घरी केलेला हॅलोवीनचा वेष !

Submitted by मीनल on 27 October, 2010 - 22:52

नमस्कार, मायबोली वर लिहायचा पहिलाच प्रयत्न, मी नेहमी रोमातच असते, पण घरी हॅलोवीनचा वेष करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर मायबोलीवर टाकण्याचा मोह आवरु शकले नाही!

रुबिक्स क्युब

साहित्य :

  • कोणत्याही मापाचा एक चौकोनी खोका (आम्ही computer चा २० इंच x २० इंच मापाचा खोका वापरला)
  • काळी २ इंच रुंदीची टेप,
  • काळी १ इंच रुंदीची टेप, (काळी २ इंच रुंदीची टेप मधे कापून वापरली तरी चालेल)
  • पारदर्शक २ इंच रुंदीची टेप,
  • पारदर्शक १ इंच रुंदीची टेप,
  • खोक्याच्या मापा प्रमाणे कागद अथवा कापडाचे निळा, लाल, हिरवा, पांढरा, पिवळा आणी केशरी असे प्रत्येकी ९ चौकोनी तुकडे (आम्ही ६ इंच x ६ इंच मापाचे वापरले)

कृती :

  • खोक्यावर - डोक्यासाठी एक मध्यम, पाय घालण्यासाठी एक मोठे, आणी हात घालण्यासाठी दोन लहान अशी वर्तुळे कापुन घ्या.
  • डोक्यासाठीच्या आणी पायासाठीच्या वर्तुळांच्या बाजुने २ इंची काळी टेप लावून घ्या.
  • हातासाठीच्या वर्तुळांच्या बाजुने १ इंची काळी टेप लावून घ्या.
  • त्यानंतर सर्व कडांना २ इंची काळी टेप लावा.
  • खोक्याच्या एका पॄष्ठ्भागावर रुबिक्स क्युब प्रमाणे रंगीत चौकोनी तुकडे ठेवून चिकटवून घ्या, व त्यावर १ इंची काळी टेप लावा. असे सर्व पॄष्ठ्भाग करा. वर्तुळांच्या ठिकाणी रंगीत चौकोनी तुकडे त्या आकाराचे कापावे लागतील.
  • एका चौकोनावर लोगो छापून चिकटवा.
  • अधिक मजबूती साठी सर्व पॄष्ठ्भागावर पारदर्शक २ इंच रुंदीच्या टेपच्या पट्या अशा रीतीने लावा, जेणेकरून पॄष्ठ्भागावर चुण्या पडणार नाहीत.

Halloween4.jpgHalloween1.jpg.jpgHalloween2.jpg.jpgHalloween3.jpg

गुलमोहर: 

मीनल, मस्तच झालिये क्युब Happy एकदम पर्फेक्ट Happy

तु हे चुकुन चालु घडामोडी मधे टाकलयस का? अ‍ॅडमिन ना सांगुन हे गुलमोहर मधे 'हस्तकला' विभागात हलव Happy

चिंगी ,

मोठया वर्तुळाच्या बाजुने डोक्यावरून घालुन लहान वर्तुळातून डोके वर काढायचे.
डोके बाहेर राहून खोका खांद्यावर रहातो. लहान वर्तुळातून हात बाहेर काढायचे.

मस्त! Happy

मस्त Happy

फारच कल्पक! अगदी टाकाऊतून टिकाऊ Happy
मुखवट्यासाठी चेहरा रंगवायची कल्पना पण छान..

ह्याच्यासारखेच डाईस रोलर (खेळायचा फासा?) पण करता येईल.

.

Pages