गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग ९

Submitted by बेफ़िकीर on 8 November, 2010 - 08:30

"सुबोध गुप्ता?? इस नामके तो चार लडके थे मेमसाब यहांपर?? आपको कौनसा चाहिये??"

"जिसके.. पिताजी का ये हॉटेल था..."

"यह तो श्रीवास्तव करके थे यु. पी. के.... उनका था... वे गुजरके भी बाईस साल हो गये..."

"... कोई... कोई गुप्ताजी का हॉटेल भी था यहांपर क्या??"

"ना... गुप्ताजी कोई नही थे हॉटेलवाले... क्युं छोटूकी मां??"

"ना ना.... हम नही जानते किसी गुप्तावुप्ताको..."

गेले पाऊण तास मोनालिसा फक्त निराश होत हेच प्रश्न विचारत बसली होती. तिचा थाटमाट आणि रुबाब पाहून एक तर वस्तीत आधीच लोकांच्या नजरा काहीश्या 'रिझर्व्ह्ड' झालेल्या होत्या. ही कोण बया? एखाद्या राणीसारखी दिसते आहे? त्यात ती सरळ त्या पडक्या हॉटेलपाशी उभी राहिली आणि बराच वेळ पाहात बसली. नंतर मागे वळून एक दोन जणांना त्य हॉटेलबद्दल विचारले. ते म्हणाले की ते आल्यापासून हे हॉटेल असेच आहे. बर्‍याच वेळाने आणि अनेकांकडे चौकश्या झाल्यानंतर कुणीतरी हिंट दिली. 'उस्ताद बडे बुजुर्ग है यहांके... शायद वेही जानते होंगे आप जो पूछ रही है...'!

उस्ताद! सिमल्यात अभावानेच दिसणारी सहा फुटांच्याही वर असलेली उंची! वय किमान पंचाहत्तर असावे! पण खणखणीत म्हणजे खणखणीत! पापण्याही पांढर्‍या झालेल्या! पण विको वज्रदंतीला हा माणूस दिसला असता तर 'खराखुरा आक्रोड दातांनी फोडणारा म्हातारा' म्हणून त्यांनी याला जाहिरातीत घेऊन श्रीमंतही केला असता. शेतकरी होता आणि हळूहळू टुरिझमवर जगण्याची सवय लागली होती. त्यामुळे सिमल्याचे काही खास पदार्थ विकण्याची एक टपरी होती बाजारात! आता त्याचा मुलगा ती पाहात होता. हा मस्त घरी बसायचा, हातांनी पिळले तर लोणी गळेल असे पराठे चापायचा आणि गावाला जुन्या कहाण्या सांगत बसायचा! 'छोटू की मां' भलतीच भलीमोठी होती! तिच्याकडे आणि उस्तादकडे बघून छोटू 'खरच छोटू' असेल यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. पण ही बाई मात्र थकलेली दिसत होती. घरात हे तिघेच असावेत बहुधा!

एकंदर 'गुप्ता' आणि 'हॉटेल' या दोन शब्दांचे कॉम्बिनेशन लोकांना 'दुर्लक्ष करण्यायोग्य असलेले उल्लेख' असेच वाटत असावे! मोनालिसाला ते समजलेले होते. काहीतरी तरकीब करायला हवी होती. कारण एक गोष्ट स्पष्ट होत होती. 'ना ना.. हम नही जानते किसी गुप्तावुप्ताको' या म्हातारीच्या 'रिलक्टन्ट' टाईपच्या टोनमुळे ती गोष्ट मोनालिसाला जाणवलेली होती. नक्कीच... दाल मे कुछ काला था!

सुबोधचे वडील, आपले काका, आज असते तर नक्कीच पासष्टीचे असते. त्यांना ही सत्तर वर्षाची बाई ओळखत नाही? बर ते जाऊदेत! कुणीच ओळखत नाही? मोनालिसाने आणखीन एक प्रश्न विचारला.

मोना - सुबोध गुप्ता के पिताजी गुप्ताजीकी बात कररही हूं मै... जिनका ये हॉटेल था.. आप लोग बतानेको तय्यार क्यूं नही है?? वे मेरे रिश्तेदार थे...

उस्ताद - अरे ये क्या बला है भाई? आप तो पीछेही पडगयी?? अगर हम नही जानते किसी गुप्ताको तो नही जानते?? जरूरी है के मुझे बस्तीके हर आदमीके बारेमे जानकारी हो? गझब है??

मोना - तो ये हॉटेल श्रीवास्तव का है....

उस्ताद - जी हां... और अब आप ये छास पियेंगी... और चली जायेंगी जहांसे आयी थी... हमारे पास वक्त नही है...

मोना - बाबुजी... आप मजाक अच्छा कर लेते है...

उस्ताद - क्या मतलब??

मोना - आप तो यहां आरामसे चारपाईपे बैठकर हवा खा रहे है... वक्त नही है आपके पास??

उस्ताद - आप है कौन जी? हम हमारे घरमे बैठे है?? आपसे पूछकर बैठे क्या??

मोनालिसा हसायला लागली. सकाळी दहा वाजताही तेथे अभूतपुर्व थंडी होती. तिने पुण्याहून आणलेले गरम कपड्यातील जवळपास सगळे काही एकदम घातलेले होते. ग्लोव्ह्ज सकट! आणि प्यायला काय देतायत तर म्हणे ताक! ही काय ताक प्यायची वेळ आहे? पण प्यायली ती! जबरदस्त चव होती ताकाची! आणि ज्या सुरईच्या आकाराच्या स्टीलच्या ग्लासमध्ये ताक दिले होते त्याची कपॅसिटी किमान अर्धा लिटर तरी असावी. एकदम पोट जडच झाले तिचे! आधीच पर्लचा ब्रेकफास्ट हेवी, त्यात रेजिनाने गप्पा मारत मारत आणखीन खायला लावलेले, या वस्तीतही ती चालत न येता हायर्ड कारमधून आलेली! त्यवर हे ताक! तिच्या गाडीच्या ड्रायव्हरने इतकी विचित्र स्त्री आजवर बघितलेली नसावी! पहिल्यांदा शिमल्याला आली आणि बघतीय काय तर म्हणे हे पडके हॉटेल! पर्लमधल्या सर्व स्टाफने तिला नम्रपणे सांगीतले होते. उगीच त्या वस्तीत जाऊ नका! तिथे काहीही नाही आहे. दमाल आणि थकाल! वैतागाल!

पण मोनालिसा.... आलीच ती इथे!

मोना - अच्छा... तो आप नही बतायेंगे...

उस्ताद - जबरदस्ती है क्या??

मोना - देखिये उस्तादजी... ये तो आप खुद भी जानरहे है के आप झुठ बोल रहे है.. क्युंकी गुप्ताजी मेरे चाचा थे... और वे लगभग आपहीकी उमरके थे... और वे भी तबहीसे यहांपर रहते थे.. ये हॉटेलभी उन्हीका है.. अब आपको बताना हैही नही तो मै कर तो कुछ नही सकती... लेकिन...

छोटू की मां - ओ मेमसाहिब... आप इन्हे झुठा समझरही है?? दरपे आये मेहमानको इज्जत दी जाती है इसलिये मै चुप हूं.. आपके दादाजीके उमरके है ये... अब आप तशरीफ ले जाये... वही बेहतर होगा..

सरळ हाकलून देत होते तिला! या साधेपणाची फार मजा वाटली मोनाला! पुण्यात आणि हेलिक्समध्ये तिला असला साधेपणा कधी मिळूच शकत नव्हता. तिला आत्ता रागच आला नाही! वातावरणाचा परिणाम! ती अजूनही निर्मळच हासत होती. पाचगणीला होस्टेलवर असताना हा साधेपणा मिळायचा तिला! त्यवेळेस ती मैत्रिणींच्या दृष्टीने हेलिक्सची वारसदार नसायची! ती असायची एक रूममेट!

आपण कोण आहोत हे यांना समजले तर हे नक्कीच बावचळतील हे माहीत असल्याने ती मनात हसत होती.

मोना - आपके घरमे.... और कौन होता है??

उस्ताद - हम दोनो, हमारा बेटा जो इसवक्त दुकानपर है, ये तीन चार मुर्गियां, ये दो बकरियां. ये एक खरगोश रख्खा हुवा है बहुत पहलेसे, ये तोता है और पीछे हौदमे दो मेंढक अपना जी बहलाया करते है... आपको कुछ ऐतराज??

मोनालिसा खदाखदा हसायला लागली. तसे आजूबाजूला उत्सुकतने थांबलेले अनेक लोकही हसायला लागले. उस्ताद त्यांच्यावर चिडून म्हणाला..

उस्ताद - ओय उल्लू के पठ्ठों... यहां सर्कस लगी है क्या?? हसरहे है...

गर्दी उस्तादला टरकून किंचित मागे सरकली. नाही म्हंटले तरी उस्तादवर मोनाच्या एकंदर श्रीमंत पेहरावाचा प्रभाव पडलेलाच होता. मोना ताकाचा उरलेला एक चतुर्थांश भाग हळूहळू पीत होती. कारण ताक संपेपर्यंत ती निश्चीतच तिथे बसू शकणार होती.

मोना - बच्चे नही है छोटे कोई?

उस्ताद - हर घरमे बच्चे होतेही है क्या?

मोना - आपकी बहू?

उस्ताद - अरे आपका दिमाग तो ठीक है ना? ये छांस ढकेलके उठजाईये आप...

मोनाने घाबरून ताक एका घोटात संपवले...

मोना - अच्छी थी छांस...

उस्ताद - मालूम है... उतनीही थी...

छोटू की मां अजून बघत होती टुकूटुकू!

मोना - तो मै.. चलती हूं..

उस्ताद - बहोत बहोत शुक्रिया आपका..

मोना - मुझे लगरहा था ये होटेल फिर बसानेमे यहांके लोगोंको काम मिलेगा और इसलिये वे मेरी मदद करेंगे... मगर... आप तो बुराही मान रहे है हर चीज को...

"अबे चूSSSSSSSSSSSSSSSप"

आजवर घाबरली नसेल अशी घाबरली मोनालिसा! अचानक घराच्या दारात एक ध्यान बसल्याचे दिसले तिला! उस्तादही हादरून तिकडेच पाहात होता. अचानक तो उभा राहिला ताडकन!

"आप अंदर जाओ... जाओ अंदर..."

"चूप कर... "

त्या ध्यानाने खणखणीत आवाजात उस्तादला दम भरल्यावर तो होता तिथे बसला.

मोनालिसाला त्या आवाजाने सिमल्याच्या थंडीत क्षणभर आपल्याला घाम फुटला की काय असे वाटले.

ती त्या व्यक्तीकडे हात दाखवत घाबरत घाबरत पुटपुटली...

मोना - ... ये..... ये ... कौन है ये???

उस्ताद - ... मां है मेरी...

उस्तादची आई??? बापरे! म्हणजे किमान नव्वद पंचाण्णव वर्षांची बाई असणार ही!

संपूर्ण पांढरे केस! अंगावरच्या शिरा टरटरून दिसणार्‍या! बसल्या बसल्याच सरकत होती ती! बहुधा उभे राहता येत नसावे! कदाचित गर्दीनेही बाई अनेक दिवसांनी बघितली असावी.. कारण एकदम कुजबुजाट वाढला.. तिने एक कांबळे अंगावर घेतलेले असल्याने आणि केस राठ होऊन खूप वाढलेले असल्याने ती स्त्री आहे की पुरुष हेच पहिल्यांदा समजत नव्हते. तिचा आवाजही पुरुषासारखाच होता. पण होता फारच खणखणीत!

मोना तिच्याकडे पाहताना हादरलेली होती. आपण इथे येण्यात बहुतेक चूक केली असे तिला वाटत होते. ती जख्ख म्हातारी मोनाकडे डोळे फाडफाडून बघत होती. तिचे डोळे दारू प्यायल्यासारखे लालभडक होते. ती सरकत सरकत बाहेर आली. मोना शहारली. तिने कित्येक दिवसात आंघोळच केलेली नसावी. मात्र तशी ठणठणीत वाटत होती ती! मोना हिप्नोटाईझ झाल्यासारखी तिच्याकडे पाहात होती.

ती म्हातारी जमीनीवर थुंकली! अत्यंत संतापी डोळे तिने गर्दीवरून फिरवले तशी गर्दी खूपच मागे सरकली. तिला सगळे का घाबरत होते हे काही मोनाला समजेना!

म्हातारी - उस मादर**की कौन है तू?????

शी:! ही असली भाषा आणि या असल्या लोकांसमोर आपण ऐकायची? का म्हणून? मोनाला त्या म्हातारीच्या दोन थोबाडात देऊन तिथून निघून जावेसे वाटले.

मात्र धाडस करायलाच हवे होते! कारण अथक प्रयत्नांनंतर निदान एक व्यक्ती अशी निघाली होती की जी काकांना अगदी म्हणजे फारच व्यवस्थित ओळखत असावी.

मोना - जी... भतीजी हूं...

त्या म्हातारीने किमान पाच सेकंद मोनाकडे टक लावून पाहिले! का कुणास ठाऊक, उस्ताद आणि छोटू की मां हे दोघेही तसेच पाहात होते. आणि गर्दीही....

म्हातारी - भतीजी तो उसी घरकी औलाद होती है...

मोना - जी.. मेरे पिताजी और चाचाके बीच.. बहुत बडा झगडा था...

म्हातारी - ये... ये तू मुझे बतारही है???

म्हातारीचे या प्रश्नानंतरचे हासणे म्हणजे अभद्र हासण्याचा कळस होता. काय ते तिचे पडके आणि सडके दात! काय तो हासण्याचा आवाज! शहारलीच मोना! उस्तादसुद्धा चरकला ते हासणे पाहून! बहुधा अनेक वर्षांनी 'हासणे' नावाची क्रिया केली असावी म्हातारीने! पुन्हा थुंकली ती!

म्हातारी - थूकती हूं मै तेरे खानदानपर...

लाथ घलावीशी वाटत होती मोनाला! पण ते धोक्याचे होते..

म्हातारी - ये हॉटेल चालू करके बस्तीवालोंको काम देगी तू??? तुझे जिंदा दफनादुंगी उस हॉटेलके नीचे...

मोनाने हळूहळू एकेक पाय मागे सरकवायला सुरुवात केली. प्रकरण वाटले त्या पेक्षा भीषण दिसत होते.

म्हातारी - अब भाग रही है?? क्युं? मौत दिखायी दी आंखोंके सामने क्या??

आता मात्र मोनालिसाला 'मी घाबरलेली नाही आहे' हा अभिनय टिकवणे अशक्य होते. ती सरळ मागे वळली आणि टॅक्सीच्या दिशेने घाईघाईने निघाली.

म्हातारी - अबे पकड उसको...

म्हातारी कुणालातरी म्हणाली. गर्दी ढिम्म! इव्हन उस्तादसुद्धा ढिम्म! कुणीही मोनालिसाला पकडायला वगैरे पाऊल उचलले नाही. बहुधा म्हातारी कोणत्यातरी बाबा आदमच्या जमान्यात वावरत असावी. असे कुणीही कुणालाही कसे धरेल? मात्र कुणीच हालत नाही आहे हे पाहून मोनाला किंचित धीर आला असावा. ती लांब जाऊन तिथून मागे वळून पाहात ढिम्मपणे उभी राहिली. म्हातारी अजून डोळे फाडून बघत होती. कुणीच हालले नाही हे पाहून गर्दीला शिव्या देत म्हातारी बसूनच घाईघाईत मोनाकडे सरकायला लागली. गर्दी बहुधा आपल्याच बाजूने असावी किंवा आपल्याला वचकलेली असावी असा ग्रह झाल्यामुळे मोना पळून न जाता उभी राहिली. म्हातारीचा सरकण्याचा वेगही बर्‍यापैकी होता. मिनिटभरातच ती मोनापासून पंधरा एक फुटांवर आली. तशी मात्र मोना पुन्हा घाबरली.

मोना - रुकजाओ... वही रुकजाओ....

म्हातारी अजून सरकतच होती. आता मात्र उस्ताद उठला आणि मागून पळत आला आणि त्याने म्हातारीला धरले. म्हातारी कर्कश्श किंचाळायला लागली. उस्ताद तिला अजिबात इजा मात्र करत नव्हता. याचाच अर्थ म्हातारी उस्तादला घाबरून ओरडत नव्हती. ती रागाने किंचाळत असावी. उस्तादने त्या घाणेरड्या म्हातारीला तसेच उचलले आणि घराकडे घेऊन चालला पळत! मोनाला वाटले उस्तादला बहुधा कल्पना असावी की मोना फार सामर्थ्यवान बाई असू शकेल याची! मात्र मध्येच म्हातारीने चपळाई करून उस्तादची ग्रीप सैल केली आणि परिणामतः ती खाली पडली. पडल्यावर मात्र ओरडली. उस्ताद दचकून बाजूला झाला. पालेल्या आईला मदतीची गरज असेल हे त्याला का वाटले नाही कुणास ठाऊक! त्याने काहीतरी पाहिलेले असावे!

अचानक पाठमोर्‍या बसलेल्या म्हातारीने तोंड मागे वळवून पुन्हा ती लालभडक नजर मोनावर रोखली आणि अचानक तिच्या हातात एक छोटासा फोटो आला..

"ये देख च्यु**... ये देख... ये मेरा मरद था... तेरे बापने कत्ल किया इसको..."

अचानक उस्तादने पुन्ह तिला उचलले आणि आता मात्र तो घट्ट पकडून तिला आत घेऊन गेला. ती ओरडत शिव्या देतच होती. म्हातारी घरात पोचल्यावर धाडसाने मोना पुन्हा घराजवळ गेली. तेवढ्यात उस्ताद बाहेर आला...

उस्ताद - ए लडकी...

'मेमसाहिब'चे आता 'लडकी' झालेले होते.

उस्ताद - अकल नही है तुझे क्या? कहासे आयी है?? है कौन तू? क्यूम वो गढे मुरदे उखाडरही है?... हम सीधेसाधे लोग है... हैवान नही है तुम लोगोंजैसे...

'हैवान'! काय शब्द वापरला उस्तादने! मोनालिसा खाडकन तोंडात मारल्यासारखी बघत राहिली उस्तादकडे! छोटू की मां तिला 'जा, जा' असा हत करत होती आणि आतल्या दाराकडे बिचकून बघत होती.

मोनाने पुन्हा साहस केले. एवढ्या गर्दीसमोर हे असले काही करणे म्हणजे मूर्खपणाच होता. आता तिच्या टॅक्सीचा ड्रायव्हरही काही अंतरावर येऊन उभा राहिलेला होता.

मोना - कौन था हैवान?? आपके पिताजीको किसने मारा बाबुजी???

उस्तादने हात जोडले आणि म्हणाला...

उस्ताद - जा बेटा जा... हम छोटे लोग होते है... जा तू अपने घर...

तेवढ्यात म्हातारी दारात सरकत सरकत आली आणि कर्कश्शपणे म्हणाली...

"उसीने... जिसने जयाकोभी मारा था... "

किमान ऐंशी माणसे असताना एकमेकांचा श्वाससुद्धा ऐकू येईल इतकी शांतता कधी असते? असते... ! निर्माण झाली होती आत्ता! उस्ताद, छोटू की मां आणि स्वतः म्हातारी सोडली तर तिथे जमलेल्यांपैकी बहुतेक फक्त मोनालिसालाच माहीत होते की जया हे तिच्याच आईचे नाव आहे. जमीनीत पाय थिजून चिकटावेत तशी ती उभी राहिली होती. डोळ्यांमध्ये भीती, दु:ख आणि संताप कुतुहलामध्ये मिसळून एकत्र झालेले होते.

मोना - मेरी मां थी वो...

उस्ताद - वो हम सब जानते है... तुम चली जाओ...

'जानते है?????' यांना सगळ्यांना माहीत आहे आपण जया गुप्ताची मुलगी आहोत ते?

मोना - क्या हुवा था मेरी मां को???

उस्ताद - पुलीसमे वो फाईल बंद होकर पच्चीस साल होगये है बिटिया... अब ना करो ये नादानी...

मोना - लेकिन उसे हुवा क्या था???

अचानक म्हातारी पुन्हा जोरात ओरडली.

म्हातारी - उसे येही हुवा था की वो तेरी मां बनी थी... इसलिये मार दिया...

यानंतरचे मोनाला आत्ता काहीही आठवत नव्हते.

कारण ती हॉटेलच्या रूममध्ये होती. समोर रेजिना आणि एक डॉक्टर उभे होते. डॉक्टर म्हणाले...

डॉ - अब होशभी आगये... चिंता मत कीजिये... रेस्ट लेनी पडेगी एक पुरा दिन... अ‍ॅडमिट करनेकी जरूरत नही है...

आणि तिला पुन्हा झोप लागली.

मात्र ती सकाळ! वॉव्ह! किती फ्रेश वाटत होतं! इथे आल्यानंतरची ही केवळ दुसरी सकाळ होती. पावणे दहा??? ताडकन उठून बसली मोना! अरे हो.. आज रेजिना मित्राच्या लग्नासाठी कोणत्यातरी जवळच्या गावाला जाणार होता. तो एकदम परवाच येणार होता.

३२३ नंबर फिरवला तिने! उचलला नाही कुणीही! गेलेला दिसतोय!

बापरे! काय भयानक इतिहास आहे आपला! आपण आत्ता जिथे आलो आहोत त्या गावात आपल्या आईला मारले? का म्हणून गप्प बसायचे मी? मी खणून काढणार! सगळा इतिहास खणून काढणार!

साडे अकराला रूममध्येच ब्रेकफास्ट घेऊन ती सरळ रिसेप्शनमध्ये आली. तिला काहीतरी चौकशी करायची होती त्या आधीच रिसेप्शनीस्ट तिला म्हणाला..

"ये साहब इंतजार कर रहे है आपका मॅडमजी..."

युनिफॉर्म!

"येस????"

"सब इन्स्पेक्टर जगमोहन... आपसे बात करनी है..."

"कहिये??"

"यहां नही... "

"... तो???"

"नीचे ... ठाने... "

"आय कान्ट कम व्हेअर एव्हर यू वॉन्ट मी टू कम..."

"आय रिक्वेस्ट यू मॅम.. प्लीज को ऑपरेट..."

"आप मेरे लीगलवालोंसे बात कीजिये पूनामे.."

"सॉरी.. केस यहांका है.. और जाच चलरही है... अभी किसी वकीलसे बात करनेकी हमे जरूरत नही.."

रिसेप्शनीस्टसमोर तमाशा नको म्हणून मोना त्याच्याबरोबर निघाली.

ठाण्यावर नवाच प्रकार! कालची म्हातारी, उस्ताद आणि त्याची बायको, त्यांचा मुलगा आणि त्य सगळ्यांबरोबर आणखीन सहा जण! त्यात एक कालचा तिचा ड्रायव्हरही होता.

जगमोहन तिला खूप आतल्या खोलीत घेऊन गेला. तेथे तीन महिला पोलीसही होत्या. त्यातील एक सीनियर होती. आणखीन दोन अधिकारी होते. जगमोहन मोनालिसाला एक कहाणी सांगू लागला. अर्थातच, तो हिंदीत बोलत होता.

"फार जुनी केस आहे. पंचवीस वर्षांपुर्वीची! काल आमच्या खबर्‍याने सांगीतले की त्या केसशी संबंधीत एक बाई आज वस्तीत आलेली होती. म्हणून तुमच्याशी बोलतो आहोत आम्ही! आम्ही सर्व पडताळणी केलेली आहे. आपण एका खूप मोठ्या कंपनीच्या मालकीण आहात हे समजलेले आहे. त्यामुळेच आम्ही अत्यंत आदरपुर्वक तुमच्याशी बोलणार आहोत. तुम्हाला कोणताही मनस्ताप होऊ देणार नाही याची मी हमी देतो. हे माझे सहकारी आहेत.

मॅडम, ही केस अशी आहे की जया गुप्ता नावाच्या एका स्त्रीचा विषबाधेने मृत्यू झाला होता आणि सुरुवातीला डिपार्टमेंटला तो क्राईम वाटला पण नंतरच्या तपासात ती चुकून झालेली विषबाधा होती असे निदर्शनास आल्यामुळे ती फाईल बंद आणि इनॅक्टिव्ह झाली. याच दरम्यान आणखीन एका माणसाचाही मृत्यू झाला. त्याला अपघात झाला होता. हा माणूस म्हणजे काल तुम्ही बाहेर बसलेल्या ज्या घाणेरड्या म्हातारीशी बोललात तिचा नवरा! ही केसही अपघाती मृत्यू असा शिक्का बसून बंद झाली. मात्र तेव्हापासून काही वावड्या उठायच्या की हे दोन्ही खून आहेत वगैरे! आमच्या खात्यातील त्यावेळेसची माणसे केव्हाच निवृत्त झाली. तपास तर त्या आधीच थांबलेला होता. मात्र अशा अफवांमुळे कधी कधी तपासास उगाचच पुन्हा तात्पुरती गती यायची आणि पुन्हा सगळे शांत व्हायचे.

मात्र काल तुमचे आणि त्या म्हातारीचे झालेले बोलणे हा फारच महत्वाचा प्रकार होता. आम्ही कशीतरी त्याबाबतची बातमी थोपवून धरल्यामुळे आजच्या पेपरात काहीही आले नाही. मात्र! अनेकांना समजलेले आहे की त्या तुमच्या आई होत्या आणि तुमच्या पुण्यातील घरी काही इतर कागदपत्रे वगैरे मिळतात का हे बघण्यासाठी आम्ही तुम्हाला येथे बोलावले आहे. आपण कृपया सहकार्य करावेत. आमच्या खात्यातील कुणालाही उगाच तुम्हाला मनस्ताप द्यायची इच्छा नाही आहे. मात्र ही बाहेरची म्हातारी अगदी छातीठोकपणे आरोप करत आहे त्या मोहन गुप्तांवर.. त्यामुळे आम्हाला तपास केलाच..."

"मोहन गुप्तांवर??????????"

मुळापासून हादरून मोनाने तो प्रश्न विचारला.

"होय... तिने तेच नाव घेतले... का???"

"ते... माझे वडील होते.."

"हो... मग??"

"मग म्हणजे?? .. ते कसा खून करतील आईचा??"

"ओह... तो वेगळा भाग आहे... कुणी खून केला होता आणि खरच खून झाला की काय झाले ते माहीत नाही आहे.. तुम्ही मला एक सांगा... तुम्हाला ही केस री ओपन करायची आहे का? नाहीतर मग सरकारी पक्षातर्फे आम्ही केस री ओपन करू..."

"एक मिनिटे.. ज्यांचा तथाकथित खून झाला ते आणि ज्यांच्यावर आळ आहे ते.. यातले कुणीच जिवंत नाही आहे.. मग केस ओपन झाली काय आणि नाही झाली काय..??"

"तसे नसते मॅडम.. सरकारी पक्षाला न्यायदानामध्ये कार्यभाग करावाच लागतो... खरे काय आहे ते कळायलाच हवे..."

"नो.. आय डोन्ट वॉन्ट टू गेट इनटू धिस अ‍ॅट ऑल.. मला.. माझी काहीही तक्रार नाही..."

"अ‍ॅज यू विश... चौकशीमध्ये मात्र आपल्याला सहकार्य करावेच लागेल..."

"तुम्ही जेवढे विचाराले त्याला मी उत्तरे द्यायचा प्रयत्न करेनच.."

"अंहं.. आपल्याला समजले नाही.. ही चौकशी पुण्यालाही होऊ शकते.. आपल्याकडच्या जुन्या कागदपत्रांची तपासणीही होऊ शकते..."

"म्हणूनच मी म्हणतीय की मला आमच्या लीगलशी बोलू देत.. "

"दॅट्स फाईन.. तुम्हाला काही वेळानंतर तसा फोन करता येईलच... आत्ता मला एक सांगा... तुम्ही तुमच्या आईला भेटला नसालच ना??"

"नाही... कधीच नाही.. पण... ते.."

"आम्हाला कसे माहीत... हो ना?? या फाईलमध्ये ते लिहीलेले आहे.. मयताला तीन महिन्याची मुलगी होती... तुमच्या जन्मानंतर तुम्ही काका, काकू यांना कधी पाहिलेत??"

"कधीच नाही.. म्हणजे.. मला जे माहीत आहे आणि जे आठवते त्यानुसार मी खूपच लहान असल्यापासून पुण्यातच होते.. "

"गुप्ता हेलिक्स ही कंपनी कधी स्थापन झली??"

"१९७०..."

"त्या कंपनीत भागीदारी होती??"

"आता त्या कंपनीची मी एम डी आहे... अ‍ॅज फार अ‍ॅज आय नो... मिस्टर लोहिया आणि मिस्टर अर्देशीर हे त्या कंपनीचे भागीदार झाले.. पण ते १९७६ च्या नंतर.. आधी कुणीच भागीदार नव्हते.."

"आपल्याकडे काही जुना पत्रव्यवहार... काही फोटो वगैरे...???"

"..... काही.... काहीच नाही आहे..."

"हाऊ डु यू नो???"

"आय मीन.. मला तसे काही दिसलेच नाही कधी..."

"आपले वडील आपल्याशी बोलताना काही महत्वाचे बोलले होते?? जुन्या काळाबद्दल..???"

"नथिंग.. नथिंग इम्पॉर्टन्ट..."

"काय म्हणायचे ते.. काही बोललेच तर.."

'विशेष काही नाही... कारण.. ते जे काही बोलायचे ते पुण्यात आम्ही गेल्यानंतर जे झालेले असायचे त्यावरच बोलायचे..."

"तुमच्या आईबद्दल काही??"

"तो विषय काढायचा नाही असे मला खूप लहानपणीच शिकवले होते त्यांनी..."

"तरीही... तुम्ही कधीच काही विचारायचा नाहीत???"

"विचारायचे... पण ते एक तर हसण्यावारी न्यायचे किंवा कामात असायचे.."

"तुमच्या जन्माच्या वेळेस तुमचे आई वडील सिमल्याला का होते याबद्दल काही माहीत आहे??"

"म्हणजे?? ...."

"तुमच्या वडिलांचे मूळ गाव बरेली आहे.. तुमच्या काकांचेही अर्थातच... मग सिमला???"

"ओह.. मला माहीत नाही.. पण.. बहुतेक काका इथे होते म्हणून.. "

"तुमच्या आईचा तुमच्याघरी फोटो असेलच..."

"हो... आहे..."

"एकटीचा, की वडिलांबरोबर की... सगळ्यांबरोबर??"

"एकटीचा आहे..."

"तुम्ही जन्माला यायच्या आधी किती काळापुर्वीचा??"

"माहीत नाही.. "

"आई कशाने गेली याबाबत वडील काय म्हणायचे??"

"फूड पॉयझनिंग..."

"जन्मानंतर तुम्ही सिमल्याला किती वेळा आलात??"

"ही.. आत्ताच येतीय..."

"तुम्ही काल त्या वस्तीत स्वतःहून का गेलात??"

या प्रश्नावर आपण अडकू याची कल्पनाच आली नव्हती मोनाला! आपण एका कंपनीच्या एम डी आहोत! काय ही आपली दशा? एका क्षुल्लक चौकीवर आपल्याला प्रश्न विचारतात??

माणूस सापळ्यात अडकला की हमरीतुमरीवर येतो! त्याचा अनुभव आलाच जगमोहनला..

"लूक मिस्टर जगमोहन.. आय हॅव बीन अ‍ॅन्सरिंग इच ऑफ यूअर क्वेश्चन्स.. बट आय हेड अ व्हेरी बिग कंपनी.. सो.. प्लीज आस्क ऑल युवर क्वेश्चन्स टू माय लीगल अ‍ॅडव्हायजर नाऊ.."

"मॅडम.. काल तुम्ही उस्तादला आणि बरेच जणांना 'हे हॉटेल ज्यांचे आहे त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का' हा प्रश्न विचारलेला आहेत... आय रिक्वेस्ट यू.. प्लीज को ऑपरेट..."

काही क्षंण मोना बघत होती. सहाच्या सहा चेहरे तिच्याकडे रोखून पाहात होते. तिने मान खाली घातली.

"आय लाईड विथ यू... कारण.. मला ते दु:खद प्रकार पुन्हा उफाळून येऊ नयेत असे वाटत होते.. माझ्या... माझ्या घरी एक फोटो आहे.. ज्यात माझी आई, वडील, काका आणि काकू सगळे आहेत.. त्याच्या मागेच ते हॉटेल आहे.. आणि.. त्या फोटोत मी नाही आहे.. आई.. इन फॅक्ट.. शी वॉज प्रेग्नंट दॅट टाईम.. मी काल खरे तर.. खूप खूप विश्रांती घ्यायला सिमल्याला आले.. इथेच का आले.. याचे उत्तर मी आत्ता तुम्हालाच काय.. मला स्वतःलाही देऊ शकत नाही आहे.. त्या फोटोमधील हिमालय पाहून मला अचानक असे वाटले.. की भारतात कुठेतरी जायचेच तर सिमलाच का नाही?? आणि अचानक... पर्ल ऑफ शिमला मधून मला.. नेमके तेच हॉटेल दिसले.. खरच सांगतीय.. ते दिसले नसते तर मी... अजिबात यात पडले नसते... मला वाटले आपल्या आधीच्या पिढीचा सगळा इतिहास इथे कुणालातरी माहीत असेल.. म्हणून मी आज तिकडे गेले तर.. तो... तो फारच भलताच इतिहास निघाला.. मला.. मला आत्ता या क्षणी असे वाटत आहे की.. मी... अजिबात नको होते जायला तिकडे... आता आई नाही.. बाबा नाहीत.. काका काकूही नाहीत... आता काही समजले तरीही.... मी... मी करणार काय त्याचे??? ही. ही म्हातारी म्हणते म्हणून तुम्हाला वाटत आहे की खरेच तो खून असावा.. पण माझे वडील गप्प बसले असते का??? "

"एक मिनिट... फोटोत ते हॉटेल दिसले म्हणून.. तुम्ही त्या वस्तीत गेलात???"

"होय.... .... का???"

"तुमच्यापैकी कुणाचाच त्या हॉटेलशी संबंधच काय???"

"काकांचे होते ते..."

"छे??"

"म्हणजे... काल मला समजले की.. कुणीतरी श्रीवास्तव म्हणून होते त्यांचे होते म्हणे.. मी काकांचे होते असेच समजत होते...."

"असेच का समजत होतात??"

"तसेच सांगीतले होते वडिलांनी...."

"वडिलांनी तर तुम्हाला काहीच सांगीतलेले नव्हते असे म्हणालात तुम्ही??"

"एक मिनिट ... प्लीज डोन्ट क्रॉस क्वेश्चन मी लाईक दॅट्...सुबोधला जॉबवर घेताना त्यांनी तसे सांगीतले.."

"सुबोध??... "

"हं... चुलत भाऊ.. वडिलांनी काकांना वचन दिले होते.. त्याला माझ्या कंपनीत लावून घेईन म्हणून.."

"तुम्हाला चुलत भाऊ होता??"

"आहे... मुंबईत आहे.. आमच्याच कंपनीत..."

"मॅडम... या फाईलमध्ये लिहिलेल्या डिटेलप्रमाणे... सुबोध म्हणून एक लहान मुलगा होता.. जो मुंबईत शिकायला होता त्याच्या मावशीकडे... अ‍ॅन्ड ही वॉज.. नॉट युअर कझिन अ‍ॅट ऑल.. सुबोधचे पूर्ण नांव ऐकायचे आहे???"

"............ ........ क....काय??? काय... नाव आहे???"

"सुबोध रवीलाल श्रीवास्तव"

"श्री.... "

आपण ज्या खुर्चीवर आत्ता बसलो आहोत त्याखालीच सुरुंग लावलेला आहे ही बातमी मिळाल्यावर व्हावा तसा चेहरा झाला होता मोनालिसाचा...

डोळे फाडून जगमोहनकडे बघत ती म्हणाली...

"प्लीज... कम अगेन???? सुबोध???"

"... रवीलाल... श्रीवास्तव..."

"धिस इज... धिस... व्हॉट.... आय मीन.... व्हॉट द हेल... डू यू मीन????"

"आय मीन व्हॉट आय सेड मॅडम.. देअर इज नो सुबोध इन युअर ओन फॅमिली... "

"आय.... आय निड टू ... आय निड टू टॉक टू यू...."

"म्हणजे???... बोला ना?? ... बोलतोच आहोत आपण..???"

"नोSSSSSS... आय नीड टू टॉक टू यू .. वन टू वन..."

इतर सर्वांकडे बघत मोना तीव्र स्वरात म्हणाली.

जगमोहनने क्षणभरच विचार केला. नावाजलेला अधिकारी होता तो! काल झालेला प्रकार त्याने दुर्लक्षित ठेवला असता तरी त्याला कुणालाही उत्तर द्यायला लागले नसते. कारण त्या फाईल्स कधीच बंद झालेल्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्याबाबत उठणार्‍या सर्व बातम्या या अफवा असतात असे आता शिमला समजून चुकलेला होता. पण रक्तात असलेली इन्स्पेक्टरी स्वस्थ बसू देईना त्याला! त्याने तो विषय पुन्हा खणायला सुरुवात केली होती. आणि सहकार्‍यांना बाहेर जायला सांगून ही बाई आपल्याला काही सांगणार आहे हे त्याला चुकीचे वाटत होते. कारण ते सर्व शासकीय अधिकारीच होते. पण.. कदाचित ती खरच काहीतरी महत्वाचे सांगणार असेल असे वाटून त्याने सर्वांना बाहेर काढले... सगळे गेल्यानंतर तिच्या अगदी जवळ बसून त्यने विचारले...

"येस मॅडम... ???"

"कॅन यू... कॅन यू.... "

"येस.. टेल मी.. डोन्ट बी डिप्रेस्ड..."

"कॅन यू टेल अदर्स दॅट....."

"... धिस केस इज क्लोज्ड?????"

"... यॅह... एक्झॅक्टली....."

"आणि????"

"आणि... मी.. मी तुम्हाला सर्व सहकार्य करेन.. प्लीज ट्रस्ट.. आय वॉन्ट टू टीच लेसन टू इच वन ऑफ देम..."

"अ‍ॅन्ड मोस्ट ऑफ देम आर नो मोर..."

"लेट इट बी... सुबोध आहे..."

"हं.. आणि.... हे सगळे हिमाचल प्रदेश सरकारने मान्य करावे असे तुम्हाला म्हणायचे आहे??"

मोनाचे डोळे क्षणभरासाठी हिंस्त्र झाले खरे.. पण लगेच निवळले...

"मला तसे म्हणायचे नव्हते.. मला... मला इतकेच म्हणायचे आहे की.. अत्यंत गुप्त पातळीवरून या केसचा तपास करू शकाल का?? मी... मी माझा वैयक्तीक इन्टरेस्ट म्हणून सहकार्य देईन..."

जवळपास तीन मिनिटे! तीन मिनिटे जगमोहन येरझारा घालत होता. नक्की ती काय म्हणते आहे हा प्रकाशच डोक्यात पडत नव्हता. पण एक मात्र होते, तिचा तो प्रस्ताव कोणत्याही क्षणी धुडकावून तिच्यावर सरकारी नियंत्रण आणणे त्याला शक्य होते हे त्याला माहीत होते. पण जुगार... जुगारही कधीकधी खेळावाच लागतो माणसाला.. कधीकधी काय? अनेकदा...

खेळला जुगार जगमोहन...

"यू मे गो... आय'ल मॅनेज माय कलीग्ज..."

'अ‍ॅन्ड... अ‍ॅन्ड दॅट ओल्ड लेडी???"

"आय'ल मॅनेज एव्हरीथिंग.. मात्र... "

"...????"

"मला या केससंदर्भात तुमच्याकडून शक्य असलेलं सहकार्य मिळत नाही आहे असे लक्षात आले तर मात्र... आय विल बी फ्री टू टेक माय डिसीजन्स..अ‍ॅन्ड वन मोर थिंग... मी तसा गरीब आहे.. मात्र... माझी मुले अभिमानाने वर्गात सांगतात... हिमाचलमधील सर्वात स्वच्छ कारकीर्द असलेले सब इन्स्पेक्टर माझे बाबा आहेत म्हणून... तेव्हा..."

'आय हॅव ... ओन्ली रिस्पेक्ट फॉर यू मिस्टर जगमोहन...."

"बाय..."

"... बाय... यू मे कॉल मी एनीटाईम...फक्त.. मला एक सांगा... त्या म्हातारीने.. खरच माझ्या वडिलांचे नाव घेतले???"

"....... नाही.. अजिबात नाही..."

==========================================

हे काय?? आपल्या स्विटचे दार उघडे?? कसे काय?? हाऊसकीपिंगवाले असतील..

ठाण्यावरून पर्ल ला आलेल्या मोनालिसाने खोलीत जायच्या आधी त्या खोलीचे लांबूनच दार उघडे पाहून मनात हा विचार केला आणि आत जाऊन बघते तर...

"तुमचे स्वतःचे हॉटेल शिमल्याला असताना आपण पर्लला का राहता आहात??"

रेजिना तंगड्या पसरून एका दणकट खुर्चीवर बसला होता आणि दोन मुले स्विट स्वच्छ करत होती.

"तुम्ही लग्नाला गेला नाहीत??"

"जाऊन आलो.."

"इतक्यात??"

"होय... कारण.. इथे फार भयंकर प्रकार झाले..."

"काय??"

"एक मोठ्या कंपनीची हेड काल शिमल्याला आली.. नको तिथे फिरली.. येऊन बेशुद्ध पडली... डॉक्टरने गोळी दिल्यावर पुन्हा झोपली.. ती आज उठली.. उठली ती सरळ चौकीवरच गेली.. बहुधा तिने खूनबिन केला असावा... आणि आत्ता लायब्ररीतून परत यावे किंवा मुलाला शाळेत सोडून परत यावे तशा आविर्भावात ती निवांतपणे आलेली आहे..."

मोना भिंतीला टेकून हासत होती.

"आणि अशा एका स्त्रीच्या स्विटमध्ये तुम्ही तिला न सांगता कसे काय बसता??"

"कारण त्या स्त्रीने स्वतःच्या सर्व मौल्यवान वस्तू रूममध्ये वाट्टेल तशा फेकलेल्या मी आज सकाळी पाहिलेल्या होत्या.. दोन मुले स्वच्छतेसाठी इकडे वळलेली पाहताच मी इथे येऊन बसलो..."

"पण लग्नाचे काय झाले??"

"ते दोघे बोहल्यावर चढले.. त्यांच्यावर लोकांनी रागारागाने तांदुळ फेकले.. पण ते पुढच्या रांगेतल्याच माणसांना लागल्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली आणि तोपर्यंत नवरा बायकोंनी एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या आणि टाळ्या वाजल्या.. एवढे झाल्यावर मी आहेर करून निघून आलो.. "

"म्हणजे दोन तासांच्या लग्नासाठी तुम्ही आठ दिवस पर्लमधे राहणार आहात? म्हणूनच एलेकॉनचा प्रॉफिट कमी झाला बहुधा..."

"आपल्या भयंकर बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला कदाचित विस्मरण झालेले असावे की आपण 'गिअर' हा शब्दच काढायचा नव्हता..."

"तो मी काढलाच नाही... तुम्हीच काढलात.. मी प्रॉफिट म्हणाले...

"ओके.. पेनल्टी म्हणून मी एक बीअर घ्यायला तयार आहे..."

"घ्यायला?? की द्यायला??"

"घ्यायलाही आणि द्यायलाही..."

"पण या स्विटमध्ये मागवलीत तर बिल मला लागेल..."

"माझ्या स्विटमध्ये यावेत आपण"

"अर्ध्या तासात येते..."

"राईट स्सर...."

अभिवादन करून रेजिना निघून गेल्यावर मोनाच्या मनात विचार आला. काय आपण? आपण आहोत एका कंपनीचे मालक! आपण याच्याशी इतक्या मित्रत्वाने का वागतोय? मूर्खासारखे?? त्याने आपली काळजी घेतली म्हणून? सरळ आहे.. उद्या त्याला जॉबची गरज लागली तर आपल्याकडे हक्काने जॉब मागता यावा म्हणून तो असा वागणारच... आपण जरा आब राखला पाहिजे...

मोनाने सरळ फोन लावला रेजिनाला...

"येस मॅम...??"

"सॉरी मिस्टर डिसूझा... मी... जरा विश्रांती घेणार आहे..."

"अ‍ॅबसोल्युटली फाईन मॅम... आपण वेळ होईल तेव्हा मला फोन करावात... हॅव अ गुड रेस्ट..."

"थॅन्क्स... "

फोन ठेवल्यानंतर आणि हाऊसकीपिंगची मुले निघून गेल्यानंतर मोना तशीच बेडवर आडवी पडली आणि आढ्याकडे बघत विचार करू लागली.

पातळ्या पातळ्या पातळ्या! थर... एकमेकांवर थर.. जाणीवांचे.. भावनांचे.. अनुभवांचे...!

हा माझ्यापेक्षा कनिष्ठ, तो पुरुष, ती माझ्या कंपनीत नोकरीला आहे, ही केअर टेकर आहे, तो एलेकॉनचा एम डी आहे, ते महसूल मंत्री आहेत...

फरक फरक फरक! प्रत्येकात फरक! प्रत्येक दोघांमध्ये फरक! त्यातूनच येणारी तुलना! मी श्रेष्ठ आहे की हा? अशी तुलना.. अगदी आपोआप करावीशी वाटणारी...

मग जाणीवा... अरे?? आपण श्रेष्ठ.. म्हणजे मग इगो मेन्टेन करायला हरकत नाही.. अरे?? तो श्रेष्ठ.. आता इगो जरा बाजूला ठेवायला हवा...

थर... कालही मी माझा इगो सोडला.. आजही सोडावा लागला..

आणखीन थर... कालही त्याने माझा इगो सांभाळला... झक मारत आजही सांभाळेल...

भिन्न लिंगांचे आकर्षण.. त्याच लिंगाचेही आकर्षण.. भिन्न लिंगाचा तिटकारा.. तिरस्कार... प्रत्येकाचाच तिटकारा...

वय.. अनुभव.. लिंग... घराणे.. पैसा.. रूप.. नाव... स्वभाव...

किती व्याख्या एकाच माणसाच्या.. आणि प्रत्येकाच्या इतक्या व्याख्या??

म्हणजे... जगात सहा अब्ज माणसे असतील तर प्रत्येकाच्या किमान आठ म्हणजे.. अठ्ठेचाळीस व्याख्या आहेत जगात आत्ता... गाढवाला.. म्हशीला आणि पक्ष्यांना का नसतात व्याख्या??

सायरा... काय करत असेल आत्ता?? आपण... आपण काहीही कल्पना न देता तिला एकदम किस केले तर काय करेल ती??

पण... रेजिना कोण आपल्याशी बोलणार? ठीक आहे? टॅक्सीतून इथे आणले.. फाईन.. आय'ल पे एव्हरीथिंग... आज डॉक्टरला बोलावले.. ओके.. त्याचेही पैसे देईन.. तसेही.. नसतेच बोलावले डॉक्टरला तर?? काय झाले असते?? मी काय मेले थोडीच असते?? उगाच आपली जवळीक निर्माण करायची.. जवळीक वाढावी म्हणूनच लग्नाला विशेष न थांबता इथे आला..

.. नालायक.. आणखीन एक नालायक पुरुष आहे तो... हॅन्डसम नालायक.. इतकाच फरक.. तुझ्याबरोबर बीअर घ्यायला मी एका मध्यमवर्गीयाची मुलगी वाटते का??

हाऊ डेअर ही आय मीन??

बेसिकली.. हाऊ डेअर ही सीट हिअर??? इन माय स्विट??

विचार विचार विचार! विचार नसणे अशी अवस्था असू शकते का मेंदूची?? हो? असते की?? झोप म्हणतात त्याला झोप! पण आपण झोपेतही विचार करत असलो तर?? समजायचे कसे?? आत्ता तरी जागे आहोत का?? की झोपलेलोच आहोत??

सिमला! हिमाच्छादीत शिखरे! काय करतोय आपण आल्यापासून.. विश्रांती घ्यायला आलो होतो..

बास्स! आजपासून साईट सीइंग.. फक्त आणि फक्त...

नो हेलिक्स.. नो मर्डर मिस्टरी.. नो रेजिना.. नो सायरा...

लोहिया.. लोहियांना कसं गुंडाळायचं ते बघायला हवं.. हळूहळू फास आवळायला हवा...

बेल?? आत्ता कोण स्विटची बेल वाजवतंय??

"येस?? कम इन??"

फ्रुट ट्रॉली घेऊन एक माणूस आला आणि ती एका जागी ठेवून विश करून निघून गेला..

नुसता थाटमाट.. कोण खाणार एवढी फळे?? पण त्याचे पैसे लावणारच.. आपण नाही का.. वाट्टेल ते ओव्हरहेड्स गिअरबॉक्सवर लोड करतो...

सायराला आपला नंबर माहीतच आहे.. एकही कॉल कसा केला नाही तिने?? दिवसातून दोन कॉल करायला सांगीतले होते आपण तिला..

"हॅलो रिसेप्शन??"

"येस मॅम..??"

"वॉज देअ एनी कॉल फॉ मी?? सिन्स यस्टरडे??"

"शुअर मॅम.. थ्री कॉल्स.. फ्रॉम मिस सायरा मॅम..पुणे.."

"सो यू नीड माय एन्क्वायरी टू टेल मी दॅट??"

"सॉरी मॅम??"

"मैने पुछना चाहिये क्या आपको?? आप खुद नही बता सकते??"

"मॅम.. व्हेरी सॉरी.. बट अ‍ॅक्च्युअली.. यू वेअर नॉट वेल.. सो.. "

"ओह.. सॉरी... प्लीज कनेक्ट मी टू हर..."

"शुअर मॅम.. द सेम नंबर दॅट शी हॅज गिव्हन..??"

"यॅह.. द सेम नंबर..."

दोनच मिनिटांत मोनाच्या शेजारचा फोन वाजला.

"हॅलो??"

"हॅलो मॅम??? मॅम हाऊ आर यू?? दे सेड यू आर नॉट वेल??"

"नो .. आय अ‍ॅम ओके.. जरा दमले होते...काय काय झालं??"

"एव्हरीवन आस्क्ड मी.. व्हेअर मॅम हॅज गॉन.."

"हं.. बाकी.. बिझिनेसचे काही समजले??"

"नाही मॅम.. हवे तर जोशींना विचारते.."

'आत्ता नको.. उद्या विचार.. विशेष काही??"

"होय.. विशेष आहे मॅम.. "

"काय???"

"जरा विचित्रच आहे.. पण..."

"अगं बोल ना पटापट...???"

"मॅम सुबोध सरांनी आज सिमल्याची फ्लाईट बूक केल्याचे समजले.. उद्याची.."

ताडकन उठून बसली मोना बेडवर! फोन ठेवून ती कितीतरी वेळ तशीच बसली होती. काय करावे काही समजत नव्हते. निघायलाच हवे पुण्याला! तो उगाचच इथे आला तर? आणि तो आला की निश्चीतच पर्ललाच राहणार! कशाला येतोय पण तो??

सरळ आहे. मी सिमल्याला आहे हे त्याला समजलेले असणार! तो सहज आल्यासारखे दाखवणार आणि इथल्या एकंदर परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार! बरं! आपण त्याला विचारू शकत नाही की आत्ताच तू इथे कसा? तो म्हणेल सहज सुट्टी घेऊन आलो. पण.. तो मात्र म्हणू शकतो की 'निदान आपल्या सर्कलमध्ये तरी सांगायचंस की तू शिमल्याला आहेस' असं! आपला कुणावरच विश्वास नाही हे अगदी स्पष्ट झाल्यासारखे होईल!

पण त्याला कळलं कसं? अजूनही.... सायरा त्याच पक्षाची तर नाही?? की?? खरंच अगदी सहजच येतोय तो??सहज येवो नाहीतर मुद्दाम! आपल्याला निघायलाच पाहिजे..

डॅड असते तर??

पुन्हा तोच प्रश्न! सारखा हाच प्रश्न मनात येतो. अरे?? खरच की?? मूर्ख आहोत आपण..

मोनाने ताडकन रिसेप्शनवरून स्वतःच्या ऑफीसचा नंबर लावून घेतला. शिल्पा, तिची पी.ए. लाईनवर आली.

"शिल्पा.. ड्राफ्ट अ‍ॅन इमेल टू सुबोध विथ अ कॉपी टू जॉईंट एम. डी. ... सेयिंग दॅट.. सुबोध शूड इमिजिएटली गो टू मनाली फर्टिलायझर्स टूमोरो अ‍ॅन्ड हॅव अ मीटिंग विथ देअर चेअरमन फॉर नेक्स्ट इयर्स बिझिनेस.. ऑल्सो राईट दॅट द चेअरमन हॅड कॉल्ड मी द डे बिफोर अ‍ॅन्ड आय फर्गॉट टू टेल हिम दॅट.. इन हरी.. ओके??? अ‍ॅन्ड ऑल्सो अ‍ॅड दॅट ही नीड नॉट कॉल मी.. ही कॅन कीप द मेसेज विथ सायरा"

हे काम होते खरेच! पण इतक्या तातडीचे नव्हते.

दुसरा फोन लावला आणि मनालिच्या चेअरमनच्या ऑफीसमध्ये निरोप ठेवला. गुप्ता हेलिक्सच्या एम डींनी सांगीतल्यामुळे कन्स्ट्रक्शन आर्मचे सुबोध गुप्ता उद्या त्यांना भेटायला येत आहेत.

आता खूपच निर्धास्त वाटत होते. डॅडची आठवण काढली की कसे प्रश्न चुटकीसरशी सुटायचे जणू! सुबोधला किती अपमानास्पद वाटेल सायराकडे मेसेज देताना! वाटू देत! नालायक लेकाचा! नाहीतरी तो 'गुप्ता' नाहीच आहे. आपण इमेल लिहिल्यावर कुणाची हिम्मत असता कामा नये त्या विरुद्ध जाण्याची!

आता काय? एन्जॉय शिमला मोनू? एन्जॉय शिमला!

चला.. रेजिना तर रेजिना... मैत्रीची कंपनी म्हणून इगो सोडायला काय हरकत आहे??

जाऊ आणि थोडी बीअर घेऊ! त्याला का बिचार्‍याला दुखवायचे आपण??

मोनाने मस्तपैकी स्वतःचे आवरले. एक हलका परफ्युम स्प्रे केला... आणि... रेजिनाला फोनही न करता त्याच्या स्विटमध्ये निघाली...

सरळ त्याच्या स्विटचे दार उघडून आत गेली तेव्ह रेजिना खिडकीवर दोन्ही हात ठेवून डीप्स मारत होता..

त्याची जबरदस्त व्ही शेप असलेली पाठ क्षणभर पाहातच राहिली मोना...

"व्हॉट अ करेक्ट टाईम टू एक्सरसाईझ.. हा हा हा हा"

मोनाच्या कमेंटने दचकलेल्या रेजिनाने पटकन टॉवेल घेतला आणि आतल्या खोलीत गेला..

... पंधरा मिनिटांनी दोघेही शांतपणे बीअर घेत असताना...

रेजिनाच्या स्विटमधला फोन वाजला...

"हॅलो सर?? मिस गुप्ता मॅम इज देअर??"

"यॅह... व्हाय?? ओह कॉल.. वन सेक..युवर कॉल..."

मोनालिसाने फोन हातात घेतला..

सायरा होती फोनवर...

"व्हॉट हॅपन्ड सायरा???"

"मॅम.. शिल्पा हॅड कॉल्ड... देअर इज अ‍ व्हेरी इम्पॉर्टन्ट इमेल फ्रॉम मिस्टर लोहिया... "

"सेयिन्ग व्हॉट???"

"दॅट डॅनलाईन हॅज रिजेक्टेड अवर प्रपोजल अ‍ॅन्ड हॅज टाईड अप विथ व शाहरुख अर्थमूव्हर्स इन पुणे.."

सरळ आहे... अर्देशीर अजून जिवंत होते हे समजत होते मोनालिसाला...

"ओके.. डू वन थिन्ग.. आस्क हर टू सेन्ड इमेल्स टू.. एक्स्क्यूज मी?? कॅन यू..."

'शुअर' म्हणून रेजिना सरळ रूमच्या बाहेर गेला. हे सगळेच खरे तर विचित्र होते. स्पर्धकाबरोबर अशी मैत्री गोत्यात आणणारी होती.

"यॅह.. आस्क शिल्पा टू ड्राफ्ट इमेल्स अ‍ॅड्रेस्ड टू जतीन अ‍ॅन्ड सुबोध.. आस्किंग फॉर रिटन एक्स्प्लनेशन ऑन धिस.. विथ अ कॉपी टू लोहिया अंकल.. अ‍ॅन्ड ऑल्सो आस्क हर टू अ‍ॅड वन मोर लाईन...आर यू नोटिंग डाऊन???"

"येस... येस मॅम....???"

"वन मोर लाईन दॅट... दे शूड आयदर ब्रिन्ग धिस प्रपोजल बॅक टू हेलिक्स... ऑर .... "

"... येस्स.... ऑर मॅम???"

"ऑर दे शूड लीव्ह... बोथ ऑफ देम..."

गुलमोहर: 

एकदम रहस्य कथा? साहेब, मोनाला लॅपटॉप घेउन द्या. आणि हॉटेल मध्ये वायफाय हवेच. Happy

सह्ही.... एकदम नाट्यमय चाललीये कथा... थरारक....
मोनाची तर गोचीच होतेय चहूबाजूंनी! कशी पुरुन उरणार ही मुलगी, कोण जाणे...

थोडा अतिरंजित वाटला भाग..पण ठिक आहे...
याच प्रकारात अडकून न रहाता कथा पुढे सरकावी असे वाटते...
ती सिमल्याला आली तेव्हा काहीतरी सस्पेन्स मिळणार असा अंदाज होता...तो खरा ठरल्याबद्दल स्वतची पाठ थोपटून घेणारा बाहुला....

अगर हम नही जानते किसी गुप्ताको तो नही जानते?? >> (१) जरूरी है के मुझे बस्तीके हर आदमीके बारेमे जानकारी हो? गझब है??>>>(२)

* (१) (२) इथं ? चुकीच नाही का ?

सर्वांचे आभार!

लॅपटॉपचा व सेलफोनचा 'जमाना' यायला अजून एक वर्ष आहे.

हिंदी भाषेशी अत्यंत जवळीक असल्याने मी जे 'बोलले जाते' ते 'तसेच' लिहीले आहे.

भाग आवडलेल्यांचे / न आवडलेल्यांचे / वाचकांचे मनःपुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

गेले तीन चार दिवस पुढ्च्या भागाची वाट बघत होतो आणी आज एकदम दोन भाग वाचायला मिळाले. दिवाळीचा फराळ मिळाल्यासारख वाटल.
झकास !! एकदम मस्त वळण घेतलय कथेने... सानीला अनुमोदन.

पु.ले.शु.

बेफिकीर

मस्त आहे हा भाग, पण थोडासा खेचल्यासारखा वाटला. कदाचित आधीचे भाग वेगवान असतील म्हणूनही तसे जाणवले असेल.

पुढच्या भागान्ची आतुरतेने वाट पाहतोय.

Please post next part as early as possible. very interesting Story

Happy तुमच्यामुळे आजकाल मी माझ्या बिझनेस बरोबरच मोना ची पण काळजी करते. तिला एका विश्वासू मॅच्युअर स्त्री मेंटर ची गरज आहे - फक्त बिझनेस संदर्भात. गो मोना.

सही...

बेफिकीर | 8 November, 2010 - 10:06 नवीन
सर्वांचे आभार!

लॅपटॉपचा व सेलफोनचा 'जमाना' यायला अजून एक वर्ष आहे.

>> तेच लिहिणार होते गोष्ट १९९५च्या काळातली वाटते.

>>तेच लिहिणार होते गोष्ट १९९५च्या काळातली वाटते.
मोनाचा जन्म १९८० चा आहे ना आणि ती २५ वर्षाची. म्हणजे गोष्ट २००५ च्या काळातील असेल ना?

आत्तापर्यंतची कथा आवडली.

सर्वांचे पुन्हा आभार! माझा स्वतःचा जरासा गोंधळ होत होता मनात! मलाही या कथेत योग्य वेळेलाच लॅपटॉप आणि सेलफोन्स आणायचे होते. पण बहुधा ते जरा लेट झाले असावेत.

सर्वांचे मनापासून आभार!

आता पुढचा भाग लिहायला घेत आहे अशी धमकी देऊन प्रतिसाद थांबवतो.

-'बेफिकीर'!

झाला का पुढचा भाग लिहुन? पोस्टा ना लवकर. तुम्हि उशिर केलात कि घरी जायला उशीर होतो. कारण समोर आलेला भाग सोडुन निघता येत नाहि हो. पोर बाळ वाट पहात असतात घरी Happy

बेफिकिरजी, भावा, काय लिहु आणि काय नाय अस झालय बघा...
एकाच भागात किति वळणे? मस्तच जमलय Happy

मोना ने जरा सावरायला हव... खुप चुका करति आहे ति, आता कोणि न्हणेल २५वर्षाचि तर आहे पोर.. पण त्याचबरोबर ति हेलिकस चि एम्.डि पण आहे.

डेनलॅड च प्रपोजल गेल, ह्या केस मध्ये 'सिवा' किति ऊपयोगाचा होता तिला, आरदेरशिर गप्प बसुच शकत नाहि, हे नको का कळायला तिला.......... आणि आता तो कोण 'रेजिन' किति फालतु प्रकार आहे हा, एवढ कस कळत नाहि तिला.... कळस म्हणजे त्याचाच स्विट मध्ये बसुन बिसनेस च्या मेल ड्राफ्ट करायला सांगते, तो बाहेर गेलाय पण बाहेरुण एकल त्याले तर?
:रागः