सोनटक्का: पांढरा व पिवळासुद्धा, गोकर्ण: निळा, पांढरा व आकाशीसुद्धा......................

Submitted by भालचन्द्र on 24 October, 2010 - 12:04

सोनटक्का व गोकर्ण: थोड्याशा निराळ्या रंगांची फुले !

IMG_0674_0.JPGDSCN7516.JPGDSCN7484.JPGDSCN7486.JPGIMG_1247.JPGIMG_1067.JPGIMG_1068.JPGIMG_0732.JPG

गुलमोहर: 

वा! Happy

सुरेखच! पिवळा सोनटक्का जरा जास्तच पिवळा का दिसतोय? तो हलका पिवळा, सोनेरी असा असतो ना? माहेरी दोन्ही प्रकारचे सोनटक्के होते. काय सुवास असतो. अहाहाहा.....
रच्याकने, हे दोन्ही सोनटक्के मॉरेशसमध्ये भरपूर प्रमाणात अगदि जंगली वनस्पतीसारखे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेले दिसतात.

व्वाह!!! सगळीच फुले अ प्र ति म!!!!!
प्रचि ७ खुप खुप आवडले Happy

पिवळ्या रंगाचा सोनटक्का पहिल्यांदाच पाहिला.

शेवटचा फोटो.. एकदम क्लास.. जाम आवडला... तीन निरागस पिल्लं .. दवात न्हाहून पहुडल्यासारखी वाटतायेत..

मस्त

सोनटक्का(White butterfly ginger lily): काय सुंदर आठवण दिली ह्या फुलाने. आईचे आणखी एक आवडते फूल. ती अनंत,प्राज्क्त, सोनचाफा, मोगरा व सोनटक्का ह्यांना अगदी खूप जपायची. इथे येताना ती झाडे आणू शकलो नाही म्हणून खूप उदास झालेली.

मला कोणी सांगेल का इथे अमेरीकेत हे झाड मिळते का?(सोनटक्का?)

सुंदर फोटो. सोनटक्क्यात हा पिवळा रंग मी बघितलाच नव्हता.
भालचंद्र, गुलाबी (राणी) रंगाची गोकर्ण कुठे दिसली तर नजर ठेवा. फार दुर्मिळ झालीत ती आता.

ग्रेट फोटो.. पिवळा सोनटक्का पाहिलाय तो अगदी फिकट पिवळा, ऑफ व्हाईट म्हणता येईल असा. इतका पिवळा पहिल्यांदाच पाहिलाय..

(रच्याकने एक रोप मिळेल का हो??)

रच्याकने, हे दोन्ही सोनटक्के मॉरेशसमध्ये भरपूर प्रमाणात अगदि जंगली वनस्पतीसारखे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेले दिसतात.>>
हो हो अगदी रान आहे रान सोनटक्क्यांच (आम्ही त्याला सोलीया म्हणतो) तिथे.

हल्ली रस्त्यावर खुप निळा गोकर्ण फुललेला दिसतो.
माझ्याकडे पांढरा सोनटक्का आहे. पिवळाही होता गेला तो आता.

व्वा!! अप्रतिम... Happy
खुप दिवसांनी बघितले गोकर्णाचे फूल... धन्यवाद. Happy

माझी अतिशय आवडती फुलं आहेत दोन्ही. सोनटक्क्याचा वास तर मला फार आवडातो. माझ्या आजीने लावल होत झाड. पिवळा सोनटक्का कधी बघितला न्हवता. तुमच्या फोटोत बघितला. खुप छान दिसतोय हा पण रंग.