Submitted by SatishMadhekar on शनि., 05/10/2008 - 22:45.
कंदाहार प्रकरणात १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी अतिरेकी सोडणे हा एकच पर्याय शिल्लक होता. कन्दाहार विमानतळावर उतरवलेल्या विमानाला तालिबान्यांनी रणगाड्यांचा वेढा देऊन अखंड पहारा ठेवलेला होता. त्यामुळे इस्राईल सारखी कोणतीही कारवाई करणे अशक्य होते. ते विमान नेपाळ मधून पळविण्यात आले होते. त्यामध्ये भारताने सुरक्षेत कुचराई केली असा काही भाग नव्हता. किंबहुना नेपाळ्यांच्या मूर्खपणामुळे चाच्यांना विमानात सहज प्रवेश मिळाला होता. चाच्यांनी एका प्रवाशाची आधीच हत्या केलेली होती. ७-८ दिवस विमानात स्वच्छता न केल्यामुळे आतमध्ये नरकपुरी झाली होती. अशा परिस्थितीत त्यांचा मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. १६० प्रवाशांचे बळी जाऊन देणे किंवा ३ अतिरेकी सोडणे, यातला दुसरा पर्यायच त्या परिस्थितीत योग्य होता. कॉंग्रेस व केतकरांसारखे कॉंग्रेसचे महामूर्ख स्वयंघोषित चमचे, भारताने इस्राईलसारखी कमांडो कारवाई करायला पाहिजे होती व ती न केल्यामुळे भाजप सरकारने अतिरेक्यांसमोर गुडघे टेकले असा गेली ८ वर्षे पूर्णपणे खोटा प्रचार करत आहेत.
त्या खोट्या प्रचाराला उत्तर देऊन प्रामाणिकपणे जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्याऐवजी जसवंत सिंग, आडवाणी इ. मंडळी गेली ८ वर्षे या प्रश्नावर कोलांट्या उड्या का मारत आहेत हे अनाकलनीय आहे.
जसवन्त आणि अडवाणी यांच्या कोलन्टऊड्या नाहीत, सतीशराव, तुमच्या आहेत वरच्या पोस्ट वाचल्या तर अडवाणींची स्तुती करावी की निंदा याबाबत तुमची अवस्था अगदी किंकर्तव्यमूढ अशी झाली आहे. आपण ज्यांचे समर्थन करतो त्यांच्या चुका फारच embarrassing असतात नाही?. आता काय भूमिका घ्यावी असा प्रश्न आला की तुम्ही सरळ सोनिया, नेहरू, गांधी(सर्व),गेला बाजार केतकर यांना शिव्या देत चला. भाजपच्ये मूल्यमापन करण्यापेक्षा ते सोपे आहे.(आणी इथले प्रेक्षक बहुमतात आहेत हा फायदा अलाहिदा....)
खरे तर भाजपत अडवाणी हेच गृहस्थ बर्यापैकी डोके जागेवर असलेले आहेत.
Submitted by SatishMadhekar on रवि., 05/11/2008 - 21:47.
>>> आता काय भूमिका घ्यावी असा प्रश्न आला की तुम्ही सरळ सोनिया, नेहरू, गांधी(सर्व),गेला बाजार केतकर यांना शिव्या देत चला. भाजपच्ये मूल्यमापन करण्यापेक्षा ते सोपे आहे.
माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. मी अनेक वेळा लिहिले आहे की कॉंग्रेस व विशेषतः नेहरू-गांधी कुटुंबियांच्या महाभयंकर घोडचुकांमुळे भारतातल्या आजच्या बहुतेक सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत. अडवाणि किंवा जसवंत सिंग यांनी एखाद्या प्रश्नावर चुकीचे प्रतिपादन केले म्हणून गांधी (सर्व असली व नकली गांधी) आणि नेहरू आडनावाच्या लोकांनी केलल्या महाभयंकर घोडचूकांवर पांघरूण पडत नाही.
>>>>गांधी (सर्व असली व नकली गांधी) आणि नेहरू आडनावाच्या लोकांनी केलल्या महाभयंकर घोडचूकांवर पांघरूण पडत नाही.<<<
पण आता नेहेरु जाऊन, इंदिरा, राजिव गांधी जाऊन अनेक वर्षे झाली की. मग आता काय फरक पडतो, त्यांना शिव्या देऊन? आपलाच वेळ नि शक्ति वाया जाते झालं. त्यापेक्षा इथून पुढे पहा, नि या निवडून नि करा काय ते!
Submitted by shendenaxatra on सोम., 05/12/2008 - 21:58.
विमान अपहरण प्रकरणी इस्रायलसारखी कठोर भूमिका घेण्यात भाजप सरकार पार अपयशी ठरले.
पण अपहरणकरत्या गुन्हेगारांना पकडले का? नाही. कुण्या नेत्याने त्वेषाने असे गर्जून सा.न्गितले का किइ हे नीच कृत्य करणार्याना जिव.न्त पकडून आणू आणि फासावर लटकवू कि.न्वा त्यांनी स्वाधिइन व्हायला नकार दिला तर त्यांना ठारही मारू? नाही. तसेही काही. . मग हे लोक कॉ.न्ग्रेसप्रमाणेच कमकुवत आहेत असे म्हटले पाहिजे. क.न्दाहार अपहरणाला जबाबदार कुणाला पकडले आहे का? आपल्या हेरखात्याला भक्कम पैसे देऊन तसे प्रयत्न करायला काय हरकत होती?
१९७२ मधे म्युनिचला इस्रायलि ऑलि.न्पिक टीमचे अपहरण केले गेले. त्यातिइल बहुतेक लोक मारले गेले. पण न.न्तर इस्रायलने तपास करुन अनेक स.न्ब.न्धिता.न्ना यमसदनी पाठवले. युरोपातिइल विविध देशात त्या.न्चे हेर पाठवून हिइ कारवाई केलिइ. भाजपच्या "पोलादी" नेत्या.न्कडून ही अपेक्षा होती. पण कसले काय? सगळे कचकड्याचे नेते नुसते.
ता.क. फायरफॉक्स वापरले तर काहीच्या काही देवनागरी उमटते.
Submitted by kedarjoshi on सोम., 05/12/2008 - 11:54.
टोनगा म्हणतात तसे आत्मपरिक्षन भाजपाने पण करायलाच पाहीजे. ( तशी पक्षश्रेष्टींनी ऐक बैठक घेतली होती पण त्यात पुढे काहीच निष्पन्न झाले नाही असे वाटते. ऊलट नंतर काँग्रेस सारखे एकमेकांना दोष्च जास्त दिले गेले.)
दोनदा आलेली संधी भाजपाने दवडली असे मलाही वाटते. (मी उजवा असुनही).
विमान अपहरण प्रकरण, शवपेट्यांचा भ्रष्ट्राचार, कारगिल युध्दातील घेतलेली पडखाऊ भुमीका, अध्याक्षांनी खाल्लेली लाच, हे भाजपाच्या कालावधी मधील काळे पिरिऐडस आहेत.
पण आता नेहेरु जाऊन, इंदिरा, राजिव गांधी जाऊन अनेक वर्षे झाली की. मग आता काय फरक पडतो, त्यांना शिव्या देऊन?
--- राष्ट्राच्या ईतिहासात ५-५० वर्षाला अनेक म्हणाता येणार नाही. काही निर्णयांचे दुरगामी (पुढच्या अनेक अनेक पिढ्या) परिणाम होतात, त्यामुळे त्या निर्णयांची चिकित्सा ही होतच रहाणार, व्हायला पण हवी. याचा अर्थ काळा कोळसा उगाळत बसायलाच हवे असेही नाही, पण झालेल्या चुकांपासुन (मग ते कुणिही असो) "शिका", पुन्हा-पुन्हा तेच प्रकार नको. नेते लोकं सामान्य लोकांशी धड-धडीत "खोटे"बोलत असतील किवा अप्रामाणिक रहात असतील तर त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवायला हवी, येथे दया-माया नकोच. असे केले तरच चांगले प्रामाणिक नेते पुढे येतील.
गांधी या नावा भोवती एक वलय आहे, कोण नाकारणार? बहुतेक राजकारणि (आता काही मायबोलीकरपण?) त्या नावा केवळ कामापुरता 'उपयोग' करतात. आता तर अर्जुनसिंगांना 'राहुल' गांधी यांना पंतप्रधान म्हणुन झालेले पहाण्याचे स्वप्न पडत आहेत, त्यात त्या राहुलचा काही दोष नसेलही. सोनिया गांधी यांन्ना स्वतःला कुठे 'सुरवातीच्या' काळात राजकारणात रस होता? त्यांनी त्यांचे उदासिनता वेळो-वेळी दाखवलीच होती (हीच त्यांची उदासिनता राजिव गांधी यांना राज-कारणापासुन काही काळ दुर ठेवण्यात यशस्वी झाली होती) पण असल्या तिसर्या-दर्जाच्या नेत्यांच्या फळीनेच त्यांना राजकारणात अक्षरशः ढकलले.
>>>>पण असल्या तिसर्या-दर्जाच्या नेत्यांच्या फळीनेच त्यांना राजकारणात अक्षरशः ढकलले.<<<<
मग तोपर्यंत पहिल्या नि दुसर्या दर्जाचे नेते काय नुसते मायबोलीवर लिहीत बसले होते का?
आता मात्र भारत आघाडीवर हं. चार हजार कोटी रुपये नुसत्या क्रिकेटवर. साईबाबाला सोन्याचे सिंहासन. सगळे लोक प्रचंड श्रीमंत झालेले. मग करू देत राजकारण्यांना काही पण. शेवटी सगळे लोक श्रीमंत झाले, गरीबी हटाओ कार्यक्रम यशस्वी झाला. तेच महत्वाचे ना! आणखी काय महत्वाचे असते?
आपण क्रिकेट बघत बसू. सिनेमे बघू. टीव्ही बघू. सुखी सुखी म्हणजे अजून काय?
आता जरा बरी चर्चा चाललीय. भा ज प ही संघाची राजकीय शाखा आहे हे मान्य व्हायला हरकत नाही. खरे तर राजकारण ही एक देशाची अर्थव्यवस्था चालविण्याची एक प्रक्टीकल व्यवस्थापकीय पद्धत आहे. त्यावर अनेक हितसंबंधांचा सारखा प्रभाव पडत असतो. राष्ट्रीय व आन्तर राष्टीयही. अन हितसंबंधही सारखे बदलत असतात. आता सरबजीतला सोडा अन पाकीस्तानच्या कैद्याना सोडू नका अशी भूमिका कशी घेता येईल? संघासारखी अराजकीय संघटना चालविणे वेगळे अन त्या विचारसरणीतून तयार केलेला राजकीय अजेन्डा सत्तेत असताना चालविणे फारच वेगळे. त्यामुळे ५४२ खासदार भा ज पचे निवडून आले तरी ३७० कलम ते काढू शकणार नाहीत अन समान नागरी कायदा ते कदापि आणू शकणार नाहीत. कारण हितसंबंधांचे ताणे बाणे. हितसंबंध वाईट अर्थाने नव्हे. समान नागरी कायदा आणला तर १/३ भाजप खासदार राजिनामे देतील!
दाऊदला ओढून आनणारे मुंडे, एन्रॉनला अरबी समुद्रात बुडवणारे मुंडे हास्यास्पद का झाले? सत्तेत नसताना बेजबाबदार अजेन्डा देणारे लोक सत्तेत आले की आपल्या कृतीचे परिणाम बुद्धीबळासारखे सारखे जोखत असतात. आणि एखाद दुसर्या चुकीसाठी सरकारे राजीनामे द्यायला लागले तर रोजच सरकार स्थापन करावे लागेल. नेहरूंची अर्थनीती कोसळण्याचे कारण भारतीयांचा अप्रामाणिकपणाच आहे. आजही पी एम टी एस्टी त असलेले देशप्रेमी कर्मचारी भरतीय प्रजेची जीव तोडून सेवा करतात काय. खाजगी करणाचा उदय सार्वजनिक क्षेत्राच्या अपयशातून निर्माण झाला ना. पण खाजगी करणाची स्थिती घी देखा लेकीन बडगा नही देखा अशीच आहे. रिलायन्स च्या फोनची तक्रार कोणी ऐकून घेते काय. तुम्ही खुशाल आमचे कनेक्शन बन्द करा असे उत्तर मला रिलायन्स मधून मिळाले आहे. एअर टेल चे पैसे भरलेले नवे कनेक्शन मी पोलिस केस दाखल केल्यावर सुरू करण्यात आले.
इब्ति दा ए इश्क है ,रोता है क्या
आगे आगे देख होता है क्या...
त्यामुळे सत्ताधारी, ते कोणत्याही पक्षाचे असोत त्याना समाजातील विविध स्तरांची दखल घेऊन त्यांचे साठी काहीतरी करावे लागतेच. म्हणून हिन्दुत्ववादी सरकार आले तर ते इथल्या मुसलमानाना थोडेच बाहेर हाकलून देऊ शकते? अन धर्मान्तरीत ख्रिश्चनाना सुद्धा हाकलून देऊ शकते? मग कितीही ओरडा धर्मान्तर म्हणजे राष्ट्रान्तर.. असे ओरडण्याचे व्यासपीठ वेगळे असते. सत्ता राबवायची वेळ आल्यावर साखरेच्या भावाचा ब्यालन्स कसा ठेवायचा याला डोके खाजवावे लागते. आता तुमचे ३७० कलमावर नन्तर बोलू हो आधी हा साखरेचा घोळ मिटवू द्या असे बोलने आले म्हनजे राजकारण म्हनजे समाज व्यवस्थापन पद्धती आहे हे त्याना पटू लागते पण शेंड्यासारख्या हार्ड कोअर कार्यकर्त्याला पटवून घेणे फार अवघड होते. भाजपचे सरकार असताना एक भाजपचे मन्त्री बहुधा कृषी मन्त्री , कांद्याचे भाव प्रचंड वाढले असताना, अन दिल्लीत महिला कांद्यासाथी रस्त्यावर आल्या असताना जाहीररीत्या म्हटले होते कांदा ही जीवनाश्यक वस्तू नाही. त्यासिवाय आपण राहू शकतो.
त्यानी आणखी तेल ओतले गेले. आता हे मंत्री काहीही चुकीचे बोलले नव्हते. पन यावर भाजपतही जोरात प्रतिक्रिया आली. कारण त्यावरून सरकारचा एटीट्यूड दिसून येतो ना...
त्यामुळे सत्तेवर बसणार्यांची भाषा बदलते कारण कोणते घटक दुखावले जातील वा जवळ येतील याचे सारखे भान ठेवावे लागते. त्यामुळे वाजपेयीही अहमदाबादेत एक अन पणजीत दुसरे असे बोलतात. मोदी अडचणीचे ठरताहेत पाहिल्यावर त्याना टाळण्याचे प्रकार सुरू झाले. भाजपचाच उल्लेख करण्याचे कारण ती पार्टी विथ डिफरन्स आहे ना!(कालच तिला कोणी तरी पार्टी विथ डिफरन्सेस म्हटले. केतकर नाही,तो घरचाच आहेर होता.)कॉन्ग्रेसवाले तर बोलून चालून नालायकच असल्याने ते कसेही वागले तरी तो गाढवपणाच असतो. पण घोडाही गाढवासारखा वागू लागला तर चिन्तेचीच बाब नाही का? त्याने अश्वशाळाप्रमुख तर फारच दु:खी होतात.
भाजपत विचार स्वातन्त्र्य जरा जास्तीच असल्याने कुणीच कोणाचे ऐकत नाही. अगदी १९७७ च्या जनता प्रयोगापासून हे चालू आहे.
आता मी जरा केतकरांच्या वळणावर जाऊन म्हणतो नरसिंह राव हे एक उत्तम पन्तप्रधान होते. त्यानी मनमोहन सिंगाना अर्थमन्त्री म्हणून जो फ्री ह्यान्ड दिला त्याचा भारताला फारच फायदा झाला. भाजपत कालचक्र पुढे नेणारे अन काळाची चाके उलटी फिरवणारे असे दोन गट झाल्याने बी जी पीची मोठीच गोची झाली आहे. कोणी कोणाचे ऐकायचे? सगळेच शहाणे. मग राष्ट्रीय अध्यक्षानी बोलावूनही मुंडे दिल्लीला भेटीस न जाण्याची जुर्रत करू धजतात.
गांधी या नावा भोवती एक वलय आहे, कोण नाकारणार? बहुतेक राजकारणि (आता काही मायबोलीकरपण?) त्या नावा केवळ कामापुरता 'उपयोग' करतात.>>>>>>हे मला उद्देशून असेल तर मला एकदम मान्य आहे. फक्त आद्य गांधी पुरते त्यांच्या दोषांसकट