Submitted by बेफ़िकीर on 4 October, 2010 - 00:08
गर्वमुक्त होण्यासाठी जन्म घेतला मी
देहमुक्त होतानाही गर्व पोसला मी
ज्यात श्वास दरवळताना सैल होत जाती
त्या मिठीत सुस्कार्यांचा ताण सोसला मी
कोणत्याच मुक्कामाला पोचलोच नाही
पण नव्या नव्या रस्त्यांचा शोध लावला मी
लाख रंग आयुष्याने लावले मनाला
मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी
तू असूनही नसल्याचे केवढे पुरावे
एवढ्याच खटल्यामध्ये जन्म नासला मी
एक काम नाही केले नीटसे कधीही
घोळ घालतानासुद्धा घोळ घातला मी
'आजही तुझी आहे मी' हा निरोप आला
गंधवान वार्यालाही दूत मानला मी
आपल्याच लोकांसाठी बांधली घरेही
आपल्याच भिंतीलाही कान लावला मी
आपलेच हेही सारे... बोलुदेत त्यांना
'बेफिकीर' टीकेसाठी जीव टाकला मी
गुलमोहर:
शेअर करा
तू असूनही नसल्याचे केवढे
तू असूनही नसल्याचे केवढे पुरावे
एवढ्याच खटल्यामध्ये जन्म नासला मी >> _/\_ !
गर्वमुक्त होण्यासाठी जन्म
गर्वमुक्त होण्यासाठी जन्म घेतला मी
एक काम नाही केले नीटसे कधीही
घोळ घालतानासुद्धा घोळ घातला मी
आपल्याच भिंतीलाही कान लावला मी
<<<< जबरदस्त ओळी >>>
खूप आवडली गझल...
''वर आणली ''म्हणून वाचायला मिळाली
स्तान्जा वेगवेगले वाततात. गजल
स्तान्जा वेगवेगले वाततात. गजल नि कवितेत काय फरक आहे का ?
पन मत्स आहे.
नीलम बर्गे | 16 July, 2012 -
नीलम बर्गे | 16 July, 2012 - 11:31 नवीन
स्तान्जा वेगवेगले वाततात. गजल नि कवितेत काय फरक आहे का ?
पन मत्स आहे.
<<<
तुमचा फोटो सुंदर आहे. देवाने दिलेल्या या देणगीबद्दल अभिनंदन! (गैरसमज नसावा)
गझलेत व कवितेत फरक असतो, गझलेतील प्रत्येक शेर वेगळी कविता असते, पण गझलतंत्रानुसार ती एकाच गझलेत दाटीवाटीत जगत राहते.
सर्वांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
बेफिकीरजी! गझल आवडली. काही
बेफिकीरजी! गझल आवडली. काही गोष्टी खटकल्या त्या नमूद करतो.........
मतला...........
मतल्यातला उला मिसरा रुचला नाही.
जन्म घेताना गर्वमुक्त का व्हायचे? गर्वमुक्तीसाठी जन्म घेणे........समजले नाही. जन्मताना प्रत्येक जीव निरागसच असतो!
मी हा मतला असा लिहून पाहिला........
अर्थ नम्रतेचा जगताना न जाणला मी!
देहमुक्त होतानाही गर्व पोसला मी!!
..............................................................................................
२रा शेर अस्पष्ट वाटला. मिठीत नंतर स्वल्पविराम हवा.
सुसकारे म्हणजे वेगाने व शब्द करीत बाहेर पडणारे उच्छ्वास!
सैल होत जाती......कोण सैल होत जाती? श्वास सैल होत जाती?......असे आपण म्हणत नाही.
मिठी सैल होते?.........सुसकारे सैल होतात?.........असेही आपण म्हणत नाही.
दोन्ही मिस-यांच्या अर्थांमधे नाते जुळत नाही.
शब्दयोजनेत बदल हवा होता असे वाटून गेले.
हा शेर मी असा लिहून पाहिला...........
ज्या मिठीत अस्तित्वाचे भानही विरावे;
त्या मिठीत, सुसका-यांचा ताण सोसला मी!

३रा शेर शोध लावला मी.....अप्रतिम!

४था शेर
मूळ व्यक्तिमत्वाचा डाग व मनाला आयुष्याने लावलेले रंग......नाते जुळत नाही.
मी हा शेर असा लिहून पाहिला........
लाख रंग आयुष्याचे चेह-यास होते;
मूळ रंग माझा केव्हा, सांग सोडला मी?

५वा शेर
संदर्भ पटकन लक्षात येत नाही.

६वा शेर
घोळ घालताना सुद्धा घोळ घातला मी!...........नाही रुचला मिसरा.
घोळ कशाला घालायचा? कुठे घोळ घालायचा?.........हे यायला हवे होते.

७वा शेर..........ठीक

८वा शेर
दोन मिस-यातले नाते स्पष्ट होत नाही.

९वा शेर
छान!
बोलु देत.........बोलू देत..........असे हवे.
.............................................................................................
टीप: भूषणराव! आपले मनोगत/मते जरूर विस्ताराने कळवावीत!
माझ्या दृष्टीने ती मौल्यवान आहेत.
..........प्रा.सतीश देवपूरकर

आवडला
अप्रतिम गझल्...........खूप
अप्रतिम गझल्...........खूप खूप आवडली......
Pages