भ्रष्टाचार

Submitted by आनंद गोवंडे on 11 November, 2010 - 02:38

(या कवितेतील एकेरी अवतरण चिन्हातील शब्द 'विशिष्ट' व्यक्तींच्या संदर्भात वाचावेत...)

इथे राजरोस चोरांचे थैमान
शिपाईच (राज्यकर्ते) सारे इथे बेईमान

कुणी आपल्या 'शिला'स विकतो
'राजा' आपल्या देशास लुटतो
कुणाचा 'आदर्श' वा कुणाची 'माडी'
(तरी) सार्‍यांच्याच दारी लाल दिव्याची गाडी

'आम आदमी'... चा सदा जप चालू
जप करणारा प्रत्येक, नंबर एक 'चालू'

यांच्याच तोंडी भरे सर्व 'साखर'
गरिबाच्या थाळीत कोंड्याची भाकर
साखर खाऊन 'तोंड' फाटलेले
पैशानेच आहे सर्व झाकलेले
गरिबांस आता हरएक लुटतो
भाकर उरे ती 'युवराज' खातो

सर्वांस 'मडम' दावितात 'हात'
म्हणे - सर्व बसा असेच खात
बोंबलेल जनता मरो बोंबलू दे
चिडेल जनता कितीही चिडू दे
जनतेस जेव्हा मिळवीन हात
जनता म्हणेल - "व्वा काय मडमची बात!"

देशात आपल्या हेच चालणार
आपुलेच थडगे आपण खोदणार (यांना परत परत निवडून देऊन)

गुलमोहर: 
शब्दखुणा: