"आयुष्य"

Submitted by निलेश उजाल on 22 October, 2010 - 06:36

हे जीवन...
हे जीवन एक देणगी देवाची,माय-पित्याच्या परिश्रमाची-पुण्यकर्माची.ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यावेळीच सारे ठरवतात आपले भविष्य आणि त्या प्रमाणे आपल्याला आपले आई-बाबा घडवण्याची जणू काय शपतच घेतात.आणि मग सुरुवात होते एक नव्या युध्दाची. होय युध्दच म्हणेन मी,कारण आपलं जीवन एका युध्दाप्रमाणेच चाललेलं असतं.कधी भयाण संकट कुठुन कसं येईल याची आत्म्याला जराही खबर नसते.आपलं बालपण मोठ्या आनंदाचं आणि उत्साहाचं चालु असतं पण आपल्यासाठी वणवण भटकणार्‍या,जिवाचं रान करणार्‍या,आपल्या आई-बाबांच्या जीवाचे काय हाल होत असतात याचा जराही विचार आपल्या मनात कधीच येत नाही.त्यांचे हाल,त्यांच्या दु:ख-यातना,त्यांच्या मनातील गुढ,त्यांना होणारा त्रास या सार्‍या गोष्टी आपल्या ह्रिदयाच्या कवाडावर कधीच येऊन धडकत नाहीत.

आजच्या युगात शंभरामधील फक्त पंचविस टक्केच मुलं आपल्या आई-बाबांचे कष्ट जाणू शकतात असं मला वाटतं.ते मात्र आपल्याला जिवापाड जपतात.पण आपण त्यांना क्षणार्धात लाथाडतो.ज्यावेळी आपण त्याना लाथाडुन मोकळे होतो त्याच वेळी आपण आपल्या जीवनामधील सर्वात मोठे पाप करुन या पृथ्वीवरील तरी नंबर-१ महापापी बनतो.तरीही आपले पालक आपले आपल्याला माफ करतात.का?तर आपल्या प्रती त्यांच्या ह्रिदयात एक वेगळीच प्रित उमललेली असते आणि त्या कणखर ह्रिदयावर वाढलेल्या रोपट्याला असं अच्यानक तोडुन,काढुन,पार ओरबाडुन दुर फेकणे हे त्यांच्या जिवावर येते.मग इत़कं ते आपल्यासाठी करतात तरीही आपण त्यांच्या मनातील दु:ख का जाणू शकत नाही? चला मनातलं जाणने हे आपल्याला जमत नसेल तर निदान त्याना त्रास तर देऊ नका.त्यानी दिला का आपल्याला कधी त्रास,कधी चढवली का दु:खांच्या डोंगरावर?नाही.मग का ही जनावरांप्रमाणे वर्तणूक आपण त्यांच्याशी करतो??हे शिकतात कि "आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही,
आणि......
बाप सदैव संसारी या पदोपदी साह्य करी.
पण....म्हणतात ना "पलभाराचे वारे सारे,वाहती आणि निघुन जाती" त्यातली गत सारी.आणि अशा मुलांना देव कधीच माफ करत नाही.मी तर म्हणेन अशांचे हात पाय बांधुन दगडाने ठेचली पाहिजें.नाही ठारच मारली पाहिजे.अरे जिजाबाईने शिवाजी घडवला.त्यांचा वाढदिवस सार्‍या महाराष्ट्रात साजरा केला जातो.प्रभु श्री राम जेव्हा वनवासी गेले पण पुत्र शोकाने दशरथाला आपले प्राण गमवावे लागले.अरे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,ही गोष्ट तितकिच खरी आहे जितकि आई-बाबांच्या संस्काराने मुलाचे घडणे.पण कुणाला कळतो इतिहास,श्री राम आणि कोण हा परिस???काही महात्मे सांगुन गेले कि "आम्ही बि घडलो,तुम्ही बि घडा"या शब्दांमध्ये जे गुढ लपले आहे ते फक्त विद्वानच जाणू शकतात.म्हणतात ना "समझने वालो को इशारा काफि होता है।"आता घडायचे कि नाही हे प्रत्येकाच्या मनावर असते.ज्यावेळी आई बाळाला जन्म देणार असते ती वेळ म्हणजे प्रत्यक्षात यमदेवाशीच तीची लढाई सुरु असते आणि अशा कठीण परिस्थितीतही असंख्य यातना शोशुन ती आपल्याला जन्म देते,ती वेळ अशी असते कि तीचा श्वास थांबून,उघडे डोळे सतत वाहणारे,हाता पायांची तळमळ,वळलेली जिभ,त्याचप्रमाणे बापाची ही मनात होणारी चलबिचल हि एक वेगळीच अवस्था असते त्या दोघांची. हा सगळा प्रकार आपल्याला मात्र ठाऊक नसतो.या सर्व गोष्टी मुलांना ठाऊक नसतात.आणि ज्यांना ठाऊक असतात ते तरी किती आपल्या आई-बाबांची काळजी घेतात?
पण माझ्यासाठी तर माझे आई-बाबा खुप खास आणि प्रथम दैवत आहेत...॥॥

कारण मी हे तुम्हाला सांगण्याचा एकच कारण कि मी इतर मुलांप्रमाणे मुळीच नाही.मी माझी सारी कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडलीयेत.माझ्यासाठी जे-जे त्यांनी केलं ते-ते मी हि माझ्यापरिने त्यांच्यासाठी केलं.मी तर त्यांच्यासाठी माझे प्राणही पणाला लावेन इतका आत्मविश्वास माझ्या नसानसात भरला आहे आणि याचं श्रेय सुध्दा माझ्या आई-बाबांनाच जातं.त्यानी शिकविलेले धडे मला आजही आठवतात.एकदिवस मनाशीच म्हणालो कि मी तर आई बाबांवर खुप प्रेम करतो पण माझी होणारी पत्नी एवढचं प्रेम करेल का त्यांच्यावर?या विचारात मी रात्र-रात्र जागायचो,स्वत:शी बोलायचो,कशी असेल ती स्वभावाने नुसत्या कल्पनेने तीळतीळ तुटुन जायचो.कशामध्येही लक्ष लागायचे नाही.मी कोणत्यातरी घोर संकटात आहे याची खबर लागली होती बाबांना.पण मला विचारण्याची त्यांच्याकडे आता हिम्मत उरली नव्हती आणि मी सुध्दा त्याना काही सांगु शकत नव्हतो कारण हा प्रश्न माझ्या माय-पित्याच्या संगोपनाचा होता.

ज्या स्वभावाची मुलगी मला हवी होती अगदी तशीच मला एक मुलगी मिळाली शिवाय सुंदर आणि खुप समजदार,दुसर्‍याला समजून घेणारी.मी लगेच विचार केला कि हिलाच आपली पत्नी बनवावी.तसं बोललोही तीच्याशी तीने होकारही दिला.मग आम्ही खुप बोलायचो,रुसाअयचो,खुप फिरायचो.
आता माझ्या जीवनात तर हिरवळच पसतली होती जुणू कि आयुष्यातील सारे सौख्य मला मिळाले आणि आई बाबांना पाहिजे तशी सुन.

मला अजुन आठवते ती संध्याकाळ त्या दिवशी आपण भेटणार होतो तुझ्या घरी.नटुन-थटुन तुझ्या थेट घरी पोहचलो होतो.पण तीथे घडलेला प्रकार ऐकुन असं वाटलं कि कुणीतरी धारदार तलवार घेऊन माझ्या अंगावर असंख्य वार करतोय आणि मी मात्र सुन्नतेने शांत पडलोय.ते घाव होते तुझ्या वडिलांच्या तोंडुन निघणारे शब्द.त्या प्रत्येक शब्दांमध्ये मी स्वतःला हरवुन बसलो होतो.का?कशासाठी मला बोलावलेस तुझ्या घरी तुझी श्रीमंती दाखवण्यासाठी की माझा अपमान करण्यासाठी हे मला अजुन न उलगडलेलं कोडं आहे.कदाचित तुझेही काही प्रोब्ल्मेम्स असतील पण मला वाटते तु हे पार चुकिचं केलस असं मला वाटतं गं.मी तर तेथुन सरळ जीव द्यायलाच निघालो होतो पण आई-बाबांच्या काळजीने तेही नाही करु शकलो.म्हणजे नीट जगणं ही नाही आणि मरणं ही नाही.सात जन्म जगण्याच्या शपती अच्यानक कशा तुटल्या?ते बंध,ते नाजुक नातं,ते रंगवलेले स्वप्न,काय हक्क होता तुला कि मला असे लाथडलेस?एवढच कि मी गरीब होतो आणि तू श्रीमंत हे तुला प्रेम करताना नाही कळलं?का? का? या प्रवासात मला अशी एकट्याल सोडुन गेलीस?

पहिले आनंदाचे,उत्साहाचे दिवस आता तु नसण्याने आता मदिराघरात जातात?तुझी संगत सुटली आणि हि बाटली माझी मैत्रीण बनली.तुझ्या रुपाचे चांदणे मला कधीच सतावण्यास येत नाही.कुठ लपलीयेस तु? मी तर दिवसभर नशेत आणि रात्रभर नभातील चांदण्यात रमलेला-गुंतलेला असतो.दिवसभर डोळे बंद आणि रात्रभर तुला शोधतो मी आकाश सबंध.अजुनही खुप प्रेम करतो तुझ्यावर,वाटते कि उठुनीया तुझ्या पास यावे,दु:ख सारे सांगुनीया तुला मस्त मिठीत रंगुन जावे.पण तुझा पत्ता कोण देणार?नशिबालाच दोष देत मरणाची वाट बघत बसलोय,पण मरणाचाही ठिकाणा नाही.तुझ्या आठवणीत शरिरावर अन् मनावर जळमटे उगवलीयेत,ह्रिदय गंजल्याने पुर्विचं काही आठवतही नाही पण तु मात्र अजुन स्पष्टपणे आठवतेस. आज जरी मला मरण आलं या वेळेला तरी उघड्या डोळ्यांनी रस्ता तुझा रोखलेला असेल.माझ्या रोमरोमात आजही तुच आणि तुच दिसशील.पण तु मला बघितल्यावर तुझ्या मनातील आनंद बघायला मी नसेल,मी नसेल,मी नसेल...म्हणून आज तुझ्या आठवणीत कवि निलेशच्या कवितेच्या ओळी मला आजही आठवतात.......,,
"तू नसताना....
तस्विर तुझी बघणे
स्वप्नात तुला सतत शोधणे
कल्पनेच्या भोवर्‍यात गुंतुन जाणे
स्वतःच स्वत:शी व्यर्थ बोलणे
चालताना थांबणे अन् रडताना मध्येच हसणे
सारं काही वेगळचं होतं
तू नसताना...."

तुझा पत्ता मिळाला आणि तुझा जन्मदिवसही आठवला.मी तुझ्यासाठी तुला आवडणारी गुलाबाची फुलं घेऊन आलोय तुझ्या घराबाहेर.निदान आज तरी दाखव रुप तुझं मला,धगधगणार्‍या या प्रेमज्वाराला शांत होऊदे जरा.कुठे आहेस तू प्रिये?ये कडकडुन भेट ये मला.
नाहीSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS
का? का?केलेस हे सारं?
एकदातरी बोलली असतीस,येऊन भेटली असतीस,
आता मी तरी जगुन काय करु?मी हि येतो.......

(हि कथा आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटनांपैकीच आहे,कुणाला परिस्थितीमुळे तर कुणाला आणखी कोणत्या कारणांमुळे,आपल्या प्राणाला मुकावे लागते हे या कथेत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.त्याबरोबर आपले आयुष्य कधी,कुठुन आपल्याला कोठे नेईल याचा काही नेम नाही.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: