घरी केलेला हॅलोवीनचा वेष !

Submitted by मीनल on 27 October, 2010 - 22:52

नमस्कार, मायबोली वर लिहायचा पहिलाच प्रयत्न, मी नेहमी रोमातच असते, पण घरी हॅलोवीनचा वेष करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर मायबोलीवर टाकण्याचा मोह आवरु शकले नाही!

रुबिक्स क्युब

साहित्य :

  • कोणत्याही मापाचा एक चौकोनी खोका (आम्ही computer चा २० इंच x २० इंच मापाचा खोका वापरला)
  • काळी २ इंच रुंदीची टेप,
  • काळी १ इंच रुंदीची टेप, (काळी २ इंच रुंदीची टेप मधे कापून वापरली तरी चालेल)
  • पारदर्शक २ इंच रुंदीची टेप,
  • पारदर्शक १ इंच रुंदीची टेप,
  • खोक्याच्या मापा प्रमाणे कागद अथवा कापडाचे निळा, लाल, हिरवा, पांढरा, पिवळा आणी केशरी असे प्रत्येकी ९ चौकोनी तुकडे (आम्ही ६ इंच x ६ इंच मापाचे वापरले)

कृती :

  • खोक्यावर - डोक्यासाठी एक मध्यम, पाय घालण्यासाठी एक मोठे, आणी हात घालण्यासाठी दोन लहान अशी वर्तुळे कापुन घ्या.
  • डोक्यासाठीच्या आणी पायासाठीच्या वर्तुळांच्या बाजुने २ इंची काळी टेप लावून घ्या.
  • हातासाठीच्या वर्तुळांच्या बाजुने १ इंची काळी टेप लावून घ्या.
  • त्यानंतर सर्व कडांना २ इंची काळी टेप लावा.
  • खोक्याच्या एका पॄष्ठ्भागावर रुबिक्स क्युब प्रमाणे रंगीत चौकोनी तुकडे ठेवून चिकटवून घ्या, व त्यावर १ इंची काळी टेप लावा. असे सर्व पॄष्ठ्भाग करा. वर्तुळांच्या ठिकाणी रंगीत चौकोनी तुकडे त्या आकाराचे कापावे लागतील.
  • एका चौकोनावर लोगो छापून चिकटवा.
  • अधिक मजबूती साठी सर्व पॄष्ठ्भागावर पारदर्शक २ इंच रुंदीच्या टेपच्या पट्या अशा रीतीने लावा, जेणेकरून पॄष्ठ्भागावर चुण्या पडणार नाहीत.

Halloween4.jpgHalloween1.jpg.jpgHalloween2.jpg.jpgHalloween3.jpg

गुलमोहर: 

प्रतिसादा बद्दल सगळयांचे आभार.
ह्या कॉस्च्युमला शाळेत "मोस्ट ओरिजिनल कॉस्च्युम"चे बक्षिस मिळाले!

गम्मतच्चे! Happy
>>>> डोके पण झाकता आले तर <<<
येईल की, डोक्याच्या मापाचे लहान खोके भोकावर फिक्स करायचे, डोळ्यान्च्या जागी दोन भोके बघायला ठेवायची. रोबोट प्रमाणे दिसेल ते!

Pages