काहीतरी घोळ नक्कीच होता.
आपण या पदावर येणे म्हणजे अप्रिय होणे हे मोनाला केव्हाच माहीत होते. पण त्या अप्रियतेला बदलून प्रिय व्हायचे व रिस्पेक्टेबल व्हायचे हा तिचा प्लॅन होता.
अशी स्टेप घेण्यामागे तिची एक विशिष्ट भूमिका होती. बाबांशी ती दर रविवारी संध्याकाळी निवांत गप्पा मारत बसायची. बाबा स्कॉच घ्यायचे. ती बहुधा सुला वाईन! आंणि मग मस्त कोळंबी पुलाव किंवा कोणतीतरी थाई डिश चाखायची आणि दोघे झोपून जायचे.
पण अलीकडे तिला बाबांच्या बोलण्यात सतत जाणवत राहायचे. 'मला फार मनस्ताप होतो मोनू, आय फील लाईक क्विटिंग, अनेक आघाड्यांवर लढणे मला नवीन नाही, पण ...'! या 'पण'च्या पुढे त्यांना काय म्हणायचे असायचे ते ते कधीच बोलायचे नाहीत. मोना आत्ताही स्वतःच्या आलिशान केबीनमध्ये त्या 'पण' नंतरचे वाक्य काय असेल याचाच अंदाज करत बसली होती. तिला नेहमी वाटायचे. बहुतेक बाबांना कोणत्यातरी मोठ्या प्रपोजलमध्ये भलताच लॉस होणार असेल किंवा हेलिक्सची प्रॉडक्ट्स आता ऑब्सोलेट होत असावीत किंवा मध्यंतरी झालेल्या संपामुळे बाबा खूप व्यथित झाले असावेत.
बाबा व्यथित दिसायचे तरीही त्यांच्या रक्तातील थेंबाथेंबात गुप्ता हेलिक्स मुरलेले होते हेही तिला जाणवत राहायचे. आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर तिने अचानक ठरवले होते. कोणालाही अंदाज नसला तरीही आपण हा बिझिनेस हातात घ्यायचा. त्या गोष्टीचा खूप जणांना त्रास होईल हे माहीत असूनही तिने ही स्टेप घेतली होती याचे कारण तिचे तिच्या बाबांवर नितांत प्रेम होते आणि तिला वाटत होते की तिने यशस्वीरीत्या गुप्ता हेलिक्स चालवले तर त्यांच्या आत्म्याला खरीखुरी शांतता मिळेल व तीही एक प्रकारे पितृऋणातून मुक्त होईल!
सोपे नव्हते पण हे! आईविना वाढलेली मोना आजवर ख्यालीखुशालीत मश्गुल असायची. तिने बी एस सी केलेले होते. शिक्षणात ती कधीच विशेष नव्हती. मात्र अती उच्चभ्रू रीतीरिवाज अतिशय व्यवस्थित माहीत होते आणि कॉन्व्हेन्ट एज्युकेटेड असल्यामुळे संवाद कौशल्यात मागे पडण्याची शक्यता नव्हती. पण.. इतकेच! बाकी काहीच नाही. हार्डंड अॅन्ड ग्राऊंड गियर बॉक्सेस म्हणजे काय आणि त्या कुठे वापरल्या जातात आणि केवढ्याला असतात आणि कशा बनवतात! शुन्य माहिती होती तिला!
पण तरीही जिद्दीने तिने हे पद हातात तर घेतलेले होते. आणि आता हे पद केवळ एक नामधारी पद होऊन राहू नये यासाठी तिला अत्यंत धोरणात्मक पद्धतीने वागायला लागणार होते.
कालच रात्री तिने निर्णय घेतला होता. किमान तीन महिने कोणत्याही ऑपरेशनमध्ये अथवा निर्णयात हस्तक्षेप करायचा नाही. जस्ट वॉच! मात्र, याच कालावधीत ज्ञान जमेल तितके वाढवायचे!
आणि.. या ज्ञान वाढवण्याच्या प्रोसेसमध्येच तिला एक गोष्ट आजच, म्हणजे ऑफीसला यायला लागल्याच्या केवळ तिसर्याच दिवशी आढळली होती, जो तिच्यामते घोळ होता आणि या घोळाबाबत आत्ताच काही बोलणे चुकीचे ठरणार होते.
डिझाईन डिपार्टमेंटचा हेड बिंद्रा समोर बसलेला होता. पी.ए. गोरे बाजूला! आणि आपली निमुळती नाजुक बोटे एकमेकात गुंफून मोनालिसा गुप्ता बिंद्राकडे टक लावून पाहात होती.
मोना - प्लीज कम अगेन??
बिंद्रा - या.. दॅट मशीन इज स्टिल देअर बट इट इज...
मोना - नो नो.. अगदी पहिल्यापासून.. सगळं...
बिंद्रा खरे तर वैतागला होता. चाळिशीचा तो माणूस गियर डिझाईनचा किंग समजला जायचा इंडस्ट्रीत! पण त्याला स्वतःला माहीत होते. त्याच्यापेक्षा सुपिरियर माणसे या उद्योगात ऑलरेडी आहेत. तरीही त्याने त्याची इमेज गुप्ता हेलिक्समध्ये मात्र टिकवण्यात यश मिळवले होते.
बिंद्रा - यू मीन.. फ्रॉम द बेसिक्स??
मोना - राईट.. फ्रॉम द बेसिक्स..
बिंद्रा - ओके..
बिंद्राने पुन्हा एक कोरा कागद आणि पेन घेतले आणि बोलू लागला..
"मेकॅनिकल पॉवर ट्रान्स्मिशन प्रॉडक्ट्समध्ये गिअर्स सर्वात महत्वाचे! मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशन म्हणजे काय तर इलेक्ट्रिकल पॉवरवर बहुतांशी एखादा शाफ्ट फिरत असतो. त्याचा टॉर्क आणि आर पी एम, म्हणजे ताकद आणि सर्क्युलरली फिरण्याचा वेग अर्थातच कन्सिस्टन्ट असतो, म्हणजे एकच असतो आणि तो इलेक्ट्रिकल पॉवरवर अवलंबून असतो. पण समजा आपल्याला, जसे मी मगाशी सांगीतले, रसाचे गुर्हाळ काढायचे आहे.. हे उदाहरण अगदीच सामान्य स्वरुपाचे आहे.. पण आयडिया यावी म्हणून सांगत आहे.. तर मग आपल्याला त्या शाफ्टच्या स्पीडने.. म्हणजे वर्तुळाकार स्वतःभोवती फिरण्याच्या स्पीडने चरक फिरलेला चालणार नाही.. किंवा.. शाफ्ट ज्या ताकदीने फिरत आहे.. त्या ताकदीने चरक फिरू तरी शकणार नाही किंवा काम तरी करू शकणार नाही.. चरकाला अधिक ताकद लागेल..
अशा वेळेस ही दोन दातेरी चक्रे बसवली जातात... समजा एक चक्र डायमिटरने दुसर्याच्या दुप्पट असले.. तर त्या चक्राची एक फेरी, म्हणजे स्वतःचभोवतीची एक फेरी होईपर्यंत दुसर्या चक्राच्या दोन फेर्या होतात... याचाच अर्थ... दुसर्या चक्राला जर अॅप्लिकेशन असेल... उदाहरणार्थ चरक.. तर तो चरक त्या मूळ शाफ्टच्या दुप्पट स्पीडने फिरेल.. पण.. आपल्याला तर वेग कमी करून ताकद वाढवायची आहे.. त्यामुळे.. त्या मूळ शाफ्टच्या तिप्पट व्यासाचे दातेरी चक्र जर आपण अॅप्लिकेशनच्या शाफ्टवर बसवले.. तर चरक एक तृतियांश वेगाने फिरेल व मोटरची पॉवर समान असूनही वेग कमी झाल्यामुळे फिरतानाची त्या चरकाची ताकद, म्हणजे टॉर्क तिप्पट वाढेल.. मॅडम.. टॉर्क व आर पी एम हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात.. कारण एका विशिष्ट सेट अप मध्ये पॉवर सेम असते.. म्हणजे कॉन्स्टन्ट असते..
गिअर्सचे हे तत्व इंडस्ट्रीमध्ये अफाट प्रमाणावर वापरले जाते.. प्रत्येक.. अगदी मॅफको असले तरीही.. कोणत्याही कारखान्यात, जेथे मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशन आहे तेथे गिअर्स असतातच.. गिअर्स नसले तर कपलिंग्ज, पुली वगैरे! जसे गिरणीत पुलीज असतात... पण गिअर्स फार फार मोठ्या प्रमाणावर..
अॅप्लिकेशनवर विसंबून गिअर डिझाईन करताना अनेक प्रकारचे गिअर्स तयार होतात... रॉ मटेरिअल्स वेगवेगळी.. प्रोसेसेस वेगवेगळ्या.. हीट ट्रीटमेंट्स वेगवेगळ्या.. फिनिशिंग वेगवेगळे..
हॉबिंग ही साधारण प्रोसेस आहे.. जवळपास रॉ गिअर.. आपल्याकडे हॉबींगची पंधरा मशीन्स आहेत.. टफन्ड गिअर बॉक्सेस अनेकदा पॉवर प्लॅन्ट्समध्ये लागतात.. हार्डन्ड अॅन्ड ग्राऊंड गिअर्सचा फिनिश सर्वात सुपर असतो.. अशा गिअरबॉक्सेस खूप महत्वाच्या अॅप्लिकेशन्समध्ये किंवा जेथे अॅक्युरसी व लाईफ खूप महत्वाचे आहे तिथे वापरल्या जातात.. आपल्याकडे गिअर ग्राईंडिंग मशीन्स दोन आहेत..
मात्र... गिअर्सचे सर्वात मोठे मार्केट.. म्हणजे ऑटो सेक्टर.. यात मात्र शेव्हन गिअर्स वापरले जातात.. आपण ऑटॉमोबाईलचे गिअर्स बनवत नाही... आपण इंडस्ट्रिअल ड्युटीच्या गिअर बॉक्सेस बनवतो..... मात्र... तीन महिन्यांपुर्वी गिअर शेव्हिंगची दोन मशीन्स आपण आणली.. इन फॅक्ट.. त्याचे मोठे फन्क्शनही झाले.. पण... आजवर आपण ती वापरलेली नाहीत... का ते मला माहीत नाही.. पण.. बहुतेक त्या सेक्टरमध्ये उडी घ्यायची की नाही यावर डिसीजन झालेला नसावा.. अॅक्चुअली... एवढी मशीन्स घेऊन ती आयडल राहणे याचीच कॉस्ट खूप आहे.. आणि.. काही नाही तर निदान जॉब वर्क तरी करायला पाहिजे आपण.. म्हणजे समजा.. टेल्को या कंपनीला एस आर गिअर्सवाले सप्प्लाय करत असतील.. तर एस आर वाल्यांकडून आपण नुसत्या शेव्हिंग ऑपरेशनचे कॉन्ट्रॅक्ट मिळवू शकतो... आणि त्यात एक्साईजची इन्व्हॉल्व्हमेन्टही नसते.. कारण ते जॉब वर्क असते...
आय बिंग अ डिझाईन मॅन... आय कॅन नॉट सबमिट सच अ प्रपोझल.. बट आय थिन्क.. जोशी शूड मूव्ह सच अ प्रपोझल.."
तब्बल दोन मिनिटे फक्त टेबलकडे बघत असलेल्या मोनालिसाने शेवटी एवढेच शब्द उच्चारले..
"थॅन्क्स मिस्टर बिंद्रा... आयल गेट बॅक टू यू इफ वुई कूड डू समथिन्ग अबाऊट इट.."
मान लववून बाहेर पडलेल्या बिंद्राला पाहून मॅडमकडे वळत गोरे म्हणाला..
गोरे - कॅन.. कॅन आय गिव्ह यू अनादर इनसाईट मॅम.. ऑन धिस इश्यू??
मोना - ... शुअर??
गोरे - .. ती मशीन्स कमिशनच झालेली नाही आहेत.. जर्मन सप्लायरशी वाद झाले आपले...
मोना - कशावरून??
गोरे - एल सी ओपन केली आपण.. मशीन्स शिप झाली.. आणि काही कारणाने अॅक्चुअल डिलीव्हरी मात्र तीन महिन्यांनी लांबली.. त्यावरून..
मोना - हो पण.. शेवटी आली ना मशीन्स??
गोरे - होय मॅम.. पण.. तोवर फारुख ऑटॉचे कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलेले होते..
मोना - पण.. म्हणून काय??
गोरे - सरांनी.. दिड लाख रुपयाचा क्लेम केला जर्मन सप्लायरवर...
मोना - ... ओह...
गोरे - मग त्यांनी कमिशनींगला कुणाला पाठवलेच नाही...
मोना - इव्हन द जर्मन्स कॅन बिहेव लाईक धिस??
गोरे - हा खूप मोठा शॉक होता मॅम सरांना...
मोना - असणारच... एक काम करा... जोशी.. कॉल जोशी..
गोरे - शुअर..
गोरे त्याच्यासाठी असलेल्या काचेच्या छोट्या केबीनमध्ये निघून गेला आणि त्याने जोशीला फोन केला. जोशी साधारण वीस मिनिटांनी येतील असा निरोप मॅडमना देऊन तो त्याचे काम करू लागला तेव्हा मोना विचारात गढली होती.
समजा जरी फारुख गिअर्सचे कॉन्ट्रॅक्ट हातातून गेले.. तरीही पुढच्या वर्षी मिळेलच ना? आणि.. समजा तो दिड लाखाचा क्लेम काढून टाकला.. तर कमिशनिंगला येतील की नाही ते लोक? नाही आले तरी भारतात मशीन्स कमिशन करू शकणारे कुणी नसतील? मॅन्युअल्स तर आलीच असतील मशीन्सची! बर, ठरल्याप्रमाणे त्यांनी दोन वर्षांचे स्पेअर्सही पाठवलेले आहेत.. मग.. निदान दोन वर्षे तर मशीन्स नक्कीच चालतील.. नव्वद लाखाची इन्व्हेस्टमेंट दिड लाखासाठी कशी वाया घालवतील डॅड?? घोळ... काहीतरी तिसराच घोळ असणार! कुणाशी बोलावं? बिंद्रा तर म्हणतो प्रपोझल तोही मूव्ह करेल पण तो डिझाईनचा असल्यामुळे करत नाही आहे.. मग.. मग जोशी?? हू हॅज स्टॉप्ड हिम??
"कम इन मॅम???"
"याह.. हॅव अ सिट मिस्टर जोशी... हाऊ इज बिझिनेस.."
"थॅन्क यू.. व्हेरी फाईन मॅम"
राजकुमार जोशी! महाराष्ट्रीयन जोशी नव्हता तो! यु. पी. चा जोशी होता. डेहराडून! तोही असेल चाळीशीचा! गिअर मार्केटिंगचा इंडस्ट्रीतला जानामाना माणूस! गुप्ता हेलिक्समध्ये गेली सात वर्षे होता आणि फास्ट चढत चढत आता जी. एम. मार्केटिंग झाला होता. त्याचे डायरेक्ट रिपोर्टिंग लोहियांना होते.
मोना - जोशी.. आज सतरा तारखेपर्यंत सेल किती झालाय??
जोशी - ९.७१.. साहेबांना फिगर दिली होती...
मोना - नाही नाही... इट्स ओके... पण.. प्रोजेक्शन काय आहे या महिन्याचे??
जोशी - अॅक्चुअली १८ होते... पण..
मोना - होणार नाही अॅचिव्ह??
जोशी - ...काही काही नवीनच प्रॉब्लेम्स आले..
मोना - .. लाईक??
जोशी - वेस्टर्न कोलफिल्ड्सने अचानक ऑर्डर रद्द केली...
मोना - वेस्ट.. ते तर गव्हर्नमेंट आहे ना??
जोशी - .. हो...
मोना - मग?? रद्द का केली??
जोशी - लीड टाईंम न पाळल्यामुळे...
मोना - व्हॉट?? हे तर फारच विचित्र कारण आहे.. आपण काय कमिट केले होते??
जोशी - जून..
मोना - आणि सप्टेंबरपर्यंत देऊ शकलो नाहीत???... का??
जोशी - मटेरिअलच आले जुलैमध्ये...
मोना - कसे काय??
जोशी - ऑर्डर प्लेस झाली होती.. पण.. सुमीतवाल्यांनी काहीतरी अकाऊंट्सचा इश्यू काढून डिले केले...
मोना - नाही नाही.. एक मिनिट... ऑर्डर कधी प्लेस झाली??
जोशी - एप्रिल..
मोना - अॅन्ड वुई रिक्वायर हाऊ मेनी मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ रिसीट ऑफ रॉ मटेरिअल??
जोशी - अॅट लिस्ट टू...
मोना - आय नो मिस्टर जोशी... की तुम्ही सेल्स बघता.. आणि पर्चेसचे काम आहे मटेरिअल वेळेवर आणणे.. पण.. ही गोष्ट हायलाईट केलीत तुम्ही??
जोशी - येस मॅडम... सरांना माहीत होते हे..
मोना - कोण सर??
जोशी - दोघेही.. लोहिया आणि गुप्ता सर..
मोना - .. हं... बरं मला एक सांगा...व्हाय डोन्ट वुई हॅव्ह द जॉब वर्क कॉन्ट्रॅक्ट फॉर शेव्हिन्ग मशीन्स??
एकदम सटपटलाच जोशी! हा प्रश्न मॅडम जॉईन झाल्याच्या तिसर्या दिवशीच निघेल असे त्याला अजिबात वाटले नव्हते. जोशी लोहियांना रिपोर्ट करायचा. लोहिया बसायचे मुंबई ऑफीसला जिथे जतीनही बसायचा. सुबोधचे ऑफीस वेगळे असले तरी मुंबईतच होते. अर्देशीर सर पुण्यात आपल्या घरीच असायचे. मात्र आठवड्यातून तीन वेळा कंपनीत येऊन जायचे. त्यांची केबीन भली मोठी होती. आणि स्वतः मोहन गुप्ता सर पुण्यात बसायचे. मात्र, ते बहुतांशी वेळ नवीन अॅग्रीमेंट्स, नवीन मशीन्स, लीगल बाबी आणि नवीन बिझनेसेसचे प्रॉस्पेक्ट्स यावर घालवायचे. त्यात नाना सावंत हा एक माणूसही त्यांना हॅन्डल करायला लागायचा.
मोनालिसा मात्र जॉईन झाल्या झाल्या डे टू डे अफेअरमध्येच घुसली होती.
जोशी - ती.. ती.. काहीतरी क्लेम आहे त्या मशीन्सचा..
मोना - काहीतरी म्हणजे??
जोशी - म्हणजे.. आय अॅम नॉट द राईट पर्सन टू से एनिथिंग अबाऊट इट..
मोना - ते माहीत आहे..पण तरी??
जोशी - आय थिंक.. ती मशीन्स कमिशनच होत नाही आहेत..
मोना - कशामुळे??
जोशी - त्यांचे.. पेमेंट पूर्ण केले आहे की नाही ते बघावे लागेल..
मोना - इंटरनॅशनल शिपमेंट्स पूर्ण पेमेंटशिवाय होतात कुठे??
जोशी - काहीतरी वाद मात्र आहे त्या मशीन्सबाबत...
मोना - मिस्टर जोशी.. व्हॉट आय फील इज.. यू टेक द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दोज मशीन्स..
जोशी... शुअ...र.. शुअर मॅम..
मोना - आणि एका महिन्यात ती ऑपरेटिव्ह करा...
जोशी - मॅम.. त्यासाठी मला... काही..
मोना - ऑथोरिटीज?? ओके! नो प्रॉब्लेम.. गोरे... एक सर्क्युलर तयार करा..
गोरे - येस मॅम??
मोना - मि. जोशी विल लूक आफ्टर ऑल द मॅटर्स ऑफ दोज मशीन्स...
गोरे - राईट मॅम..
मोना - आणि ते सर्व डिपार्टमेंटच्या हेड्सना देऊन को ऑपरेट करायला सांगा.. सही माझी..
गोरे - शुअर मॅम..
मोना - राईट मि. जोशी?? प्लीज कीप मी अपडेटेड ऑन धिस डेली... अॅन्ड मशीन्स आर टू स्टार्ट नाऊ..
जोशी - ... राईट... राईट मॅम..
झाले त्याचे दु:ख मानावे की आनंद या गोंधळात जोशी बाहेर पडला आणि मोनाने तिसरे नांव उच्चारले.
"कॉल मेहरा..."
मेहरा! पन्नाशीचा गृहस्थ! अनेक कंपन्यांमध्ये पर्चेसचा अनुभव घेत घेत मोठा झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून गुप्ता हेलिक्समध्ये हेड पर्चेस अॅन्ड सप्लाय चेन म्हणून कार्यरत होता. का कुणास ठाऊक! इथे जॉईन व्हायच्या आधी जी काही फन्क्शन्स झालेली होती त्यातील भेटींमध्येही मोनालिसाला तो माणूस अत्यंत बोअरिंग आणि आतल्या गाठीचा वाटला होता. तो मोनाला कधीच 'बेटी' वगैरे म्हणायचा नाही. तो तिला नेहमी 'मिस मोनालिसा'च म्हणायचा. का कुणास ठाऊक? त्याने कायम एक परकेपणा जोपासल्यासारखे वाटायचे मोनाला!
मेहरा - हाय...
मेहराला मोनालिसाला 'मॅडम' असे संबोधायची गरजच नव्हती. तो जवळपास डायरेक्टर लेव्हलचाच माणूस होता आणि तोही लोहियांना रिपोर्ट करत असला तरीही त्यांच्याच वयाचा व सप्लाय चेनमध्ये गाजलेला माणूस होता. तो लोहियांनाही 'हाय मिस्टर लोहिया' म्हणायचा हे मोनाला माहीत होते. फक्त... मोहन गुप्तांना आणि अर्देशीर यांनाच तो सर म्हणायचा.
कोणत्यातरी महागड्या सिगारेटचा वास केबीनमध्ये दरवळला तशी मोना भानावर आली. मेहराला पाहून अर्धवट उठून तिने हस्तांदोलन केले. या माणसावर हुकुमत गाजवणे सहज शक्य होणार नाही हे तिला माहीत होते.
भलमोठं हसू मेहराच्या चेहर्यावर होतं! आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असा पडायचा की नेमकं तेच हसू समोरच्याच्याही चेहर्यावर यायचं! तसंच आत्ता मोनाच्याही आलं! पण क्षणभरच! लगेच तिला जाणीव झाली की तिचा आता रोलच वेगळा आहे.
मेहरा - येस मिस मोनालिसा.. कॉन्ग्रॅट्स अॅन्ड विश यू लक अॅज द न्यू लीडर ऑफ हेलिक्स..
मोना - ओह.. थॅन्क्स अ लॉट... हाऊ आर यू???
मेहरा - या?? गुड... हाउ अबाउट यू??
मोना - जस्ट... लर्निंग...
खूप मोठ्यांदी हासला मेहरा!
मेहरा - टेल मी..
मोना - अं.. आय जस्ट टोल्ड जोशी टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दोज शेव्हिंग मशीन्स...
खटकन चेहरा बदलला मेहराचा! क्षणभरच त्याच्या डोळ्यात एक विचित्र झाक आली आणि लगेच गेली.
पुन्हा तेच भाव डोळ्यात आणून मेहरा म्हणाला...
मेहरा - वेल .. दॅट्स गूड.. बट.. आय डाउट इफ देअर इज एनिथिंग वुई कूड डू अबाउट इट..
मोना - अॅक्च्युअली.. काय प्रॉब्लेम काय आहे???
मेहरा - क्लेम केला आहे आपण..
मोना - मग तो मागे घेऊयात....
मेहरा - त्याने काय होणार?
मोना - मशीन कमिशन करतील ते..
मेहरा - अंहं! आता ते को ऑपरेट करायला तयार नाही आहेत..
मोना - मग.. लोकल माणसांकडून?? नाहीतरी त्यांचा कोणीतरी इथे असणारच ना?
मेहरा - आहे ना... केंजळे म्हणून आहे...पण.. तोही उत्तर देत नाही...
मोना - पण.. इतर कोणीतरी... लोकल??
मेहरा - बघावं लागेल..
मोनाच्या मनात आलेलं वाक्य तिला या क्षणीतरी मेहरासमोर बोलावंसं वाटत नव्हतं! तिच्या मनात आलं की मेहराला ऐकवावं... 'बघावं लागेल? मग इतके महिने काय झोपलावतात का?'
मोना - मला वाटतं आपण ती मशीन्स कमिशन करून घ्यावीत...
मेहरा - ओके... यू हॅव ऑलरेडी टोल्ड जोशी अबाऊट इट नं??
मोना - येस..
मेहरा - प्रश्न ऑर्डर्सचा आहे...
मोना - का? पुण्यात ऑटो पार्ट्स व्हेंडर्स कितीतरी आहेत की?
मेहरा - आहेत खरे... बट... दोज मशीन्स आर नाऊ... आय मीन...
मोना - ... काय??
मेहरा - मार्केट डिमांड असलेली अॅक्युरसी आता ती देऊ शकत नाहीत...
मोना - ... काय??? .... का??
मेहरा - बावर कंपनीची मशीन्स वापरली जातात आता शेव्हन गिअर्ससाठी...
मोना - म्हणजे??
मेहरा - मायक्रॉन्समध्ये अॅक्युरसी असते मिस मोनालिसा गिअर्सची... बावरने पुढच्या दर्जाची मशीन्स काढली आहेत.. ज्यांच्याकडे आपल्यासारखी मशीन्स आहेत ते... हतबल होऊन बसले आहेत..
मोना - ... ... .... धिस..... धिस.. इज ... हॉरीबल...
मेहरा - ... इट इज...
मोना - बट... देन... हाऊ डिड वुई...
मेहरा - गुप्ता सर वॉन्टेड दीज मशीन्स...
मोना - बट... वॉज ही नॉट वेल इन्फॉर्म्ड???
मेहरा - अॅट लीस्ट... आय हॅव नॉट बीन वन ऑफ हिज... व्हेरी क्लोज .. कलीग्ज...
मोना - ... मीनिंग????
मेहरा - मार्चमध्येच मी म्हणालो होतो... वुई शूड नॉट गो फॉर दीज मशीन्स...
मोना - .. कुणाला???
मेहरा - बोथ.. गुप्ता सर.. आणि.. मिस्टर लोहिया...
मोना - .. मग??
मेहरा - मग काय?? मेहरा इज नॉट फ्रॉम बिझिनेस.. ही इज फ्रॉम लॉजिस्टिक्स..
मोना - ... म्हणजे??
मेहरा - असं माझ्याबद्दल मत बनवलं गेलं....
मोना - कोणी??... कुणाचं???
मेहरा - कोणी ते माहीत नाही.. पण.. गुप्ता सरांचं आणि लोहियांचंही...
मोना - व्हॉट इज ऑल धिस???
मेहरा - धिस इज गुप्ता हेलिक्स... मिस मोनालिसा...
मोना - यू मीन.. दिज मशीन्स आर... अॅब्सोल्युटली...
मेहरा - नाही.. अल्वरचे आयशर ट्रॅक्टर्स आणि एच. एम. टी. ट्रॅक्टर्स मध्ये... आणि मद्रासच्या सिंप्सनमध्ये हे गिअर अजूनही लागतील...
मोना - मग?? तिथे आपण का नाही गेलो..??
मेहरा - ते मला माहीत नाही.. पण.. तिथे गेलो तरी इट वोन्ट फीड द मशीन्स इनफ...
मोना - ... ओह... म्हणजे... आपण फसलो आहोत... ?????
मेहरा - मला विचाराल तर.. पूर्णपणे...
मोना - पण.. ती जर्मन कंपनी अजून ही मशीन्स कशी काय बनवते मग??
मेहरा - मशीन्स नॉर्मली फक्त असेंबल करायची राहिलेली असतात त्यांच्या प्लॅन्टमध्ये.. आणि.. ऑर्डर आली की असेंबल करतात.. तसेही... इंडोनेशिया आणि आफ्रिकेतील काही देशात अजून ते गिअर्स वापरात आहेतच मोठ्या प्रमाणावर.. इतकंच काय.. भारतातील रिप्लेसमेंट मार्केटही आहे.. पण.. इट विल फेज आऊट फास्ट... गिअर्स तसेही फारसे रिप्लेसमेंटला येत नाहीतच... मात्र.. ट्रक्सच्या बाबतीत बर्यापैकी लागू शकतात.. ट्रक्स फार कमी बनतात टू आणि फोर व्हीलर्सच्या मानाने.. एकंदर.. सगळा आनंद आहे मिस मोनालिसा... आय अॅम सॉरी.. बट.. वुई टूक राँग डिसीजन...
मोना - मला... मला हे अजिबात पटू शकत नाही...
मेहरा - काय??
मोना - एवढी इनव्हेस्टमेंट करताना प्रॉस्पेक्टिव्ह ऑर्डर्स, लाईफ ऑफ द अॅप्लिकेशन, टेक्नॉलॉजी, सगळा सर्व्हे केला जाणार नाही का?
मेहरा - सर्व्हे रिपोर्ट असेल तुमच्याच केबीनमध्ये...
मोना - ... मि. मेहरा... आय... आय अॅम.. आय कॅन जस्ट थॅन्क यू फॉर धिस इनसाईट.. लेट मी सी...
मेहरा - शुअर... अॅन्ड कॉल मी एनीटाईम फॉर एनी हेल्प... कॅन आय???
मोना - ओह.. शुअर...
मेहरा निघायला उठल्यावर मोना उठून उभी राहिली. हस्तांदोलन झाले तेव्हा मोनाला..
... मेहरांच्या स्पर्शात काहीतरी वेगळे जाणवले.. जे आजवर जाणवलेले नव्हते..
... एक.. एक प्रकारचा धीर... आश्वासन... आधार.. असं काहीतरी.. की?? ते तिच्याच मनाचे खेळ होते हे तिलाच समजत नव्हते...
तब्बल पाच मिनिटांनी तिने गोरेला हाक मारली... आणि हाक मारताना तिच्या पहिल्यांदाच लक्षात आले..
... बिंद्रा आणि जोशीच्या मीटिंगच्यावेळेस इथेच बसून राहिलेला गोरे...
.. मेहरांच्या वेळेस कसा काय आला नाही???
"गोरे... आय नीड द सर्व्हे रिपोर्ट ऑफ द गिअर शेव्हिंग मशीन्स.. आय मीन.. बिफोर दे वेअर पर्चेस्ड..."
गोरे - सर्व्हे... असा.. असा काही रिपोर्ट..... मी पाहिलेला नाही मॅडम..
मोना - तुमच्या बहुधा लक्षात आले नाही किंवा मला नीट सांगता आले नाही.. ती मशीन्स घ्यायचा निर्णय होण्याआधी त्याबाबतची जी काही माहिती होती.. म्हणजे मिळू शकणार्या ऑर्डर्स, मशीनचा हप्ता, मेंटेनन्स, मशीन किती अॅक्युरेट आहे, नवीन येऊ घातलेल्या मशीन्स आणि या मशीन्समधला फरक .. वगैरे..
गोरे - हां हां!... देतो...
गोरे इतका कमी बुद्धीचा असेल यावर विश्वास ठेवता येतच नव्हता. कोणत्या तरी कारणासाठी गोरेला ही फाईल आपल्याला मिळावी असे वाटत नव्हते की काय?
तसे असेल तर का? आणि तसे नसेल तर... आपण उगाचच पुर्वग्रहदुषितपणे बघतोय का??
की... जोशी आणि बिंद्रा खरे बोलत होते.. मेहरा उगाचच आपली दिशाभूल तर करत नसतील??
मोना विचार करत असतानाच तिच्यासमोर फाईल आली..
रटाळ! हा एकच शब्द त्या फाईलचे वर्णन करायला पुरेसा होता.
मशीन्सची ब्रोशर्स, आधीच्या क्लायेंटची लिस्ट, त्यांची सर्टिफिकेट्स, जर्मन कंपनीशी झालेला सगळा करस्पॉन्डन्स...
करस्पॉन्डन्स मात्र डोळ्यात तेल घालून वाचला मोनाने! पण.. कुठेच काही विशेष वाटत नव्हते. एक मूळ ऑफर आली होती. त्यावर अनेक चौकश्या केल्या होत्या हेलिक्सवाल्यांनी! प्रत्येक चौकशीला व्यवस्थित उत्तर आले होते. मग ती चौकशी तांत्रिक बाबींची असो वा आर्थिक!
एका इंटर्नल रिपोर्टमध्ये भारतातील सर्व ऑटो मॅन्युफॅक्चरर्सचा गेल्या तीन वर्षातील उत्पादन डेटा 'अॅक्मा' या संघटनेतून मिळवून लावलेला होता. त्याखाली अनेक कॉमेंट्स होत्या.
नवीन ट्रेन्ड्स होते. पुढील पाच वर्षात वाहनांचे उत्पादन कसे कसे होईल याची काही तज्ञांनी केलेली प्रोजेक्शन्स होती. एक्स्पोर्टला काही पोटेन्शिअल आहे का यावरही भाष्य होते.
फाईव्ह इयर्स प्रोजेक्शन आणि एक्स्पोर्ट्स यावर अर्देशीर, लोहिया आणि डॅड, सगळ्यांच्या कॉमेंट्स होत्या. अनेक ठिकाणी बिंद्रा आणि जोशीच्या कॉमेंट्स होत्या. पर्चेस अॅक्टिव्हिटी असल्यामुळे मेहरांच्या कॉमेंट्स तर अनेक होत्या.
फाईलमध्ये काहीही शंकास्पद नव्हते. उलट, ही मशीन्स घेतल्यामुळे व्यवसायाचे नवीन दालन उघडले जाईल आणि प्रचंड वाढ होईल असेच स्पष्ट होत होते.
अॅक्युरसीबाबत ऑटो मॅन्युफॅक्चरर्स अधिक कॉन्शस झालेले आहेत किंवा त्यांनी तसे होण्यासाठी इतर काही कंपन्यांनी नव्या प्रकारची मशीन्स बनवण्यात यश मिळवलेले आहे असा कुठे उल्लेखही नव्हता.
ही मशीन्स ऑब्सोलेट होण्याच्या मार्गावर आहेत असे एक अक्षरही नव्हते.
गोची! फारच मोठी गोची होती! गुप्ता हेलिक्स सारखी कंपनी, ज्यात स्वतः गुप्ता, लोहिया आणि अर्देशीर आहेत, आणि एकसे एक जानेमाने गिअर मार्केट तज्ञ आहेत.. तेथे एवढी मोठी गोची होतेच कशी??
एल्.सी.ची डॉक्युमेंट्स मोनाने अत्यंत काळजीपुर्वक तपासली. डिलीव्हरी पिरियड आणि कमिटमेंट्सही तपासल्या. डिलीव्हरीला उशीर झाल्यामुळे लोहिया अंकलनी पाठवलेल्या काहीश्या चिडक्या स्वभावाच्या इमेल्सही त्यात होत्या. त्या सर्व इमेल्सच्या कॉपीज डॅड, अर्देशीर आणि मेहरांना होत्या.
काही कारणाने डिलीव्हरी लेट झाली म्हणून हातातून गेलेले फारुख ऑटोचे कॉन्ट्रॅक्ट नेमके कसे गेले याची साद्यंत हकीगत इमेल्सच्या स्वरुपात त्या फायलीत होती. फारुख तर्फे त्यांचे डायरेक्टर जडेजा यांनी संतापून लिहीलेल्या काही इमेल्सही होत्या ज्या डॅडच्या नावे होत्या आणि त्यांच्याही कॉपीज इतर तिघांना होत्या.
त्या इमेल्स लोहियांनी संतापून जर्मन कंपनीला कागदोपत्री पुरावा या अर्थाने पाठवल्याही होत्या. ज्यात ते म्हणाले होते की अशी एकापाठोपाठ एक कॉन्ट्रॅक्ट्स रद्द होत आहेत आमच्या कंपनीची! त्यावर जर्मन कंपनीने जर्मनीत झालेल्या कोणत्यातरी नवीन कायद्याचे पालन करता करता हा उशीर झाल्याचे ठासून सांगीतले होते.
इतकेच! म्हणजे.. जे आत्तापर्यंत कळले इतकेच त्या फाईलमध्ये होते.
असं कसं?? ही मशीन्स काही महिन्यांनी चालणारच नाहीत यावर एक शब्दही नाही?? इव्हन मेहरांचाही?? का? आत्ता आपल्यासमोर अधिकारवाणीने बोलणार्या मेहरांनी त्या फाईलमध्ये एकही इमेल का लिहीली नाही?? आणि?? त्यांच्याबद्दलचे मत डॅड आणि लोहिया अंकल यांच्या दृष्टिकोनातून कलुषित करण्याचे काम नक्की केले कोणी???
फाईल बंद करून मोना अनेक मिनिटे तशीच बसली होती. स्वतःच्या काचेच्या केबीनमधून मधेअधे गोरे तिच्यावर एक नजर टाकत होता. हे तिला डोळ्यांच्या कोपर्यातून जाणवतही होते. पण त्याकडे आत्ता तिचे लक्षच नव्हते.
आत्ता ती संपूर्ण गोष्ट पचवत होती. आटापिटा करून गुप्ता हेलिक्सने घेतलेल्या मशीनच्या डिलीव्हरीला उशीर झाल्यामुळे फारूख ऑटॉचे वार्षिक कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले होते. त्यामुळे सप्लायरवर दिड लाखाचा क्लेम लावण्यात आला होता गुप्ता हेलिक्सकडून! पण मशीन्स आल्यानंतर तीन महिन्यांना आपल्याला कळत आहे की ही मशीन्स आता टू अॅन्ड फोर व्हीलर सेक्टरमध्ये चालतच नाहीत. फक्त जीप्स, ट्रॅक्टर्स आणि ट्रक्सच्या रिप्लेसमेंट्स एवढेच!
गॅप! मोनाला या सगळ्यात काहीतरी मोठी गॅप जाणवत होती. एवढा आटापिटा करून आणलेल्या मशीन्सच्या भवितव्याची जाणीव कुणालाच नसावी?? आणि मेहरांना असल्याचे ते सांगत असतानासुद्धा कुणाच्या तरी इतराच्या सांगण्यावरून डॅड आणि लोहिया अंकल यांनी ते ऐकू नये??
मोनाने पुढच्या संपूर्ण एका तासात ती फाईल लक्षपुर्वक अशी एकूण तीन वेळा अभ्यासली. अभ्यासली म्हणण्यापेक्षा तपासलीच! आधीच्यापेक्षा अधिक लक्षपुर्वक पुढच्या वेळेला! गोरेला काही समजत नव्हते.
आणि निराश होऊन ती फाईल बाजूला ठेवताना...
.... आपण आत्ता नेमके काय बघितले हेच मोनाला समजले नाही... पण... इतके निश्चीत होते... की जे काही बघितले.. नेमके तेच बघण्यासाठी ती ही फाईल गेला एक तास डोळ्यात तेल घालून तपासत होती...
ही बॉक्स फाईल त्यातील कागदांनी गच्च भरल्यामुळे एक कागद उलटून दुसरा कागद बघताना दुसर्या कागदाचा डावीकडचा काही भाग, म्हणजे साधारण वहीचा समास असतो असा काही भाग.. लपत होता..
ताकद लावून तो ओढून पाहावा लागत होता. पण बहुतांशी कागदांवरच्या त्या भागामध्ये काहीच महत्वाचे लिहीलेले नसल्यामुळे तो लपलेला भाग मोना दुर्लक्षितच ठेवत होती...
पण... आत्ता ती फाईल चिडून बंद करताना अचानकच... तिला एका कागदाच्या वर्..त्या नॉर्मली लपणार्या डावीकडच्या भागात... पंचीगच्या भोकांमध्ये अजूनही अडकलेला... एक पिवळ्या रंगाच्या कागदाचा भाग दिसला...
हा पिवळा कागद म्हणजे एक भाग चिकट असलेले छोटे छोटे कागद जसे साहेब लोकांकडे असतात... जे ते एखाद्या फाईलवर चिकटवून त्यावर 'प्लीज स्पीक टू मी ऑन धिस' स्वरुपाचे संदेश लिहून सहकार्यांकडे पाठवतात.. तसा पण खूपच मोठा होता...
मोनालिसाने अत्यंत घाईघाईने ती फाईल ताकदीने पुन्हा तपासली...
... एकंदर सहा ठिकाणी असे फाटलेल्या कागदांचे अवशेष मिळाले...
तिची स्वतःची केबीन डोळ्यांसमोर गरगरत होती तिच्या... कारण.. तिला व्यवस्थित माहीत होतं....
लहानपणी चित्रं काढायला किंवा कुणालातरी चिठ्ठी वगैरे लिहायला ती डॅडकडून जेव्हा कोरा कागद मागायची.. तेव्हा गुप्ता हेलिक्सचे सर्वेसर्वा मोहन गुप्ता तिला जे कागद द्यायचे... नेमक्या तश्याच कागदांचे अवशेष होते हे... आइ तिला हेही माहीत होतं... की अशी राइटिंग पॅड्स घरात भरपूर पडलेली आहेत...
बहुतेक..... बहुतेक की नक्कीच?? नक्कीच असणार....
नक्कीच या सहा कागदांवर डॅडनी काहीतरी लिहिलेले असणार जे आत्ता तिथे नव्हते... आणि ते आत्ता तिथे नसण्याचे कारण 'चुकून फाटणे', 'डॅडनी स्वतः काढणे' किंवा 'कुणीतरी हेतूपुरस्पर फाडणे' यातील काय आहे हे तिला माहीत नसले तरी तिला तिसरी शक्यताच जास्त वाटत होती...
मोनालिसा गुप्ता.. एक पंचवीस वर्षांची तरुणी... एका मरण पावलेल्या नवकोट नारायणाची एकुलती एक व आईविना वाढलेली मुलगी.. जी केवळ वडिलांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्यासाठी सबकुछ असलेल्या या धंद्याला त्यांच्या पद्धतीने चालवण्यासाठी यात उडी मारून आली होती तर खरी... पण.. ज्यात उडी मारली ते बाउन्सिंग नेट होते, काटेरी पृष्ठभाग होता की दलदल होती हे उडी मारण्याआधी तिला माहीत नव्हते...
काहीच न सुचल्यामुळे तिने एक फोन लावला. नंबर तिने स्वतःच शोधला होता. जर्मन मशीन सप्लायरचा! त्या फाईलमधून!
" हॅलो "
" हाय.. कॅन आय स्पीक टू... मिस्टर रोलियो??
"यू मीन.. मिस रोलियो??"
"ओह.. या .. मिस रोलियो..."
"हू इज न द लाईन??"
"मोनालिसा... इन्डिया.."
" नाईस नेम.. हॅन्ग ऑन..."
..............
"हाय... हूज दॅट??"
"रोलियो??...
"रोलियो हिअ... हूज दॅट??"
"मोनालिसा... मोना गुप्ता.. फ्रॉम ईन्डिया... गुप्ता हेलिक्स..."
"........ "
".... हेलो.... रोलियो... आर यू देअ??"
"या... शूट..."
"वुई... वुई आर टेकिंग बॅक द क्लेम... माय डॅड पास्ड अवे... आय अॅम हेडिंग द ऑर्गनायझेशन नाऊ..वूड यू... डेप्यूट समवन टू कमिशन द मशीन्स???"
" ... हे... वेल... आय डोन्ट नो हू यू आर... इन केस यू हॅव एनिथिंग इम्पॉर्टन्ट लाईक धिस टू बी इन्फॉर्म्ड टू... यू नीड टू गिव्ह अस अ मेल कन्फर्मिंग दॅट... अॅन्ड अपार्ट फ्रॉम दॅट... धिस इज नो वे अॅन अॅश्युअरन्स दॅट वुई कूड हेल्प यू गाईज अॅट ऑल.. गेटिंग मी?? "
खट्ट!
म्हणजे क्लेम नक्कीच सिरियसली घेतला होता त्या कंपनीने! प्रकरण किरकोळ नव्हते. हरकत नाही. रिटन कन्फर्मेशन मात्र लोहिया अंकलना विचारल्याशिवाय आपण देणे हा फार मोठा घोळ होऊ शकेल.
मोनाने समोरच्या कंप्यूटरवर 'गुप्ताहेलिक्स.कॉम' साईट उघडली. 'इन्ट्रानेट'वर क्लिक केल्यावर युझरनेम पासवर्डची विन्डो आली.
मोहनगुप्ता@गुप्ताहेलिक्स.कॉम हे युझरनेम तिला माहीत होते. प्रश्न पासवर्डचा होता.
व्हॉट कुड बी डॅड्स पासवर्ड??
या स्थानावरचा माणूस, ज्याला चोवीस तास एक पी.ए. असतो, त्याचा पासवर्ड फारच साधा असणार! कारण सगळा विश्वास पी.ए.वर! अर्थात, गोरेला तो पासवर्ड माहीत असेलच! पण गोरेला तिसर्याच दिवशी आपण पासवर्ड विचारणे जरा विचित्र होईल का? हरकत नाही, विचित्र झाले तरी काय? आपले वडीलच होते ते!
"गोरे... डॅडचा पासवर्ड काय होता?? इन्ट्रानेट??"
"अं... मायबेटीमोना१९८०"
"मा..य...बे..टी..टी आय की टी डबल ई??"
"टी आय.."
"मो.. ना... १९८०.."
मोहन गुप्तांची मेलबॉक्स उघडली.
झिरो!
झिरो मेल्स इन इनबॉक्स... झिरो इन ड्राफ्ट्स... झिरो मेल्स इन सेन्ट मेल्स..
"हे काय गोरे??"
"काय झाले??
"एकही मेल कशी नाही???"
"ओह.. सर कधीच मेल सेव्ह करायचे नाहीत..."
"का?????"
"माहीत नाही.. सवय होती त्यांना... "
"का पण?? इतक्या इम्पॉर्टन्ट मेल्स असतील त्या..."
"अॅक्चुअली.. ते सगळ्या मेल्स मला फॉरवर्ड करायचे अन त्यांच्या मेलबॉक्समधून डिलीट करायचे..."
"का??"
"आय मीन... आय युज्ड टू करस्पॉन्ड ऑन हिज बिहाफ ना??"
"ओह... कॅन यू... फॉरवर्ड ऑल दोज इमेल्स टू मी???"
"... सगळ्या?? किमान चार हजार असतील... एवढ्या सगळ्या करायच्या आहेत???"
"इट्स ओके.. हिअर ऑन आय विल कीप द मेल्स विथ मी..."
"शुअर मॅम.. तसाही.. आता आपला स्वतःचाही एक आय डी झलेलाच आहे.. मोनागुप्ता असा.."
"व्हॉट्स द पासवर्ड?? "
"तो मीच एच आर कडून करून घेतल्यामुळे सध्या मी पासवर्ड मोहनडॅड असा ठेवल आहे.. "
"ओके.."
"आपण तो बदलावात.. "
"हं.. बाय द वे... मेहरा आणि डॅड.. एकमेकांचे खूप चांगले मित्र होते का??"
अचानक गोरेचा चेहरा बदलला. त्यावर खूप आश्चर्य जमा झाले.
"मेहरासाहेब?? ... छे... म्हणजे... अजिबातच नाही...इन फॅक्ट.. "
"येस??"
"इन फॅक्ट.. त्यांचे मतभेद व्हायचे..."
"कशावरून??"
"ऑपरेशन्स वरून वगैरे... स्पेशली.. रॉ मटेरिअल सप्लाय डिस्टर्ब झाला की..."
"ओह... ओके देन... आय अॅम लिव्हिन्ग.. ही फाईल उद्या ऑफीसला आणते..."
"शुअर मॅम.. हॅव अ नाईस डे.."
"थॅन्क्स... "
घरी आलेल्या मोनाला मानसिक थकवा अधिक जाणवत होता. काही समजत नव्हते. खरे तर आपण इतके खोलात शिरायची काही गरजच नाही हेही समजत होते. नुसत्या सह्या केल्या तरीकंपनी व्यवस्थित चालेलच हे कळत होते. पण डॅडचे स्वप्न, त्यांच्या पद्धतीने कंपनी चालणे हे महत्वाचे होते. आणि मुख्य म्हणजे, आपण स्वतः असताना लोहिया अंकल आणि अर्देशीर सर या दोघांनी कंपनी चालवावी आणि गुप्ता हेलिक्समध्ये गुप्तांच्या स्वतःच्य रक्ताची व्यक्तीच नसावी हे शोभलेही नसते.
डोंगराएवढी जबाबदारी घेऊन बसलो आहोत आणि आपल्याकडे ताकदी फक्त दोनच आहेत. शेअर्स आणि गुप्तांची मुलगी असणे ही फॅक्ट!
"सायरा SSSSSS"
सायरा! एक पस्तीशीची स्त्री! जी गेली दहा वर्षे बंगल्यावर केअर टेकर म्हणून होती, ती एकटीच होती. मोनालिसाला ती मोनाच्या अल्लड वयापासून ओळखत होती. मात्र तरीही दोघींमधले नाते मालकिण व कामाला ठेवलेली बाई असेच राहिले होते. याचे कारण सायराला माहीत होते. मोनालिसा काही झाले तरी एका अगडबंब इस्टेट असलेल्या माणसाची एकमेव मुलगी आहे. त्यामुळे ती मोनाला जरा वचकूनच असायची. पण मोना बेसिकली स्वभावाने चांगली असल्याचे समजल्यावर सायराचे तिच्यावर प्रेम बसले होते. सायराही स्वभावाने शिस्तप्रिय आणि खरोखरच्ज 'केअर टेकर' होती.
"येस मॅम??"
"गेट मी अ ड्रिन्क प्लीज... "
"शुअर... विच वन मॅम??"
"एनिथिंग.. "
गुप्ताजी स्कॉच घ्यायचे. पण घरातल्या बारमध्ये सर्व प्रकार होते. सायराने आज पहिल्यांदाच मोनालिसासाठी ड्रिन्क बनवले. गुप्ताजींसाठी बनवायची त्यापेक्षा थोडे माईल्ड! पण स्कॉचच! तिच्या दृष्टीने आता गुप्ता सरांची जागा मोनाने घेतली होती आणि त्यामुळे मोना आता खूप मोठी झालेली होती.
"मॅम... "
"थॅन्क्स.. आणि साडे आठला जेवण लाव... आय अॅम वर्किंग.. डोन्ट डिस्टर्ब नाऊ.. ओके??"
"येस मॅम.. "
"अॅन्ड रिपीट द ड्रिन्क आफ्टर हाफ अॅन हवर ऑर सो.. "
"राईट मॅम.."
आणि अर्ध्या तासाने ड्रिन्क रिपीट व्हायची वेळ आलेली होती तेव्हा सायराला मोनालिसाचा चेहरा कधी नव्हे इतका गंभीर दिसल होता. चरकलीच होती ती!
होणारच तसा चेहरा!
फायलीतले पिवळ्या कागदांचे अवशेष डॅडच्या कागदांशी जुळले तर होतेच... पण... डॅडचे घरातले कागद शोधता शोधता त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीलेला एक कागदही एका 'कॉन्फिडेन्शिअल' असे लिहिलेल्या कागदीच पाकिटात मिळाला होता...
त्यावर लिहीले होते...
"सुबोध.. अर्जन्टली फ्लाय टू जपॅन अॅन्ड मीट ओकुहामा.. दे हॅव द न्यू टाईप ऑफ गिअर शेव्हिन्ग मशीन्स.. अॅन्ड... डोन्ट डिस्क्लोज धिस अॅट ऑल.. वुई कान्ट बी ट्रॅप्ड लाईक धिस... "
सुन्न!
मोनालिसा सुन्न झालेली होती.
या चिठ्ठीचे दोन अर्थ तिला लगेच समजले होते आणि तिसरा अर्थ हळूहळू भिनणार्या स्कॉचसारखा हळूहऊ डोक्यात प्रवेशत होता...
एक म्हणजे.. डॅडना ती जर्मन मशीन्स नकोच होती...
.... दुसरे म्हणजे... सुबोधवर त्यांचा.. लोहिया अंकल, अर्देशीर सर आणि जतीनपेक्षाही अधिक विश्वास होता...
... आणि तिसरा.. हळूहळू मेंदूत प्रवेशलेला अर्थ.....
.... या घरातून ही चिठ्ठी... कधी बाहेरच पडली नव्हती...
नवीन ड्रिन्क बनवून समोर उभ्या राहिलेल्या सायराकडे तिने तब्बल पाच, सहा सेकंदांनी पाहिले..
ड्रिन्क हातात घेऊन ती पाठमोरी होऊन निघून जात असलेल्या सायराकडे पाहात होती....
... आणि तिच्या मनात विचार आला...
अॅट होम... हू वॉज सो क्लोज टू डॅड... एक्सेप्ट मी???
आणि मग... अंतर्मनाने स्वतःला वाटले ते उत्तर उगाचच एकदा देऊन बघितले...
'डॅडना .. माझ्यापेक्षा... सायरा तर क्लोज नव्हती... की.. इतरच कुणालातरी ती क्लोज होती???'
वाटच पहात होतो..
अरे व्वा......... सावरी
अरे व्वा.........
सावरी
अरे व्वा..... आज पन तीसरा...
अरे व्वा.....
आज पन तीसरा...
खुपच छान बेफिकिरजी.
धन्यवाद..
भन्नाट
भन्नाट
हम्म कथा चांगलीच पकड घेत आहे,
हम्म कथा चांगलीच पकड घेत आहे, आभारी आहे बेफिकीर साहेब.. १०/१०
सॉलिड...मस्त
सॉलिड...मस्त
आजचा भाग झक्कास!!!
आजचा भाग झक्कास!!!
मस्त वाटला आजचा भाग !!!! पु.
मस्त वाटला आजचा भाग !!!!
पु. ले. शु.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
थक्क झाले....... छान
थक्क झाले.......
छान वेग........
सावरी
अतिशय सुंदर आणि वेगळा विषय
अतिशय सुंदर आणि वेगळा विषय घेतला आहे बेफिकिर तुम्ही.... खुप छान वाटते आहे वाचताना...
पु.ले.शु.
छान !!!!!!!!!!
छान !!!!!!!!!!
सहिच. छान चाललि आहे हि देखिल
सहिच. छान चाललि आहे हि देखिल कथा. पुढिल भागांची वाट पाहणे चालु झालेय परत.
सहि, मजा आलि वाचायला.
सहि, मजा आलि वाचायला.
बेफिकीर तुम्ही खुप छान
बेफिकीर तुम्ही खुप छान लिहिताहात.
तुम्ही कधी या industry मध्ये काम केले होते का?
बेफिकीर तुम्ही खुप छान
बेफिकीर तुम्ही खुप छान लिहिताहात.
तुम्ही कधी या industry मध्ये काम केले होते का?
होय, मी गिअरबॉक्सेस विकायचो
होय, मी गिअरबॉक्सेस विकायचो दोन वर्षं!
सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!
सही! मस्त जमलीय.
सही! मस्त जमलीय.
जबर्दस्त जमलयं .... बहुतेक
जबर्दस्त जमलयं .... बहुतेक याची भट्टी सगळ्यात छान जमेल असं वाटतय....
मस्तय...
मस्तय...
खुपच मस्त! शब्द नाहए बोलायला!
खुपच मस्त! शब्द नाहए बोलायला!
आवडला आजचा भाग ...........
आवडला आजचा भाग ...........
छान आहे , मजा येतेय वाचायला.
छान आहे , मजा येतेय वाचायला.
बॉस..... हॅट्स ऑफ.......,
बॉस..... हॅट्स ऑफ......., जरुर, दाल कुछ काला हे. मोनालिसा काहितरि भयानक शतरंज चि शिकार होणार हे नक्कि. आणि ति त्यातुन खुप काहि शिकेल हे हि आलेच आणि फायनलि ति सर्वांना (वाईट पॉलिटिक्स वाल्यांना)शह देईल. मज्जा येतेय हे वाचतांना, येऊदेत पुढ्चा भाग, लवकर..........

बेफिकीर ... मी काही फार मोठा
बेफिकीर ... मी काही फार मोठा पंखा नाहीये ... पण वाचक नक्कीच आहे ...
तुमच्या कथांमध्ये ज्या चुका असतात त्या सलग लिहिल्यामुळे आणि प्रूफ रीडिंग न झाल्यामुळे कधी कधी असतात ... तुम्ही लगे पु.ल. किंवा व.पु. व्हावे अशी मी अपेक्षा करत नाही.
मला तुमच्या कथा वाचायला आवडते ... मी पुढचा भाग वाचायला मिळावा अशी रास्त अपेक्षाही करतो.
तुम्ही मध्यरात्री पुढचा भाग टाकणार होतात ...
इथल्या भांडणांमुळे तुमचा पर्फोर्मंस जर लो झाला तर एक वाचक म्हणून मला नक्कीच खेद होईल.
ता.क.
मला एक कळत नाही ... आपल्याला लेखनाबद्दल घेणेदेणे असावे ... लेखक वैयक्तिक आयुष्यात काळा की गोरा याने काय फरक पडतो ??
अरे हे काय आजही नवीन भाग
अरे हे काय आजही नवीन भाग नाही?
सावरी
धन्य! Corporate Culture इतकं
धन्य! Corporate Culture इतकं छान लिहित आहात! Really astonishing! Shaved Gears बद्दल वाचुन Engineering मधील Machine Design चे आमच्या सरांचे फन्डे आठवले!!..बाकी तुमच्या लेखनातील विविधता खरच भावली!! लिहीत रहा असच!
आत्ता हा भाग वाचणे झाले...
आत्ता हा भाग वाचणे झाले... जबरी, उत्कंठावर्धक कथा...कोर्पोरेट वर्ल्डची छान ओळख करुन दिलीत...
पहिल्या कादंबरीमधली मीना आणि ह्या कादंबरीमधली मोना... ती ही नायिका आणि हि ही... दोघींमध्ये नामसाधर्म्य तर आहेच, शिवाय कर्तबगारी पण सारखीच... किंबहुना मोनाची जरा जास्तच असावी ह्याचा अंदाज आला...
आत्तापर्यंतच्या विषयांपेक्षा अगदीच वेगळ्या धाटणीची ही कथा दिसते आहे...मस्त लिहिलेत... धन्यवाद!
या कादंबरीचा पहीला भाग कुठे
या कादंबरीचा पहीला भाग कुठे मिळेल??
पहिला भाग मिळत नाही आहे..
पहिला भाग मिळत नाही आहे.. कुणी मदत करील का?
Pages