पुन्हा प्रश्न!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

परदेशीच नव्हे तर आपल्या नेहेमीच्या, राहत्या, सवयीच्या जागे पासून दूर गेलं की नव्या सवयी, नव्या रितीभातींशी जुळवायचा प्रसंग सगळ्यांवरच येत असतो. काही सवयी आपसूक अंगवळणी पडतात. जसे आम्ही कधी एलिव्हेटर अन अपार्टमेन्ट म्हणायला लागलो ते कळलं सुद्धा नाही. काही सवयी प्रयत्नपूर्वक लावून घ्याव्या लागतात नाही तर अनवस्था ओढवते-मग खोडरबर चा इरेझर होतो. दुकानात टॉर्च न विचारता फ्लॅश लाईट किंवा इमर्जंसी लाईट मागायचा असतो. रस्ते क्रॉस करताना, गाडीत बसताना डावं उजवं बदलावं लागतं. स्पेलिंगच्या सवयी बदलतात.
प्रत्येक जण कमी-अधिक प्रमाणात हे बदल स्वीकारत अस्तो. तरिही प्रत्येकाला वाटतं की आपणच बदलण्याचा अन न बदलण्याचा सुवर्णमध्य गाठलाय. जे आपल्या पेक्षा कमी बदलले ते 'गांवढळ' किंवा those typical xxxxx ( इथे कुठलाही प्रांतीय/भाषावाचक शब्द चालेल) अशी संभावना करायची. अन जे आपल्यापेक्षा जास्त बदलले त्यांची 'he/she is trying to be whiter than white' अशी संभावना करायची. स्वतः जे बदल स्वीकारले नाहीत त्याबद्दल I am honoring my diversity म्हणायचं.
तर हे सगळं माझं निरिक्षण. तुम्हाला काय वाटतं? रेस्टॉरंट मधे गेल्यावर तुम्ही काटे चमचे कधी वापरता अन हाताने कधी जेवता? Those typical xxxx सारखं पूर्ण हात माखून दहीभात, आमटी भात कालवून जेवता? आमटी, रसम वगैरेंचे भुरके मारता का? भारतीय जेवण तरी सुरी काट्याने जेवलं तर फक्त पोट भरलं, मन अतृप्त अशी तुमची अवस्था होते का? कोणाकडे कटाची आमटी किंवा कढी फक्कड जमली असेल तर वाटीच तोंडाला लावून भुरकता का?

प्रकार: 

शोनू, चांगला आहे हा विषय, खरे तर 'माझा अनुभव' ह्या बा. फ. वर लिहायला हवे होते.

बरे असो.. तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हंटले म्हणजे, वाढत्या अनुभवानुसार आणि वयानुसार माणसाला एक परिपक्वता येते. मग जग काय म्हणले, आपण अनुकरण केलेच पाहिजे का? हे असे प्रश्न फारसे छळत नाहीत. ज्यांना खरेखुरे आणि स्वत:साठी जीवन जगायचे असते त्यांना तर असल्या रितभातींचा अजिबात बाऊ नसतो. मला तर माझा भारतीयपणा टिकवताना आणि तो चार परेदेशी किंवा देशी लोकांसमोर व्यक्त करताना अत्यंत आनंद होतो. आणि असे आनंदाचे क्षण मी कधीच गमवत नाही. माझ्या मनाला एखादी देशी गोष्ट, रिती रिवाज जर असंस्कृत वाटतं असेल तर मी ती गोष्ट करूच शकत नाही. इथे येऊन एक खूप चांगल्या प्रकारे कळेल की आपल्या मनात जे काही किंतू परंतू असतात तितके किंतू परंतू हे इतर देशातील लोकांमधे नसतात. कधीकधी इतर देशातील लोकांचा गावंढळपणा इतका खूपतो पण त्यांना त्याचे काहीच वाटतं नाही. जसे की स्लीपर घालून, मळके कपडे घालून जर्मन लोक इथे फिरायला येतात. ऑफीसमधे चहा, जेवन गोष्टी उरकायला युरपवाले एक एक दोन दोन तास लावतात. तोडके मोडके इंग्रजी वापरून बरेच जन म्यानेजरच्या खुर्चीवर बसतात. जीवनसत्वाच्या गोळ्यांवर खूप जन जगतात.

भारतीय जेवन जे हातानीच चांगले खाता येते असा एक फिरंगी मला म्हणाला. इथे लिटल इंडिया मधे जेवायला जाणारे अभारतीय, हे तिथे गेलेत बहुदा हातानीच खातात. मी तरी अजून हातानी खाण्यावर कुणाच विदेशी माणसाकडून टिका ऐकलेली नाही. तु ऐकलीस का?

होय बरोबर आहे, जेवण हातानेच करावे.

आमच्या सर्जरीच्या सरानी सान्गितले होते.... भारतीय लोक लहान पणापासून हातानेच जेवतात. त्यामुळे बोटान्च्या हालचालीमध्ये एक प्रकारची सफाइ येते. त्यामुळे भारतीय सर्जन्न्सचे स्कील इतर देशातील सर्जन्सच्या तुलनेने चान्गले असते. मेटकार्पोफॅलिन्जीयल जॉइन्ट आणि इन्टर फॅलिन्जीयल जॉइन्ट यान्च्या हाल्चालीन्चे सर्व परम्युटेशन कॉम्बिनेशन भारतीय पद्धतीने जेवताना होतात.... दिनक्र्मातील /खेळातील इतर कोणत्याही वेळेला असे घडत नाही...

मी सर्जन नाही झालो , पण तरीही हातानेच जेवावे असा माझाही आग्रह आहे.

एक स्पेशल अनुभव..... चान्दीच्या वाटीत श्रीखन्ड घ्यावे... त्यात बोट बुड्वून घट्ट श्रीखन्ड घ्यावे... आणि तोण्डात बोट घेऊन ते चाटून खावे... कशाला हवा चमचा?....
पण भुरकणे/ हात माखून खाणे हे मात्र मला पटत नाही.... अन्न फक्त बोटाना लागावे.. तळहाताला नको असे मला वाटते..

बरोबर निरीक्षण आहे शोनू Happy भारतीय रेस्टॉरंट मधे (यालाही येथे आल्यावर हळुहळू हॉटेल म्हणणे कमी होते) काटा, चमचा कशाला लागतो मलाही कळत नाही, ते ही एकवेळ चालेल पण सुरी? फक्त एकच कारण समजण्यासारखे आहे - आपल्या त्या रंग वगैरे घातलेल्या भाज्यांपासून ते गुलाबजाम चे पाक वगैरे लागलेले हात त्या ढाक्याच्य मलमलीसारख्या एका काडेपेटीत बसेल अशा तलम टिशू पेपर ला कसे पुसले जाणार Happy भारतात 'हॉटेल' मधे बाहेर बेसिन असते तसे येथे नसते.
अजून एक प्रश्न तुम्हाला कधी आला का - आपण समोर ऐकणारा कोण आहे याप्रमाणे साधारण २-३ प्रकारचे इंग्रजी येथे बोलतो. म्हणजे समजा तुम्ही पोस्ट ऑफिस मधे गेला आहात आणि एखादे पत्र, पेमेंट वगैरे पाठवून ते पोहोचल्याची पावती मिळते वगैरे यात काय पर्याय आहेत ते विचारायचे आहे. तर समोर काउंटरवर एखादा भारतीय आहे, का फक्त अमेरिकन इंग्रजी समजणारा/री कोणी आहे, का चीनी, व्हिएतनामी किंवा लॅटिनो वगैरे फक्त कीवर्ड्स समजणारा कोणी आहे याप्रमाणे आपण आपले वाक्य नकळत बदलतो.

मी याबाबतीत ऐकलेला किस्सा - एक नवीन आलेला भारतीय ग्रोसरी दुकानात गेला आणि तेथील काउंटरवाली ला "I want currency in the denomination of 25 cents..." वगैरे सांगायला लागला. नशीब तिला काहीतरी कळले आणि तिनेच "you want quarters?" विचारले Happy

प्रत्येकजण स्वतःला सुवर्णमध्य मानतो हे अगदी अगदी पटले. बहुतेक भारतीय पदार्थ मी शक्यतो हातानेच खातो कारण पदार्थ आणि तो खाण्याची पद्धत हे अविभाज्य आहेत असं मला वाटतं. पदार्थ त्याच्याबरोबरच त्याला खायची पद्धत घेऊन येत असतो. पास्ता काट्याने आणि पोळीभाजी हाताने. तसंही मला पोळीभाजी काटाचमच्याने खाणे जमत नाही Happy म्हणजे भेळवाला पूर्वी जाड कागदाचा चौकोन द्यायचा चमचा म्हणून... त्या चमच्यासारखं डाव्या हातात रोटी वगैरेचा तुकडा धरायचा अन् त्यावर उजव्या हाताने काटा किंवा चमच्याने भाजी ठेवायची हा प्रकार मी पाहिला आहे, पण ते जमले नाही. तंदूरी सारख्या गोष्टीसुद्धा मला काटासुरीने खाता येत नाहीत. पण एक निरीक्षण असं की दुसरा हाताने पोळीभाजी खाताना बघणे हे बहुतेकांना ओके वाटते, पण भाताचं मात्र तसं नाही. बर्‍याच भारतीयांनाच, विशेषतः उ. भारतीय, हाताने कालवून भात खाणे किळसवाणे वाटते, म्हणजे ते गुल्ट्यांसारखे जाऊ दे, ते भयाणच असते, पण नुसती बोटे वापरून कालवणेसुद्धा.... हे कळल्यापासून (थोडा धक्का बसला होता तेव्हा) जर बरोबर खूप परिचयाचे लोक नसतील तेव्हा मात्र मी चमच्याने आमटीभात वगैरे खातो. त्यांना काय वाटायचं ते वाटू दे हा विचार करवत नाही, कारण शेवटी त्यांच्या अन्नवासनेचा प्रश्न आहे. तीच गोष्ट भुरके मारून जेवण्याची. कधी कधी गोष्ट अशी फक्कड जमलेली असते की एक-दोन भुरके तरी मारण्याची अनावर अनावर इच्छा होते (काही वेळा मारलेही जातात आपसूकच), पण इतरांची अन्नावरची वासना का उडवा हा विचार जास्त प्रभावी ठरतो. इथे मी त्यांना judge करत बसत नाही. आता किळस येते तर येते.... अन्नाचा प्रश्न असल्याने शक्यतो आपण ती आणू नये एवढा प्रयत्न करतो. अशा वेळी ते यज्ञकर्म न होता थोऽऽऽडंसं उदरभरण होतं खरं (श्रीखंड चमच्याने हे उदरभरणच :)), पण इलाज नाही.
गंमत ही की पाश्चात्य लोक भारतीय पदार्थ खाताना काटासुरी वापरतात त्यामागे बहुतेक वेळा पाश्चात्यांना हाताने खाणे अवघड जाते हे कारण असते. लाज, किळस हा भाग जरा कमी असतो असा निदान माझा तरी अनुभव आहे. त्यांच्याबरोबर बाहेर जेवायला गेलो तर मी आधी विचारतो की मी हाताने जेवलो तर त्यांना काही प्रश्न नाही ना ? तेव्हा 'जसं चायनीज पदार्थ काठ्यांनी खातात, तसं भारतीय पदार्थ हाताने खातात' ही समांतरता त्यांना(सुद्धा) कळते असा माझा अनुभव आहे. अन् हळूहळू सवय झाली की तेसुद्धा भारतीय पदार्थ हाताने खातात. इथे बीचं म्हणणं मला पटतं. बर्‍याच वेळा, आपल्याइतके किंतु, परंतु परदेशी लोकांमध्ये नसतात.
तेव्हा हाताने खायला लाज, भीती वाटणे आणि हाताने खाणे हा अस्मितेचा प्रश्न करणे या दोहोंचा माझा सुवर्णमध्य हा असा आहे Happy
ब्रेंडन फ्रेजरच्या Blast from the Past नावाच्या एका चित्रपटातले काही संवाद उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही -
Troy : He (पक्षी ऍडम, फ्रेजरची व्यक्तीरेखा) said, good manners are just a way of showing other people we have respect for them. See, I didn't know that, I thought it was just a way of acting all superior. Oh and you know what else he told me?
Eve : What?
Troy : He thinks I'm a gentleman and you're a lady.
Eve : [disgusted] Well, consider the source! I don't even know what a lady is.
Troy : I know, I mean I thought a "gentleman" was somebody that owned horses. But it turns out, his short and simple definition of a lady or a gentleman is, someone who always tries to make sure the people around him or her are as comfortable as possible.

  • *** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***

बर्‍याच वेळा, आपल्याइतके किंतु, परंतु परदेशी लोकांमध्ये नसतात.>>
कित्येक परदेशी लोक तर टिश्यू पेपर घेउन मिटिंग मध्येच नाक साफ करताना पाहिलेत.

अग्निपंख,

बोटाला थुंबी लावून पाने उलटणारी मला इथे अनेक जण दिसलीत अमेरिकेत. दिसलेली ही मंडळी जुन्या पिढीतील होती.