आत्महत्या

Submitted by बाळकवी on 24 October, 2010 - 02:33

मित्रहो,
मी बाळ श्रीरंग घैसास.४७ वर्षे वयाचा एक शिक्षक आहे. शाळेत अर्धवेळ शिक्षकी व एका खाजगी शिकवणी वर्गात शिकवण्याचं काम करतो. मी बी.ए.,बी.एड.आहे. माझ्या कुटुंबात माझे वडील्,आई व एक मतिमंद बहीण आहे.वडील भिक्षुकी करायचे व त्यांचेपश्चात परंपरेने मी ही भिक्षुकी करतो. आई ,वडील व बहीणीची आबाळ होवू नये म्हणून मी विवाह केला नाही.गेली कित्येक वर्षे माझी आई अंथरुणास खिळून आहे. आईची किडनी काम करत नाही.दोन ते अडिच महिन्यांनी आईस डायलिसिस करावा लागतो.देसाई गाव ते '' कौशल्य'' हॉस्पीटल्,ठाणे आईला नेणे हे दिव्य मला दर दोन -अडिच महिन्याने पार पाडावे लागते.मी यास दिव्य म्हणतोय कारण अँब्युलन्स मिळविणे,आईला त्यात ठेवणे ( आईचे वजन ९०-९२ किलो आहे ),हॉस्पीटलात तिला स्ट्रेचरवर उतरवणे,डायलिसिस साठी लागल्यास रक्त मिळविणे,पुन्हा परत येणे,हे माझ्यासारख्या शरीराने किरकोळ व्यक्तीस फार जिकिरीचे होते.

माझे वडील गुडघेदुखीने सतत आजारी असतात.त्यांचे जेवण व इतर सगळं मलाच करावं लागतं. बहीण मतिमंद असून तिचे वर सतत लक्ष ठेवावे लागते.ती झोपलेलि असताना फक्त तिचा काहीच त्रास नसतो,अन्यथा ती फार जोरजोराने बडबडत असते व अकारण रडू लागते.

जी गोष्ट मला लिहायची नव्हती,ती सुद्धा लिहीतोय्,की ती ऋतुमती असताना तिची सर्व प्रकारची स्व्च्छता मलाच पहावि लागते. असो.

वरील सर्व गोष्टीं मुळे मला बर्‍याचदा खूप नैराश्य येते.माझ्या शाळेत माझी बरेच जण हेटाळणी करतात्,पैसे अपुरे पडतात.मानसिक ताण असह्य होवून मी २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.पण बहीणीचा निरागस चेहरा,तिची जगण्या ची दुर्दम्य इच्छा शक्ती यामुळे मी दोन ही वेळेस परत आलो.

आत्महत्या करणे हे भेकड पणाचे लक्षण आहे हे जरी खरे असले तरी बर्‍याचदा मला असे वाटते की माझे कुटुंबिय नसते तर कदाचित मी आत्महत्या करण्यात सफल झालो असतो.

असो. आत्महत्या या विषयावर आपणां सर्वांचे मत जाणून घेणे आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

!@##!$%@#$%@ <<< बस हेच माझं प्रामाणिक मत ... ! अगदी प्रामाणिक.. नशिबापेक्षा आपण आपल्या कर्तृत्वावर विचार करून योग्य तो बदल घडवून आणालात तर मृत्यू यायचा तेव्हा येऊद्यात ना.. उलट तुमचं कार्य पाहून तो सुद्धा बुचकळ्यात पडेल.. कि याला न्यायचं का नाही..?

<<<आत्महत्या करणे हे भेकड पणाचे लक्षण आहे हे जरी खरे असले तरी बर्‍याचदा मला असे वाटते की माझे कुटुंबिय नसते तर कदाचित मी आत्महत्या करण्यात सफल झालो असतो. >>>

आपले कुटुंबिय नसते किंवा कुटुंबियांवर आणि पर्यायाने आपल्यावर अशी परिस्थिती ओढवली नसती तर कदाचित आपण आत्महत्येचे प्रयत्नही केलेच नसतेत......... सफल होणे दूरची गोष्ट आहे.

बाळकवी, सर्वप्रथम आपल्याला सलाम.

आयुष्याचा मार्ग खडतर आहे हे दिसत असताना त्यावर चालत रहाण्याला एक मानसिक बळ लागते. हि ही एकप्रकारची तपश्चर्याच. ह्यामुळे माणसास निश्चितच मानसिक बळ प्राप्त होते.

अधिक काय लिहू, ह्यापुढील ह्या धाग्यावर होणार्‍या चर्चेत भाग घेईनच.

तुमच्या पुढे अडचणी खुप आहेत हे दिसतयं,पण शेवटी याला जबाबदार तुम्ही एकटेच आहात का ?
शेवटी तुम्हीच एकटे कमावते (घर चालवणारे) आहात तेव्हा,स्व:त आत्महत्या करण्यापेक्षा काही गोष्टींचा त्याग करणं एक वेळ ठिक होईल, कुणा नातेवाईकांची मदत घेता येईल.

खरोखर सलाम बाळजी ! निशब्द.. ! :आओ:
पहिल्यांदा प्रतिसाद दिला होता त्या बद्दल क्षमस्व.. ! कारण फक्त त्या "आत्महत्या" या शब्दावर भयं कर चिड आहे मला. पण तुमच्या आयुष्याचा एकंदरीत प्रवास वाचल्यावर .. खाडकन मुस्काटात बसली..हो !

पण आत्महत्या नकोच ! :आओ:

तुमची परिस्थीती वाईट आहे मान्य Sad पण आत्महत्येनंतर होणाय्रा परिस्थीतीचा विचार करा... It will be worst ....म्हणुन आत्महत्या नकोच

बाळकवी,
सगळ्यांच्याच आयुष्यात खडतर वर्षे येतात.. पण मग ती जातातही हे लक्षात ठेवा. हा एक bad patch आहे आणि तो जाणारच यावर, स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. मला माहित आहे हे सांगणे सोपे आहे. पण तसंही पाहिलं तर प्रत्येकाला आपापली दु:खं मोठी वाटतात आणि दुसर्‍याची लहान वाटतात. तेव्हा तुमच्या दु:खाचा दुसर्‍याच्या दृष्टिकोनातून विचार करता आला तर? स्वतःच्याकडे तटस्थतेने बघता आले तर? आपण आपली तुलना नेहेमी आपल्यापेक्षा जास्त मिळालेल्या व्यक्तींशी करतो आणि दु:खी होतो. पण आपल्या दु:खाची assessment करताना, नेहमी आपल्यापेक्षा कमी दु:खी असलेल्या व्यक्ती निवडतो आणि मग अजूनच दु:खी होतो.

जेव्हा कुठलाही dilemma असतो तेव्हा मी एक सोपी पद्धत वापरते. जमाखर्च मांडणे. जमा म्हणजे आपल्याकडे असलेल्या positive गोष्टी तर खर्च म्हणजे negative गोष्टी. असा ताळा सतत मांडत गेलात ना तर नकळत एक positive attitude तयार होईल. तुम्ही दिलेल्या माहितीवरून जर तुमचा जमाखर्चे मांडायचा झाला तर तो असा दिसेल. (आधी खर्च मांडला आहे कारण त्यात थोडेच घटक दिसत आहेत.)

खर्च :
१. म्हातारी, आजारी आई. तिला डायलिसीसला घेऊन जाणे तुम्हाला जिकीरीचे पडते.
२. वडिलांना गुडघेदुखीमुळे काही करणे जमत नाही.
३. बहिण मतिमंद तर आहेच पण त्यामुळे तिचा एक वेगळाच प्रॉब्लेम तुम्हाला सांभाळावा लागतो.
४. घरातील सर्व कामं जेवण वगैरे तुम्हालाच करावी लागतात.
५. या सर्व गोष्टींमुळे तुम्हा स्वतःला अतिशय मानसिक त्रास आहे. ज्यामुळे निराश होऊन तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येतात.

जमा:
१. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे. त्यामुळेच अनेकदा आत्महत्येचा विचार येऊनही तुम्ही ती करू शकला नाही आहात.
२. आता तुम्हीच ४७ वर्षांचे आहात. तरीही तुमचे आईवडिल आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. या वयात आई-वडिल आजारी पडले तर ते सहाजिकच आहे. त्यांचे उपचार करण्याची तुमची आर्थिक स्थिती आहे. तसे नसते तर किती वाईट स्थिती निर्माण झाली असती!
३. होणारा मानसिक त्रास सोडला तर तुम्ही स्वतः शारिरीक रित्या सक्षम आहात. त्यामुळे नोकरी आणि इतर उद्योग करूनही तुम्ही कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत आहात.
४. बहिणीचे hysterectomy चे ऑपरेशन करता येऊ शकेल. त्यामुळे तिचा आणि तुमचाही एक महत्त्वाचा प्रॉब्लेम नाहिसा होईल.
५. आयाबाईची कामं करणारी कोणी बाई निदान काही तासांपुरती ठेऊ शकता येईल.
६. तुम्ही विवाह केला नाहिये या गोष्टीकडे सुध्दा पॉझिटिव्हली पाहिले तर असे लक्षात येते की त्यामुळे तुमच्यावर बायका-मुलांची जबाबदारी नाहिये. शिवाय तुमच्या पत्नीला ही परिस्थिती मान्य नसती तर तुमची स्थिती अधिकच वाईट असती. आणि तुमच्या पत्नीने हे सारे मान्य केले असते तरी मग तुमच्या मुलांना या परिस्थितीत वाढावे लागले असते.
७. तुमची हताश स्थिती केवळ तुम्हाला कोणाची मदत नाही किंवा मन मोकळे करायला हक्काचे माणूस नाही यामुळे आलेली आहे.
८. मनातील विचारांना निचरा करून देण्याकरता तुम्हाला मायबोलीचे व्यासपीठ उपलब्ध आहे. इथल्या मित्रांबरोबर तुमची दु:ख वाटाल्याने तुमचे मन नक्किच मोकळे होईल.
९. तुम्ही कविता करता तर त्यामुळेही मनाला विरंगुळा मिळतो.

हे मला जाणवलेले मुद्दे. तुम्ही विचार केलात तर तुम्हाला यापेक्षा कितीतरी जास्त 'जमा' मिळतील......

मामी यांना अनुमोदन..
आर्थिक परिस्थीती कशी सुधरता येईल याकडे लक्ष द्या..

बाकी ऑल द बेस्ट फॉर युवर फ्युचर लाईफ ..

"The only thing that is constant in the universe is change"

आपल्याला सहानभूती. ह्यावर काहीच मार्ग नाही असे माझे स्पष्ट मत आहे. माझे वडील थोडेफार ह्या अवस्थेतून गेले होते आणि त्यांची झालेली चीडचीड घुसमट आणि सध्या सध्या गोष्टींसाठी झालेली कुचंबना फार जवळून पहिली आहे. फक्त परिस्थिती तुमच्या इतकी वाईट नव्हती कारण माझी आई नोकरी करत होती आणि सुदैवाने काका लोक पण मदत करत असत काकू लोकांकडे दुर्लक्ष करून. आजी ला आता जावून १२ वर्ष झाली. ती गेल्यावर आत्याची स्थिती अजून वाईट झाली. आता लोक लक्ष देतात पण फार नाही. माझे स्वतःचे वडीलच ८ वर्षांपूर्वी कॅन्सरने गेले. कोणीही मदतीला आले नाही. मित्र आले. पण लोक आर्थिक मदत मागितली कि लोक पळून जातात हा माझा अनुभव आहे. मी स्वतःच खूप वेळा विचार करायचो कि आपणच मेलो तर बरे होएईल. अगदी १२वित असताना वडिलांनाच कांकेर झाला आणि तो त्यांनी लपवून ठेवला कारण माझी १२वि म्हणून. पण त्याचे परिणाम फार भोगावे लागले सगळ्यांनाच. ८ वर्ष प्रचंड आर्थिक ओढताना झाली. आई आणि मी कधी कधी हतबुद्ध वायचो. वडील गेल्यावर थोडी थोडी करत परिस्थिती सुधारली. पण ती ८ वर्ष अजूनही मनातून जात नाहीत आणि रात्री झोप येत नाही कधी कधी. वडिलांचा विचार केला कि तर अजूनच अवस्था होतो बिचारे जन्मभर कष्टाच राहिले. काय मिले त्यांना? आपण म्हणतो मागच्या जन्मीचे पाप / कर्म त्यामुळे वगैरे पण त्याचा काय उपयोग. खरे खोटी कोणी पहिले आहे? शेवटी जगायला माणसाला काहीतरी अशा/उमेद किंवा गोल लागतो. बोल्णारे दोन्ही बाजूनी बोलतात. स्वतःवर वेळ आली कि मग समजते. आईकून पाहून फक्त सहानभूती देऊ शकतात पण ते काय हाल असतात ते ज्याचे त्यालाच कळतात आणि भोगावे लागतात. ते कोणीही दूर करू शकत नाही. अजून एक अनुभव आमच्या शेजारी एक काकू होत्या ब्लड कॅन्सरने १२ वर्ष चालले पण त्याहून जास्त त्यांच्या मुलाचे हाल झाले. मोठा मुलगा आणि त्याची बायको फक्त नावापुरते लोकांना फार कळू नये म्हणून बघून जात पण कधीही मनापासून मदत केलीच नाही.अह्मीच कधी कधी दया येवून थोडीफार आर्थिक मदत करायचो. अर्थात हा माझा अनुभव झाला. वडील आणि आजीला दवाखान्यात ने आन करताना कधी कधी बाकीच्या पेशंट लोकांशी बोलायचो आणि माझ्या पाहण्यात फार कमी कुटुंबे आढळून आली कि ज्यांना सगळे नीट जमले. माफ करा जरा स्पष्ट लिहिले आहे पण हा माझा मानुभव मी मांडला. शेवटी आपण माणूस आहोत आणि आपल्याला मर्यादा असतात परिस्थिती बदलली तरी हाताचे बरेच निघून गेलेले असते. तारुण्य संपते मित्र तुटतात नातेवाईक दुरावतात. फक्त नशीब चांगले असेल तर काही काही मित्र शेवटपर्यंत साथ देतात आणि त्यांच्यावर आपण निभावून जातो म्हणा किंवा परिस्थितीपुढे शरणागत होवून तसेच जगात राहतो.

मामी, तुमचा प्रतिसाद वाचून तुमच्याविषयी खुप आदर निर्माण झाला आहे... फार छान पद्धतीने तुम्ही समुपदेशन केले आहे.
चैतन्य इन्या, तुमचाही आयुष्याचा प्रवास खडतर निश्चित आहे. वाचून वाईट वाटले, पण मामी म्हणतात तसे आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर काय कमी याचे दु:ख कमी होते...आणि विचार केला तर प्रत्येक अडचणीवर उपाय सापडतोच...
बाळकवी, खरंच, तुम्ही मामींनी सुचवलेल्या अनेक व्यावहारिक उपायांचा विचार करा. बर्‍याच समस्या सहज सुटतील...
सर्वांना सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी शुभेच्छा!!! Happy

बाळकवी आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यातच पुरुषार्थ असतो आणि तो तुम्ही आधीच दाखवलाय , आत्महत्या म्हणजे पळपुटेपणा आहे. त्यामुळे आत्महत्येचा विचार आधी मनातुन काढुन टाका. तुमच्या पुढील आयुष्यास शुभेच्छा !
मामी छान लिहिलतं.

Every problem has atleast one solution.

हे माझं अत्यंत आवडतं वाक्य आहे.

एक अजून मुद्दा सांगायचा राहिला की, रात्री झोपताना कधिही निराश झोपू नका. निदान १ मिनीट तरी आपल्याजवळच्या पॉझिटिव्ह गोष्टिंची उजळणी करा. 'हे दु:ख मलाच का?' असा विचार करत वेळ घालवण्यापेक्षा, आहे त्या परिस्थितीला तोंड दिले तर तुम्हालाच स्वतःची आंतरिक शक्ती जाणवेल.

इथेच माबोवर मी अशाच दोन व्यक्तिंच्या बाबतीतल्या घटना वाचल्या. (नावं देणे मला प्रशस्त वाटत नाहिये). त्याही व्यक्ती अतिशय कल्लोळातून गेल्या आहेत. पण खंबीरपणे आजही उभ्या आहेत - अतिशय उत्तुंग आणि लोभस व्यक्तीमत्त्वं आहेत ती. त्यांचे विचार बघितले की तुम्हाला जाणवणार सुध्दा नाही त्यांची खडतर पार्श्वभूमी.

किशोर१६८४ (हे १-६-८४ असेल अशी अपेक्षा .... १६८४ हे आपलं जन्मसाल नाही ना? ..... दिवे घ्या प्लीज!), सानी, श्री ...... धन्यवाद. पण ज्यांच्याकरता लिहिलय त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यामुळे त्यांच्या मनःस्थितीत काही फरक पडला तरच याचा फायदा.

बाळकवी, मामींचा प्रतिसाद परत परत वाचा.
सकारात्मक बर्‍याच गोष्टी असतात.
या काळात डोके शांत ठेवून, सर्व परिस्थिती / प्रसंग हाताळणे गरजेचे आहे.
ठाण्यातल्याच नीता गद्रे यांनी एक फार छान लेख लिहिला होता. तो मला इतका आवडला होता, कि मी इथे पूर्णपणे टाईपला होता.
नवीन मित्रमैत्रिणी जोडा. आपल्यापेक्षा सुखी असणार्‍यापेक्षा आपल्यापेक्षा दु:खी असणार्‍यांकडे बघा. खुप उमेद मिळते त्यातून. स्वानुभव आहे हा !

मामींचा प्रतिसाद आवडला. बाळकवी, तुमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीतही आज तुम्ही टिकून आहात ह्यातच तुमच्यातली ताकद दिसून येते. ही ताकदच तुमची शक्ती आहे. तुमचे कुटुंबियांविषयीचे प्रेम ही ती ताकद आहे. जगात रोगाने जर्जर झालेले, परावलंबी, कफल्लक, एकाकी असे अनेक लोक दिसतात, पण तरीही ते झगडत असतात, हार मानत नाहीत. आणि त्या संघर्षातूनच त्यांना मार्ग सापडतो. तुम्ही हार मानू नका. मनाला सांभाळा, समजावा. परिस्थिती तशीच कधीच रहात नाही.... ती बदलत असते. हे दिवसही पालटतील.

धन्यवाद मित्र हो,
खरं तर मला 'आत्महत्या' या विषयावर चर्चा घडवून आणायची होती. माझा स्वःताचा विषय मी अकारण घुसवला असे वाटते.परंतु ह्या निमित्ताने मी या जगात एकटा नाही याची जाणीव झाली.मला न भेट लेले का असेनात पण माझे बरेच स्नेही,मित्र्,सल्ल्यासाठी इथे आहेत हे समजून खरंच्,अगदी खरंच सुखावलोय. Happy
सूर्यकिरण्,भुंगा,आपल्या सुहृदय प्रतिसादासाठी आभार. आता मीही विचार करतोय की,कुटुंब आहे म्हणून मला जगण्यास निमित्त आहे. Happy

असुदे,आपले खूप आभार.

अनिल्७६,आपले आभार्,माझे नातेवाईक ठाण्यातच आहेत.दुर्दैवाने,माझ्या वडिलांशी झालेल्या भांडणांमुळे ते कायमचे दुरावले आहेत.

सूर्यकिरण्,प्रसिक्,मी आत्महत्या निश्चितच करणार नाही. प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

मामी,आपले खूप-खूप आभार.आपण अतिशय अभ्यासपुर्ण विवेचन केले आहे. माझ्या कामाच्या काही गोष्टी त्यातून समोर आल्या आहेत्,जशी,बहीणीसाठी गर्भाशयाचे ऑपरेशन. जमा-खर्चाचा विचार मी बर्‍याचदा केला आहे.आपल्या विवेचनामुळे मला अजून बर्‍याच ''जमे''च्या बाजू समजल्या. मी आपला ऋणी आहे.

किशोर्,चैतन्या,रैना,सानी,श्री,दिनेशदा,आपले खूप खूप आभार.

मला माझ्या तथाकथित मित्रांनी एवढा धीर दिला नाही ,माझ्या नातेवाईकांनी कधी चाम्गल्या नजरेने पाहिले नाही,माझ्या कलिग्जनी कधी नीट चर्चा केली नाही,परंतु कधीच न भेतलेल्या मायबोली करांकडून मिळालेल्या या सहानुभूतीने मी अगदी भारावून गेलो आहे. मला एक मायबोलीकर असल्याचा अभिमान आहे.

ती बदलत असते. हे दिवसही पालटतील.

मी त्याच आशेवर आहे,अरुंधतीजी. आपले मनापासून आभार.

अनिल अवचटांनी एक लेख लिहिला होता बघा. त्यात त्यांनी असाच सकारात्मक विचार करण्याबद्दल लिहिलय्...म्हणजे काही मनाजोगतं झालं नाही किंवा मनाविरूध्द घडलं की विचार करायचा - "तरी बरं ..." आणि यापेक्षा अजूनही काय वाईट घडू शकलं असतं त्याची नोंद घ्यायची. त्यामुळे जी आहे ती परिस्थिती सुसह्य होण्यास मदत होते.

त्यांचच उदाहरण द्यायचं झालं तर - एकदा कुठेतरी बाहेर जात असताना घरातून निघाल्यावर थोड्याच वेळात त्यांची कार बंद पडली. आधी सगळे नेहेमीप्रमाणेच वैतागले. मग त्यांनी विचार करायला सुरवात केली - 'तरी बरं...'
१. तरी बरं - घराजवळच गाडी बंद पडली. सहज चालत घरी परत जाता येईल.
२. तरी बरं - पाऊस पडत नाहीये. नाहितर भिजावं लागलं असतं.
विचार करता करता असे बरेच मुद्दे निघाले. मग याची सवयच लागली.
वगैरे वगैरे.

श्रीरंग,
आत्महत्या या विषयावर चर्चा करणासारखे काही नाही. तूम्ही तो विचार बदललात, म्हणून तर तूमच्याशी बोलायचे. जे करुन गेले, त्यांच्याशी काय बोलायचे ?
पण इथे मन मोकळे करत रहा, मित्रमैत्रिणी जोडा. निदान तेवढा काळ तरी, तणावातून मुक्त व्हाल.

मी आत्महत्या निश्चितच करणार नाही. >>>

करणार नाही नाही..विचारही डोक्यात आणु नका..तुम्ही स्वतःच म्हटलंय हे भेकडपणाचं लक्षण आहे...तेवढंच कारण पुरेसं आहे त्यापासुन अगदी दूर रहायला. मामींची पोस्ट उत्तम, अगदी समर्पक!
प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले-वाईट दिवस येतात. मीही आतापर्यंत जगलेलं आयुष्य अजुन छोटंसंच असलं तरी बर्‍याच वाईट प्रसंगातुन गेलेली आहे. असो..ते दिवस संपलेत..तो विषय नको. पण मी अशा कोणत्याही प्रसंगी नेहमी स्वत:च्याच भूतकाळातल्या एखाद्या त्याहीपेक्षा वाईट आणि गंभीर परिस्थितीची आठवण काढते..मुद्दामच! आणि मग ठरवते, जर मी त्या परिस्थितीतुन वर आले, तर आताची परिस्थिती काहीच नाही! विश्वास ठेवा, बर्‍यापैकी उभारी मिळते ह्याने..माझा तरी अनुभव आहे.
तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा!

बाळकवी,

मधे मी पण एकदा निराश झालो होतो. पण एक माणुस पाहिला ज्याला उजवा हात आणि डावा पाय नव्हता. अशाही परिस्थितीत त्याची जगण्याची जिद्द आणि चेहर्‍यावरचे हसु पाहिले आणि ठरल निराश नाही व्हायच.

कर्माचा सिध्दांत हे पुस्तक आपल्याला भेट पाठवायच आहे. आपला पत्ता संपर्कातुन पाठवावा.

मामी, आपण महान आहात....

मुद्देसुद विचार, जमा खर्चाचा ताळा ही कल्पना खरच फार शिकवून गेली.
अनिल अवचटांचा लेख कुठे वाचायला मिळेल?
बाळकवी, दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे मन मोकळे करत रहा, मित्रमैत्रिणी जोडा.

नीशी, धन्यवाद.

मला नक्की आठवत नाहिये तो लेख कोणत्या पुस्तकात वाचला- पण कदाचित इथेच इतर कोणीतरी तुला सांगू शकेल.

बाळकवी,

तुम्ही पौरोहित्यातलेच वेगवेगळे प्रकार शिकु शकता का? सध्या (आणि नेहमीच) त्याला मागणी असते. उत्पन्नाला हातभार लागायला मदत होइल.

बाकी तुम्ही जे करताय त्याला तोड नाही. मामी आणि इतर यानी सांगितलेल्या गोष्टींवर विचार करा.

तुमच्या पुढील प्रवासास शुभेच्छा!

जाता जाता.. एक वाचलेला बोर्ड आठवतो..लिहिले होते " इफ यु थिंक यु आर अनलकी, चेक युअर पल्स".

वपुंचं एक वाक्य आहे - "हे ही दिवस जातील!!" परिस्थिती काहीही असो हे वाक्य समोर ठेवायच! अनुकूल असली तर डोक्यात हवा जात नाही नि प्रतिकूल असली तर हिम्मत खचत नाही.... मीही इतक्या नाही पण थोड्याफार अशाच स्थितीतून गेलोय.. आणि हे वाक्य म्हणजे आधार होतं माझा...

बाळकवी, अजूनही वेळ गेलेली नाही. लग्न करुन तुम्ही सुखी व्हाल. कित्येक विधवा स्त्रिया, घटस्पोटीत स्त्रिया किंवा वय वाढलेल्या परंतू अविवाहीत मुली अशा स्त्रियांचा विचार करा. लग्न करुन हे विचार पळून जातील. तुमचे आयुष्य तुम्ही असे मातिमोल करुन घेऊ नका. आयुष्याला ***कलाटणी***** देण्याचा पक्का विचार करा.

Pages