कार्यक्रम - नाव नोंदणी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कार्यक्रम (event) हा लेखनप्रकार आता सर्व ग्रूपमध्ये उपलब्ध केला आहे. तसेच त्यात नाव नोंदणीची नवीन सुविधा देण्यात आली आहे.

जर तुम्ही त्या कार्यक्रमात सहभागी होणार असाल तर त्या धाग्यावर नाव नोंदणीमध्ये आपले नाव नोंदवा. तुमचे मायबोली सदस्य नाव तिथे आपोआप दिसेल. तुमच्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती (मायबोलीकर नसलेले) येणार असल्यास तिथे लिहू शकता. फोन नंबर ऐच्छीक आहे.

तुम्ही नाव नोंदणी केल्यावर तुम्हाला एक इमेल येईल तसेच कार्यक्रमाच्या एक दिवस आधी आठवणीसाठी एक इमेल मिळेल.

तुमच्या सदस्य खात्यात एक नवीन टॅब दिसू लागला आहे. बर्‍याच जणांनी हे काय आहे ते विचारले आहे. तर तुम्ही ज्या कार्यक्रमात नाव नोंदवले असेल ते कार्यक्रम तिथे दिसू लागतील.

विषय: 
प्रकार: 

अ‍ॅडमिन ही फार मस्त सुविधा दिलीत... ववि, तसेच निरनिराळ्या शहरातल्या ए.वि.ए.ठि साठी ह्याचा चांगला उपयोग होईल.. शक्य झाल्यास टी-शर्ट बुकींग साठी पण ही सुविधा वापरता येऊ शकेल..
धन्यवाद...

व्वा, भारी हे सुविधा ही Happy मस्तच!
फक्त, अ‍ॅव्हेलेबल या बटनावर क्लिक केले अस्ता
>>>>>Congratulations, you have replied to all of the content on the site that is accepting signups.
हे वाक्य आले, त्याचा अर्थच लागला नाही काही!

>>>> 'गटग'ना प्रशासनाकडून प्रोत्साहन <<<
प्रोत्साहन की काय नाही सान्गता यायचे, Happy
पण नको त्या अवसानघातकी प्रश्नातून सन्योजकान्ची सुटका नक्की!
शिवाय, येणार पेक्षा मी कसा नाही येणार हेच सान्गणार्‍या पोस्टीना आपोआप लगाम! नै? Wink

चांगली सुविधा आहे.
पण न येणार्‍यांच्या चर्चांशिवाय ईव्हेन्ट प्लॅनिंगची काय मजा? Proud

>>>. छान सुविधा!! पण आम्हा "टांगारु" जमातीला कामाची नाही!
अस कस म्हणतोस भ्रमा?
उलट "रजिस्टर" करुन "टान्ग मारण्यात" अधिक थ्रील आहे असे नाही वाटत तुला? Wink

उलट "रजिस्टर" करुन "टान्ग मारण्यात" अधिक थ्रील आहे असे नाही वाटत तुला? >>> Lol 'टांगारू' या पदवीसाठी हेच तर क्वालिफिकेशन आहे.

बाकी, या सुविधेचा सर्वात मोठा उपयोग पुढच्या वविला होईल. Happy

चांगली सुविधा. समजा, नाव नोंदणी केले असेल आणि काही कारणाने नाव काढून घ्यायचे असेल, तर तेही करता येते का? येत असल्यास कसे? नसल्यास, तीही सुविधा देता येऊ शकेल का?

नविन कार्यक्रमाचं पान उघडताना ठिकाण/पत्ता इथे लिहिलेलं काही बोल्ड केलं तर पोस्ट झाल्यावर ते बोल्ड दिसत नाहीये.

बाकी ही सुविधा मस्तच आहे.

अ‍ॅडमिनांस विनंती...

नवनोंदणी धाग्यावर जी वेळ दिसते तिच्यापुढे तुमच्या माबो सदस्यत्त्वात ठरवलेल्या Time Zone ची वेळ असा Disclaimer टाकावा.. बहुतेक प्रत्येक नावनोंदणी धाग्यात हा दोन दोन वेळा दिसण्याचा घोळ झालेला आहे..

प्रत्येक जण धागा बनवताना वरती वेळ सिलेक्ट करतोच पण त्याच बरोबर खालती मजकूरात देखील वेळ लिहितो आणि त्यामुळे अजूनच गोंधळ होतो..

सहज शक्य असल्यास वरील सूचनेचा नक्की विचार करावा..