पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?

Submitted by sudhirkale42 on 27 October, 2010 - 23:18

पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?
प्रेषक: सुधीर काळे

कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची राजधानी "माँट्रियल" येथून प्रसिद्ध होणार्‍या "ला प्रेस" या वृत्तपत्रातील श्रीमती पॅट्रिस लागासे यांनी लिहिलेला एक सुरेख लेख अलीकडेच माझ्या वाचनात आला. हा सुरेख लेख मूळ इंग्रजीत वाचावा अशी मी सर्व 'मायबोली'करांना सुचवू इच्छितो..

[मूळ लेख http://grendelreport.posterous.com/pakistan-by-patrice-lagace-la-presse-... या दुव्यावर वाचता येईल. तसेच तिथे ’ला प्रेस’च्या वाचकांचे प्रतिसादही वाचता येतील]

या उपहासपूर्ण शैलीत लिहिलेल्या लेखातून पाकिस्तानबद्दलची आम पाश्चात्य जनतेची सहानुभूती काशी कमी-कमी होत चालली आहे हे दिसून येते.

पाकिस्तानला जो नुकताच प्रलयंकारी महापुराचा तडाखा बसला त्यामुळे त्या देशातील दोन कोटी पूरग्रस्त जनता बेघर होऊन रस्त्यावर आली. त्यांच्या पुनर्वसनासाठी ४६ कोटी डॉलर्स लागतील असे संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर करून सार्‍या जगाला मदत करण्याची हांक घातली होती. पण केवळ १८.५ कोटीचीच मदत ही संघटना जमा करू शकली. एका मानवतावादी परोपकारी संघटनेने पकिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी फक्त दोन लाख डॉलर्सचीच मदत जमा केली पण त्याच काळात तिने हेतीसारख्या (Haiti) छोट्या देशातील भूकंपग्रस्त लोकांसाठी याच संघटनेने ३६ लाख डॉलर्सची मदत जमा केली होती. यामुळे पाकिस्तानच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आणि त्याने या पाश्चात्य देशांवर खूप आग पाखडली.

त्या आधीच पाकिस्तानने दर F-16 या लढाऊ विमानासाठी प्रत्येक नगामागे ४ कोटी डॉलर्स मोजून २० अशी विमाने खरेदी केली होती असे सांगून लेखिका विचारते कीं या विमानांसाठी पाकिस्तानने २०x४=८० कोटी डॉलर्स उडवले (म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने मागितलेल्या ४६ कोटी डोलर्सपेक्षा जास्त रक्कम मोजली होती. हे पैसे कुठून आले?) पण पूरग्रस्तांसाठी मात्र पाकिस्तान हातात कटोरी घेऊन उभा!

लेखिका पुढे म्हणते कीं ज्या देशाकडे लष्करी सामुग्री विकत घेण्यासाठी पैसे आहेत किंवा असा पैसा जे राष्ट्र उभा करू शकते अशा राष्ट्रांना पूरग्रस्तांसाठी कां नाहीं स्वतःचा निधी कसा काय उभा करता येत? लेखिका पुढे म्हणते कीं अशा पाकिस्तानला एक दमडीसुद्धा मदत द्यावीशी त्यांना वाटत नाहीं.

याहूनही चीड आणणारी गोष्ट म्हणजे पाकिस्तानी राजकीय व औद्योगिक क्षेत्रातील बडे-बडे नेते स्वतःचा आयकर व इतर कर देत नाहींत. १९ जुलै रोजी न्यूयॉर्क टाइम्सने एक पाकिस्तानला अवमानित करणार्‍या लेखात पाकिस्तानच्या करवसूली करण्याच्या पद्धतीवर खणखणीत टीका केली आहे. त्यानुसार पाकिस्तानातले श्रीमंत लोक कर देतच नाहींत असा गौप्यस्फोट केला. तोही हा थोडाथोडका कर बुडवण्याचा प्रकार नसून अजीबात कर न देण्याचा प्रकार आहे. जिथे १ कोटी पाकिस्तान्यांनी कर भरला पाहिजे तिथे त्याच्या २५ टक्के लोकच कर भरतात. पाकिस्तानी खासदारांची सरासरी माया (Net worth) नऊ लाख डॉलर्स आहे. भूतपूर्व पंतप्रधान व आताचे विरोधी पक्षनेते नवाज शरीफ हे करोडपती आहेत पण त्यांनी २००५ ते २००७च्या दरम्यान अजीबात आयकर भरलेला नाहीं. थोडक्यात करवसूलीची पद्धती श्रीमंतांनी श्रीमंतांसाठी केलेली पद्धती आहे.

याच विषयावर 'डॉन' या आघाडीच्या पाकिस्तानी वृत्तपत्रात इस्लामाबादच्या मेहनाज सिद्दीकी या पाकिस्तानी नागरिकाचे 'वाचकांच्या पत्रव्यवहारा'तले हे पत्र फारच उद्बोधक आहे. (http://news.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newsp...) या पत्रलेखकानुसार पाकिस्तानी लोकसभेला दिलेल्या अहवालानुसार करबुडवे लोक १० अब्ज पाकिस्तानी रुपयांचा (१२५ कोटी डॉलर्सचा) कर बुडवत आहेत तर वसूल न केलेला कर याच्या पाचपट आहे. या अपमानास्पद परिस्थितीत (सध्या तरी) लोकशाहीचा मार्ग अनुसरणार्‍या पाकिस्तानच्या सरकारचे मित्रसुद्धा यापुढे पाकिस्तानला मदत करायला कांकू करू लागले आहेत असे पत्रलेखक म्हणतो.

मूळ इंग्रजीत लिहिलेला पॅट्रिस लागासे यांचा लेख आणि डॉनमधील वाचकाचे पत्र जरूर वाचण्याची मी सर्व 'मायबोली'करांना शिफारीस करतो.

(अर्थात् भारतीय नेते आणि भारतीय श्रीमंतही यात कांहीं कमी नाहींत, पण आपला देश कटोरी घेऊन हिंडत नाहीं हाच फरक!)
PAKISTAN By Patrice Lagacé - La Presse - Montréal

गुलमोहर: 

पटलं. पूर आल्यावर देशोधडीला लागलेल्या नागरिकांना हे माहिती पण नसेल की त्यांचे सरकार विमान खरेदी करू शकते, श्रीमंताकडून कर चुकवला तरी कारवाई करत नाही. भारताने मात्र मदत करण्यात कसर ठेवली नाही आणि पाकिस्तानने उदारतेचा आव आणत ती मदत स्वीकारली जणू त्यांना गरजच नव्हती. आपल्या देशातील नेत्यांच्या श्रीमंतीबद्दल काय बोलायलाच नको.

अवांतर : काळेसाहेब या लेखातील मजकूर दोनवेळा प्रकाशित झालाय.

सगळीच पोस्ट जरा एडीट करणार का? एकतर ती दोनदा पडली आहे, डॉन चे गॉन झाले आहे इ.इ.
पाकिस्तान ही अनैसर्गिक राष्ट्रनिर्मिती आहे, तिथली लोकशाही एक विनोद आहे आणि ते अत्यंत वेगाने 'फेल्ड स्टेट'च्या दिशेने चालले आहेत. आपले दुर्दैव हे की ते आपले शेजारी आहेत, आणि असे होउ नये म्हणून प्रोअ‍ॅक्टीव्हली काही करणे (गरज असूनही) आपल्याला शक्य नाही. सुदैवाने गेल्या काही वर्षात सामान्य भारतीय आणी मिडीआ दोन्हीही 'पाकिस्तानअपरोक्ष' विचार करु लागला आहे. उदा. क्रिकेटमधे आपण ऑस्ट्रेलिआला हरवणे जास्त महत्वाचे बनले आहे, पाकिस्तानला नाही

नमस्कार सुधीर काळे,

मायबोलीवर चालू घडामोडी असा जो ग्रुप आहे तेथे हा लेख योग्य ठरेल. कृपया योग्य त्या ग्रुपमध्ये लेख पोस्ट करून सहकार्य करावे ही विनंती.

तसेच एकच पोस्ट दोनदा पडली आहे, व काही टायपोदेखील आहेत. ते देखील सुधारावेत.

मदत_समिती.

मदत समितीकर,
खरं तर मला अजून इथं कसं लिहायचं हे नीट समजलं नाहींय्. त्यामुळे अशी चूक झाली! क्षमस्व.
पुढच्या वेळी दुरुस्त करेन.
गॉन ही टंकनाची चूक नव्हती पण आता तीही दुरुस्त केली आहे.
ध्यानाकर्षणाबद्दल आभारी आहे.

"उदा. क्रिकेटमधे आपण ऑस्ट्रेलिआला हरवणे जास्त महत्वाचे बनले आहे, पाकिस्तानला नाही"
Lol

पाकिस्तानला दिलेल्या मदतीचा बराचसा भाग पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या खिशात जाईल, उरलेल्यातलाही बराचसा भाग अतिरेकी संघटनांना जाईल व फारच थोडा भाग पूरग्रस्त जनतेपर्यंत पोहोचेल हे जगातील सर्वांना (भारतातील राज्यकर्ते, पाकिस्तानप्रेमी व निधर्मांध सोडून) माहित आहे. २००५ मध्ये पाकव्याप्त काश्मिरमध्ये भूकंप झाल्यावर दिलेल्या मदतीचे असेच झाले होते. त्यामुळेच पाकिस्तानला मदत देताना पाश्चात्य राष्ट्रे हात आखडता घेतात.

या उपहासाचा काहि फायदा होईल असे वाटत नाही. कारण पाकिस्तानच्या खोड्या काहि कमी होणार नाहीत.
अदनान सामीचा, या विकांतला केनयामधे जाहिर कार्यक्रम आहे. पाकिस्तानातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी !!

मानवता वादी लोकांना यात फक्त मानवता दिसते. त्यात ते आपद्ग्रस्त मनुष्य कुठल्या देशाचा, धर्माचा आहे, त्याला इतर कुणि मदत करू शकेल का, हा विचार करत नाहीत. कुणि आपद्ग्रस्त आहे असे कळले की हे लोक लगेच 'अरे रे' म्हणून मदतीला तयार.

कुणि सांगितले की अहो तुमचे पैसे आपद्ग्रस्तां ऐवजी अप्रामाणिक लोक बळकावून बसतील, अतिरेकी संघटना वापरतील, तरी ते म्हणणार, "सगळेच लोक अप्रामाणिक नसतात, सगळेच लोक अतिरेकी नसतात."

ते म्हणतात, 'मला वाटते त्या आपद्ग्रस्तांसाठी काही तरी करावे, म्हणून मी पैसे देतो, नि देवाची प्रार्थना करतो की त्यांचे संकट दूर होवो. बाकीचे विचार मी करत नाही'. कदाचित् कुणि मदत मागायला गेले नाहीत तरी त्यांना सुद्धा हे जबरदस्तीने मदत करतील.

कुठल्याहि चांगल्या भावनेचा, विचारांचा अतिरेक होऊ शकतो.

दोन्ही बाजूंचे कमी अधिक प्रमाणात खरे आहे.

त्यात अजून राजकारण, धर्मांधता इ. गोष्टींचा विचार केला तर सर्व काही इतके गुंतागुंतीचे नि कठीण होऊन बसेल की तो गुंता सोडवून योग्य मार्ग काढणे हे फारच कठीण.