तू...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

तू...

खिडकीच्या गजागजातून
तू माझ्या घरात शिरतोस
हळूचं हृदयात उतरतोस
माझ्या नसानसात भिनतोस
मध्यरात्रीची झोप घालवतोस
दुलईतली ऊब चोरतोस
मालवलेल्या स्वप्नांना उठवतोस
चांदण्याची आरास मांडतोस
पहाटेच्या दवात विरघळतोस
माझ्या मनातला चंद्र...
तू जेंव्हा अवचित ग्रासतोस
मी निर्मिलेलं आभाळ मग
माझ्यावरचं कोसळवतोस!!!

प्रकार: