NRI Banking

Submitted by केशर on 6 March, 2008 - 00:29

For the global Indian, a Non-Residential External (NRE) ...we can discuss all our Banking queries.

The types of accounts that an NRI can open in India are NRE (Rupee Repatriable) FCNR (Dollar, Pound, Euro, Yens, Can dollars & Aus Dollars) & NRO (Rupee Non Repatriable).

NRE account is a rupee account from which funds are freely repatriable.
FCNR accounts can be opened in five different currencies viz., US dollar, Pound Sterling, Euro, Jap Yen, Canadian Dollar & Australian Dollar. They are in the form of fixed deposits only and the minimum period of deposit is 12 months.
NRO account is a Rupee denominated account which is not repatriable. This account is basically for your rupee funds generated in India.

Features & Benefits of NRE account
* Can Deposit & withdraw money.
* requires minimum account balance
* Mandate card for your family in India, giving them anytime, anywhere access to your account.
* International ATM-cum-debit card
* Tax Exemptions - NRE accounts are not taxable in India

Interest on NRE and FNCR deposits are exempted from tax in India .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नुकतेच HSBC चे खाते उघडले. आत्तापर्यंत तरी चांगला अनुभव आहे. त्यांच्या महाराष्ट्रात फार कमी शाखा/ ATM आहेत. पण बॅंकेच्या म्हणण्याप्रमाणे मी कोणत्याही atm मधुन पैसे काढु शकतो. कोणताही वेगळा चार्ज लागत नाही.

माझे सिटी चे nri खाते आहे, ६-७ वर्षात मला कधिही वाईट (दिरंगाई) अनुभव आलेला नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असु शकतील.

आम्ही hdfc चे अकाउंट उघडायचा प्रयत्न केला..तेच इतके कटकटीचे झाले की शेवटी तो प्रयत्न सोडला.
icici ची customer service सांगू शकत नाही इतकी वाईट आहे.
आणि nri acct इथून उघडायचे म्हटले की सगळ्या banks सारख्या, ते उघडेपर्यंत तुम्हाला राजाची वागणूक मिळेल्.एकदा ते झाले की तुम्हाला तुमच्याच कामांसाठी भीक मागावी लागते Happy

icici ची customer service सांगू शकत नाही इतकी वाईट आहे.
आणि nri acct इथून उघडायचे म्हटले की सगळ्या banks सारख्या, ते उघडेपर्यंत तुम्हाला राजाची वागणूक मिळेल्.एकदा ते झाले की तुम्हाला तुमच्याच कामांसाठी भीक मागावी लागते >> अगदी अगदी!

माझे HDFC चे खाते आहे आणि खाते सुरु करतानाचा माझा पहिला ड्राफ्टच या लोकानी हरवला आणि एकमेकांवर टोलवायला लागले. मी कराडला घरी फोन करुन कराड लोकल ब्रांचचा नंबर घेतला आणि त्याच्या मॅनेजरला कॉल केला कारण माझे अकाउंट तिथेच होते/असणार होते. त्याला झाप-झापले दुसरे दिवशी खात्यात पैसे जमा!

नवर्‍याचे icici मधे खाते आहे. त्यांना कॉल केला तर 'लाईट नाही', जनरेटर सुरु होत नाही, त्या टेबलवरचे साहेब जेवायला गेलेत इथेपर्यंत काहीही माहिती मिळाते Happy

अमेरिकेतुन HDFC NRE Account ऊघडण सोप न वाटल्याने शेवटि ICICI चा सहारा घेतला. HDFC Bank ची अमेरिकेतुन NRE Account उघडायच असल्यास Phone, Cutomer Care सेवा नाही हे खुपच अडचणीच वाटल म्हणुन तीथे खात उघडल नाही ..... शीवाय ICIC च जाळ पण जास्त आहे भारतात HDFC पेक्षा ... ICIC ला कागद पाठवली आहेत आता किती दिवसात खात उघडेल वाट बघतेय Happy

NY SBI ला फोन करुन करुन थकले .... कुणी फोन ऊचलतच नाही ... SBI म्हणजे खरच Babu Attitude, No Customer Service nothing

CiTI bank Customer Care Representatives कडुन बरेच फॉलो अप कॉल आले, पण आपल्या मा. बो. करांचे CITI बद्दल अनुभव वाचुन CITI नको अस ठरवल Happy

एस बी आय एकदम भिकार बँक आहे... मला मालदीव मध्ये बेकार अनुभव आहे... मी शेवटी दुसर्‍या बॅन्केत अकाउंट उघडले....

नमस्कार.
मालदीवमधल्या SBI बँकेने expatriates ना भारतात पैसे पाठवायला निर्बंध घातले आहेत. एका महिन्यात १००० डॉलर इतकेच पैसे पाठवू शकतो. ही बातमी आम्हाला कालच कळली. ह्या महिन्यापासुन हा नियम लागू करणार आहेत.
मोठ्ठा प्रश्न पडलाय......
आता उरलेले इतके पैसे कसे पाठवायचे ????
आणि पाठवता येणार नसतील तर कमावलेल्या पैशाचं काय करायचं ?? कारण मालदीवच्या करंसीचा बाहेर काहीच उपयोग नाही.
कुणी दुसरा काही उपाय सांगू शकेल का ?
( आमच्या एका कलीगने डॉलरचा रेट वाढल्यावर पाठ्वू असा विचार करून जवळजवळ २५००० डॉलर्सइतकी मालदिवियन करंसी साठवून ठेवली आहे. तो डोक्यालाच हात लावून बसलाय. Proud Sad )

मालेची एस बी आय बेक्क्क्क्काआअर आहे.. तुम्ही बँक ऑफ मालदीव मध्ये चौकशी करा.. ते कुठल्याही करन्सीचे ट्रान्सफर करतात
मालेमध्ये एस टी ओ ट्रेड सेंटरच्या शेजारी एक अँटिक पीसचे दुकान आहे. तिथुन मी डोलर घेतले होते.. जानेवारी २०१० मध्ये.. तिथे विचारा.. अशा लोकांच्याकडे फॉरिन कस्ट्मर असल्याने डोलर असतात.. पण बहुतांशी एक्स पॅटचे सालरी अकाउम्ट डोलरमध्येच असतात.. तुम्ही ते इंडियात येताना घेऊन येऊ शकाल..

मला एफ बी अए आर ला भारतातली खाती डीक्ल्येअर करायची आहेत. त्यात पी पी ऐफ चे खाते पण दाखवावे लागते का? प्लीज मार्गदर्शन करावे.

Does anyone know if DEMAT account comes under FBAR or not?

कोणाला ह्या बाबत अजुन माहिती, दुवे शेअर करता येईल तर आभारी आहे. धन्यवाद.

सगळे अनुभव १ वर्श्य तरि जुने आहेत. आज ओपेन करायचे असेल तर कोणते अकाउट आणी कोणती बन्क चान्गली आहे? अजुन काही चान्गले ओपशन्स आहेत क?

मला काही प्रश्न आहेत्..कळेना कुठे विचारवे.

माझ्या वडिलांनी माझ्यासाठी invest केली होती जी त्यांना मला द्यायची आहे. Amount बरीच मोठी आहे.
१. मी अमेरिकेत राहते. माझे आणि नव-याचे जॉइन NRI अकाउंट आहे. पण तिथे मी हे पैसे transfer करू शकत नाही. मला हे पैसे भारतातच ठेवायचे आहे. तर मी NRO account उघडू का, तिथे हे पैसे transfer करू शकते का? कोणती कागद्पत्रे लागतात त्यासाठी (हे मी ओनलाईन शोधतेच आहे)? NRO account मधल्या पैशावर काही interest मिळतो का? मिळत असेल तर किती? मला हे पैसे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवायचे आहे म्हणजे कमीत्-कमी १५ वर्षे तरी. तसेच मिळ्णार्या interest वर इथे अमेरिकेत टॅक्स भरावा लागतो का? कोणती बॅक चांगली आहे यासाठी? तसेच NRO account ला ओनलाईन access मिळेल का?

२. जर ते इथे आणायचे ठरले तर जास्तीत्-जास्त किती रककम एकावेळी इकडे आणू शकतो? जर सोन्यात convert करून आणली तर जास्तीत्-जास्त किती एकावेळी सोनं इकडे आणू शकतो?

३. आणखी काही पर्याय असतील तर प्लीज तसे सुचवावे.

सुप्रिता:

1. You can transfer money to NRO acctn, you will get interest on that money but better option is to open NRO (Cert. of Deposit) which pays much higher rate. Since you are keeping the money in NRO acctn, no need to worry about american tax on it, however you are liable to pay taxes in India on all interest earned on that amount as well as income from other sources into that acctn. All major banks provide NRE/NRO services with online access.

2. Any time when you plan to bring money here from NRO acctn, you will have to submit CA certificate stating your taxes are paid on that amount, once bank receives the required documents, they will move the money to NRE acctn. You may have to consult with your Tax professional in US to understand tax implications (if any) when to move money back to US. I believe you may not have to pay any extra taxes in US again as you are paying in the source country.

3. Other options could be investing the amount in Mutual Funds in India as your time horizon is quite long. If you do decide to keep money in NRE or NRO acctn then make sure most of the money is locked into CDs and NOT sitting around in your acctn as insurance only covers upto Rs. 1 lakh.

I hope this helps... Happy

एक बाळबोध शंका
मी जर परदेशातून एन आर ओ हे खाते भारतात उघडले
तर माझे वडील किंवा मित्र भारतातून त्यात रुपये टाकू शकतात का

होय.. टाकू शकतात.
फक्त पैसे त्या खात्यात भरणार्‍या व्यक्तीला त्या पैश्याचा स्रोत बँकेत सांगावा लागेल. Happy

The interest income from US banks is taxable. Would interest income from NRO/NRI account taxable in USA? If so, how to show this income in US tax return? Does ICICI/HDFC etc provide any statement for this purpose at year end?
Have avoided opening NRI accounts as no clarity about this.

Interest income from NRI Account is taxable "ONLY IN" USA not in India.

Generally what happens is for an NRI account, whatever interest income you get is convered into equiv $US and sent to you as 1099 interest statement. You DO NOT pay any tax on that in India under DTAA (Double Tax Avoidance Treaty) with US. Yes your bank should provide you an interest statement at the end of the US Financial year i.e After December. You need to add that income in your 1040 (or whatever form applicable).

मी NRE खात्यात FD केल्यावर, जर मध्यंतरीच्या काळात, माझं नागरिकत्व बदललं, तर माझ्या अकाऊंट वर (NRE / NRO) आणी त्यातल्या गुंतवणुकीवर (टॅक्स) काही फरक पडतो का?

फेरफटका: नागरिकत्व बदललं तरी tax बाबत काही फरक पडत नाही. You will have to pay local country tax as per the law in that country as well as submit foreign account details in terms of amounts and gains to IRS during your tax filing in US. आपल्या कडे PIO अथवा OCI कार्ड नसेल तर मात्र आपल्याला NRE/NRO accounts legally close करावी लागतिल असा माझा समझ आहे तरी सुद्धा आपण तपासुन घ्यावे. अर्थात आपण जर Indian bank ला कळवले नाही तर they have no way to know.

Hope this helps.... Happy

नमस्कार!
शेवटच्या प्रतिसादानंतर वर्तमानाचे दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने सध्या परिस्थिती सुधरली असावी असे म्हणू शकतो का?
वर्तमानात जुने खेळाडू:
१. H.D.F.C.
2. IDBI
3. ICICI
4. Axis Bank
ह्यांची परिस्थिती कशी आहे?

S.B.I मध्ये काही फरक पडला आहे कां?
Kotak Mahindra bank सारखी नवीन खेळाडू कसे अहेत?
आजून काही नवीन मार्ग निघाले आहेत कां?
ह्याबद्दल माहिती मिळु शकेल कां?
धन्यवाद!

ICICI वापरतो. कस्टमर सर्विस उत्तम आहे. अनेकदा पत्ते, फोन नंबर इ. बदलले पण बर्‍यापैकी सहज सगळं झालं.
भारतात गेल्यावर बँकेत जाण्याची वेळ आली की डेस्कवरच्या व्यक्तीला सांगतो की इन्वेस्टमेंट करा हे माझ्या गळी उतरवायला कुणालाही बोलावू नकोस. ते ज्या शाखेत होतं त्या ठिकाणी परत जात नाही. आयसीआयसीआयच्या ढीग भर शाखा आहेत. ठाण्यात तीन हात नाका ब्रांच छोटी आहे, पण उत्तम सेवा मिळते. तलावपाळी/ राम मारुती रोड वर गळेपडू प्रकार फार होतात.

धन्यावाद अमितव!
S.B.I, Kotak Mahindra bank, YES Bank ह्याविषयी काही मते आहेत कां ?

SBI nri branch uttam ahet , exclusive for nri
Geli 13 varshe SBI madhech NRI/NRO account hote madhun tari eak varsha india hoto NRI band karun savings madhe convert kele atta parat baher aloy mhanun NRI open karnyasathi mail kela banket 1 tasat account open ani tyanche YONO app hi khup changale ahe

Pages