दिवाळी शुभेच्छापत्रे

Submitted by मिनी on 10 November, 2010 - 15:33

मागचे २ वर्षे स्कुलमुळ्ये दिवाळीला काही खास करता आलं नव्हतं. म्हणून ह्यावेळी काहीतरी करायचं ठरवलं. माझे बाबा दरवर्षी दिवाळीला सगळ्या आप्तेष्टांना, मित्र-मंड़ळींना ग्रिटिंग्ज पाठवतात. इथे अमेरिकेत दिवाळी ग्रिटिंग्ज मिळणं शक्य नाही आणि मिळाले तरी मराठीमध्ये मिळणं अजिबातच शक्य नाही. म्हणून मग घरीच ग्रिटिंग्ज बनवायचं ठरवलं. मायकल्स मधुन कागद, आणि रंग विकत आणले. आणि चक्क ७-८ तासांमध्ये जवळपास ३५ ग्रिटिंग्ज तयार झाले.

माबोवरच्या आणि उसगांवातल्या ज्या ज्या मित्रं-मैत्रिणींना माझ्याकडुन कार्ड मिळालं नाही, त्यांची माफी मागते. इतकी नावं होती लिस्टमध्ये. अनावधानाने कोणी राहिलं असेल त्यांना पुढच्या वर्षी नक्की. Happy

गुलमोहर: 

छान आहेत सगळी कार्ड्स...आम्हालासुद्धा पोचलं...थँक्यू Happy

सहीच गं मिने! सगळी कार्डस मस्त आहेत.
लकी ड्रॉ मधे आमचा पण नंबर लावल्याबद्दल धन्यवाद!!
आणि हे इकडे टाकल्याबद्दल तर पेशल धन्यवाद Happy

अरे वा, सगळ्यांकडेच कार्ड आली. मग आम्हीच मिनीचं काय घोडं मारलं असावं ब्वा? काही आठवत नाही कधी घालून पाडून बोलल्याचं, अनुल्लेख केल्याचं किंवा तु क टाकल्याचं. Biggrin

अरे वा!! छान आहेत! सगळी एकदम बघायला मिळाली आणि त्यामुळे मी किती स्पेशल आहे ते समजले Happy
धन्यवाद मिनी!!!

सायो,
हा खालचा मेसेज नाहि का वाचलास?

>>>माबोवरच्या आणि उसगांवातल्या ज्या ज्या मित्रं-मैत्रिणींना माझ्याकडुन कार्ड मिळालं नाही, त्यांची माफी मागते. इतकी नावं होती लिस्टमध्ये. अनावधानाने कोणी राहिलं असेल त्यांना पुढच्या वर्षी नक्की.><<

तु घालून पाडून बोलाल्यच तुला कसे आठवणार? ज्याला बोलले त्यालाच आठवणार. Proud
(तु मला आता कधी कार्ड नाही पाठवणार ना?) Wink

Pages