बायको..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

चिवचिवणारी पहाट असावी
चिडचिडणारी बायको नसावी
साखरझोपेतून उठल्या क्षणी
भिंतीवर 'नर्गिस' दिसावी..

'बाळ' म्हणणारी आई असावी
'उठा!' म्हणणारी बायको नसावी
चुळ भरून झाल्या बरोबर
हातात उपीट भरली बशी यावी

लडीवाळ बोलणारी मैत्रीण असावी
करवाद मांडणारी बायको नसावी
अगदी करकरीत तिन्हीसांजेला
समुद्र किनारी 'ती' भेटावी..

गुपित ओळखणारी बहिण असावी
बोल लावणारी बायको नसावी

निसटून जाणारे क्षण नसावेत,
सोडून जाणारी माणसे नसावित,
वृद्ध होत जाणार्‍या काळासोबत
सहवासाला बायको असावी..

- बी

विषय: 

बरोबर ............ प्रत्येक पुरुषाची हीच इच्छा असते ! फारच चांगले लीहीलेत.

काहिच्या काही कविता मध्ये अगदी चपखल बसलेली. छानच बी.

कवितेचे शेवट्चे कडवे मात्र अत्यंत वास्तवदर्शी आहे.

खुप सुन्दर कविता आहे.मी स्वताच्या कविता पाटवु शकते का?

'अपेक्षा काय' या प्रश्नाला हे तुझं standard उत्तर का ? Happy

  • *** Intaxication: Euphoria after getting an income tax refund, which lasts until you realize that it was your money in the first place. ***

साखरझोपेतून उठल्या क्षणी
भिंतीवर 'नर्गिस' दिसावी..
>>>> संजूबाबापेक्षा चांगली बॉडी असली तरच वरच्या वाक्याचा उपयोग नाहीतर

जड हाताचा डॉकटर नसावा
मऊ हाताची नर्स असावी
कुल्ल्यावर सुई देताचक्षणी
संजूबाबा विसरूण झोप लागावी!

Happy

बी
कविता मस्त रे.. छान जमली आहे...

बी,

लेका अजूनही "स्वप्न" बघतोयस तर..:)
आता या स्वप्नातून "सत्त्यात" यायला कधी मुहुर्त काढतोयस..?

वा वा किती छा न (प री) कल्पना आहे! Happy स्त्रीची महती अगदी पटते! असच जर वास्तवात असत तर? हा ही विचार येतो... पण अपेक्षा अन् वास्तव ह्यातला फरकच अ धोरेखित होतो.
Happy

दीपक
"Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."

करून करून भागले अन देवपुजेला.....
(कविता कैच्याकैच... पण छानय) Happy

कल्पना चांगली, शेवटी मात्र बायको असावी
गोदेय

बर्‍याच अपेक्षा आहेत की !! एकदा अश्या बायकोचा नवरा कसा असावा ते पण लिहा !! Proud Light 1