"कण्हा" - एका सोफ्ट वेअर इंजिनीअर ची कहाणी

Submitted by स्थितप्रज्ञ on 26 October, 2010 - 05:22

ओळखलत का साहेब मला केबिन मध्ये आला कोणी
मळकी कापड अंगावर डोळ्यावर जाड ढापणी

मटकन बसला मलूल हसला विव्हळला वरती पाहून
"दिवाळी आली जवळ, जरा गावाला येतो जाऊन"

सुट्टी विना राबलो तीन महिने झाले
तुम्ही बायको संगे दोनदा केरळला जाऊन आले

दर दिवशी client req changes चा धो धो पाउस पडतो
आजचा ओपन टास्क लॉग कालच्याला लाज आणतो

सगळ्या टीम संगे आता प्रोजेक्ट्शी लढतो आहे
जुने बग्स काढतो आहे, टेस्ट वर टेस्ट करतो आहे.

फोन कडे हात जाताच कण्हत कण्हत उठला
HR नको सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार आणि मोडला कधीच कणा
तरी कमरेत लाथ घालून तुम्ही "code" म्हणा

- संदीप खांदेवाले (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)

गुलमोहर: 

संदिप, फारच छान जमल आहे विडंबन Happy

>>फोन कडे हात जाताच कण्हत कण्हत उठला
>>HR नको सर जरा एकटेपणा वाटला
Lol Lol Lol

छान Happy

फोन कडे हात जाताच कण्हत कण्हत उठला
HR नको सर जरा एकटेपणा वाटला

सांगता ही येत नाही सहन ही होत नाही. सही जमलय रे! Happy

thanks all!

छान

मस्त

Pages