विमान सेवा कशी आहे?

Submitted by मनःस्विनी on 1 October, 2010 - 01:57

मला कोणी मदत करेल का?
कॅथे पॅसिपीकची विमान सेवा कशी आहे?
newark to mumbai
आणि/किंवा
sfo to mumbai
वयोवृद्ध काका प्रवास करणार आहेत, त्यांना त्यातल्या त्यात किंमतीच्या मानाने हाच ऑप्शन बरा वाटतोय. रिटायर्ड असल्याने ज्यास्त खर्च झेपणार नाही. अचानक भारतात जावे लागतेय तेव्हा पुढच्या आठवड्यात विचार आहे. पण एकटेच प्रवास करणार आहेत व डायबीटीस आहे. सध्या काकांचा विचार कॅलिफोर्नियातून निघायचा आहे. नाहीतर मग खूप प्रवास असेल तर जर्सीला लोकल फ्लाईटने जावून एक दोन दिवस आधी नातेवाईकांकडे उतरून मग पुढे मुंबईला निघायचा विचार आहे.
तेव्हा प्लीज काही मार्गदर्शन मिळेल तर काकांचा प्रवास चांगला होइल.

तेव्हा जर का कॅथे पॅसिपीकने प्रवास केला तर,

खाण्याची व्यवस्था आहे का नीट?
कशाप्रकारचे जेवण मिळू शकते?
विमानं कॅन्सल, लेट होणे वगैरे प्रकार होतात का सर्व साधारण पणे कॅथे पॅसिपीक्मध्ये? व तसे झाल्यास काय सुविधा असते.
एयर ईंडियात तर डिले कायम असतात म्हणून हा प्रश्ण.
avg प्रवास किती तासाचा आहे जर कॅलिफोर्नियातून निघाले तर? (हे नेटवर बघु शकतो पण कधी कधी प्रत्येक विमान कंपनीचा डिले अगदी पाचवीलाचा पुजलेला का काय असतो, कसा हँडल करतात त्यामुळे विचारतेय.)

जर जर्सीतून निघाले तर बरे राहिल का पुर्ण प्रवासाचा अवधी लक्षात घेता व त्यांचा डायबीटीस लक्षात घेता इतका २५ एक तासाचा प्रवास एकदम करण्यापेक्षा जर्सी ठिक राहिल ना?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही २दा कॅथे ने प्रवास केलाय तसेच माझी आई एकटी इथे येउन गेली कॅथे च्या CFO- मुम्बई फ्लाईटने.
जेवण तुम्ही हिन्दु वेज सीलेक्ट करा चेक इन करताना. ( ते वेज असतील तर नाहीतर तसाच नॉन वेज चा पण ऑप्शन आहे वाटते. ) हे सर्व मील ऑप्शन्स तुम्हाला कॅथे च्या साईटवर बघता येतील.

तुमच्या काकांना 'असिस्टंट' किंवा व्हीलचेअर (प्रकृतीप्रमाणे ) घ्यायला सांगा. मग अजीबात त्रास होत नाही. आम्ही आईसाठी फक्त असिस्टन्स घेतला होता. तिला चालायला काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणुन. बाकी फ्लाईट मधे पण सर्विस चांगली होती.
'असिस्टन्स' पण नेट वरुन चेक इन करताना घेता येईल.
आम्हाला अत्तापर्यंत तरी विमान कॅन्सल होण्याचा अनुभव नाही. पण १-२ तास लेट झाले होते एकदा.

avg प्रवास किती तासाचा आहे जर कॅलिफोर्नियातून निघाले तर---
हे प्रत्येक फ्लाईट प्रमाणे बदलते. साधरण २३-२४ तास ते ३२ - ३८ तासापर्यंतच्या फ्लाईट्स सुद्धा दिसतात.
अत्तापर्यंत तरी २ तासाच्या वर डीले चा अनुभव नाही. एअर इंडीयाने अजुनपर्यंत कधी प्रवास केला नाही परंतु त्यांच्या सुरस कथा ऐकल्या आहेत. कॅथे कधीही त्यांच्यापेक्षा खुप विश्वासार्ह वाटते मलातरी.

मी कधी us हून cathay नी प्रवास केला नाही परन्तु हॉन्ग कॉन्ग व चीनला गेलो आहे
मला नेहेमीच चांगला अनुभव आला आहे. जेवणाचा काही खास preference असला तर टीकीट बूक करताना सांगीतले तर तेही मिळते. त्याना बहुतेक एक दिवस हाँग काँग मधे फ्री स्टॉप ओव्हर मिळेल म्हणजे लाम्ब प्रवासाचा त्रास होणार नाही.

मला कॅथे चा अनुभव खुप चांगला आहे. मला नेहमीच उत्तम जेवण मिळाले आहे/ (पुर्वी एशियन व्हेज सांगावे लागायचे आता हिंदू व्हेज मिल सांगतात ) हवाई सुंदर्‍या नम्र आणि हसतमुख असतात. भारतात जाणार्‍या फ्लाईट्स मधे, हिंदी बोलणार्‍या सुंदर्‍या असतात.

आपले भारतीय "जेट एअरवेज" पण newark to mumbai रुटवर दोन फ्लाईटस चालवतात - पुर्वी त्या ब्रसेल्स मार्गे येत आता कस आहे ती कल्पना नाही पण सेवा-जेवण अन मुंबईत उतरल्यावरची मदत यात जेटही एक चांगली ऑप्शन आहे.

कॅथेची सर्व्हिस चांगली आहे असं ऐकून आहे (अर्थात मला युएस-मुंबई याबद्दल काहीच माहिती नाही). माझ्या ओळखीच्या एक आंटी आहेत, त्यांचं मुंबईला जायचं अगदी अचानक ठरलं म्हणजे अगदी आदल्या दिवशी. त्यामुळे त्यांना जेवणाचा प्रेफरन्स देता नाही आला. विमानात त्यांना एअर होस्टेसनी विचारलं की तुम्ही का जेवत नाही? त्यांनी सांगितलं काय ते. त्यांना तिने अगदी खिचडी वै आणून दिली. Happy

.......

कॅथेचा अनुभव चांगला होता.
एल ए - मुंबई प्रवास केलेला. हाँकॉग मधे ६ तास थांबावे लागले. (तेथे थोडा बोर झालो).
बाकी सर्विस चांगली आहे.