गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग ७

Submitted by बेफ़िकीर on 3 November, 2010 - 02:47

महसूल मंत्र्यांच्या विशाल केबीनच्या बाहेरील रिसेप्शनमध्ये ते चौघे बसलेले होते.

भारतातील गिअरबॉक्स मधले प्रथम क्रमांकाच्या कंपनीचे सर्वेसर्वा - डॉ. दासप्रकाश - चेअरमन - एलेकॉन गिअर्स - कोलकाता

भारतातील दोन क्रमांकाच्या गिअरबॉक्स कंपनीचे, म्हणजे ललीतमोहन थापर ग्रूपच्या ग्रीव्ह्ज रॅडिकॉन डिव्हिजनचे - राहुल चंद्रा - एम. डी.

भारतातील तीन क्रमांकाच्या गिअरबॉक्स मॅन्युफॅक्चररचे, सिम्प्लेक्सचे - धीमन रे - डायरेक्टर मार्केटिंग!

आणि... भारतात विखुरलेल्या इतर सर्व किरकोळ गिअरबॉक्स मॅन्युफॅक्चरर्सपैकी सर्वात मोठे असलेल्या गुप्ता हेलिक्सच्या - मोनालिसा गुप्ता - एम्.डी. - वय वर्षे २५!

प्रत्येक जण दुसर्‍याचा सर्वात मोठा शत्रू! आणि प्रत्येकाच्या चेहर्‍यावर 'तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस' असे भाव!

मात्र, महसूल मंत्र्यांकडे येण्याचे कारण सगळ्यांचे एकच!

नवीन आर्थिक वर्षात अचानक गिअरबॉक्स या आयटेमचा टेरिफ कोड बदलल्यामुळे आता तेरा टक्क्याऐवजी वीस टक्के एक्साईज लागू होणार होती आणि एक्साईजचा जरी कस्टमर्सना पुर्ण रिबेट मिळू शकत असला तरीही आधीच फायनलाईझ झालेल्या टेंडर्सची व्हॅल्यूच मुळी १२२ कोटी असल्यामुळे आणि ती सर्व टेन्डर्स लॅन्डेड कॉस्टच्या ऐवजी टोटल कॉस्ट या पॅरॅमीटरवर फायनल झालेली असल्यामुळे अचानक सर्व ठिकाणाहून होऊ लागलेले ऑर्डर कॅन्सलेशन!

याच्यात एक मेजर घोळ होता. तो म्हणजे सिम्प्लेक्स होते मध्यप्रदेशमध्ये, म्हणजे आत्ताच्या छतीसगढमध्ये! भिलाई येथे! तर एलेकॉन होते कलकत्याला! या दोन कंपन्यांना महाराष्ट्रात येऊन मंत्र्यांना भेटण्याचे काहीच कारण नव्हते. कारण देशाच्या पातळीवरच एक्साईज ड्युटी बदललेली होती. तशीच बदलते. पण टेरिफ कोड बदलल्यानंतर विविध व्यवसायातून होणारा छोटा मोठा विरोध सर्वच राज्यशासनाकडे व केंद्रशासनाकडे विखुरलेल्या अवस्थेत नोंदवला जायचा! यावेळेस तो सर्व विरोध केंद्रीय पद्धतीने अ‍ॅड्रेस केला जावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडे जबाबदारी देण्यात आली होती आणि सी. एम नी अर्थातच ही जबाबदारी प्रामुख्याने महसूल मंत्र्यांना मॅनेज करायला सांगीतली होती.

एक्साईज ड्युटीमध्ये अल्टरेशन्स होऊ शकत नाहीत. पण या बदलांमुळे शासनाचा नेमका काय फायदा तोटा होईल याचा अभ्यास जरी आधीच झालेला असला तरी बदलल्यानंतरची जी बदलणारी औद्योगिक समीकरणे असतात त्यांचा अंदाज आधी येऊ शकत नाही.

म्हणजे, काही कंपन्या टॅक्सेशनमध्ये बेनिफिट्स मिळावीत म्हणून पुणे मुंबई सारख्या शहरातून चक्क लांब उत्तर प्रदेशात वगैरेही हालतात. कारण तेथील औद्योगीक वाढ होण्यासाठी तेथे येणार्‍यांना शासन काही सवलती देते. हा एक मोठाच प्रॉफिट असू शकतो.

त्याचप्रमाणे आता काय काय होणार याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावरचा रिपोर्ट सादर करण्यासाठी महसूल मंत्र्यांना नेमले गेले होते. महसूल मंत्र्यांनी हा सर्व रिपोर्ट एक महिन्याच्या आत केंद्रीय समीतीला सादर करायचा होता. या समीतीने तो पाहून केंद्रीय औद्योगीक मंत्रालयाला प्रेझेन्टेशन द्यायचे होते. एकंदर महसुलात झालेला बदल व विविध राज्यांमधील महसुलांमध्ये होऊ शकणारा बदल या विषयावरचे ते प्रेझेन्टेशन असणार होते.

आणि महसूल मंत्री दीपकराव माने दुपारी दोन वाजता यायचे होते पण साडे तीन वाजले तरी फिरकलेले नव्हते आणि त्यामुळे हे चौघेही मनातल्या मनात संतापलेले असूनही तसे चेहर्‍यावर दाखवू शकत नव्हते.

एकमेकांमध्ये चाललेली चर्चा जणू अशी होती की प्रवासात शेजारी शेजारी बसलेले आहेत आणि हवापाण्याच्या गप्पा चाललेल्या आहेत. राजकारणी, टॅक्सेशन, स्थानिक पुढार्‍यांचा उपद्रव, इन्टरनॅशनल संधी, विमान प्रवास, मॉरिशस येथील निसर्ग सौंदर्य, आय सी चे रद्द झालेले कोलॅबोरेशन... वगैरे वगैरे!

मात्र बोलताना प्रत्येकाच्याच मनातले विचार रॉ पद्धतीने बाहेर पडले असते तर असे असते...

'हरामखोर, जी एस एफ सी ला टेंडर ओपनिंग नंतर जाऊन तू सात टक्के कमी करून बिझिनेस ओढलास ते काय मला माहीत नाही? तुला झुवारीमध्ये बघतोच मी आता...'

आणि वरवर बोलत होते.

'जी एस एफ सी चा बिझिनेस तुम्हाला मिळाला याबद्दल अभिनंदन! ग्रीव्हज मस्ट बी नंबर वन नाऊ? हो ना?'

'छे छे.. एलेकॉन इज एलेकॉन.. वुई हॅव बीन हिस्टॉरिकली नंबर टू अ‍ॅन्ड वुड रिमेन सो...'

मग मोठा हशा वगैरे!

मोनालिसा गुप्ता हा एक कंप्लीटली दुर्लक्षिलेला घटक होता तेथे! पंचवीस वर्षाच्या मुलीशी काय बोलायचे? मात्र! थट्टा करायला ती सर्वात पोटेन्शिअल व्यक्ती होती. मोहन गुप्तांच्या निधनाबद्दल शोक वगैरे व्यक्त करून झाल्यानंतर आता औपचारिकता संपलेली होती.

चंद्रा - सो? मिस गुप्ता? हाऊ इज हेलिक्स डुईंग नाऊ?

मोना - या.. आय अ‍ॅम न्यू..सो.. जस्ट लर्निन्ग...

या मुलीने अर्देशीरला बाजारातून उडवला आहे याची कुणकुण असती तर जपून बोलले असते. त्यांच्यामते अर्देशीर आणि आय सी चा काहीतरी घोळ झाला होता इतकेच!

दासप्रकाश - व्हेअर इज अर्देशीर नाऊ अ डेज??

मोना - व्हेरी मच विथ अस? व्हाय सर?

दासप्रकाश - नो नो.. डिडन्ट हॅपन टू टॉक टू मी अ‍ॅट ऑल सिन्स लास्ट फिव मंथ्स..

मोना - एज! ही इज सिक्स्टी प्लस नाऊ...

दासप्रकाश - आय नो..

धीमन रे - सो यू अ‍ॅन्ड लोहिया आर मॅनेजिंग द एन्टायर शो??

मोना - अ‍ॅक्च्युअली लोहिया अंकल... आय अ‍ॅम जस्ट...

सगळेच हासले. त्या हासण्यात एक अहंकाराचा दर्प होता. पुरुषी अहंकारही आणि गिअरबॉक्समध्ये किंग असल्याचा अहंकारही!

चंद्रा - हाऊ मच यू आर डूइंग नाऊ?

मोना - लास्ट इयर.. अबाउट थ्री फिफ्टी...

चंद्रा - क्रोर्स...

मोना - या...

मोनाचा संताप झाला होता मनातून! ग्रीव्हज अकराशे कोटी करते म्हणून काय बाकीचे ३५० लाख करणार आहेत? नालायकासारखे 'क्रोर्स' म्हणून विचारतायत...

धीमन रे - आय थिन्क यू वेअर अल्सो इन्व्हॉल्व्ह्ड इन दॅट आय सी अ‍ॅन्ड अर्देशीर्'स थिन्ग?

मोना - इन फॅक्ट वुई वेअर ट्रायिंग टू बी इन्व्हॉल्व्ह्ड... बट.. आय सी वाइंडेड अप सो फास्ट....

दासप्रकाश - एक्झॅक्टली.. धिस इज व्हाय आय लाईक टू बी अवे फ्रॉम दिज फॉरीनर्स...

रे आणि चंद्रा दोघांच्याही मनात विचार आला.

'असं असं! तर तुम्ही फॉरीनर्सपासून लांब राहता काय? आम्हाला काय माहीत नाही त्या आय सी बरोबर कोलॅबोरेशन करायची किती धडपड केलीत ते??'

अचानक धावपळ झाली. बहुधा मंत्रीमहोदय आले असावेत.

सगळे उठून उभे राहिले. केवळ सात ते आठ सेकंदातच इकडे तिकडे कुठेही न बघता मंत्रीमहोदय ताडताड आले आणि स्वतःच्या केबीनमध्ये गेले.

सगळे पुन्हा बसले. निदान आता साहेब आलेले तरी होते. आता प्रतीक्षेचा काळ संपत आला होता.

आणि खरच संपला. केवळ बाराव्या मिनिटालाच सगळ्यांना आत बोलावण्यात आले.

दीपकराव माने! महसूल मंत्री - महाराष्ट्र शासन!

एक प्रचंड मोठी केबीन! अत्यंत थंड! दीपकराव माने कुणाशीतरी फोनवर बोलत होते. हे चौघेही जाऊन त्यांच्यासमोर उभे राहिलेले असतानाच त्यांनी फोनवर बोलता बोलताच 'बसा' अशी खुण केली. सगळे बसले. अलिखित नियम सगळ्यांनाच माहीत होता वर्षानुवर्षापासून! गिअरबॉक्स या बिझिनेससाठी जर सगळ्यांनी मिळुन कुठे एकत्र यायचे असले तर लीडरशीप कायम दासप्रकाश यांच्याकडेच असणार! बिकॉज ही वॉज नंबर वन! मंत्र्यांचा फोन आटोपला आणि त्यांनी पी.ए.ला काही सूचना दिल्या. समोरच्या दोन तीन फायली तपासायाल त्यांना पाच सात मिनिटे लागली. हे सगळे शांत बसलेले होते. अचानक मंत्री यांच्याकडे बघत म्हणाले..

माने - बोला..

दासप्रकाश - सर्...आय अ‍ॅम दासप्रकाश.. एलेकॉन गिअर्स...

माने - हां हां हां हां...

जणू 'कित्ती कित्ती ऐकलंय तुमच्याबद्दल' अशा आविर्भावात मंत्री उद्गारले.

दासप्रकाश - ही इज मिस्टर चंद्रा, ग्रीव्ह्ज, ही इज मिस्टर रे, सिम्प्लेक्स अ‍ॅन्ड शॅ इज मिस गुप्ता, गुप्ता हेलिक्स!

माने - ओके ओके ओके... म्हणजे आज सगळे काटेरी चक्र वाले आलेले आहेत...

मराठी फक्त मोनालिसाला आणि चंद्रांना समजत असल्यामुळे दोघेच हासले. दासप्रकाश अंदाजाने आणि धीमन रे बाकीचे हासतायत म्हणून हासले.

माने - बोला... हुकूम...

दासप्रकाश - सर.. धिस स्लॅब ऑफ ट्वेन्टी पर्सेन्ट...

माने - मला गोर्‍यांची भाषा फारशी आवडत नाही.. दो... आय कॅन व्हेरी वेल स्पीक इट.. पण... आपण राष्ट्रभाषेत बोलावेत...

दासप्रकाशांना अंदाजानेच 'हिंदी बोलायला हवे आहे' हे समजले.

दासप्रकाश - सर, ये जो बीस पर्सेन्ट की स्लॅब है.. उससे ... हम गिअर्सवालोंका काफी नुकसान होनेवाला है...

माने - वो कैसे??

दासप्रकाश - सर... हमारा बहुत सारा बिझिनेस टेन्डर्ससे आता है... गव्हर्नमेन्टसे... उसमे होता ये है के जो कॉस्ट फायनल होती है वो टोटल कॉस्ट होती है... मतलब.. एक्साईज, टॅक्स, फ्रेट ये सब पकडकर.. अब बादमे कस्टमर्सको एक्साईजमे फुल और टॅक्समे फिफ्टी पर्सेन्ट रिबेट मिलता है ये सही है.. लेकिन ऑर्डर्स फायनल करते वक्त ये लोग टोटल कॉस्ट बेसिस पर करते है....

माने - ये तो गलत है?? इसका क्या मतलब हुवा? भाई टोटल कॉस्ट अगर दो करोड है और रिबेटके बाद आपको उसमेसे पच्चीस लाख वापस मिलनेवाले है तो आपकी कॉस्ट तो पौने दो करोडही हुई ना?

दासप्रकाश - बात बिलकुल सही सर... लेकिन.. ये .. अ‍ॅक्च्युअली ... तरीकाही इन लोगोंका ये है...

माने - तरीका आप लोगोनेही बदलना है इनका तो फिर? ये तो कोई बातही नही हुई... टेन्डर कॉस्ट तो कुछ भी हो सकती है..

दासप्रकाश - जैसे सर.. एक एक्झॅम्पल देता हू.. के महाराष्ट्राके इर्रिगेशनने चार गिअरबॉक्सेस लिये.. तो कॉस्ट ऑन इन्व्हॉइस इज नाईन्टी लॅक्स.. बट आफ्टर ऑल द रिबेट्स अ‍ॅन्ड मॉडव्हॅट्स.. इट विल बी जस्ट सेव्हन्टी एट लॅक्स फॉर देम...

माने - आप इर्रिगेशनसे बात कीजिये?? हमारे दादासाहबही है वहांके हेड... आप बात क्यू नही करते??

दासप्रकाश - करते है सर... लेकिन.. मानी नही जाती...

माने - देखिये... आप लोग एक चीज क्लीअरली समझलीजिये... एक्साईज आपके ग्राहकको मोडव्हॅट के रुपमे पुरी तरह वापस मिलती है हमसे... केवल वो उसको कॉस्ट समझता है .. इसलिये.. नियमोंमे कुछ बदलाव लाना या कुछ बेनिफिट देना मुमकीन नही है..

दासप्रकाश - नही नही सर... हमारा दरस्सल पॉईंट कुछ औरही है...

माने - बताईये...

दासप्रकाश - हमारी रिक्वेस्ट ये है के... जितने ऑर्डर्स कट ऑफ डेटसे पहले फायनल हुवे है... वो पुरानी...

माने - क्या बात कर रहे है आप?? गव्हर्नमेन्ट क्या मै चलाता हूं?? ऐसा कही होता है??

अशा बालीश मुद्यावर दासप्रकाशांना यावे लागण्याचे कारण तिसरेच होते. त्यांची अपेक्षा ही होती की गव्हर्नमेन्टने काहीतरी स्वरुपाचे असे सर्क्युलर काढावे ज्यातून सर्व गव्हर्नमेन्ट अंडरटेकिंग्जना अशी सूचना दिली जाईल की आयटेम्सची कॉस्ट लॅन्डेड धरतीवर विचारात घेतली जावी. पण ही अपेक्षा व्यक्त करण्याइतकी उदार बॉडी लॅन्ग्वेज मंत्रीसाहेब व्यक्तच करत नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोर होता वाढीव महसूल! आणि गिअरबॉक्स सप्लायर्सची चूक काहिच नव्हती. केवळ एक्साईज वाढल्यामुळे अचानक स्थानिक छोट्या छोट्या निर्मात्यांनी फ्रेश ऑफर्स देऊन या लोकांच्या ऑर्डर्स पळवायला सुरुवात केलेली होती. कारण ते निर्माते लहान असल्यामुळे त्यांचे एक्साईजचे नियमच वेगळे होते. ते वेगळ्या स्लेबमध्ये बसत होते. या स्लॅबमध्ये बसणारे हे चौघेच होते.

उघड होते की त्या सर्व ऑर्डर्स एक्झिक्युट करायच्या असल्या तर वाढीव ड्युटीची अमाऊंट बेसिक प्राईसमधून कमी करावी लागणार होती. आणि धिस वॉज रिअली नॉट पॉसिबल आफ्टर हॅविन्ग पर्चेस्ड ऑल द रॉ मटेरिअल फॉर दोज गिअरबॉक्सेस ऑलरेडी!

चूक होती शासनाच्या मूर्ख पॉलिसीजची! सगळे टॅक्सेशन वगैरे गृहीत धरून तुम्ही कसे काय एल वन, एल टू काढता? पण बोलणार कोण? प्रत्येक पत्रावर राष्ट्रपतींची मुद्रा! पैसे खायला तर इतके सरावलेले होते की फोन करून करून सांगायचे..

'साहेब, तुमच्यापेक्षा त्या लोकल माणसाने आणखीन लो प्राईस कोट केली बर का.. मी आपलं.. आपले संबंध चांगले आहेत म्हणून सांगीतलं...' वगैरे!

पायाखालची वाळूच सरकली होती या तिघांच्या! होय! तिघांच्याच! मोनालिसाच्या नाही.

दासप्रकाश बोलत असताना मधे बोलायचे नाही हा अलिखित नियम धीमन रे यांनी मोडला.

रे - सर, हम तो सही ढंगसे सप्लाय कर ही रहे है.. लेकिन गव्हर्नमेंटकी पॉलिसी ये है के प्राईस फायनल करते वक्त वो सारी कॉस्ट्सके बारेमे सोचते है...

माने - तो उसमे गलत है कुछ क्या??

रे - नही नही सर.. कहनेका मतलब ये है के हमारी अ‍ॅक्च्युअल कॉस्ट अ‍ॅट पार या फिर एल वन होनेके बावजूद भी... हमारे हाथसे वो बिझिनेस जा रहा है...

माने - आप उन्हे समझाईये ना?? इसमे इक्साईज क्या करेगा??

बोलणे पुढेच जात नव्हते. मंत्र्यांनी हटवादी, आडमुठे धोरण स्वीकारलेले होते व ते त्यांच्या भूमिकेतून पूर्णपणे समर्थनीयच होते.

मात्र आता काहीतरी निर्णय व्हायलाच हवा होता. राहुल चंद्रा म्हणाले..

चंद्रा - सर.. गव्हर्नमेंट तो एकही है... अगर ... नॅशनल कमीटी कुछ... सर्क्युलर...

माने - देखिये मै आपका ये इश्यू सिर्फ रिपोर्ट कर सकता हूं उपर... डिसीजन उन्ही लोगोंके हाथ मे है...

मंत्र्यांनी सरळ पी.ए. ला बोलवून दुसर्‍या कुणालातरी आत पाठवायला सांगीतले तसे भयानक अपमानास्पद परिस्थितीत सगळेच एकदम उठले.

दासप्रकाश - एनीवे.. थॅन्क यू सर.. .फॉर यूवर टाईम अ‍ॅन्ड...

माने - थॅन्क यू थॅन्क यू...

दोन तास ज्या मीटिंगसाठी थांबलो ती पंधरा मिनिटात अशी संपली होती आणि त्यातही दहा मिनिटे मंत्र्यांचा फोन आणि फायली तपासणेच चाललेले होते.

सगळे बाहेर आले.

आता एक मोठे डिस्कशन होणार हे मोनालिसाला समजलेले होते.

रे - मिस्टर दासप्रकाश... आय थिन्क वुई शूड डिस्कस ऑल धिस नाऊ...

चंद्रा - या... आय सजेस्ट लेत्स गो टू ओबेरॉय...

दासप्रकाश - फाईन...

गुप्ता हेलिक्सतर्फे लोहिया या मीटिंगला आलेले नव्हते कारण ते स्पेनमध्ये होते. डॅनलाईनबरोबर पुढची डिस्कशन्स करायला.

या दोन महिन्यांमध्ये बरेच पाणी वाहून गेलेले होते.

अर्देशीर ताडताड पाय आपतत निघून गेल्यानंतर त्यांनी आठ दिवस भरपूर विचार केलेला होता घरी बसून!

आणि त्यांना जाणवलेली गोष्ट एक तर फार विचित्र तरी होती किंवा मूर्खपणाची तरी होती.

मोनालिसाने जर मुद्दाम आपल्याला उखडायला म्हणून डॅनलाईनचा मुद्दा मध्ये घुसडला असेल तर ती त्यांच्यामते फार फार हुषार होती आणि तसे असल्यास हा सगळाच प्रकार फार विचित्र होता. कारण शेअर्स विकून आलेल्यातील उरलेले काही पैसे आणि चाकणची जागा एवढेच त्यांच्या हातात आता उरलेले होते. आणि त्यांना या पातळीला मोनाने जर व्यवस्थित विचार करून आणलेले असेल तर ते फार भयानक प्रकरण होते.

पण असे असण्याची शक्यता त्यांचे मन डावलत होते. कारण इरफान कोण हेच तिला धड माहीत नव्हते सुबोधच्या घरी डिनरला आलेली असताना! तिने तर त्या प्रस्तावाला नॉन्सेन्स असे नावही दिलेले त्यांना आठवत होते. तिला अजून हेलिक्सचाच बिझिनेस समजत नसल्यामुळे हे काम अर्देशीरांनी सांभाळावे असे म्हणताना तिचा चेहरा अत्यंत प्रामाणिक होता हे अर्देशीरांना आजही आठवत होते. तसेच, इरफान हा आपण प्लॉट केलेला माणूस आहे आणि मोहनला तो एका कोणत्यातरी क्षणी विश्वासघातकी भासला होता हे मोनाला माहीत असणेच शक्य नाही यावरही ते ठाम होते. कारण इरफानने तिला दाखवलेल्या इमेल्समधून तिला पहिल्यांदाच समजले होते की मोहनचा रेडिफवरही एक इमेल अकाऊंट होता. त्या अर्थी मोना इनोसन्ट होती.

मात्र! या सगळ्या भानगडीत अर्देशीरांचे हेलिक्समधले शेअर्स उगाचच गेलेले होते. इतकेच काय मोनाने तेवीस लाझ इन्डियन रुपीजचे पेमेंटही आय सी ला केले पुढच्या तीन दिवसात! कोलॅबोरेशनच्या फ चा अ‍ॅडव्हान्स म्हणून! त्या अर्थी तिला हा प्रस्ताव हवाच होता.

त्यामुळे, आठ दिवसातच अर्देशीरांना जाणवले की अत्यंत परिपक्वपणे या प्रकाराकडे पाहणे आवश्यक आहे. आपले शेअर्स गेले म्हणजे मोना फसवणारच असे नाही हे त्यांनि आधी स्वत;ला समजवाले.

मात्र त्या कालावधीत जतीन आणि सुबोध सुरुवातीला मोनावर प्रचंड चिडले होते. कारण डॅनलाईन हा कुणालाही माहीत नसलेला मुद्दा आता अचानक इतका महत्वाचा होऊन बसला होता की दोघांनी आय सी च्या कोलॅबोरेशनसाठी केलेले अथक परिश्रम सध्या निरुपयोगी ठरत होते. त्यातच अर्देशीर यांचे स्थानच मुळापासून हाललेले होते.

पण लोहियांनी हळूहळू समजावून सांगीतल्यानंतर त्यांच्या बथ्थड मेंदूत त्या विचाराने जम बसवला होता. खरच की! डॅनलाईन कितीतरी फायदेशीर होते! आणि मुख्य म्हणजे अर्देशीर हा फायदा शोषणारा एक घटकच त्यात नव्हता.

अचानकच, अर्देशीर या तिघांपासून लांब ठेवले गेले. त्यात या तिघांचा स्वार्थ होता. कुणीच कुणाचे नव्हते. ही सगळी मैत्री कोणत्याही पवित्र अधिष्ठानवर नव्हती. ती निर्माण झालेली होती फक्त स्वार्थावर! आणि अधिक स्वार्थ दिसताच ती डळमळीत होणार याचे ज्वलंत उदाहरण पहिल्या केवळ पंधरा दिवसातच दिसले होते. अर्देशीरांचे फोन हल्ली सुबोध आणि जतीन अधूनमधूनच घेत होते. बोलताना नीट बोलत असले तरीही अर्देशीरांना स्वतःचे कमी झालेले महत्व जाणवत होतेच! आणि त्यातच शेवटी त्यांनी मोनाची तिच्याच केबीनमध्ये भेट घेतली. तिच्या घरी झालेल्या मीटिंगनंतर बरोब्बर एक महिन्याने!

अर्देशीर - मोनालिसा...

आजवर जिचा उल्लेख ते 'बेटा' असा करायचे तिचे आज त्यांनी पूर्ण नांव उच्चारले होते. मोनाला ते येणार हे कळल्यावरच कल्पना आलेली होती की आज ते रोखठोक बोलणार.

मोना - येस अंकल....

मात्र मोना 'सर' वरून 'अंकल' वर आलेली होती.

अर्देशीर - व्हॉट हॅव यू एक्झॅक्टली डिसायडेड नाऊ?

मोना - असे का म्हणता अंकल?? तुमचा अजूनही विश्वास नाही आहे का? आपण त्यांच्या फीसही भरतोय ना?

अर्देशीर - नुसत्या फीस भरून कसे चालेल? बांधकाम, मशीन्स, या सगळ्या गोष्टी नकोत का व्हायला?? आणि हेलिक्स इतके गरीब आहे का? की डॅनलाईनचे पैसे भरल्यानंतर आय सी च्या प्रोजेक्टसाठी काही न उरायला??

मोना - अंकल... हेलिक्स गरीब नसले तरी एकदम दोन दोन उड्या कशा जमतील??

अर्देशीर - माझा नेमका तोच मुद्दा आहे... आय सी वर आपण काम चालू केलेले असताना डॅनलाईन बाजूलाच ठेवायला नको होते का??

मोना - अंकल.. डॅनलाईन आपल्या कंपनीला कितीतरी जास्त प्रॉफिट देणार आहे...

अर्देशीर - आय नो दॅट.. पण... आय मीन... तू हा विचार कर... की आज माझे हेलिक्समधले शेअर्स तू घेतलेस... आय सी चा प्रोजेक्ट थंड आहे... म्हणजे मी... मी .. काय आहे आता मी???

आणि अर्देशीरांना धड श्वास घेता येईना की निश्वास सोडता येईना असे वाक्य अत्यंत थंडपणे टाकले मोनाने!

मोना - नथिंग.. राईट नाऊ.. यू आर नथिंग...

आपले म्हातारे आणि विस्फारलेले मात्र घाबरलेले डोळे मोनावर बरेच क्षण रोखून अर्देशीरांनी विचारले..

अर्देशीर - .... म्हणजे....?????

मोना - म्हणजे असं... की... त्या दिवशी सुबोधकडे मी डॅडच्या ज्या पत्राबाबत बोलले ना अंकल.. त्यात.. तुमचे कुठेच नांव नव्हते... ही ओन्ली युझ्ड टू ट्रस्ट लोहिया अंकल.. नॉट यू... अ‍ॅट ऑल...

एखाद्या साम्राज्याचे महामंत्री किंवा सेनापती असताना अचानक पायउतार व्हावे लागावे तसा चेहरा झाला होता अर्देशीर सरांचा...

अर्देशीर - यू मीन... तू... हे सगळं..... ठरवून...???

मोना - अ‍ॅबसोल्यूटली... 'सर'...!

अर्देशीर - ... का???? ...... क..... का पण???

पूर्ण ट्रॅप झालेला पक्षी जसा अगतिकपणे पिंजरा बंद करणार्‍याकडे पाहील तसे पाहात अर्देशीर म्हणत होते...

मोना - कारण... .. कारणे अनेक आहेत 'सर'...

अर्देशीर - .......???????

मोना - फिरोज मॉड्यूल आहे... फारुख ऑटो आहे.... शेव्हिन्ग मशीन्स आहेत...

अर्देशीर - व्हॉट द ... व्हॉट द हेल यू मीन???

मोना - यू... अ‍ॅक्च्युअली ... नो.. व्हॉट आय मीन...

अर्देशीर - मूर्ख मुली... हे.. हे सगळं खोटं आहे....

मोना - असं??

अर्देशीर - हे... कुणी सांगीतलं तुला?? फिरोज मॉड्यूल वॉज यूवर डॅड्'स ड्रीम....

उपरोधिकपणे हासत मोना म्हणाली...

मोना - इझ इट?? बोकारोला तिथून गिअर बॉक्सेस जाव्यात असं स्वप्नं होतं का त्यांचं??

पाच मिनिटे! तब्बल पाच मिनिटे अर्देशीर फक्त मोनाच्या चेहर्‍याकडे बघत नुसते बसले होते. त्यांच्या नजरेतील हळूहळू बदलणारे भाव पुस्तक वाचावे इतक्या सहजपणे मोना वाचू शकत होती. पहिल्यांदा भयानक क्रोध, त्यानंतर अगतिकता आणि नंतर सूडाची भावना!

अर्देशीर - आय्'ल... आय'ल फिनिश हेलिक्स... कंप्लीटली... इट विल बी अ हिस्टरी...

मोना - सी इफ यू कॅन डू दॅट....

अर्देशीर - आणि... मोहनला ज्या लोहियावर विश्वास होता असं तू म्हणतीयस... तो तुझ्या बापाचा एक नंबरचा शत्रू आहे..

मोना - यू जस्ट कॉल माय डॅड अ‍ॅज माझा बाप...

मोनाच्या थंड स्वरातील ती गर्भित धमकी न समजायला अर्देशीर अपरिपक्व तरुण नव्हते.
तिथून उठताना त्यांनी एकवार त्या केबीनकडे पाहिले.

मोहन गुप्तांबरोबर तासनतास केलेल्या चर्चा, मोठमोठ्या प्रस्तावांवर दिलेले होकार नकार, हास्य विनोद, रात्री होणार्‍या पार्ट्या, लोहिया आणि मोहनबरोबर केलेली सगळी धमाल, सगळी संकटे परतवण्यासाठी खांद्याला खांदा लावून केलेल्या लढाया, प्रत्येक आनंद उपभोगण्यासाठी मांडीला मांडी लावून केलेली मजा...

... एव्हरीथिन्ग वॉज फिनिश्ड... !

अर्देशीर इंजीनियर... हॅड लॉस्ट हिज पोझिशन इन हेलिक्स... !!!!

आणि त्यानंतर त्यांनी गोरेच्या माध्यमातून जरी हेलिक्सवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केलेलं असलं.. तरीही त्य दिवसापासून लोहिया, सुबोध आणि जतीन या तिघांनीही अर्देशीर या नावावर एक लालभडक रंगाची फुली मारलेली होती. त्यांच्या आयुष्यात आता तशा नावाची कुणीही व्यक्ती नव्हती. आणे असे करण्याचे कारण एकच होते, मोहन गुप्तांचा अर्देशीरांवर काहीही विश्वास नव्हता असे मोनाचे म्हणणे होते आणि त्याच वेळेस त्यांचा या तिघांवरही प्रचंड विश्वास होता असेही म्हणणे होते. त्यामुळे, लोहियांच्या छत्राखाली राहून मजा करणे हे आता शहाणपणाचे ठरणार होते. एक मात्र झाले होते...

.... मोनालिसा गुप्ता... ही अत्यंत डेंजरस व्यक्ती आहे ... हे तिघांनाही समजलेले होते...

यापुढे तिच्या कोणत्याही प्रस्तावावर ते आता विश्वास ठेवणार नव्हते... उलट... हेलिक्सच्या प्रगतीसाठीच रक्त आटवणार होते... कारण.. तिचा पूर्ण विश्वास संपादन करणे ही त्यांच्या इथल्या अत्सित्वाची गरज बनलेली होती...

मात्र त्या तिघांनीही केव्हाच तिचा विश्वास गमावलेला होता हे त्यांना कुणालाच माहीत नव्हते.

आत्ताही मंत्रालयातून ओबेरॉयला जात असताना मोनाला त्या रात्री सायराबरोबर झालेले डिस्कशन आठवले.

भयानक घाबरून आत आलेल्या सायराला तिने बेडशेजारच्या एका खुर्चीवर बसायला सांगीतले. शांतपणे काही मिनिटे ड्रिन्क घेतल्यानंतर अचानक मोनाने फार फार विचारपुर्वक एक प्रश्न तिला विचारला.

मोना - डॅडना हे कसे कळले सायरा?? की.. जतीन आणि तू एकाच शाळेत आणि एकाच कॉलेजमध्ये होतात??

पायाखालची वाळुच सरकली सायराच्या! थंड एसी बेडरूममध्ये तिला आपल्याला घाम फुटल्याचे जाणवले होते. चेहरा एकदम पडलेला होता.

सायरा! पस्तीशीची ती बाई अत्यंत आकर्षक होती. अर्थातच, तिच्यावर पागल झालेले अनेक पुरुष असणार होते. पण त्यात जतीन असेल असे मोनाला वाटले नव्हते. पण ते नुकतेच समजलेले होते. भसीनकडून सगळ्यांचे बायोडेटा मागवून ते रात्रभर चाळल्यानंतर! त्यामुळेच तिने सायराची तडकाफडकी बदली केली होती.

आणि आत्ताच्या मोनालिसाने विचारलेल्या प्रश्नात अनेक गोच्या तिने करून ठेवलेल्या होत्य. तो एक प्रश्न नव्हताच! ते होते दोन, तीन प्रश्न!

एक म्हणजे - जतीन आणि सायरा शिक्षणाच्या काळात कायम एकत्र होते हे मोनालिसाला माहीत असणे

दुसरे - ते तिला कसे कळले हे सायराला न समजणे

तिसरे - ते जतीन किंवा सायराने स्वतःहून कधीच मोनाला का सांगीतले नव्हते??

आणि सर्वात महत्वाचे...

चौथे - डॅडना ते कसे कळले यात डॅडना ते माहीत होते हे सांगणे आणि त्याबाबत उलट स्वत:च आश्चर्य व्यक्त करणे...

मोनालिसा अत्यंत हुषार होती याद वादच नव्हता. अत्यंत हुषार! बालीश प्रश्नच विचारला नाही तिने! की तू आणि जतीन एकत्र होतात का? मग मला का नाही सांगीतलेत? डॅडना माहीत होते का? ... वगैरे!

मुळात ते मोहन गुप्तांना माहीतच नव्हते हे मोनालिसाला माहीत होते.

कपाळावरून खाली आलेला घामाचा एक ओघळ सायराने पदराने टिपून घेतला आणि भकास चेहर्‍याने मोनाकडे पाहात म्हणाली..

सायरा - आम्ही... एकत्र म्हणजे.. फक्त... एका शाळेत होतो....

मोना - हो पण डॅडना कसे कळले??

सायरा - ... नाही... मला खरच माहीत नाही ते....

मोना - म्हणजे... ते... त्यांना कळायला नको होते????

सायरा - ....

सायरा पांढरी फटक्क पडलेली होती. पण उत्तर द्यायलाच लागणार होते.

सायरा - ... नाही... छे छे! तसे काहीच नाही.. मला वाटले माहीत असेल त्यांना...

मोना - अच्छा... .. एसी... चालत नाहीये का??? .. यू... यू आर स्वेटिंग....

सायरा - नाही नाही.. जरा .. दमले होते इतकेच...

मोना - तुला जरा रेस्ट हवीय का???

सायरा - नाही नाही...

मोना - डॅड गेले त्या दिवशी मी उटीला होते.... मला सांगतेस... नेमके काय झाले त्यांना??

सायरा - तेच... तुम्हाला जे सांगीतले होते तसेच झाले..

मोना - आय वॉन्ट टू हिअर इट अगेन.. सायरा...

मोनाचा तो थंड स्वर सायराने फारसा ऐकलेला नव्हता. आपल्यासमोर बसलेली मुलगी आपल्यापेक्षा खूप लहान असली तरीही एका फार मोठ्या साम्राज्याची ती एकमेव वारसदार आहे हे सायराला माहीत होते. आपली शक्ती तिच्यापुढे क्षुल्लक आहे याची सार्थ जाणीव होती तिला!

सायरा - ते.. ड्रिन्क घेत होते लोहिया सर आणि अर्देशीर सरांबरोबर...

मोना - कोणते ड्रिन्क??

सायरा - ... अं?? ... हायलॅन्ड पार्क...

मोना - डॅड तर... ब्लॅक लेबल घ्यायचे ना???

सायरा - होय... हायलॅन्ड पार्क लोहिया सरांचे फेव्हरीट आहे.. त्या दिवशी लोहिया सरांच्या आग्रहामुळे..

मोना - .... आग्रह?? .. आग्रह करण्यासारखे काय झाले होते त्या दिवशी???

सायरा - मला माहीत नाही.. पण.. बहुतेक... कोणतीतरी ऑर्डर मिळाली असावी...

मोना - वेस्टर्न कोलफिल्ड्स???

सायरा - ... मला ते खरच माहीत नाही...

सायराही चांगलीच हुषार होती. जी बाई मोनाबेटि१९८० ही चिठ्ठी इतकी जपून ठेवते तिला पार्टीचे कारण माहीत नसेल??

मोना- मग काय झाले??

सायरा - घेतली गुप्ता सरांनी... हायलॅन्ड पार्क...

मोना - ते ठीक आहे.. पण... हायलॅन्ड पार्क.. आपल्याकडे होती का?

सायरा - माहीत नाही...

मोना - माहीत नाही म्हणजे?? तूच तर असायचीस सर्व्हीसला...

सायरा - नाही नाही.. म्हणजे... ती आपल्याकडे होती की कुणी आणली होती ते आठवत नाहीये...

मोना - हं... .. मग???

सायरा - बराच वेळ सगळे.. पीतच होते...

मोना - डॅडना काही होत होते?? दुपारपासून वगैरे??

सायरा - जरा अस्वस्थ वाटतंय असे म्हणत होते खरे...

मोना - तुला???

सायरा - हो... मलाच म्हणाले..

मोना - मग.. तू पार्टीत त्यांना म्हणालीच असशील.. फार घेऊ नका म्हणून.. आता झोपा म्हणून....

सायरा - अं?? .. हो ना? मी म्हणाले.. पण..

मोना - ऐकले तर माझे डॅड कसले??

सायरा - मॅम.. हे सगळं... तुम्ही मला आज.. का विचारताय???

मोना - .... ओह.. माय डिअर सायरा... ऐकायचंय???

सायराने फटफटीत चेहर्‍याने मोनाकडे पाहिले.

मोना - यू आर गोईंग टू बी अ‍ॅरेस्टेड टूमॉरो... फॉर ... पॉयझनिंग माय डॅड???

कर्कश्श किंचाळली सायरा! नशीब! बेडरूम आतून बंद असल्यामुळे बाहेरून कुणी धावून आले नाही.

अक्षरशः कर्कश्श!

आज.. आयुष्यात पहिल्यांदाच.. मोनाने पाणी प्यायला दिले सायराला..

मोना - आणि.. तू जर माहीत आहे ते सगळे सांगणर असशील... तर...वाचशील.. म्हणजे.. वाचवेन मी तुला..

खूप क्षण सायरा मोनाचा अंदाज घेत पाहात बसली होती मोनाकडे! नक्की मोनामॅडमना किती माहीत असेल हे तिला ठरवता येत नव्हते. मात्र नंतर भीतीचा अतिरेक झाल्यामुळे तिने ठरवले. स्वतःला वाचवायचे असेल तर सांगीतलेले बरे! कारण ऐन वेळेस जतीन काही मदत करेल की नाही... हे निदान आत्ता, या क्षणी तरी तपासणे अवघड आहे.... अशक्य आहे..

सायराने बेडखालच्या कारपेटकडे पाहात तोंड उघडले.

सायरा - आय... आय... आय मस्ट टेल यू... दॅट... आय मीन... आय अ‍ॅम रिअली इनोसन्ट.. पण.. मी.. सगळे खरे खरे सांगते मॅम... आय.. आय नीड..

मोना - हेल्प यूअरसेल्फ सायरा.. यू मे टेक व्हिस्की इफ यू वॉन्ट...

सायराने एक भला मोठा पेग तयार करून घटाघटा घशाखाली ओतला. नंतर मोनासमोर एक ड्रिन्क तयार करून ठेवले.

सायरा - आय डोन्ट नो एक्झॅकटली... बट.. काहीतरी कारणाने.. सरांचे... या सगळ्यांशी बिनसलेले होते...मॅम...आय... आय रिअली लव्ह हिम...

मोना - जतीन???

सायरा - अंहं... .........लोहिया...

जागच्याजागी रक्त गोठून जिवंत माणसाचा पुतळा व्हावा तसे झाले मोनाचे! तीन, चारच क्षण! त्यानंतर ती आडवी पडलेली होती ती ताडकन उठूनच बसली..

मोना - सायरा???? .. यू... व्हॉट द हेल... इज धिस???

सायरा आता अधिकच रडू लागली. तिच्या रडण्याचा आवेग जरासा कमी होईपर्यंत मोनालिसा नुसती खिळून तिच्याकडे बघतच बसली होती. आत्ता ड्रिन्कची गरज मोनाला होती! मगाशी सायराने घेतला त्याप्रमाणे तिने स्वतःचा पेग घशात अक्षरशः ओतला!

मोना - यू... यू लव्ह... अंकल????

सायरा - जतीन आणि मी एकाच शाळेत आणि एकाच कॉलेजला होतो... त्याच्याच कॉन्टॅक्टमुळे मला.. हेलिक्सचा जॉब लागला... जतीनसारख्या हाय पोस्टचा माणूस माझ मित्र असल्यामुळे माझे महत्व बरेच होते.. मी आधी .. एक माथुर म्हणून जी एम होते त्यांची पी ए होते... माथुर लोहिया सरांना रिपोर्ट करायचे.. कशी कुणास ठाऊक... बहुधा... लोहियांना मी... त्या अर्थाने आवडायला लागली असावे...कारण... माथुर ऑफीसमध्ये नाहीत हे माहीत असूनही त्यांना काही ना काही निरोप देण्यासाठी मला त्यांचे फोन यायचे.. मग.. दोन तीन फोन नंतर ते जरा अधिक जवळचे वाटावे असे बोलायला लागले.. मी कुठली आहे.. काय शिकले आहे.. या कामात रस आहे की नाही?? अ‍ॅम्बिशन्स काय आहेत... मेन स्ट्रीम बिझिनेसमध्ये काही इन्टरेस्ट आहे का.. वगैरे वगैरे... साहेबांचे साहेब यामुळे मी अधिकच दबून वागायचे... पण.. एक दिवस असा आला की... काहीतरी कारणाने माथुर पंधरा दिवस परदेशाला जाणार होते.. त्यावेळेस... लोहियांनी मला.. मुंबईला बोलावले... कोणत्यातरी तीन चार मीटिंग्ज झाल्या मुंबईत.. पण सगळ्या ऑफीसच्या बाहेर... आणि मग रात्री डिनर आहे असे म्हणाले ते... मॅम... मला वाटत होते की हे डिनरही ऑफिशिअल असणार... आणि मला पुण्याला यायला खूप खूप उशीर होणार म्हणून मी .. वैतागले होते... पण.. दॅड डिनर ... इट वॉज फॉर मी... अ‍ॅम्बॅसॅडरच्य रिव्हॉल्व्हिन्ग रेस्टौरंटमधे असे जेवायची वेळ... माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच आलेली इतकी मोठी पर्वणी होती.. माझे सगळे कुटुंब पिंजोरला असल्यामुळे मी उशीर झाल्याबद्दल कुणालाच अ‍ॅन्सरेबल नव्हते इकडे... आणि इतक्या मोठ्या बॉसबरोबर असताना स्वतःच्या अडचणी सांगणे प्रशस्त वाटत नव्हते... मी त्या हॉतेलमध्ये लोहियांबरोबर एकटी आहे हे जतीनला समजले असते तर तो ... हादरलाच असता.. कारण त्याचा अर्थ सरळ होता.. मी त्याच्याहीपेक्षा मोठी झाल्यासारखे वाटले असते त्याला.. आणि.. खरे तर .. झलेही मॅडम.. मोठी नाही.. पण.. खूप क्लोज.... लोहियांनी माझ्या पुढ्यात सरळ ट्रान्स्फरची ऑर्डरच टाकली.. म्हणे माथुर आता परत येणार नाही आहे.. यू विल रिपोर्ट टू मी.. आणि.. मिळणारा वाढीव पगार अक्षरशः वेड लावणारा होता.. याची एक परतफेड तरी तू करायलाच हवीस कि असे लाडीकपणे त्यांनी वारंवार विचारले तेव्हा.. मला खूप लाज वाटत होती... पण... परत जाताना कारचा ड्रायव्हर असल्यामुळे.. त्यांना काहीच करता आले नव्हते... एक्सेप्ट... मी माझ्यासाठी आलेल्या आणि ऑफीसमध्ये ठेवलेल्या माथुर सरांच्या कारपर्यंत पोचेपर्यंत त्यांनी माझा हात मात्र दाबून धरला होता स्वतःच्या हातात.. मला खरे तर .. काही ठरवताच येत नव्हते... इन फॅक्ट.. मला तो स्पर्श एकाच वेळेस.. प्रचंड नकोसा आणि तरीही... काहीसा हवासा वाटत होता... पुण्याला परत येताना मला भयंकर लाज वाटत होती.. आपण हे काय करू दिले म्हणून... पण.. पगार पाहून मी त्या बाबीकडे दुर्लक्ष करत होते... मॅडम... यू आर... यू आर... नॉट दॅट... ओल्ड यट.. आय मीन.. अजून ... तुम्ही वयाने जरा... लहान आहात.. यू अ‍ॅन्ड मी.. बोथ आर नॉट मॅरिड... बट... आय.. दो आय अ‍ॅम अशेम्ड टू टेल यू धिस... आय मस्ट से... पुढील काही दिवसात आम्ही दोघेही भेटायचो... अ‍ॅन्ड.. ही इज... ही इज... बेटर दॅन एनी यंग गाय इन.... बेड... मच बेटर... मात्र.. एका क्षणी त्यांनी मला.. बंगल्यावर पोस्टिंग स्वीकारायला सांगीतले.. त्यांच्या म्हणण्यात वारंवार यायचे मॅम.. हेलिक्स विल बी माय कंपनी वन डे... डेफिनेटली माईन... अ‍ॅन्ड आय विल बी द होल अ‍ॅन्ड सोल ऑफ हेलिक्स.. आणि.. बंगल्यावर .. म्हणजे इथे पाठवताना त्यांना मी दुरावणार याचे खूप दु:ख असले तरीही... मी आता.. गुप्ता सरांच्य खूप सान्निध्यात असणार याचा आनंदही होता... आणि... माझे काम फक्त इतकेच होते... की गुप्ता सरांचा फोनवर किंवा प्रत्यक्षात कुणाशी बोललेला शब्द अन शब्द कानात साठवायचा... तो त्यांना दररोज दुसर्‍या दिवशी जसाच्या तसा सांगायचा.. गुप्ता सरांना स्कॉचशिवाय एक दिवसही झोपू द्यायचे नाही.... त्यांचा.. जमेल तितका करस्पॉन्डन्स कॉपी करायचा किंवा वाचून नीट लक्षात ठेवायचा.. आणि.. सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. गुप्ता सरांच्या मनात.. स्वतःबद्दल.. तसले आकर्षण निर्माण करायचे.... तुमचे डॅड महान माणूस होते मॅम... त्यांनी मला कायम मुलगीच मानले.. ही वॉज अ ग्रेट मॅन... पण.. तुम्ही उटीला गेलात त्या दिवशी... खरे तर डब्ल्यू. सी. एल.चीच ऑर्डर फायनल झाली होती... आणि.. हायलॅन्ड पार्क पिता पिता.. सरांना खूप अस्वस्थ वाटू लागले.. एडमीट करायची नुसती घाई घाई झाली... आणि केवळ तासाभरातच.. अख्या हेलिक्सला तो... भयानक धक्का बसला.. ते गेलेले होते... आय म शुअर मॅम.. नो वन किल्ड हिम.. बट..

थक्क झालेल्या आणि खिळून बसलेल्या मोनाने विचारले...

मोना - ...... बट????????

सायरा - बट... एव्हरीवन वॉन्टेड हिम टू डाय...

मोना - ... हाऊ... हाऊ डू यू नो???

सायरा - तुम्ही आल्यानंतर त्यांचे फ्युनरल करायचे ठरल्यावर आणि बॉडी हॉस्पीटलमध्येच मॉर्च्युरीमध्ये रात्रभर ठेवल्यावर ... आणि सर्व संबंधितांना फोनवरून ही दुर्घटना सांगीतल्यावर... पुन्हा इथेच येऊन कुणी... हायलॅन्ड पार्क घेईल मॅम????? चौघांनीही घेतली....

मोना - तू... तू .. आता पश्चात्ताप झाल्यासारखी वागतीयस तर....

सायरा - आधीच का नाही बोलले.. भीती आणि मोहामुळे.. मला वाटले... यात माझा कुणालाही संशय येणार नाही आणि लोहियांबरोबर राहून... मी आयुष्यभर पैसे कमवत राहू शकेन... पण.. आत्ता तुम्ही एकदम अ‍ॅरेस्ट म्हणाल्यावर... मला भान आले मॅम... आय... आय अ‍ॅम सॉरी... आय हॅव बीन विथ दोज पीपल.. हू .. प्रॉबेबली वॉन्टेड टू.. किल यूअर डॅड...

त्या रात्री मोनाने रडणार्‍या सायराच्या खांद्यावर थोपटले आणि दुसर्‍या दिवसपासून सायराची बदली पुन्हा बंगल्यावर झाली.. मात्र यापुढे... लोहियांना मोनाबद्दल काय माहिती सांगायची.. हे मोनाच सायराला सांगणार होती... पार्टीच बदलली होती सायराची.. आणि... ते सगळे बोलणे टेपही झालेले होते... आणि मुख्य म्हणजे... तिचे लोहियांवरचे ते प्रेम.. केवळ एक तात्पुरती भावना होती या मोनाच्या विचाराचा प्रभाव बर्‍यापैकी पडलेला होता...

आणि आत्ता ओबेरॉयच्या कॉफीशॉपमध्ये दासप्रकाश, राहुल चंद्रा आणि धीमन रे यांच्याबरोबर बसलेल्या मोनाला खरे तर मध्ये बोलायचे काही कारणच नव्हते... पण.. बहुतेक बोलावेच लागणार अशी चिन्हे दिसत होती.

दासप्रकाश - नो नो... आय मीन... वुई विल हॅव बिग लॉसेस धिस इयर... ऑल ऑफ अस...

चंद्रा - दिज गाईज आर लिटरली बास्ट..... सॉरी...

हे 'सॉरी' मोना तिथे आहे हे लक्षात आल्यामुळे होतं!

रे - बट... द क्वेश्चन इज.. व्हॉट डू वुई डू???

दासप्रकाश - और क्या करेंगे?? प्राईस रिड्युस करके सप्लाय करो?????

चंद्रा - बट.. आय मीन..

मोनालिसा - मी... एक बोलू का???

सगळे एकदम थंडच झाले. आता हे बालक काय बोलणार??

बोला बोला.. काय ते एकदाचं बोला...

चंद्रा - बताईये....

मोना - स्टॉप ऑल सप्लाईज फॉर अ मन्थ... माय डॅड हॅड डन धिस विथ बोकारो स्टील वन्स.. अ‍ॅन्ड दे डिड बो डाऊन फायनली... फर्गेटिंग अवर कॉम्पीटिशन फॉर अ मोमेन्ट.. इफ वुई कम टुगेदर.. जस्ट फॉर अ मन्थ... वुई विल विन....

तीन हबकलेले चेहरे एकमेकांकडे पाहातच बसलेले होते.

गुलमोहर: 

सॉलीड....
काय भन्नाट चालली आहे कथा.....
अशक्य गुंगुन गेलोय मी यात....
बेफिकीरजी...पुन्हा एकदा सलाम...

अरेरे माझा पहिल्या ५ मधला नम्बर गेला....
आता वाचतो.... पण नेहमी प्रमाणे सूसाटच असणार ....
बेफिकीरजी .... मूजरा !!!

आज २ भाग वाचायला मिळाले, खुपच छान.

माने - ओके ओके ओके... म्हणजे आज सगळे काटेरी चक्र वाले आलेले आहेत... >>> हा हा हा Lol
मोना द ग्रेट मॅन, एक एक रहस्य ऊलगडत आहे, ग्रेट चाल, मला वाटल आगोदरच मोठा मोहरा गिळला कि बारके बारके प्यादे घेता येतिलच कि? पण हि हि चाल ऊत्तम Happy

गोष्ट खुप छान चालली आहे. महसुल मंत्र्यांबरोबरच संवाद आवडला.
आपला मार्केटिंग मधला अनुभव देखिल जाणवला.

'हरामखोर, जी एस एफ सी ला टेंडर ओपनिंग नंतर जाऊन तू सात टक्के कमी करून बिझिनेस ओढलास ते काय मला माहीत नाही?
>> हा प्रकार मी ऐकला आहे, कसा चालतो ते नीट माहिती नाही. IPL मध्ये पण असेच प्रकार झाले ना?

बेफिकीरजी,

दिवाळीची सुट्टी घेतली का?

पुढचा भाग कधी?

तुम्हाला व परीवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

सर्व मायबोलीकराना आणि परीवाराला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

लवकर पूढिल भाग टाका हो बेफिकीरजी !!!
आणि तुम्हाला दिपावली साठी अभिष्टचिंतन. !!!

बेफिकीर तुमचा सेल्स मधला अनुभव खुपच अफाट दिसतय्!...यावर एखादा सिनेमाही काढता येईल!!

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा!

बेफिकीर राव दिवाळी च्या सुट्टीची मजा घ्या!! त्यानंतर लागलीच पुढचा भाग पोष्ट करा!!

धक्का.. बापरे किती वेगवान कथानक!! वाचताना सुद्धा आपण भरभर धावत आहोतसा भास होते.. पुढच्या भागाची अशीच वेगात वाट पाहणे सुरु...