहिया - ... का???

सायरा - सर... माझे भवितव्य काय???

लोहिया - म्हणजे???

सायरा - माझ्याशी... लग्न.....

लोहियांच्या चेहर्‍यावरचे भाव सायरा आत्ताही वाचत होतीच.

लोहिया - तुला नक्कीच माहीत आहे की...

सायरा - नाही नाही... मी तसा आग्रहही करत नाही आहे.. पण.. मी... मी काय करणार आता??

लोहिया - वेडी आहेस.. मी असा वार्‍यावर सोडेन का तुला??

सायरा - ... पण.. सांगा ना सर... मी काय करायचे???

लोहिया - लीव्ह हेलिक्स... शिफ्ट टू बॉम्बे... आय'ल बाय अ‍ॅन अपार्टमेन्ट फॉर यू.. तिथे राहा... मुलाला वाढव...

सायरा - आणि... वडिलांचे नांव...??

लोहिया - .. सायरा.. तुझा माझ्यावर विश्वास नाही??

सायरा - काय बोलता सर??

लोहिया - मग वडिलांच्या नावाची गरज जिथे भासेल तिथे मी काळजी घेईन... हा आपल्या दोघांचा मुलगा आहे..

सायरा मनात विचार करत होती. तारुण्य ओसरल्यावर लोहियांचा इन्टरेस्ट कमी होणार हे न समजायला ती मूर्ख नव्हती. इतकेच काय डिलीव्हरीनंतरही कदाचित ओसरेल असे तिला वाटत होते. त्यानंतर लोहिया फार तर एक कर्तव्य समजून कदाचित खर्च करत राहिलेही असते. पण किती काळ? किती दिवस? किती वर्षे? कुणी दुसरी आवडली तर? आपण काही कायद्याने पत्नी नाहीत. याचाच अर्थ, धिस इज द टाईम टू मेक मोस्ट ऑफ इट! आणि मोना मॅडम? त्या मात्र आपण प्रामाणिकपणे वागलो तर आयुष्यभर आपल्याला जपतील! कारण एक तर आत्ता त्यांना कुणीच नाही आहे. आणि अशा कालावधीत आपण दिलेली साथ त्यांना नेहमीच महत्वाची वाटेल.

लोहियांच्या खांद्यावर डोके टेकवत सायरा उद्गारली.

सायरा - मला तर वाटते...

लोहिया - ... हं...

सायरा - तुमच्या मुलाला खूप खूप छान वाढवावे...

लोहिया - अन मुलगी झाली तर??

सायरा - तर मुलीला....

लोहिया - अर्थातच... लोहियांचा मुलगा, मुलगी राजासारखेच असायला हवेत...

सायरा - मला वाटते की तुम्ही माझ्या डिलीव्हरीच्या आधीच एक अपार्टमेंट घ्या... मुंबईत...

लोहिया - हं.. तिला माहीत आहे का?? मोनाला??

सायरा - नाही... काल म्हणत होत्या वेगळी दिसतेस म्हणून....

लोहिया - कुठे अपार्टमेंट घ्यायची??

सायरा - कुठेही... स्वस्त असेल तिथे...

लोहिया - स्वस्त?? स्वस्त काय म्हणून?? चांगली पॉष अपार्टमेंट घेऊ...

सायरा - सर.. एक सांगू?? मुंबईपेक्षा इथले रेट्स अर्ध्यापेक्षा कमी आहेत...

लोहिया - तुला पुण्यात राहायचंय???

सायरा - मॅडमच्या बंगल्यावर ड्युटीही करता येईल....

लोहिया - पण आता दोन वर्षे तर तू कामच करू शकायची नाहीस...

सायरा - हो... पण निदान नंतर तरी....

लोहिया - ठीक आहे... एखादा फ्लॅट बघ इथे...

सायरा - मी काय म्हणते... हेलिक्सतर्फे नाही घेता यायचा??

लोहिया - छे... काहीतरी काय.. सगळेच मागायला लागतील फ्लॅट्स...

सायरा - पण तुमचे इतके पैसे घ्यायला कसेतरीच वाटते...

लोहिया - याचाच अर्थ तुझे खरे प्रेम नाही आहे...

सायरा - असं नाही सर... पण.. हितेश सर जर तुम्हाला काही बोलले तर???

लोहिया - हितेशला कशाला कळेल??

सायरा - इथल्या फ्लॅटलाही पस्तीस लाख लागतील.. दोन बेडरूम्सच्या...

लोहिया - ओके... तू सिलेक्ट केलास की सांग... मी पाठवीन पैसे...

सायरा - सर... आय... लव्ह यू...

लोहिया - आय लव्ह यू टू डिअर...

सायरा - निघू???

लोहिया - अकराच वाजलेत...जा निवांत...

सायरा - सोडवत नाहीये??

लोहिया - नाही ना.. काय करणार...

दोघे पुन्हा हसायला लागले.

सायरा - मॅडमना सांगीतले की पिंजोरची मैत्रीण नवर्‍याबरोबर पुण्यात आलीय.. डिनरला बोलवलंय... आता खरच निघायला पाहिजे...

लोहिया - जतीन आणि सुबोधच्या बाबतीत किती वाईट वागली...

सायरा - खरंच सर... फार वाईट वाटले.. बोलले ते तुमच्याशी नंतर??

लोहिया - नाही... बहुधा तडक मुंबईला गेले..

सायरा - सोडा... निघते...

लोहिया - ओक्के... अ‍ॅज यू विश...

सायरा - मला वाटेल का जावेसे?? मॅडमचे टेन्शन आहे... म्हणून निघतीय...

लोहिया - परत कधी??

सायरा - मुंबईला बोलवून घ्या ना एखाद दिवस... आता जास्त वेळ भेटताही यायचे नाही.. फर तर एखादा महिना...

लोहिया - खरं आहे... ठीक आहे.. नेक्स्ट वीक काहीतरी कारण काढतो.. तुला तिकडे येण्याचं...डॉक्टरला दाखवलंस का??

सायरा - उद्या परवा जाईन...

लोहिया - लव्ह यू बेबी...

सायरा - आय लव्ह यू टू सर...

एक प्रदीर्घ किस देऊन सायरा उठली. कपडे उचलून रेस्ट रूममध्ये निघून गेली.

बाहेर आली तेव्हा लोहिया नवीन ड्रिन्क बनवून घेत होते. बहुधा त्यांनी जेवणाची ऑर्डर दिलेली असावी.

सायरा लोहियांच्या जवळ खेटून उभी राहिली. त्यांनी तिला जवळ ओढून विचारले.

लोहिया - जेवणार आहेस???

सायरा - अंहं..

लोहिया - कार आहे ना??

सायरा - हं...

लोहिया - खरच साडीला हायलॅन्ड पार्कचा वास येतोय...

सायरा - मग मी काय खोटे बोलतीय?? बाटली ओतल्यावर काय होणार??

लोहिया - ओके...

सायरा - गुड नाईट सर....

लोहिया - गुड नाइट डार्लिंग...

सायरा पर्स उचलून जायला निघाली.

दारात असतानाच लोहियांनी हाक मारली.

"सायरा.... हे... हे मी माझ्याकडेच ठेवतोय... हं??? आणि... तुझ्या मुलाचा... माझ्याशी काहीही संबंध नाही हे आता तुझ्या लक्षात आले असेलच.. "

हातात रेकॉर्डर घेऊन सायराकडे मिश्कीलपणे बघत लोहिया बोलत होते.

तोंडावर भीतीच्या अतिरेकाने हात दाबून सायरा लिफ्टची वाटही न पाहता जिन्यावरून धावत सुटली होती.

मुलाची काळजी लोहिया घेणार नाहीत याची भीती नव्हती तिला! ती कुणीही घेतली असती. तिला भीती वेगळीच होती. आता ती लोहियांच्या अपोझिट पार्टीत स्पष्टपणे आलेली होती... आणि तिच्या पोटात लोहियांचाच गर्भ वाढत होता... थोडक्यात... आपले फार फार कमी दिवस राहिलेले आहेत हे सायराला समजलेले होते...

शी वॉज गोईंग टू डाय... शी वॉज गोईंग टू बी किल्ड... लाईक मिस्टर गुप्ता वॉज अल्सो किल्ड...

==============================================

त्याचवेळेस मोना बंगल्यावरून फोनवर बोलत होती...

.. रेजिनाल्डो रिकार्डो डिसूझाशी...

सायरा निघून गेल्यानंतर मोनने खूप खूप विचार केला होता. हेलिक्समध्ये विषारी वातावरण निर्माण झालेले होते. त्यातच अर्देशीरांचा पत्ता कट झाला होता. पाठोपाठ काहीच महिन्यात सुबोध आणि जतीन यांच्याशी आज सरळ सरळ शत्रूत्व आहे हे सिद्ध केले होते तिने! सायरावरचाही विश्वास डळमळीत होऊ लागला होता. वास्तविकपणे सायरा ही तिच्यासाठी किस झाड की पत्ती होती. पण ती जर आपल्या बाजूची असली तर आपले बरेच फायदे होतील हे मोनला माहीत होते. कारण सायरा लोहियांशी रिलेशन्स ठेवून होती. पण तीच आपल्या विरुद्ध गेली तर धोकादायक ठरेल हे मोनाला समजू शकत होते.

अशा परिस्थितीत केवळ काही तासातील बिनधास्त भूमिकेमुळे आपल्या पदरात डॅनलाईनसारखी एजन्सी पडलेली आहे आणि ती नीट चालली तर हेलिक्सच्या तिप्पट प्रॉफिट एकही आयटेम मॅन्युफॅक्चर न करताही पदरात पडेल हे तिला माहीत होते. पण विषारी चौकडीपैकी कुणाच्याही हातात डॅनलाईन द्यायची आता तिची अजिबातच तयारी नव्हती. आणि डॅनलाईनसाठी तिने भारतभर फिरणे शोभूनही दिसणार नव्हते.

असा कोण माणूस आहे जो डिसेन्ट आहे आणि तरुण आहे आणि... आव्हाने स्वीकारायला तयार असू शकेल?

हेलिक्समधल्या प्रत्येक नावापुढे मनातच फुलीमारून मोना आता रेजिनाच्या नावावर येऊन स्थिरावली होती.

अत्यंत सभ्य, मिश्कील आणि कर्तबगार हॅन्डसम तरुण! रेजिनाल्डो रिकार्डो डिसूझा!

अडीच दिवसात मोनाला रेजिना आवडू लागला होता. निर्मळ अर्थानेच, पण व्यवस्थित आवडू लागला होता. आत्ता या क्षणी डॅनलाईन जिंकल्यानंतर तिला खूप आठवण येत होती त्याची!

त्याला कसे तुटकपणे काहीतरी सांगून आपण निघून आलो. तरी बिचारा काही बोलला नाही. इतकेच नाही तर आपण एक साम्राज्ञी आहोत हे जाणून असल्यामुळे स्वतःच्या पोझिशनचा विचार करून त्याने एकही फोनही केला नाही. हे समजून घेण्यासाठी की आपण ठीक आहोत की नाही! आपल्याशी तो मैत्री करतो आहे असे आपल्याला अजिबात वाटू नये याची तोच काळजी घेतो आहे. किती चांगुलपणा खरे तर!

त्याला वाटत असेल का एखादा फोन करावासा? की आपणच बावळट आहोत. त्याच्यासारख्या जगभर फिरलेल्या माणसावर आपले काय इम्प्रेशन पडणार म्हणा!

पण... आपण हेलिक्सच्या हेड आहोत... आपण हे विसरता कामा नये.. बावळटासारखे विचार करता कामा नयेत... आपण आपल्याला शोभेल असेच वागले पाहिजे...

मोनाच्या मनातले हे सर्व निर्धार रेजिनाचा आवाज ऐकताच नष्ट झाले... केवळ आवाज ऐकताच..

तिने डॅनलाईनसाठी आत्ता त्याला फोन लावला होता.

रेजिना - yes mam... is everything alright??

मोना - हो.. सगळे ठीक आहे...

रेजिना - मला वाटले पुण्याला काहीतरी भयंकर झाले म्हणून तुम्ही निघून गेलात की काय...

मोना - नाही... तुम्ही... अजून पर्ललाच आहात???

रेजिना - छे???? मी केव्हाच कलकत्याला आलो...

मोना - का???

रेजिना - त्याचं काय झालं?? की तुम्ही ट्रीपमध्ये मला भेटाल असे मला कधीच वाटले नव्हते.. पण तुम्ही निघून गेल्यानंतर मला एकदम एकटे एकटेच वाटायला लागले...

हा माणूस आपल्याशी असा बोलू शकतो याचा मोनाला खरे तर राग यायला हवा होता. पण का कुणास ठाऊक, तिला राग आलाच नाही. रेजिना दिलखुलास स्वभावाचा आहे हे ती जाणून होती.

मोना - हं... होतं असं काही वेळा...

रेजिना - हो ना... तुम्ही कसा काय गरीबाला फोन केलात???

मोना - गरीब फारच गरीब आहे... म्हंटलं बघू.. श्रीमंत व्हायची कल्पना आवडते का गरीबाला..

रेजिना - व्वा! म्हणजे हेलिक्सचे मार्केटिंग मला बघायला सांगणार की काय?? चला.. एलेकॉनचा कंटाळा आलाच होता... तुमच्या स्फुर्तीदायक मार्गदर्शनाखाली मी हेलिक्सचे मार्केट बघायला तयार आहे..

मोना - मी तुम्हाला अजिबातच हेलिक्सला घ्यायला तयार नाही....

रेजिना - मॅडम एलेकॉन आज नंबर वन वर या रेजिनामुळे आहे... तुम्ही अगदी मनच मोडलेत माझे...

अजूनही तो तसाच मिश्कीलपणे बोलत होता. रक्तात एलेकॉन होती त्याच्या! जीव गेला तरी हेलिक्सचा एकही गिअर विकला नसता रेजिनाने!

मोना - हो ना! आणि हेलिक्सकडे रेजिनाल्डो डिसूझा नसल्यामुळे आम्ही मागे पडतो आहोत...

रेजिना - असे म्हणालो का मी??

मोना - किती तो अभिमान एलेकॉनचा...

रेजिना - असणारच.. माझी रोजी रोटी आहे ती...

मोना - गिअर्स विकायचा कधीच कंटाळा येत नाही??

रेजिना - भयंकर कंटाळा येतो... पण करणार काय?

मोना आत्ताचा टेलिकॉन खरे तर एन्जॉय करत होती. मनात आणले असते तर तिने पटकन एम डी ची भूमिका घेतल्ही असती स्वतःकडे! पण रेजिनाच्या व्यक्तीमत्वात एक आश्वासक गोडवा आणि एक प्रामाणिकपणा होता. जो माणूस स्वतःच्या रूममधून दुसर्‍याला फोनवर बोलताना प्रायव्हसी मिळावी म्हणून बाहेर जातो, तेही कॉम्पीटीटरला, तो निश्चीतच एक दिलखुलास माणूस असणार होता. डिसेन्ट! आणि हॉनेस्ट गेम खेळणारा! स्पर्धा करायची तर मार्केटमध्ये करा, चोवीस तास कॉम्पीटिशन नको, हे त्याचे आवडते मत सिमला टूरमध्ये मोनालाही खूप आवडले होते.

.... आणि कितीही नको नको म्हणत असली तरी तिचे मन तिला हेही सांगत होते... की.. तोही तिला आवडला आहे... आणि बहुतेक.. तीही त्याला...

मोना - पण करणार काय... खरच आहे.. एखादी वेगळी संधी आली तर बरे होईल नाही???

रेजिना - हो ना.. पण अशी संधी कोण देणार..??

मोना - मोनालिसा गुप्ता...

रेजिना - दिलीत???

मोना - काय??

रेजिना - संधी???

मोना - असं म्हणतीय मी...

रेजिना - घेतली.....

मोना - घेतली???

रेजिना - येस्स...

मोना - मी एक महिला मंडळ काढणार आहे.. त्याचे अ‍ॅडमिस्ट्रेटिव्ह हेड व्हाल का विचारत होते...

रेजिना - ई... शी...

मोना खदाखदा हासली.

रेजिना - तुम्हाला या अशा वेळेस थट्टा करण्यासाठी रेजिनाशिवाय कुणी मिळाले नाही???

मोना - नाही हो... खूप प्रयत्न केला...

रेजिना - त्या बायका माझ्या झिंज्या ओढतील...

मोना - नाही.. सुंदर सुंदर बायका आहेत...

रेजिना - जेवढी सुंदर बाई तेवढी धोकादायक...

मोना - का??

रेजिना - कारण तिला दुराभिमान असतो..

मोना - अच्छा अच्छा...

रेजिना - पण नियमाला अपवाद असतातच म्हणा...

मोना - म्हणजे???

रेजिना - तुम्ही अजिबातच दुराभिमानी नाही आहात...

आपण फारसे सुंदर नाही आहोत हे माहीत असूनही मोनाला ती काँप्लिमेन्ट आवडली. क्षणभर फोनवरच लाजून ती म्हणाली...

मोना - ओक्के... तर मग... हेड ऑफ सिनियर वुमेन'स असोसिएशन फॉर कल्चरल अ‍ॅन्ड ब्युटी डेव्हलपमेन्ट..

रेजिना - प्लीज... नक्कीच असली काहीतरी ऑफर नसणार आणि तुम्ही माझी थट्टाही नक्कीच करणार नाही...

मोना - हेड ऑफ ईन्डियन सबकॉन्टिनेन्ट... डॅनलाईन इस्पानिया...

केवळ दोन क्षणांच्या रहस्यमय गॅपनंतर एक भला थोरला मोठ्ठा चीत्कार ऐकू आला फोनवर मोनाला! उघड होते. रेजिनापर्यंत डॅनलाईनची थोरवी पोचलेली असणारच होती.

रेजिना - मिस गुप्ता... आय अ‍ॅम शुअर.. यू आर सिरियस....

मोना - डॅम..

रेजिना - बेस्ड अ‍ॅट??

मोना - वेल?? ... आय गेस....पुणे???

रेजिना - हेड....

मोना - हेड...

रेजिना - रिको डिसूझा इज अ‍ॅन एक्स्पेन्सिव्ह डील बाय द वे...

मोना - यू मीन वुई कान्ट पे???

रेजिना - ओह.. स्सो सॉरी.. नोट अ‍ॅट ऑल...

मोना - पॅकेज काय आहे??

रेजिना - साडे सोळा...

मोना - ओह.. माझ्याहीपेक्षा जास्त आहे...

रेजिना - हो पण माझ्याकडे एलेकॉनचे शेअर्स नाही आहेत...

मोना दिलखुलास हसायला लागली.

रेजिना - हासताय??

मोना - हं!

रेजिना - लोहियांचेच पॅकेज किमान तीस असेल... तुमचे तर काय...

मोना - असो... एक्स्पेक्टेड पॅकेज??

रेजिना - वीस...

मोना - डन...

रेजिना - डन????

मोना - कान्ट ट्रस्ट??

रेजिना - नो नो... आय मीन....

मोना - केव्हा येताय?? पुण्याला??

रेजिना - तीन महिने...

मोना - नोटीस पिरियडची पेनल्टी डॅनलाईन इन्डियाने बेअर केली तर???

रेजिना - परवाच्या दिवशी...

मोना - उद्या नाही???

रेजिना - अंहं...

मोना - का??

रेजिना - उद्या आलो तर तुम्हाला मी डॅनलाईन पण अशीच सोडू शकेन असे वाटेल...

पुन्हा मोना हसायला लागली.

मोना - म्हणजे परवा आलात तर वाटणार नाही.. असे???

रेजिना - मी किमान परवातरी यावे म्हणून तर पेनल्टी पेमेंट करताय...

मोना - यू नीड अपॉईंटमेंट लेटर??

रेजिना - मी पहिल्यांदा पुण्याच्या ऑफीसमध्ये येऊन बसतो... मग द्या...

मोना - गुड.. फारच विश्वास आहे...

रेजिना - हेलिक्सच्या एम डींवर विश्वास नाही ठेवायचा तर कुणावर??

मोना - सो .. डन??

रेजिना - येस्स.. थॅन्क्स अ टन...

मोना - राईट.. कॉन्ग्रॅट्स.. सो जॉईन अस द डे आफ्टर...

रेजिना - आय शॅल... गुड नाईट... मॅडम...

फोन ठेवतानाही मोनाला त्याने आपल्याला 'मॅडम' असे संबोधल्याचा आनंद झाला होता. कितीही हसून बोललो तरीही तो अधिक जवळीक करत नाही ही तिला फारच प्रॉमिसिंग बाब वाटत होती.

आणि साधारण सव्वा ते दिड तासांनी तिला चाहुल ऐकू आली.

सायरा???

मोना - काय गं??

सायरा - मॅम...

मोना - बोल???

सायरा - ही... ही इज... डेंजरस..

मोना - .. म्हणजे???

सायरा - त्यांना रेकॉर्डर मिळाला... पर्समध्ये..

मोना - ... गॉश.. मग??

सेकंदभर मोनाला सायरावर विश्वासच ठेवू नये असे वाटले. पण सायराचा चेहरा भयंकर दिसत होता.

सायरा - ही विल... ही विल ... नॉट लेट मी लिव्ह हॅपिली मॅम...

मोना - प्यायलीयस??

सायरा - नाही... कपड्यांवर थोडे ड्रिन्क पडले...

मोना - काय काय झाले मला सांग???

सायराने पाणी पिऊन सगळी हकीकत कथन केली. मोना खरच शॉक्ड झालेली होती. कारण सायराच्या लोहियांकडे जाण्यात मोनाचा स्वतःचा हात असू शकेल ही बाब लोहियांनाही जाणवली असेल याची तिला मनातून फार फार भीती वाटत होती.

आज आपण लोहियांवर अविश्वास दाखवला. उद्यापासून त्याचे पडसाद सुरू होतील.

आयुष्यातील शांतता, जी काय थोडीफार होती, ती आता गेली.. पूर्णपणे गेली....

सायरा - मॅम.. बहुतेक... बहुतेक...

मोना - काय???

सायरा - बहुतेक... मला.. मारायचा प्रयत्न करतील ते...

हा आणखीन प्रचंडच धक्का होता मोनासाठी!

मोना - का?????

सायरा - कारण.. त्यांच्याच मुलाची आई होणार आहे मी... आणि त्यांचेच बोलणे टेप करत होते..

क्लिक! सुटलो की आपण!

मोनाच्या मनात तो विचार एकदम आला... खरच... सुटलो आपण...

लोहियांना 'हे तुमचेच मूल आहे' यावरून ब्लॅक मेल करता यावे यासाठी स्वेच्छेने सायरा त्यांचे बोलणे टेप करत असणार असा स्टॅन्ड आपल्याला उद्यापासून घेता येईल.. अर्थात.. कदाचित लोहियांनाही तेच वाटू शकत असेल..

मोना - डोन्ट वरी सायरा... आय अ‍ॅम विथ यू.. डोन्ट वरी... आणि आजपासून त्यांना अजिबात भेटू नकोस..

सायरा - मॅम.. मी.. मी इथे राहू ना???

मोना - या बंगल्याच्या बाहेर पाय ठेवतानाही माझी परवानगी घे... तुला मी वाचवणार म्हणजे वाचवणार...

सुरक्षिततेची भावना मनात निर्माण झाल्याबरोबर सायराने मोनाला मिठी मारली. मात्र या वेळेस मोनाचे मन पूर्णतः लोहिया आणि रेजिना या बाबींनी भरलेले होते. आज तिला त्या दिवशीचे फीलिंग अजिबात आले नाही. उलट सायराच्या साडीला येणार्‍या स्कॉचच्या वासाने तिला कसेतरीच झाले..

रात्री झोपण्यापुर्वी एकदा इमेल्स चेक कराव्यात म्हणून ती पीसीसमोर बसली.

स्वत:च्या इमेल्स चेक केल्यावर कित्येक महिन्यांनी सहज म्हणून डॅडच्याही जुन्या इमेल्स उगीचच पाहिल्या.

आश्चर्याचा धक्का म्हणजे.... त्यातील 'सिवा' या फोल्डरपुढे (1 new) असे दिसले. खटकन मोनाने तो फोल्डर ओपन केला.

एक महिन्यापुर्वीची इमेल होती ती!

'Ranjeet Shreevaastav coming to pune tomorrow. He normally stays at boat club. He is the son of Late Dr. Shaamataaprasaad Shreevaastav who had invented the tablet named as BAZAT. See if you can meet him. - SIVA'

काहीही अर्थ उमगला नाही पहिल्यांदा मोनाला! मात्र नंतर झटकाच बसला. सुबोध हा श्रीवास्तव होता. मग रणजीत कोण? आणि 'बझट' म्हणजे काय??

खरे तर आत्ता त्या इमेलला उत्तर देण्यात काही अर्थच नव्हता. साडे अकरा वाजत आले होते.

तरी तिने उगाचच उत्तर दिले.

'I read the email today. Thanks for the information. Would like to know what BAZAT is and also why you wanted me to meet him. In case you get this email tomorrow, please do let me know. Thank you again - Ms M Gupta'

काहीही अपेक्षा नसताना ती केवळ सात आठ मिनिटे उगाचच ब्राऊज करत बसली होती. रिफ्रेश करत बसली होती तीच तीच पेजेस...

आणि बाराव्या प्रयत्नाला यश मिळाले... पुन्हा त्याच 'सिवा' फोल्डरमध्ये (1 new)!!!!!!!

तातडीने तिने ती इमेल ओपन केली.

जे वाचायला मिळाले ते वाचून अंगाला कंपच सुटला तिच्या! नसती वाचली इमेल तर बरे झाले असते असे वाटले.

'BAZAT was the tablet used to kill number nine, your mother.'

गुलमोहर: 

नमस्कार मी मायबोलीवरची नवीन सभासद आहे .
अशा करते मला सगळे सांभाळून घ्याल .
अतिशय सुंदर लेखन .
आताशा मायबोलीचं व्यसन लागल्यासारखं झालंय.
एक दिवस जर काही वाचायला मिळाला नाही तर खूप अस्वस्थ व्हायला लागतं .
बाकी इथले लेखक म्हणजे एक से एक आहेत .
माझे त्यांना कोटी कोटी प्रणाम .बेफिकीर जी तुमच्या य कादंबर्यान पाई खरच एक दिवस माझी नौकरी जाईल कि काय असं वाटतं.
कारण कार्यालयात आल्या आल्या जोपर्यंत मायबोली उघडून वाचत नाही पुढे गाडी सरकतच नाही .
असो चेष्टेचा भाग .
असो आज् इतके बास .

पुन्हा भेटू

चिऊ

परत एक ट्विस्ट्...कसं सुचतं हे सगळं तुम्हाला!! जबरीच!!...

पण टेप चा सिक्रेट मोना आणि सायरा सोडून तिसर्‍याला कसं कळालं! कुठतरी पाणी मुरतय खरं! दुसरा कुणितरी मोनावर लक्ष ठेऊन आहे हे नक्की!

हे क्रमशः कुणि शोधलंय त्याला एकदा बघायला पहीजे!...

सामना ला अनुमोदन... कोणीतरी मोनावरही लक्ष ठेवून आहे तर... Uhoh मोठाच शॉक बसला आज...
सह्ह्ह्ह्ह्ह्ही भाग... रोजचा भाग आधीच्या भागापेक्षा सरस... पहिल्या कादंबरीनंतर हे असे ह्याच कादंबरीच्या बाबतीत झालेय... Happy

सायराची कहाणी ऐकून जरा वाईटच वाटल, ईडंस्ट्री जगतात अशा काही सायरा बघितल्यात म्हणून असेल कदाचीत..... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत adore.gif

पण कस शक्य आहे हे .... सिवा matter तर close केल होत न मोनाने तरीसुद्धा त्याने contact करावा म्हणजे ...
कठीण होत चाललंय बुवा सगळ ....
बाकी तो english मधल english मध्ये हा बदल आवडला आपल्याला ... go on .... Happy

अतिशय खिळवून ठेवणारी कादंबरी आहे, पुढच्या भागाच्या उत्सुकतेपायी नकळत किती वेळा गुलमोहोर विभाग चेक केला जातो याची गणतीच नाही.
दरवेळी कथेतले नवे वळण, अधिकाधिक खिळवून ठेवत रहाते... कधीकधी वाटते कि हि कादंबरी पुस्तक रूपाने हातात असायला हवी होती... म्हणजे 'क्रमश:'च्या अडसराशिवाय .. एका बैठकीत... पापणी न लवता... वाचून काढली असती Happy

बेफिकीर आपले खूप खूप आभार... अतिशय सुरेख आणि खूप रंजक लिहिता आहात...

नेहमीप्रमाणे आतुरतेने वाट पाहत आहे पुढच्या भागाची...

<<<<< ....दरवेळी कथेतले नवे वळण, अधिकाधिक खिळवून ठेवत रहाते... कधीकधी वाटते कि हि कादंबरी पुस्तक रूपाने हातात असायला हवी होती... म्हणजे 'क्रमश:'च्या अडसराशिवाय .. एका बैठकीत... पापणी न लवता... वाचून काढली असती ........... >>>
मला पन असेच वाटते.

मला पण असेच वाटते. एका बैठाकीत वाचायला मिळायला हवी.:) पुढच्या भागची वाट पाहात आहोत.

काहीतरी SMS Alert ची सुविधा असायला हवी होती , नवा भाग आला कि लगेच कळावे. नाही... पहिला नंबर येण्याकरता नाही... पण कथेचा पुढच भाग त्वरित वाचायला मिळावा म्हणून...
किती वेळा चेक करायचे... वाट पाहून पाहून दमायला होते!!

सर्वांचे मनःपुर्वक आभार!

मी आता पुढचा भग लिहायला घेण्याची दैनंदीन धमकी देत आहेच!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मला वाटत सायरा ब्ल्यू डायमंड ला जेव्हा आली असणार तेव्हा security ने scan केल तेव्हा त्याना कळले असणार कि तिच्याकडे टेप रेकोर्ड आहे.

Pls excuse for spelling mistakes.

ओझरकर तुमची शंका बरोबर आहे असे वाटतेय..कारण दहाव्या भागाच्या शेवटी सायराचे थबकणे आणि घाम फुटणे मोनाला अपेक्षीत होते असे जाणवले...
सायरा डबल क्रॉस करत असण्याची शंका येणे स्वाभाविक आहे..कारण सुबोधला मोना सिमलाला गेली होती हे कळल्यानंतर मोनाने प्रथम सायराकडे पाहिले.

>>>>मला वाटते , फोन मोना ने केला असणार....
अनुमोदन...
हेच लिहायला आले होते....
'बेफिकीर'जी पुढच्या भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय....
Happy

बेफिकिऱजि, हि मोना आहे का शकुनि मामा/मामि(मामि चि माफि मागुन)?????
अरे रेकॉडर सापडल्यावर मला तर वातत हि घाबरुन जाईल, हतबल होईल पण कसल काय....

भुषणराव.... मान गये, आपकि पारखि नजर और........

बेफिकीर जी तुमच्या या कादंबरीमुळे खरच॑ एक दिवस माझीही नोकरी जाईल असं मला ही वाटतं............... खुपच छान्!!अप्रतिम!! सु॑दर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Pages