पोटात गडबड.....बघ माझी आठवण येते का... (गारवा)

Submitted by स्थितप्रज्ञ on 26 October, 2010 - 05:24

पहाटेच पोटात गडबड होईल, उठून बसून पहा
बघ माझी आठवण येते का...

आतल्या खोलीत जा, पिऊन बघ दोन घोट पाणी
करपट ढेकर येईल तुला
बघ माझी आठवण येते का...

व्हरांड्यात ये, गार वारा अंगावर घे
डोळे मिटून घे, थोडे शांत वाटेल
आलीच कळ पोटातून तर बाहेर पड

टिनपाट घेवून मागे ये, नंबर लागलेले असतीलच
तिथेच उभी राहा, जमीन सरकेल पायाखालून
बघ माझी आठवण येते का

आता चालू लाग, स्वताशीच अखंड बडबड कर
शिव्या घालत राहा वडेवाल्याला, कळ वाढेपर्यंत
ती थांबणार नाहीच, शेवटी घरी ये
कपडे बदलू नकोस, घाम पुसू नकोस

पुन्हा दोन घोट पाणी घे
आणि पोट धरून बसून राहा
बघ माझी आठवण येते का...

दारावर बेल वाजेल, दार उघड भैय्या असेल
त्याच्या हातातली पिशवी घे, पेपर तो स्वताच टाकेल
तो विचारील "दीदी तबियत ठीक नही क्या?", तू म्हण पोट दुखतंय

मग दार लाव, दूध तापवायला ठेव
"तो" उठून चहा मागेल तू म्हण तयार होतोय
त्याला गरम चहा पाज
बघ माझी आठवण येते का...

आता सकाळ होईल, तो तुला कुशीत घेईल
म्हणेल तू छान दिसतेस, तुझ्या पोटात अजून कळ येईल
विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, तू ह्या कुशीवर वळ
त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का...

या नंतर नंबर ची पर्वा न करता धावत जा
लोकांच्या शिव्या न ऐकण्याचा प्रयत्न कर

घरी आल्यावर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी, वडापाव खाताना,
बघ... माझी आठवण येते का...

- संदीप खांदेवाले (कवी सौमित्र यांची क्षमा मागून)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिनपाट घेवून मागे ये, नंबर लागलेले असतीलच
तिथेच उभी राहा, जमीन सरकेल पायाखालून

हे जाम आवडले...:हाहा: