सई तुझ्या डोळ्यातील

Submitted by kaljayee on 23 October, 2010 - 10:56

सई तुझ्या डोळ्यातील
दे मज थोडे जळ
धुवून टाकायचा आहे
माझ्या मनातील मळ

सई तुझ्या वेदनांचे
मला घाल थोडे बळ
फुटेल धीर पुन्हा
माझ्या स्वप्नांना निर्बळ

सई तुझ्या लाघवांचे
प्रतिबिंब नितळ
राहू दे माझ्या जिवनी
हर घडी हर पळ

सई तुझ्या दर्शनाचा
लागो मज चळ
डोळ्यांत असू दे तुझी
प्रतिमा अढळ

सई तुझ्या सानिध्यात
जावे आयुश्य सकळ
ओठांवर गाजो तुझा
भावस्वर निखळ

गुलमोहर: 
शब्दखुणा: