हरवलेल बालपण

Submitted by स्मितू on 9 October, 2010 - 02:57

आई वडिल कामावर जातात
घरात कोणी भावंड नसतात
टिव्ही पाहण्यात रमवतो मन
ह्यातच माझं हरवल बालपणः

आई वडिल कामावरुन येतात,
आले की थकलेले असतात,
मी काही बोललो कि म्हणतात
होमवर्क केले का पण
ह्यातच माझं हरवल बालपणः

थकलेले आई वडिल लवकर
झोपी जातात
माझ्या मात्र असते पुस्तक हातात
असे सगळं का? पण
ह्यातच माझं हरवलं बालपण................

गुलमोहर: 

आई वडिल कामावरुन येतात,
आले की थकलेले असतात,
मी काही बोललो कि म्हणतात
होमवर्क केले का पण

अगदी अगदी.... भावनांची मांडणी.. आवडली.