गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 30 October, 2010 - 04:00

वातानुकुलीत कॉन्फरन्स हॉलमध्ये आज स्ट्रॅटेजी ग्रूप मीटिंग होती. एस्.जी.एम.! यात जनरल मॅनेजर अ‍ॅन्ड अबोव्ह लेव्हलचे सर्व डिपार्टमेंटचे लोक, अगदी मेंटेनन्स, एच आर आणि पर्सनल डिपार्टमेंटचेही लोक असायचे.

प्रामुख्याने यात महिन्याभराचा आढावा घेतला जायचा! सर्व जण अर्देशीर आणि लोहियांना रिपोर्ट करायचे.

आज पहिल्यांदाच या मीटिंगला मोनालिसा असल्यामुळे सर्व लोकांच्या मनात उत्सुकता होती. बिंद्रा, जोशी, भसीन आंणि मेहरा सोडले तर तिला कुणी भेटलेलेही नव्हते. अर्देशीर, लोहिया, जतीन आणि सुबोध हे हाय कमांडपैकी होते. खालील पातळ्यांवरची माणसे मोनाला अजून फारशी भेटलेली नव्हती.

मोनालिसाला अर्देशीर सरांच्या डावीकडची खुर्ची मिळाली. उजवीकडे लोहिया! समोर लांबलचक टेबलच्या दोन्ही बाजूला सर्व सिनियर केडरची माणसे आपापला रिपोर्ट घेऊन बसलेली होती. चहा, कॉफी सर्व्ह झालेले होते. माफक प्रमाणात हास्य विनोद चाललेले होते. मोनालिसा कशातच भाग घेत नव्हती. ती फक्त कॉफी घेत समोर आलेल्या कागदांवरून नजर फिरवत होती. पाच एक मिनिटांनी नेहमीप्रमाणे जतीन खन्नाने सुत्रे घेतली.

जतीन - गुड मॉर्निन्ग एव्हरीवन... ऑल हॅव कम नाऊ.. सो... आय सजेस्ट वुई कॅन स्टार्ट... सर??

अर्देशीर - यॅह शुअर.. थॅन्क्स.. हाय ऑल.. दर वेळेप्रमाणे क्रमाने एकेक फॅक्टर डिस्कस करायचा आहे.. लेट्स स्टार्ट विथ सेल्स... जोशी... यू स्टार्ट प्लीज..

जोशी - येस सर.. या महिन्याचे टारगेट होते १८ कोटी! इतके मोठे मासिक टारगेट पहिल्यांदाच घेतले होते आपण! कारण यात वेस्टर्न कोलफिल्ड्सच्या गिअरबॉक्सेस गृह्त धरलेल्या होत्या. त्यांचीच व्हॅल्यू ८.५ कोटी होती. एकंदर बेचाळीस गिअरबॉक्सेस होत्या. आणि ही यावर्षीची सर्वात प्रेस्टिजियस ऑर्डर होती. खूप मोठ्या गिअरबॉक्सेस होत्या या! या एकाच महिन्यात त्या सर्व डिसपॅच होणार होत्या. याव्यतिरिक्त जे काही सेल्स अपेक्षित होते त्यात बोकारो स्टील, एन्.टी.पी.सी., सिम्प्लेक्स, फरिदाबाद इन्फ्रास्ट्रक्चर्स वगैरेंच्या गिअरबॉक्सेस होत्या.

आत्तापर्यंत, म्हणजे २८ तारखेपर्यंत, आपण बाकीचा सर्व सेल कंप्लीट केलेला आहे. वुई हॅव डन ९.७१ क्रोर्स सो फार.. विच इज ऑल्सो अ बिट मोर दॅन अवर नॉर्मल मंथली सेल्स व्हॅल्यू... मात्र.. डब्ल्यू. सी. एल. ची ऑर्डर कॉंन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली आहे.

या ऑर्डरच्या बाबतीत प्रॉब्लेम असा झालेला आहे की सुमीतवाल्यांनी मटेरिअल सप्लाय थांबवला होता. आणि ते मटेरिअल एप्रिलमध्ये यायच्या ऐवजी जुलैमध्ये आलं! अर्थात, या ऑर्डरचा सर्व वृत्तान्त आपल्या सर्वांना माहीत आहेच. मात्र एक मेजर सेट बॅक म्हणून मी फॉर्मली तो इथे हायलाईट केला.

या व्यतिरिक्त आपले सर्व सेल्स अ‍ॅज पर प्लॅन पूर्ण झालेले आहेत. पुढच्या महिन्यात आपल्या हातात ७.७४ कोटीच्या ऑर्डर्स आहेत. त्यांचे प्रॉडक्शन प्लॅनिंगप्रमाणे व्यवस्थित चाललेले आहे असे शामच्या रिपोर्टवरून समजले आहे.

कलेक्शनच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी आहेत. ६९ लाखाचे पेमेंट एन्.सी.एल कडे थकलेले आहे कारण दोन गिअरबॉक्सेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता. रैनाची टीम तिकडे गेलेली आहे. ३४ लाखाचे पेमेंट मद्रास फर्टिलायझरने दिले नाही. त्यांच्या हायर लेव्हलशी बोलायला लागेल असे दिसत आहे.

मार्केटच्या बाबतीत - रॅडिकॉनने सिम्प्लेक्समधला आपला सुरळीत चाललेला बिझिनेस प्राईस कमी करून ओढून घेतला. आपण शर्मांशी बोललो आहोत. इन फॅक्ट ते काही कारणाने उद्या पुण्यात येणार आहेत. माझी अशी रिक्वेस्ट आहे की लोहिया सरांनी वेळ काढून शर्मांना काही वेळ भेटावे, ज्याचा आपल्याला खूप फायदा होईल!

थॅन्क यू सर्स!

अर्देशीर - एक मिनिट.. वेस्टर्न कोलफिल्ड्सचा इश्यू सगळ्यांना ज्ञात असला तरीही मला त्यावर काही बोलायचे आहे.

सगळ्यांनी कान टवकराले.

अर्देशीर - बेसिकली.. ही एक ऑर्डर या वर्षीची आत्तापर्यंतची सर्वात रेप्युटेड ऑर्डर होती. ती हातात्न निसटल्याबद्दल योग्य त्या माणसांना मी बोलायचे ते बोललेलो आहेच आधी! मात्र यापुढे लक्षात ठेवा! असली हलगर्जी चालणार नाही. आणि मुख्य म्हणजे... जोशी? यू डिडन्ट से व्हेदर यू मेट देअर जी. एम.

जोशी - नाही सर... अजून.. अपॉईंटमेंट मिळाली नाही...

अर्देशीर - व्हॉट द हेल जोशी.. दोन दिवस झाले आपण बोलून.. यूआर वेटिंग फॉर अपॉईंटमेंट.. आय थिन्क घ्यायला पाहिजे तितके सिरियसली हे मॅटर घेतलेच जात नाही आहे लोहिया.. सी धिस नाऊ.. धिस फेलो हॅज नॉट इव्हन टेकन अपॉईंटमेंट...

जोशी - सर.. त्यांचे जी. एम. वैझागला गेले आहेत... ते सोमवारी येणार आहेत... त्यामुळेच भेट थोडी पुढे गेली...

अर्देशीर - धिस इस टेरिबल.. व्हू इज देअर चेअरमन??

जोशी - एस्.एन्.प्रसाद...

अर्देशीर - गेट हिम ऑन लाईन.. नाऊ... आय विल मायसेल्फ टॉक टू हिम...

जोशी - स्सर...

कॉन्फरन्समध्येच फोन लावला गेला प्रसादांना!

अर्देशीर - अं.. मिस्टर.. एस एन प्रसाद??

प्रसाद - येस...

अर्देशीर - सर धिस इज अर्देशीर इंजीनीयर... फ्रॉम गुप्ता हेलिक्स...

प्रसाद - हं... टेल मी...

अर्देशीर - मॉर्निन्ग सर... हाऊ आर यू??

प्रसाद - व्हेरी वेल... थॅन्क्स...

अर्देशीर - ..राइट.. सर... आय वॉन्टेड टू टेल अबाऊट दोज ... यू नो?? द गिअरबॉक्स ऑर्डर्स दॅट गॉट कॅन्सल्ड...

प्रसाद - या.. आय अ‍ॅम अवेअर.. सी... दॅट मच डिले कान्ट बी अ‍ॅक्सेप्टेबल...

अर्देशीर - अ‍ॅबसोल्युटली सर... इट इज अ व्हेरी बिग नॉन कॉम्प्लायन्स.. आय हॅव टेकन अ सिरियस नोट ऑफ दॅट अ‍ॅन्ड हॅव आस्क्ड फॉर द एक्स्प्लनेशन फ्रॉम अवर पीपल टू...

प्रसाद - ओके... बट... इट डझन्ट हेल्प अस मि. अर्देशीर...

अर्देशीर - नो इट डझन्ट... आय नो... अं.. अ‍ॅक्च्युअली ... आय हॅव अ .. प्रपोझल..

प्रसाद - ... यॅह..??

अर्देशीर - सी... वुई कॅन सप्लाय दिज गिअरबॉक्सेस इन धिस मन्थ.. अ‍ॅन्ड.. आय शॅल रिड्युस द प्राईस बाय फाईव्ह परसेंट...

प्रसाद - नो नो.. वुई हॅव ऑलरेडी प्लेस्ड द ऑर्डर एल्सव्हेअर...

अर्देशीर - ओह इज इट?? ओह.. फाईन.. सो.. वुई विल वेट फॉर द नेक्स्ट अपॉर्च्युनिटी टू बी ऑफ सर्व्हिस टू यू??

प्रसाद - राईट... बाय द वे....

अर्देशीर - .... ... येस?? ... येस सर???

प्रसाद - बाय द वे... इट वॉज नाईस टॉकिन्ग टू यू... डू मीट मी इन केस यू हॅपन टू कम टू नागपूर..

अर्देशीर - शुअर शुअर... शुअर सर... इन फॅक्ट.. इन फॅक्ट आय हॅड प्लॅन्ड अ ट्रिप ऑन मन्डे...

प्रसाद - धिस.. कमिंग मन्डे???

अर्देशीर - या.. इन फॅक्ट माय ब्रदर स्टेज देअर... सो... आय अ‍ॅम एनीवे कमिंग...

प्रसाद - ओह.. देन डू कम?? मन्डे थ्री ओ क्लॉक???

अर्देशीर - शूड बी फाईन.. आय वॉज सजेस्टिंग वुई मीट ऑन डिनर अ‍ॅट सेन्टर पॉईंट??

प्रसाद - ... अं... मन्डे ना?? ... ओके.. फाईन... सेव्हन थर्टी??

अर्देशीर - राईट... सेव्हन थर्टी... सेन्टर पॉईंट.. मन्डे...

प्रसाद - फाईन... बाय बाय...

अर्देशीर - बाय मिस्टर प्रसाद...

अर्देशीर सरांनी फोन ठेवला तेव्हा लोहिया, मेहरा, जतीन आणि सुबोध सोडून सगळे चक्रावून बघतच होते त्यांच्याकडे! हा माणुस चेअरमनशी अगदी दोस्तीतले बोलला कसा? एकदम डिनर?

त्यातच मेहरांकडे वळून अर्देशीर म्हणाले..

अर्देशीर - मेहरा...

मेहरा - .. सर...

अर्देशीर - गिअर अप फॉर द एन्टायर ऑर्डर एक्झिक्युशन इन द कमिन्ग मंथ... दे विल प्लेस द ऑर्डर...

मेहरांनी मंद हासून मान डोलावली.

एस. एन. प्रसाद भ्रष्ट होता हे अर्देशीर सरांनी 'डू मीट मी इफ यू हॅपन टू कम धिस साईड' या त्यांच्या वाक्यातूनच ओळखलेले होते.

एक जिवंतपणाची सळसळ आली आता मीटिंगमध्ये! अर्देशीर हा एक मोठाच मानसिक आधार होता गुप्ता हेलिक्सचा!

अर्देशीर - राईट.. पुढे... बिंद्रा.. तुमचे सांगा??

बिंद्रा - येस सर... या महिन्यात प्रॉडक्ट डेव्हलपमेन्ट अशी नव्हतीच.. त्यामुळे रेग्युलर गिअरबॉक्सेसचीच ड्रॉईंग्ज प्रोव्हाईड करत होतो आपण.. मात्र... महिन्द्राची नवीन जीप येती आहे असे समजले... तिच्यात सहा गिअर्स लागणार आहेत आणि ते शेव्हन आहेत... त्या जीपचे प्रॉडक्शन महिन्याला तीन हजार इतके आहे आणि वाढत राहण्याची शक्यता आहे.. त्यामुळे.. आणि मॅडमच्या सजेशनवरून... मी थोडे काम केले त्या मशीनबाबत... ती मशीन्स आपण कमिशन करू शकतो लोकलीच.. आणि देन.. प्रॉबेबली... वुई कॅन ट्राय फॉर ऑर्डर्स सो अ‍ॅज टू युटिलाईझ द मशीन्स..

अर्देशीर - अरे ती विकायच्यत मशीन्स आपल्याला.. मोना?? दॅट गाय इज कमिंग टूडे..

मोना - ओह.. ओके..

मोनाने पटकन मेहरांकडे बघितले हे फक्त गोरेला समजले. गोरे, शर्वरी कुंभार आणि जतीनचा पी.ए. असे तीन पी.ए. ही मीटिंगमध्ये होते.

मोना - .. अंकल.. बट व्हाय डोन्ट वुई इव्हॅल्युएट द प्रपोजल ऑफ उझिन्ग दोज मशीन्स व्हिस अ व्हिस सेलिन्ग देम..

अर्देशीर - शुअर... हू विल डू इट?? जोशी?? यू कॅन डू इट??

जोशी - येस सर...

अर्देशीर - ओके.. नेक्स्ट...

लोहिया - एक मिनिट...

पहिल्यांदाच लोहियांनी तोंड उघडले.

डेसिग्नेशनप्रमाणे आत्ता सर्वात सिनियर मोना होती, नंतर लोहिया आणि मग अर्देशीर! पण अनुभवाने हाच क्रम नेमका उलटा होता. आणि अधिकारांच्या दृष्टीने तर वेगळाच होता. लोहिया, मोना आणि अर्देशीर असा! कारण अर्देशीर सरांकडे हल्ली वयामुळे इक्झिक्युटिव्ह पॉवर्स तशा कमीच होत्या. एक्सेप्ट चेक सायनिंग, जी एक खूप मोठी पॉवर होती. पण त्यांच्या शब्दाला लोहियांइतकाच मान होता.

लोहिया - मला वाटते... सम मोर डिस्कशन इज नेसेसरी ऑन वेस्टर्न कोलफिल्ड्स... मेहरा.. व्हॉट अबाऊट सुमीत??

मेहरा - ... सुमीत??.. आय मीन...

लोहिया - त्यांनी मटेरिअल का डिले केले.. ??

मेहरा - रिकन्सिलिएशनचा इश्यू होता.. चोवीस लाख द्यायचे राहिले होते...

लोहिया - का??

मेहरा - आपण एक आर टी जी एस केलेलेच नव्हते...

लोहिया - का पण?? आय मीन.. हे.. यू विल ओन्ली सी धिस ना??

मेहरा - होय.. पण.. या ऑर्डरचे सर्व पैसे दिलेले होते...

लोहिया - मेहरा.. तो प्रश्न आहे का? प्रश्न आहे की सुमीतने माल थांबवला.. व्हॉट आर वुई डूईंग अबाऊट इट??

मेहरा - आय अ‍ॅम डेव्हलपिन्ग वन मोर सप्लायर..

लोहिया - वन मोर सप्लायर इज ऑलरेडी देअर.. आकांक्षा स्टील..

मेहरा - होय... आहे...

लोहिया - मग?? आपण अर्धी ऑर्डर त्यांना का नाही दिली??

मेहरा - ... ते...अ‍ॅक्च्युअली.. त्यांच्याकडे आधीच लोड खूप होतं.. त्यामुळे...

लोहिया - मेहरा.. आय अ‍ॅम सॉरी.. पण.. हे काय उत्तर आहे का? आकांक्षाकडे किती लोड आहे हा आपला प्रश्नच नाही आहे.. वुई आर पेयिंग देम.. आयदर दे से येस ऑर नो... पण आपण विचारलंच नाही??

मेहरा - विचारलं त्यांना आपण....

लोहिया - मग??

मेहरा - ....

लोहिया - नाही म्हणाले ते??

मेहरा - अं.. नाही नाही.. ते तयार होते...

लोहिया - अर्देशीर.. धिस इज व्हॉट आय वॉज टॉकिन्ग टू यू...

अर्देशीर - मेहरा.. मी तुझ्याशी हे त्या दिवशी डिस्कस केले होते... बट.. हे पुन्हा डिस्कस व्हायलाच हवे.. वुई हॅव लॉस्ट अ बिग ऑर्डर बिकॉज ऑफ धिस...

मेहरा - .. स... सॉरी सर...

अर्देशीर - नो नो... व्हॉट डू यू मीन बाय सॉरी??

मेहरांनी मान खाली घातली. अर्देशीर अजूनही काहीतरी बोलत होते. सगळ्यांसमोर.. आणि मेहरा ऐकून घेत होते. घ्यावच लागणार होतं!

पण.. अचानक चिडलेल्या लोहियांनी वाक्य टाकलं...

लोहिया.. नो नो.. आय मीन.. आय मस्ट हॅव अ रिटन एक्स्प्लनेशन ऑन धिस मेहरा...

खाडकन मान वर झाली मेहरांची! हा विषय गेल्या दोन महिन्यांपासून भयंकर हॉट विषय झालेला होता. त्यावरून प्रचंड झापाझापी झालेली होती. एक दोघांची नोकरी जाणार असा लोकांनी केव्हाच अंदाज केलेला होता. गेल्या महिन्यात एस. जी. मीटिंगच्या वेळेस नेमके लोहिया परदेशात होते. त्यामुळे ते आज समोरासमोर व अशा व्यासपीठावर मेहराना प्रथमच झापत होते. आत्तापर्यंतचे झापणे फोनवर झालेले होते.

इतक्या वेळा या विषयावर बोलणी खाऊनही पुन्हा पुन्हा तोच विषय निघतो यामुळे मेहरा भयंकर वैतागलेले होते. पाच मिनिटांपुर्वी त्यांना वाटले की शेव्हिन्ग मशीन्सचा विषय निघाला म्हणजे आता डब्ल्यू. सी. एल. चा विषय संपला! पण लोहियांनी पुन्हा तो उकरून काढला. इतकेच नाही तर मेहरा बेइज्जत होतील असे विधान केले. लेखी स्पष्टीकरण!

या पातळीवरच्या माणसाला सगळ्यांदेखत असे म्हणणे खूपच गंभीर बाब होती. सगळेच चरकलेले होते. खरे तर लोहिया शांत माणूस म्हणून प्रसिद्ध होते. काही खूप जुन्या लोकांना माहीत होते. मोहन गुप्ताही शांतच होते म्हणून! पण जर चिडले तर गुप्तांसरखा वाइट माणूस नाही हे त्या जुन्या लोकांचे आवडते मत होते. पण सुरुवातीपासून लोहिया शांतच समजले जायचे. अर्देशीर काही वेळा भडकलेले पाहिलेले होते लोकांनी! पण लोहियांचे हे रूप आजच दिसले बहुतेकांना!

जबरदस्त अपमान झाला होता मेहरांचा! समोर बसलेल्या जोशी, भसीन, बिंद्रा आणि इतरांपेक्षा आणि पी.एं पेक्षा मेहरा कितीतरी सीनियर होते. त्यांचे कर्तृत्व वादातीत होते. मार्केटमधील त्यांची व्हॅल्यू जबरदस्त होती. वयानेही ते सीनियरच होते. अशा माणसाला लोहियांनी सगळ्यांसमोर लेखी स्पष्टीकरण मागणे हे डब्ल्यू. सी. एल. च्या ऑर्डरच्या अनुषंगाने तसे समर्थनीय असले तरी मेहरांचे आजवरचे पर्फॉर्मन्सेस बघता हे जरा जास्तच होते.

लोहिया - आय मीन.. यू मस्ट टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ धिस मेहरा...

मेहरा - आय मीन.. आय हॅव्ह गिव्हन द रिझनिंग ऑफ द एन्टायर मॅटर...

लोहिया - आय डोन्ट नो दॅट रिझनिन्ग... या सगळ्याचे कारण फक्त एकच आहे.. हलगर्जीपणा..

आणखीन एक वार केला लोहियांनी!

मेहरा - हलगर्जीपणा माझा नाही आहे.. फायनान्सचा आणि सेल्सचा आहे..

जोशी - सेल्सचा कसा काय??

तेवढ्यात फायनान्सचे व्ही.पी. राव तिडीक येऊन बोलले.

राव - फायनान्सचा संबंधच नाही... रिकन्सिलिएशन काय फायनान्स करणार का??

मेहरा - एक मिनीट.. मी सेल्सला स्पष्ट मेमो दिलेला होता... हे मटेरिअल डिले होत आहे.. एप्रिलमध्येच... धिस ऑर्डर शूड हॅव बीन पोस्टपोन्ड...

लोहिया - मेहरा काहीतरी बोलताय तुम्ही... एक इमेल दिली की प्रश्न संपला का?? हाऊ ब्युरोक्रॅटिक वुई आर...

मेहरा - एक इमेल नाही... सेव्हरल रिमाइन्डर्स.. जोशी.. व्हाय डोन्ट यू अ‍ॅक्सेप्ट...

लोहिया - ते सगळे मला माहीत आहे.. तुम्ही यांना ढीगभर मेल्स दिल्यात.. यांनी आणखीन ढिगभर उत्तरे दिली... मला अन अर्देशीर सरांना कॉपीज होत्या.. आमच्याशी बोललात.. आम्ही तुमच्याशी बोललो.. बट.. या सगळ्यानंतर.. शेवटी मटेरिअल वेळेवर आणण्याची जबाबदारी तुमचीच आहे ना??

मेहरा - आय अ‍ॅम नॉट डिनायिंग दॅट.. मी एवढेच म्हणतो आहे की झाले ते झाले.. इट वॉज अ मिसटेक.. बट दॅट मिसटेक वॉज नॉट अ सरप्राईझ.. इट वॉज नोन.. माझे तर असे म्हणणे आहे... चोवीस लाखांसाठी आपण साडे नऊ कोटीची ऑर्डर घालवण्यापेक्षा ते चोवीस लाख सुमीतला द्यायला हवे होते... आणि रिको नंतर करून मग सेटल करता आले असते.. मी रावांना किती वेळा सांगीतले तसे.. तुम्हालाही रिक्वेस्ट केली.. वुई शूड हॅव रिलीज्ड दॅट पेमेंट अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅडव्हान्स विच इज टू बी अ‍ॅडज्स्टेड अगेन्स्ट द आऊटस्टॅन्डिन्ग्ज अ‍ॅज पर रिको रिझल्ट्स...

लोहिया - अगेन यू आर सेयिन्ग द सेम थिन्ग... रिझन्स रिझन्स अ‍ॅन्ड रिझन्स... व्हेअर आर द रिझल्ट्स?? का दिले नाहीत पेमेंट सुमीतला मग?? हू हॅड स्टॉप्ड यू??

मेहरा - यू..

कॉन्फरन्सरूमसुद्धा दचकली. गुप्ता हेलिक्समध्ये लोहियांना असे बोलणारा माणूस आजवर जन्मालाच आलेला नव्हता. स्वतः लोहियाही 'यू' हा शब्द पचवत दोन क्षण बघतच बसले मेहरांकडे! अर्देशीर किंचित डोळे विस्फारून बघत होते.

लोहिया - व्हॉट डू यू मीन??

मेहरा - आय हॅड कम टू यू थ्राईस.. तीन वेळा तुम्हाला भेटलो मी या विषयावर.. प्रत्येकवेळी तुम्ही हेच म्हणालात... रिको कंप्लीट करा आणि मगच पेमेंट करा... रिकोही सुरू केले.. त्याचा रिझल्ट मिळाला मे मध्ये... वुई रिअली हॅड टू पे देम दॅट अमाऊन्ट.. इतके होऊनही आपण पेमेंट जूनमध्ये केले.. का? इफ आय मे आस्क.. रिकोसाठीच जर थांबायचे होते.. तर रिकोवर दोन्ही पार्टीजच्या सह्या झाल्यानंतर पैसे इमिजिएट का नाही दिले आपण?? जूनमध्येच मटेरिअल आले असते...

लोहियांचा चेहरा खरे तर पडलेला होता. कारण मेहरांनी त्यांच्यावर आवाज चढवून सत्य सगळ्यांसमोर सांगून टाकले होते. मेहरा हा माणूस डोळ्यात सलतो म्हणून त्याला त्रस देण्यासाठी लोहियांनी मुद्दाम रिकोचे कारण पुढे केले होते. पण त्याचा भयानक परिणाम असा झाला होता की बघता बघता वेस्टर्न कोलफिल्डचा सप्लाय दोन महिने लांबला आणि राष्ट्रपतींची मुद्रा असलेलं पत्र आलं त्यांच्याकडून...

'द ऑर्डर प्लेस्ड ऑन यूवर ऑर्गनायझेशन स्टॅन्ड्स कॅन्सल्ड'

मेहराला दोन बाजूंनी सॅन्डविच करायचा प्लॅन होता लोहियांचा! एक तर सुमीतचे पैसे द्यायला नकार दिल्यामुळे सुमीत मटेरिअल डिले करत होते त्यावरून शिव्या मेहरालाच बसत होत्या सगळ्यांच्या! आणि दुसरीकडे रिकोला इतका वेळ लागत आहे याच्याही शिव्या बसत होत्या.

पण या सगळ्यात लोहिया याबाबतीत गाफील राहिले होते की वेस्टर्न कोलफिल्ड एकदम असा काहीतरी स्टॅन्ड घेईल.. त्यांना अजूनही ती गोष्ट मॅनेजेबलच वाटत होती. थोडी खिरापत वाटली की पुन्हा व्हॅलिड करतील ऑर्डर हा त्यांचा अंदाज होता.

चक्रावून टाकणारी बाब अशी होती की जोशीने अथक प्रयत्न करूनही ती ऑर्डर पुन्हा व्हॅलिड केली गेली नाही. आणि आता सगळे रॉ मटेरिअल फॅक्टरीत येऊन पडलेले आणि २५ % प्रोसेसिंगही झालेले! आता करायचे काय? आणलेल्या रॉमटेरिअलची व्हॅल्यूच मुळी पावणे दोन कोटी होती. अशाच गिअरबॉक्सेस सिंगारानी कोलियारीजला लागणार आहेत हे माहीत असल्यामुळे अर्देशीर शांत होते. नाहीतर इतके मटेरिअल उरावर असताना ते गप्प बसलेच नसते.

नेमके याच कालावधीत मोहन गुप्ता वारले. त्यामुळे अर्देशीर आणि लोहिया यांना अनेक पातळ्यांवर लढायला लागले. त्या गडबडीत वेस्टर्न कोलफिल्डच्या ऑर्डरबाबतीत दोघेही काहीसे गाफील होते. मानसिक पातळीवर! त्या ऑर्डरबाबत काही निराशाजनक बातमी मिळाली की ते मेहरा आणि जोशीला झापायचे. पण झापणे पुरेसे नव्हते. चोवीस लाख देऊन कसेतरी ते मटेरिअल आणणे महत्वाचे होते. ते मात्र लोहियांनी मेहरांना अडकवण्यासाठी होऊ दिले नाही. आणि आज मेहरांनी सर्वांदेखत लोहियांना हेड ऑन घेतले. पण आता लोहियांच इगो हर्ट झालेला होता. आवाज चढला होता. पब्लिकला जाणवलं! आज भर मीटिंगमध्ये मेहराची धुलाई होणार!

लोहिया - एक मिनिट.. यू हॅव बीन असाइन्ड फॉर दॅट.. आय हॅव मेनी अदर इम्पॉर्टन्ट थिन्ग्ज टू डू.. यू कान्ट बी ब्लेमिन्ग मी ऑर अदर्स.. व्हाय डिडन्ट यू गो टू अर्देशीर देन???

मेहरा - आय रिपोर्ट टू यू... आय वॉज एक्स्प्लेनिन्ग द प्रॉब्लेम्स टू यू...

लोहिया - वन मोर पॅथेटिक रिझनिन्ग... यू जस्ट इग्नोअर्ड इट.... आय अ‍ॅम शुअर...

मेहरा - इग्नोअर्ड?? मी?? मी तासातासाला त्याच्यावर लक्ष वेधत होतो... तसे एव्हिडन्सेस आहेत...

लोहिया - मेहरा.. धिस इज नॉट कोर्ट... यू नीड टू अ‍ॅक्सेप्ट इट वॉज यूअर फॉल्ट...

मेहरा - मी आत्तापर्यंत ते मान्य करत होतो... आता तर मुळीच करणार नाही... इट इज यूअर फॉल्ट...

लोहिया - प्लीज माईन्ड लॅन्ग्वेज मेहरा...

अर्देशीर - एक मिनिट.. एक मिनिट.. मेहरा.. हाऊ कॅन यू टॉक लाईक दॅट??

मेहरा - व्हाय?? व्हाय शूडन्ट आय??

अर्देशीर सरांनाही उलट बोलल्यावर मात्र सगळ्यांचीच खात्री पटली. मेहरा गेला आता!

अर्देशीर - मेहरा.. यू आर क्रॉसिन्ग लिमिट्स..

मेहरा - ओके... आय स्टॉप टॉकिन्ग..

लोहियांचा मात्र इगो त्यांना शांत बसू देत नव्हता.

लोहिया - यू मस्ट स्टॉप टॉकिन्ग... अ‍ॅन्ड राईट द एक्स्प्लनेशन..

मेहरा - आय विल नॉट गिव्ह एनी एक्स्प्लनेशन..

मीटींग सुरू होईपर्यंत जिला पाहण्याचे प्रचंड कुतुहल सगळ्यांच्या मनात होते ती मोनालिसा सध्या पूर्ण गप्प व दुर्लक्षित झालेली होती. मात्र...

... एस. जी.. मीटिंगमध्ये आज पहिल्यांदाच... या नवीन एम्.डी. ने तोंड उघडले..

मोना - जस्ट अ मिनिट...

सगळ्याच्या सगळ्या माना मोनाकडे वळल्या! ही चिमुरडी काय बोलणार हे कुणाला कळत नव्हतं! मात्र तिचा चेहरा अत्यंत शांत होता.

आणि मोनाने नेमका तो भयंकर प्रश्न टाकला... सगळ्यांना उद्देशून...

मोना - मला.. अर्देशीर सर आणि लोहिया अंकल सोडून.. आणि गोरे अन शर्वरी सोडून.. प्रत्येकाने एका वाक्यात मत सांगायचं आहे... डॅड असते तर त्यांनी सुमीतबाबत काय केले असते...

मूर्खपणा! मूर्खपणा करत होती ती! ही काही शाळा नव्हती रांगेने प्रत्येकाला उत्तर द्यायला लावायला! आणि इथे काम करणारे सगळे कित्येक वर्षे काम करत होते. लोहिया आणि अर्देशीर असताना तिने हा विषय काढण्यात काही अर्थच नव्हता. अजिबात आवडले नाही लोहिया आणि अर्देशीर सरांना ते... मात्र ती नवीन आहे, स्त्री आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या वरची आहे हे पाहून दोघेही गप्प बसले..

पण आता खरी अडचण आली लोकांना.. धर्मसंकटच होते ते...

मेलेल्या गुप्तांच्या बाजूने बोलावे तर लोहिया आणि अर्देशीर हे जिवंत असलेले लोक भडकणार आणि यांच्या बाजूने बोलावे तर मोना मॅडम आपल्याला लक्षात ठेवणार...

एक मात्र निश्चीत होते... मोनाने घातलेला खोडा फारच जालीम होता.. गुप्ता असते तर हे झालेच नसते हे सगळ्यांना समजत होते... त्यांच्या नुसत्या शब्दावर सुमीतने मटेरिअल स्वतः आणून ओतले असते हेलिक्समध्ये....

मोना - येस?? जोशी??

जोशी - .. आय ... आय मीन..

मोना - डॅडनी काय केले असते???

जोशी - आय थिन्क.. ते इथे सतत बसत असल्यामुळे त्यांनी कदाचित सुमीतला मॅनेज केले असते...

मोना - इथे बसण्याचा प्रश्न नाही आहे.. त्यांनी काय केले असते असे विचारतीय..

जोशी - .. ते... ते असते तर ...

सगळ्यांच्या माना.... अगदी प्रत्येकाची मान... याक्षणी जोशीकडे वळलेली होती...

जोशी - .. ते असते तर... हे झालेच नसते....

कॉन्फरन्सच्या टेबलवर बॉम्ब फुटल्यासारखे चेहरे झाले होते सगळ्यांचे...

स्पेशली लोहिया आणि अर्देशीर सरांचे...

मोना - अगेन यू अ‍ॅन्सर्ड समथिन्ग एल्स.. त्यांनी काय केले असते म्हणतीय मी....

जोशी - त्यांनी सरळ पेमेंट काढले असते सुमीतचे.. आणि खरे तर...

मोना - ... येस??

जोशी - सर असते तर...

आणखीन एक बॉम्ब फुटणार होता आता... आणि तो काय आहे ते अर्देशीर आणि लोहियांना समजलेलेच होते... सुबोध आणि जतीन दोघांनाही घाम फुटायचा राहिला होता...

जोशी - ते असते तर... असं झालंच नसतं....

फुटला! अर्देशीर आणि लोहियांच्या डोक्यातच फुटला बॉम्ब! आता मध्ये बोलावेच लागणार होते लोहियांना!

लोहिया - व्हॉट डू यू मीन जोशी??

जोशी - सर.. तुम्ही मुंबईला असता... अर्देशीर सरही... हल्ली कमीच येतात... गुप्ता सर ऑपरेशन्स बघत होते होलटाईम... ते असते तर.. कदाचित .. सुमीतचे पेमेंट काढले असते त्यांनी...

सावरले होते खरे जोशीने! पण सगळ्यांच्या मनावर व्हायचा तो इफेक्ट झालेलाच होता. ही बाई अत्यंत थंड डोक्याची आणि हादरवून टाकणारी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेले होते.

मोना - मिस्टर राव.. व्हॉट डू यू फील??

राव - .. वेल... मॅडम.. आय मस्ट से... आय अ‍ॅम सॉरी.... मी.. मेहरांच्या सुमीतचे पेमेंट रिलीज करण्याच्या रिक्वेस्ट्स फारश्या मनावर घेतल्या नाहीत....

मोना - नो नो... व्हॉट डॅड वुड हॅव डन??

राव - ... ही... ही वुड हॅव पेड टू सुमीत...

लोहियांची मान खाली गेलेली होती. सुडाने त्यांच्या डोळ्यातील कण अन कण व्यापलेला आहे हे कुणालाही दिसू नये म्हणून! अर्देशीर उगाचच पेन्सिल टेबलवर वाजवत बसले होते.

मोना - आय अ‍ॅम नॉट इन्टरेस्टेड इन नोइंग व्हॉट माय डॅड वुड हॅव डन इन धिस केस... ते गेलेले आहेत.. त्यांनी काय केले असते याला आता काही अर्थही नाही आहे.. मी हा प्रश्न विचारण्याचे कारण फक्त इतकेच आहे जोशी, राव आणि मेहरा... की... आपण सगळे मिळून ही ऑर्डर सहज वाचवू शकलो असतो... मात्र.. ती हातातून जाऊ नये... वाचावी.. यासाठी आपल्याला आजही डॅड इथे असण्याची गरज भासते असे दिसत आहे..

हा जहरी टोमणा सगळ्यांनाच झोंबला! मोनाने कुणाला काही वाटू नये म्हणून मुद्दाम मेहरांचेही नाव त्यात घेऊन टाकलेले होते.

मोना - या पुढे ऑपरेशन्सचे सगळे फॅक्टर्स मी कंट्रोल करू का अंकल??

अरे? एकदम आपल्याला इतके महत्व? म्हणजे ही पोरगी शहाणपणा करत नाही आहे तर! आपल्याच नियंत्रणात आहे अजून!

लोहियांना फारच आनंद झाला होता.

लोहिया - अ‍ॅबसोल्युटली मोनालिसा... यू युवरसेल्फ लूक इनटू धिस.. आय अ‍ॅग्री विथ यू... मोहन असते तर हे झालेच नसते... मला वाटत होते की मुंबई ऑफीस सोडून इथेच बसावे... पण आता तू.. आय मीन तुम्ही आहात.. तर.. इट इज अ ग्रेट आयडिया... पीपल?? शॅल वुई क्लॅप??

टाळ्यांचा कडकडाट झाला रूममध्ये! दोन तासांनी मीटिंग संपली तेव्हा मोनाला ऑपरेशन्सची जवळपास संपूर्ण माहिती झालेली होती.

संध्याकाळीच सर्क्युलर निघाले.

एन्टायर गुप्ता हेलिक्स पुणे ऑपरेशन्स विल रिपोर्ट टू मिस मोनालिसा गुप्ता...

आणि तेव्हा कुठे अर्देशीर आणि लोहियांना खरा प्रॉब्लेम लक्षात आला.. ती नुसते आपल्याला महत्व देत आहे असे दाखवत आहे की काय??

कारण... सगळी ऑपरेशन्स जर ही बघायला लागली... तर... व्हाय विल गुप्ता हेलिक्स नीड मी अ‍ॅन्ड अर्देशीर???

त्यानंतरच्या पंधरा दिवसात मात्र दोघेही खुष झालेले होते. मोना दिवसातून पाच पाच वेळा फोन करून त्यांच मार्गदर्शन घेत होती. प्रत्येक निर्णय त्या दोघांना विचारल्याशिवाय घेतच नव्हती.

मात्र... सोळाव्या दिवशी लागोपाठ चार धक्के बसले ... पण.. ते काहीच जणांना बसले.. इतरांच्या ते लक्षातही आले नसेल...

गोरे... मोनालिसाचा पी.ए... पुन्हा अर्देशीर सरांचा पी.ए. झाला.. ते ऑफीसमध्ये नसतील तेव्हा त्याने नुसते बसायचे... नो अदर जॉब... आणि मोनालिसाने त्याच्या जागी स्वतःसाठी म्हणून एक चुणचुणीत मुलगी नेमली... डेझी...

शर्वरी कुंभार वॉज शिफ्टेड टू मुंबई... अ‍ॅज पी.ए. टू सुबोध गुप्ता... काय घालायचा तो गोंधळ तिकडेच घाला.. तिच्या जागी मेहरांना शिल्पा नावाची एक पी.ए. नियुक्त करून दिली...

... पराग ... हा ड्रायव्हरही मुंबईला शिफ्ट झाला... तो आता मुंबई ऑफीसची कार चालवत होता... कुणा एकासाठी नाही.. ज्याला कुणाला आणायचं न्यायचं असेल त्याच्यासाठी...

आणि.. चवथा धक्का म्हणजे... सायरा ... शी वीज ट्रान्सफर्ड टू वाकडेवाडी ऑफीस.. जिथे.. टॅक्स सेव्हिन्गसाठी हेलिक्सने काढलेली गुप्ता सोशल इन्स्टिट्यूट होती.. सायरा आता तिथे अ‍ॅडमिन बघणार होती...

या सर्व हालचाली अत्यंत सुसूत्र आहेत हे लोहिया, अर्देशीर. सुबोध, जतीन आणि ट्रान्स्फर झालेल्या सगळ्यांना व्यवस्थित समजलेले होते.

आणि आज सकाळी सकाळीच डेझीने एक कॉल ट्रान्स्फर केला.

"हॅलो.. "

"हाय.. इरफान हिअर..."

".. अं... यॅह?? .. डू वुई नो इच अदर??"

"नो... बट वुई विल.. आय फ्रॉम आय्.सी.. सिंगापोर... इन ईन्डिया करन्टली... मिस्टर गुप्ता वॉज टॉकिन्ग टू मी अबाऊट अ‍ॅन इम्पॉर्टन्ट थिन्ग.. विच प्रॉबेबली.. नो वन एल्स इन युअर कंपनी नोज..."

क्षणार्धात गंभीर झाली मोना!

"सो??"

"सो.. आय वॉन्टेड टू मीट समवन इन युअर कंपनी.. जस्ट केम टू नो यू आर हिज डॉटर अ‍ॅन्ड यू आर द हेड..."

"यॅह.. दॅट्स राईट..."

"सो.. कॅन वुई मीट???"

"व्हेन??.. "

"राईट नाऊ?? विदिन हाफ अ‍ॅन हवर.. ?? अ‍ॅट ब्ल्यू डायमंड??"

"आय... आय कॅन नॉट कम देअर... यू कॅन कम हिअर इफ यू वॉन्ट.."

मोनाला आत्ताच त्या माणसाचा संशय यायला लागला होता. हाही कुणीतरी प्लॉट केलेलाच माणुस दिसतोय, तिच्या मनात आले.

पण इरफान खरच आला.

ग्रे कलरचा सूट, अत्यंत देखणा आणि मनमोकळा.. खूप हसतमुख...

क्षणभर बघतच राहिली मोना.. आकर्षुन... क्षणात विचार झटकले तिने...

"हाय.. इरफान..."

"हाय.. आय अ‍ॅम मोनालिसा.."

"ओह... दॅट वर्ल्ड रिनाउन्ड पिक्चर इज युअर्स??? "

'नो नो' करत कित्येक दिवसांनी मनमोकळे आणि खळखळून हासली मोना.. नंतर लगेचच तिला जाणवले.. आपण बावळटपणा करता कामा नये... हा कुणीतरी सेल्स एक्झिक्युटिव्ह टाईप इसम आपल्याच समोर बसून आपण एम्.डी. असताना आपल्यावरच कॉमेंट करतोय आणि आपण हसतोय कसल्या??

लगेच गंभीर होऊन तिने विचारले..

"या मिस्टर इरफान.. टेल मी??"

"धिस इज माय कार्ड.."

बापरे! आय सी गिअर या गिअर मधल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर दादा समजल्या जाणार्‍या कंपनीच्या एशियन ऑपरेशन्सचा हेड आहे हा! इरफान अब्दुल्लाह.. !

काहीसे प्रेशर घेऊनच मोनाने पुन्ह विचारले..

"नाईस मीटिंग यू.. टेल मी प्लीज..."

"वेल... आय डोन्ट नो... बट... आय फील.. दॅट आय अ‍ॅम इन फ्रन्ट ऑफ द राईट पर्सन टू टॉक ऑन दॅट..."

"धिस इस माय कार्ड... आय थिन्क... इट विल अ‍ॅश्युअर यू... दॅट आय अ‍ॅम द राईट पर्सन..."

"ग्रेट... मिस्टर गुप्तांना ... कोलेबोरेशन करायचे होते..."

"... तुम्हाला... मराठी येते??? "

"लहानपण मुंबईतच गेलंय माझं... "

" कसलं कोलॅबोरेशन???"

"क्राऊन अ‍ॅन्ड पिनियन डिफरन्शिअल गिअर्स... बनवणे आणि विकणे .. भारतात.."

"आय सी बरोबर...???"

"दॅट्स राईट..."

"पण... म्हणजे.. मग काय??"

"अंहं.. ते दुर्दैवाने गेले..पण.. आम्ही इतर पार्टनर शोधायच्या आधी मीच म्हणालो आमच्या लोकांना.. गुप्ता हेलिक्ससारखी कंपनी मिळायची नाही.. आपण पुन्हा त्यांना अ‍ॅप्रोच करू.... "

"हो पण.. मग.. त्यात काय म्हणजे?? डॅड नसले तरीही... लोहिया अंकल आहेत.. अर्देशीर सर आहेत... आय अ‍ॅम शुअर यू मस्ट बी नोईंग बोथ ऑफ देम???"

"आय डू नो देम मोनालिसा... कॅन आय कॉल यू ... मोना??"

चक्रमच आहे. हा काय म्हणून मला मोना म्हणणार? पण तसा स्वभावाने मोकळा दिसतोय!

"यू मे कॉल मी दॅट वे.. बट... आय शॅल अ‍ॅप्रिशिएट इफ यू कॉल मी मोनालिसा ओन्ली..."

"सॉरी... सो.. आय डू नो बोथ ऑफ देम... बट प्रॉबेबली यू डोन्ट नो वन थिन्ग.."

" व्हॉट...??"

"दॅट मिस्टर गुप्ता डिडन्ट वॉन्ट देम टू नो अबाऊट धिस..."

चक्रावलीच मोना! असे कसे? इतका मोठा डिसीजन आणि अर्देशीर सरांना माहीत नसेल?? गोरे.. गोरेने नक्कीच बातमी फोडलेली असणार.. मेल्स वाचलेल्या असणार...

"मिस्टर इरफान... इट इज नॉट पॉसिबल.. बिकॉज डॅड आणि ते दोघे अत्यंत चांगले आणि खूप जुने मित्र होते... "

"ऐकून घ्या.. हे त्या दोघांना अजिबात माहीत नाही आहे.. इन फॅक्ट.. मिस्टर गुप्तांनी इतकी काळजी बाळगलेली होती की ते इमेल्ससुद्धा तुमच्या नावाने करायचे... मोनाबेटि१९८०@रेडिफमेल.कॉम"

उठून उभे राहून तो धक्का पचवावा असे वाटत होते मोनाला..

... म्हणजे... सायराच्या कपाटात मिळालेल्या चिठोर्‍यावरची अक्षरे हा.. पासवर्ड नव्हताच तर... ते युझरनेम होतं??? आणि पासवर्ड?? पासवर्ड काय होता त्या युझरनेमचा??

"कॅन.. आय.. कॅन आय सी दॅट करस्पॉन्डन्स??"

"सॉरी.. आय कान्ट इमेल दॅट टू यू... आय अ‍ॅम हिअर फॉर अनादर थ्री डेज.. वुई विल मीट अगेन... बट.. अ‍ॅन्ड वुई कॅन हॅव फ्रेश डिस्कशन्स... बट ... देअर आर टू थिन्ग्ज दॅट आय वॉन्ट टू टेल यू... "

"... काय???"

"एक म्हणजे... हे कोलॅबोरेशन.. गुप्ता हेलिक्स आणि आय सी एशिया.. दोघांसाठी अत्यंत फायदेशीर असेल... "

"........ "

इरफान उठून दाराकडे निघाला...

"आणि... "

इरफान थांबला आणि मागे वळाला...

अत्यंत गंभीर चेहर्‍याने मोनाने विचारले..

"आणि.. दुसरी गोष्ट???"

"दुसरी गोष्ट ही... की... तुम्ही इतक्या गंभीर झालात तरीही.... छानच दिसता... सॉरी... मी स्वभावाने असाच आहे.... "

खाडकन बाहेर गेलेल्या इरफानच्या मागे बंद झालेलं काचेच दार बघताना मोनालिसा हादरलीच होती...

... आजवर... असं कुणीच म्हणालं नाही आपल्याला..

मनात खूप खूप हसू येत होतं.. प्रचंड रागही येत होता.. असं वाटत होतं की सिक्युरिटीला सांगून त्याला अडवावं आणि जाब विचारावा.. त्याच वेळेस असंही वाटत होतं की जाऊदेत ना.. आपल्या कंपनीच्या भल्यासाठीच आला होता.. माणूस चांगला आहे... आपल्याला मनमोकळेपणाने कॉप्लिमेन्ट दिली एवढंच... नाहीतरी ... कुठे कोण म्हणाले आहे आजवर.. छान दिसतेस हं मोना म्हणून...

आणि त्या दिवशी रात्री.. तिने स्वत:च एक ड्रिन्क तयार केलं स्वतःसाठी.. जॅक डॅनियल्स...

दोन ड्रिन्क्स झाल्यावर हळूच उठून आरशासमोर गेली...

घरात कुणी नव्हतंच... आऊटहाऊस्मध्ये दोन सर्व्हंट फॅमिलीज होत्या त्या सोडल्या तर...

मोनाने डॅडचा एक ब्लेझर वॉर्डरोबमधून काढला आणि अंगावर घातला.. विनोदीच दिसत होती.. ढगळ होत होता ब्लेझर... तिला हसू येत होतं स्वतःचंच ध्यान पाहून .. पण लगेच गंभीर झाली...

हळूच मोना आरशातल्या प्रतिमेला म्हणाली...

"आणि... तुम्ही कितीही गंभीर झालात तरीही... छानच दिसता बर का?? .. सॉरी... मी स्वभावाने असाच आहे..."

आणि मग बराच वेळ ड्रेसिंग टेबलवर बसून खुसखुसत हसत होती...

मधेच म्हणत होती...

"ओह.. दॅट वर्ल्ड रिनाउन्ड पिक्चर इज युवर्स??? "

... त्याचवेळेस तिच्या मनात विचार आला...

... नाही... कोणत्याही पुरुषाच्या बाबतीत असा विचार तोपर्यंत करायचा नाही.. जोपर्यंत आपण जतीनचं ते वाक्य खोटं ठरवतो... की स्त्री पुरुषाशिवाय जगूच शकत नाही...

डॅडचा ब्लेझर पुन्हा वॉर्डरोबमधे ठेवायला उठली मोना...

.. आणि.. वॉर्डरॉबमध्ये ... एक भयानक धक्का तिची वाट पाहात होता...

तो फोटो.. असा का लपवून ठेवला होता कुणास ठाऊक डॅडनी...

फोटो हातात घेतला मोनाने... आणि.. हातातून गळूनच पडला.....

कोणत्यातरी रस्त्यावर.. बहुधा हायर केलेल्या डिटेक्टिव्हने तो काढला असावा...

लोहिया.. अर्देशीर ..... दोघेही गप्पा मारत कॉफी पीत बसले होते... आणि त्यांच्याबरोबर होता.. इरफान.. अब्दुल्लाह...

आणि... फोटोच्याच एका कोपर्‍यात डॅडनी स्केचपेनने बारीक अक्षरात लिहून ठेवले होते....

.... डू नॉट ट्राय...

सगळे तसेच ठेवत मोना पी.सी.कडे धावली... फोनवरून मिळणारे कनेक्शन ऑन केले.. इन्टरनेट चालू केले... रेडिफला गेली... मोनाबेटि१९८०@रेडिफमेल.कॉम युझरनेम टाकले...

... आणि... पासवर्ड टाकला... डू नॉट ट्राय...

माहितीचा एक अमुल्य...प्रचंड असा खजिना.. मोनालिसासमोर ओपन होत होता...

गुलमोहर: 

एकदम मस्त!
कथा प्रवाह खुप मस्त चालु आहे.
मला तर अस वाटत की तुम्ही जे लिहता ना ते पुस्तक रुपाने संग्रहित कराव.
बेफीकीरजी तुम्ही कथा लिहिताना प्रेरणा स्थानी कोणाला मानता??????

बेफिकीर जी,

छान....... मज्जा येते वाचायला. अजुन कोण कोणती रहस्ये उलघडणार आहेत याची उत्सुक्ता लागुन राहीली आहे.

एकदम रहस्यमय वगैरे...छान सुद्धा योग्य शब्द नाही...अजूनतरी खूप आवडतेय कथा..
पटापट वळण घेत वेगवेगळे रहस्य उलगडत जाणारी कथा..पुढील भाग सुद्धा लवकर लवकर टाकालच.

माहितीचा एक अमुल्य...प्रचंड असा खजिना.. मोनालिसासमोर ओपन होत होता... बापरे!!! थ्रिलिंग आहे हे एकदमच.... 'डू नॉट ट्राय' हा पासवर्ड असेल, असं अज्जिबात डोक्यात आलं नाही हो बेफिकीर... मला वाटलं, की इरफान हा लोहिया-अर्देशीर ला मिळालेला असणार आणि डॅडच्या क्लू चा अर्थ असणार, 'डू नॉट मेक एनी सॉर्ट ऑफ डीलिंग्ज विथ दॅट(इरफान) मॅन..'.
मोनालिसा ह्या गुढ नावाबरोबरच 'दा व्हिन्सि कोड' ची गुढतासुद्धा या कथेत परावर्तीत झाली आहे... मस्तच जमलाय हा ही भाग... Happy

ही कादंबरी आत्तापर्यंत आवडली आहे. उत्सुकता टिकवून ठेवते.

बेफिकीर - एक माहिती विचारतो: हे गियर बॉक्स म्हणजे ट्रक्स वगैरेंमधे जी गियर बॉक्स असेम्ब्ली असते त्यापेक्षा वेगळे काहीतरी आहे का? यातील माहितीत त्यांची किंमत बरीच जास्त वाटते.

गिअरबॉक्सचे काही प्रकार!

ऑटोमोबाईल -

इन्डस्ट्रिअल - (मोठ्या व किंमत काही हजारांपासून लाखांच्यावर!) (क्रेन वगैरे!)

एजिटेटर - किंमत लाखाच्या वर!

हेवी ड्युटी - (अर्थ मूव्हिन्ग, कोल माईन्स, सिमेन्ट प्लॅन्ट्स, पॉवर प्लॅन्ट्स) - प्रचंड गिअर बॉक्सेस व किंमत दहा ते पंधरा लाखांच्या घरात सहज!

सर्वांचे धन्यवाद!

-'बेफिकीर'!

ते सगळे मला माहीत आहे.. तुम्ही यांना ढीगभर मेल्स दिल्यात.. यांनी आणखीन ढिगभर उत्तरे दिली... मला अन अर्देशीर सरांना कॉपीज होत्या.. आमच्याशी बोललात.. आम्ही तुमच्याशी बोललो.>>> हे वाचताना जाम हसलो Happy क्लासिक चालढकल वाल्यांचे उदाहरण वाटले. येथे ते मेहरा कदाचित तसे नसतील पण इतर ठिकाणी असे अनेक असतात.