तुझ्या आणि माझ्या मीलनाची ती वेळ

Submitted by आशुचँप on 21 October, 2010 - 04:43

तुझ्या आणि माझ्या मीलनाची ती वेळ
जेव्हा सूर्य होता अधीर संध्येच्या चुंबनासाठी
अन चंद्र झुरत होता रजनीच्या मिठीसाठी
उनाड वार्‍याचीही तापली होती रंध्रे उगाच
अन समुद्र झेपावत होता किनार्‍याकडे बेभानसा.....

वणव्याच्या आगीत सापडलेल्या रोपट्यासारखी
जेव्हा सभ्यता अन शुचिता गेली होती करपून
सर्वांगाला माझ्या पडू लागले होते विळखे
तारुण्याच्या अतृप्त विषारी वासनांध सर्पांचे

तुझ्या डोळ्यातल्या निळाईत डोकावून
कविता करायची सवड होती कोणाला
जेव्हा अधीर झाली होती गात्रे अन
जाणवू लागले होते जडत्व क्षणोक्षणी

डोळ्यात डोळे अन श्वासात श्वास
मिथ्या ही सृष्टी नि नुसतेच भास
लाटांमागून लाटा काळ्या खडकांवर
उघडली कवाडे अन ताणले फास

उडवत ठिकर्‍या सार्‍या संकोचाच्या
बेफामपणे सुटले वारू धावत पटलांवर
अन खेचला गेलो मी अथांग अवकाशात
सोडत समाजाच्या सार्‍या गुरुत्वाकर्षणांना

काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेलो मी तुझ्यात जेव्हा
विश्वाच्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर
आणि शोधू लागली पावले नव्या सृजनाची..

गुलमोहर: 

काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेलो मी तुझ्यात जेव्हा
विश्वाच्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर
आणि शोधू लागली पावले नव्या सृजनाची..

सुंदर ओळी... खूप छान आशू.... Happy

कविता छान आहे. पण

वणव्याच्या आगीत सापडलेल्या रोपट्यासारखी
जेव्हा सभ्यता अन शुचिता गेली होती करपून
सर्वांगाला माझ्या पडू लागले होते विळखे
तारुण्याच्या अतृप्त विषारी वासनांध सर्पांचे >> नविन वणव्यात न सपडण्यासाठी शुभेच्छा! Happy

काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेलो मी तुझ्यात जेव्हा
विश्वाच्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर
आणि शोधू लागली पावले नव्या सृजनाची
वा वा...

अन खेचला गेलो मी अथांग अवकाशात
सोडत समाजाच्या सार्‍या गुरुत्वाकर्षणांना

काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेलो मी तुझ्यात जेव्हा
विश्वाच्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर
आणि शोधू लागली पावले नव्या सृजनाची..

अप्रतिम!!!

गंभीर मोडः
छान ..आवडली..

गंमत मोडः(सॉरी आशुचँप, रागवु नका)
कवीने उगाचच यमक वगैरे जुळवुन मेहनत घेतली आहे. असे "रॉ" जसेच्या तसे डायरेक्ट सुचले तसे लिहिले नाही. मायबोलीवरील सध्याच्या डायरेक्ट ट्रेंड्च्या विरुद्ध आहे. सरळ सरळ "झ**" किंवा तत्सम शब्द वापरले असते तर ती जास्त रीयल वाटली असती. सरळ "पाइंटावर" यायचे सोडुन "सामावुन गेलो" वगैरे मिळमिळीत शब्द वापरले आहेत त्यामुळे योग्य परिणाम साधत नाही. आणि सगळ्यात मोठा नीगेटीव पॉइंट की ही कविता सगळ्याना कळते आणि त्याचा एकच अर्थ निघतो Happy

थोडक्यात काय तर ही कविता वणव्यात सापडायची मुळीच शक्यता नाही आणि पर्यायाने टीआरपी वाढण्याचीही.. Wink

मनस्मी....लई झ्याक....
गंभीर मोड इतकाच गंमत मोड आवडला...
छे हो चिडतोय कशाला....
कविता सगळ्याना कळते आणि त्याचा एकच अर्थ निघतो स्मित
हे सगळ्यात भारी होते

आशू.... रोज रोज प्रेमात पडतोस वाटतं (वहिनींच्याच हो Wink )

ए दिले नादा तुझे हुआ क्या है??..... ये कविता करनेकी वजह क्या है.. Rofl

वणव्याच्या आगीत सापडलेल्या रोपट्यासारखी
जेव्हा सभ्यता अन शुचिता गेली होती करपून

तुझ्या डोळ्यातल्या निळाईत डोकावून
कविता करायची सवड होती कोणाला

अन खेचला गेलो मी अथांग अवकाशात
सोडत समाजाच्या सार्‍या गुरुत्वाकर्षणांना>>>>

या सर्व ओळी फार सुंदर आहेत. अभिनंदन!

-'बेफिकीर'!

इथे मला उमेश कोठीकर च्या " अर्पणपत्रिका " ह्या कवितेची याद आली .

आशु नक्की वाच ती कविता शोधुन !!!

ह्या कवितेविषयी काय बोलु..... खूपच कन्फ्युझ आहे Uhoh

आशु, खुप छान रे. प्रचंड आवडली. खरे तर ज्या दिवशी प्रथम तू हि कविता दाखवलीस त्यावेळेसच वेडावलो होतो.

आमचा खास प्रतिसाद इथेही वाचता येइल....
तुझ्या आणि माझ्या भोजनाची ती वेळ...

अन खेचला गेलो मी अथांग अवकाशात
सोडत समाजाच्या सार्‍या गुरुत्वाकर्षणांना

अ प्र ति म !!!!!!!!!!!!

यो, रोहन, अमित धन्स...
विशाल खरेच टाकू का कविता विभागात..माझा अनुभव कैच्याकै मध्येच जास्त प्रतिसाद मिळतात. Happy

Pages