खोटे कधी बोलू नये ....

Submitted by मामी on 15 October, 2010 - 12:47

खोटे कधी बोलू नये असं आपल्याला शिकवलेलं असतं. पण आपण सगळेच सर्रास छोटं, मोठं खोटं बोलत असतो. कधी कधी अशावेळी गंमतीशीर प्रसंग घडतात तर कधी कधी ते आपल्या अंगाशी येतं. अशा आपल्या किंवा आपल्या आजूबाजूला घडलेल्या खोटेपणाचे किस्से.

माझ्याकडे नविनच कामाला लागलेली मंदा, ४ थ्या की ५ व्या दिवशीच बरीच उशिरा आली. तोवर मी तिने दिलेल्या नंबरवर फोन करून ती घरातून वेळेवर निघाली असल्याची खात्री करून घेतली होती. फोन जिचा होता ती निघाली मंदाची नणंद - छाया. फोनवर चार ईकडच्या-तिकडच्या गोष्टी करताना, या छायाला एक ९ वर्षांची मुलगी असल्याचं पण कळलं होतं.

यथावकाश, मंदादेवींचं आगमन झालं.
"काय ग, कुठे होतीस इतका वेळ?"
"ताई, मी येतच होते तर रस्त्यात माझी नणंद भेटली. ती पहिल्यांदाच प्रेग्नंट आहे आणि तिच्या पोटात दुखायला लागलं होतं म्हणून तिला घेऊन दवाखान्यात गेले"
"काय ग नाव तुझ्या नणंदेचं?" - (माझा बेरकी प्रश्न)
"छाया!" - मंदाचं ठासून उत्तर.
"कायपण सांगू नकोस. आताच मी छायाशी बोलले. ती घरीच आहे आणि विशेष म्हणजे प्रेग्नंटही नाहिये"
"ती माझी मोठी नणंद!"
"आँ......मोठ्या नणंदेचं नाव छाया आणि धाकटीचं पण छाया???? एका घरातल्या दोन बहिणीची नावं छायाच?"
एव्हाना मंदाच्या लक्षात आलं होतं की ती बोलण्यात फसली होती. पण तसचं घोडं पुढे दामटत ती म्हणाली,
"हो, मोठीचं नाव छाया आणि छोटीला पण आम्ही लाडानी छायाच म्हणतो" .....
हसावं की रडावं कळेना. अर्थात आणखी २-४ प्रश्नात तिने खोटं बोलल्याचं कबूल केलं. पण नंतरही मी तिला कधीतरी या गोष्टीची आठवण देऊन मनमुराद हसायचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच आहे. कसली हिम्मत लागते असे आइनवेळी खोटे बोलायला. ..... .... मला तर सुचनरच नाही... ..्अ ह ह अह हा .... पन मस्त किस्सा आहे Happy

Lol मामी, भारीये किस्सा!!! Lol
कसली हिम्मत लागते असे आइनवेळी खोटे बोलायला>>> चारुदत्त, हिंमत तर लागतेच... पण प्रसंगावधान, हजरजबाबीपणाही असावा लागतो, बरंका!!! Biggrin
बाकी खोटं बोलून तोंडघशी पडण्यापेक्षा खरं बोलून समोरच्याचा राग ओढावून घेणे केंव्हाही बरेच, नाही का??? Wink Biggrin

माझ्या बहिणीचा बिहारी ड्रायवर, दर मे महिन्यात १५ दिवसांकरता म्हणून गावाला जायचा आणि चांगला २ वगैरे महिन्यांनी परत यायचा. हक्काचे १५ दिवस झाले की त्याची कल्पनाशक्ती बहरायला लागत असे.
दर ५-६ दिवसांनी फोन करून तो कारणं द्यायचा.

आजारी पडणे ही सबब तर हवीच हवी. ती तर समस्त नोकरशाहीचा पायाच आहे. म्हणून ती असायचीच. मग शिवाय, परतीचे तिकिट न मिळणे. यावरही तो ७-८ दिवस आरामात ढकलायचा. पण काही त्याच्या खास ठेवणीतल्या चीजा होत्या.

अनेकवेळा नदीला पूर येऊन त्याचं घर either पूर्णपणे किंवा partly पडायचं. मग ते बांधायच्या निमित्ताने त्याचे किमान २ आठवडे तरी आरामात निघायचे. वर मधून मधून फोन करून updates द्यायचा ते वेगळचं. शिवाय पैसे ही मागायचा. त्यातच त्याने आणखी एक सोय केलेली असायची ती म्हणजे, कौलं शाकारताना तो छपरावरून पडायचा. ह्या एका कृतीमुळे त्याला खूप flexibility मिळायची कारण या accident चा seriousness ठरवणं सर्वस्वी त्याच्याच हातात असायचं.

कधी कधी तर त्याला म्हैस धक्का मारायची. तर कधी कधी त्याचा फोन यायचा की, "दरभंगा तक आया था लेकीन जुलाब होने लगा इसलिए वापस जा रहा हूँ|" Proud

एवढे सगळे करून तो गेली १४ वर्षे बहिणीकडे टिकून आहे आणि आता त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग झाला आहे.

आमच्या साडूंकडे असलेले बिहारी डायवर.. तीन भाऊ (अलटून पलटून डायवरगिरी करतात साडूंकडे).
.. वडिल वारले म्हणून गावी गेले ते २ महिन्यांनी उगवले... पूर्ण महिनाच्या महिना गावजेवण घालत होते म्हणे..

ह्यँ!
म्याच १००००% प्री रेकॉर्डेड असणारे, इतकेच नव्हे तर बॉलरने बॉल टाकला ती शूटींग वेगळ्या दिवशी अन ब्याटसमनने प्लेड केला ती वेगळ्या दिवशी, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. टीव्हीवाले काय, कशालाही लाईव्ह म्हणतात.

(जितेंद्र फ्यान इब्लिसिणकाकूंचा नवरा) इब्लिस Sad

(संपादनाची फुक्कट सोय आम्हालाबी उपलबद हाये म्हट्लं :प)

: - )

एकदा एका नोकरीसाठीच्या उमेदवाराला मी औरंगाबादहुन पुण्याला बोलावले. दुपारी १२ वाजता तो सातारा रोडवरच्या ऑफिसमधे येणे अपेक्षीत होते. उमेदवार फ्रेशर होता १८ वर्षांचा डी.एम.ई झालेला.

१२ वाजता त्याच्या मोबाईलवर फोन लावला तेव्हा तो म्हणाला मी शिवाजीनगर पुणे येथे आत्ताच आलोय.

दुपारी १ वाजता फोन लावल्यावर ऑफीस सापडत नाही म्हणाला. मी जवळच्या खुणा सांगीतल्या पण तो पोचलाच नाही. १.३० वाजता त्याचा फोन स्वीच्ड ऑफ येऊ लागला.

३ वाजता मला कळेना काय करावे. मी त्याच्या घरी फोन लावला तर त्याची आई म्हणाली पुण्याला गेलाय इंटरव्य्हु ला.

५ वाजता त्याने दिलेल्या रेफरन्स ला फोन लावला. रेफरन्स नातेवाईक नसावा असे लिहुनही त्याने सख्या मामांचा नंबर दिलेला होता. शांतपणे मामा म्हणाला त्याला थापा मारायची सवय आहे. आईलाही हे माहित नाही. इंटर्य्व्हु च्या नावाखाली आईकडुन पैसे घेउन हा उंडारत असेल. तुम्ही काळजी करु नका.

अय्या किती हसू आलं मला

धन्स ह मामी , लेडीज किस्से सांगितल्या बद्दल

जाता जाता तुमच्या बहिणीकडे एक ड्रायवर आहे तेही १४ वर्ष हे हि कळले , कित्ती कित्ती चान नै

जाता जाता तुमच्या बहिणीकडे एक ड्रायवर आहे तेही १४ वर्ष हे हि कळले , कित्ती कित्ती चान नै
>>> आता नाहीये तो. तुम्हाला पाहिजे तर अप्लाय करा Happy

मी पण वाचला नव्हता आधी. क्षुल्लक कारणासाठी खोटे बोलण्यात नायजेरियन्स पटाईत असतात. ( हा किस्सा मी आधी लिहिला होता. ) एकदा एक मदतनीस, ऑफिसचा बॅज न लावता ऑफिसात आला. सहज विचारलं, बॅज कुठे. तर त्याने हि लांबड लावली.

आता काय सांगू तूला ( व्हॉट टू टेल यू ओगा नाऊ.. सगळ्या कथांची सुरवात अशीच असते)
काल माझी आई मेली ना ! ( ती काय बॅज घेऊन गेली का ?)
रात्र झाली होती, पण माझा भाऊ घरी नव्हता. तो येईपर्यंत थांबलो. मग रात्रीच बरियल करायचे असे ठरले.
मग नदीवर गेलो. पण मग पाऊस सुरु झाला. मग आमची घाई झाली. मी पण खड्ड्यात उतरलो ( अरे बॅजचे काय ?)

आमच्या गावाला चिखल किती माहितीय ना ? मी खड्ड्यातच घसरलो. मग आईला पुरले. हातानेच माती लोटली.

माझा बॅज बहुतेक त्या खड्ड्यात पडला असणार..

मग मी आठवून विचारतो, अरे दोन महिन्यांपूर्वीच तूझी आई गेली ना ? ती अ‍ॅडव्हान्स पण घेतला होतास !

त्याचे उत्तर, ती होय. ती माझी आई नाही, माझ्या बहिणीची आई... ( हे नायजेरियात सहज शक्य आहे.)