भारतीय अन्नसेवनाबद्दल बुशचे विधान

Submitted by कनक२७ on 13 May, 2008 - 00:07

बुश, असे कसे बोलु शकतो. is it true? खरं काय आहे त्या बदद्ल चर्चा करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे काही प्रमाणात सत्य आहे भारतातील अनेक शहरात अन्न माफ़ करा खाद्यांची जरा जास्तच चंगळ चालते आणि खुप सारे अन्न फ़ुकट जाते केरात...

उदा.
१) लग्ननात बुफ़े मधे लोक खुप सारे ताटात वाढुन घेतात आणि तसेच टाकुन देतात, आणि आज काल तर बुफ़े नाहि... असे होतच नाहि. शेवटी प्रतिष्ठा मोलाची असते. पंक्ती कालवश झाल्यात, असल्या तरी लोक हावरटा प्रमाणे घेतात आणि तसेच टाकुन देतात.

२)होटेलात होणार्‍या पार्ट्या, इथे लोक पीतात जास्त आणि खातात कमी वर मागवायाचे आणि खायचे नाही.

तसे बुश यांचे विधान काही अंशी अतीशयोक्ती वाटते. पण आपल्या देशात चंगळवाद फ़ोफ़ावला आहे हे खरे...

माझ्या माहितीप्रमाणे त्या विधानाचा रोख वरील प्रकारे अन्न वाया जाण्यावर नाही. तिथे जेव्हढ्या प्रमाणात असे अन्न वाया जाते त्याच्या दसपट अन्न इथे अश्या पार्ट्यात वाया जाते. प्रतिष्ठा, हावरटपणा यापेक्षा माजोरीपणा हे त्याचे इथे कारण आहे.
एकंदरीत भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या तिप्पट आहे म्हणून तिथे अन्न जास्त लागते असा तर्क करून हे विधान करण्यात आलेले आहे. मुळात बुश नि राईस या दोन लोकान्ना मिळून भारतातल्या सहा वर्षाच्या मुलापेक्षा जास्त अक्कल नाहीये. वास्तविक एक अमेरिकन माणूस एका भारतीयापेक्षा सहापट अन्न वापरतो (खातो नि वाया घालवतो) असे सर्वमान्य आहे. अमेरिकेतल्या लोकांइतके लठ्ठ लोक जगात कुठेहि नाहीत हेहि प्रसिद्ध आहे.
मुख्य मुद्दा असा की भारतात जे काही अन्न लागते त्यातले भारतात किती उत्पन्न होते नि परदेशातून किती आणावे लागते नि या बाबत अमेरिकेची काय परिस्थिती आहे याचा विचार करायला हवा. मग ठरवता येईल की भारतामुळे जागतिक अन्नधान्याची परिस्थिती गंभीर झाली आहे का? भारतातून तांदूळ निर्यातीवर बंदी केली म्हणून जगात तांदुळाचे भाव वाढले असतील, पण मग यात अमेरिकेचा काय संबंध? ते काय करताहेत याबाबत? असे सगळे प्रश्न भारतीय विचारतील का?

'भारतातील लोकांच्या बदलत्या आहारा बद्दल... ' आधी बुश यांनी त्यांचे प्रगल्भ विचार मांडलेत, मग राईस बाईंनी त्याची री ओढली. परवा आमच्याकडे बुश देशीच्या एका व्यक्तीचा (हे महाशय प्राध्यापक/ शास्त्राचे अभ्यासक) bio-fuel शी निगडीत सेमीनार होता, आणि त्यांना एका मुलीने "जगात अन्नाचा तुटवड्याचा bio-fuel च्या भवितव्यावर परिणाम" यांच्या संबंधात एक चांगला प्रश्न विचारला... तर हे महाशय बुश चेच विचार मांडायला चालले होते, त्या मुलीने त्यांना थांबवुन प्रश्न भारतीयांच्या आहाराचा नव्हता (तुटवडा आहे हे मान्य पण मग त्याचा परिणाम काय?) याचे स्मरण दिले. उपस्थीतात काही भारतीय प्राध्यापक पण होते...

या वक्तव्याची भारताने काही दखल घेतली आहे कां? कुणी सरकारी पातळीवर statistical data च्या मदतीने चोख उत्तर दिले आहे कां? भारताने जगाच्या बाजार पेठेतुन खुप धान्य आयात केले आहे कां की जगात अन्नाचा अचानक तुटवडा पडावा ? जागातील सर्वात जास्त ल(म)ट्ठ लोकं कुठे रहातात? मी कुठेतरी वाचले आहे सरासरी अमेरिकन हा सरासरी भारतीया पेक्शा पाच-सात पटीने जास्त खातो (भारताची लोक संख्या ११५ कोटी आहे हा भाग वेगळा).

(भारताची लोक संख्या ११५ कोटी आहे हा भाग वेगळा).<< त्यातली किती अर्धपोटी आहे?
.
बुशच्या विधानाचं म्हणाल तर हा प्राणी त्याच्या समोर जे लिहून ठेवल्या गेलं ते बोलणार! हे काय त्याचं स्वतःचं अभ्यासपूर्वक केलेलं विधान आहे?

११५ कोटी पैकी ३५ - ५० % लोकं उपाशी (अर्धपोटी) आहेत हे मी UN च्या साईट वर वाचले आहे.

तुमचे बरोबर आहे बुश लिहून दिलेले वाचतो, पण संशोधक/ प्राध्यापक यांनी पण हीच समजूत करवून घ्यायची? या वर्गाकडून माझी अभ्यासपुर्वक विधाने सोबत चांगले सबळ पुरावे असे वक्तव्य अपेक्शीत आहे, या (अप)प्रचाराला वेळीच लगाम बसयला हवा.

अमेरिकनांबद्दल एक लक्षात ठेवा. त्यांना बरोबर माहिती असो किंवा नसो, बहुधा नसतेच, पण ठामपणे नि आत्मविश्वासपूर्वक बोलण्यात त्यांचा जगात पहिला नंबर आहे. म्हणून बुश, रम्सफेल्ड, छेनि, पॉवेल या सर्वांनी मिळून, माहित असलेले खोटे, खरे म्हणून सर्व लोकांच्या गळी उतरवले नि इराकवर हल्ला केला. तसेच भारतीय विद्वानापेक्षा अमेरिकन मूर्ख नेहेमीच बरोबर असतो असे त्यांचे पुनः ठाम मत असते!
एकंदरीत जगातील ४ टक्के लोक जगाचे २५ टक्के रिसोर्सेस वापरतात (अन्न, तेल) नि पुनः चीन व भारताला शिव्या देतात. विशेषतः भारताला, कारण त्यांची होणारी प्रगति त्यांना बघवत नाही!
पैसे वाचतात म्हणून चीनमधे सगळे बनवतात. तेंव्हा त्यांना चीनमधे लोकशाही नाही हे का बोचत नाही? इराकमधेच लोकशाही कशाला?
एक इस्राएल उचलून कुठेतरी अफ्रिकेत किंवा साऊथ अमेरिकेत नेऊन टाकला तर जगातले ७५ टक्के प्रश्न सुटतील. अगदी मुसलमानांचे अतिरेकी हल्ले, जगाचे तेलाचे प्रश्न सगळे!

झक्की, उदय, मृ- बुश ने केलेले ते विधान नक्की काय आहे सांगाल का? मी वरती एका लेखाची लिन्क दिली आहे. तो वाचलात का?

http://www.whitehouse.gov/news/releases/2008/05/20080502-8.html
इथे वाचा. हे बरेच लांब आहे. शेवटी शेवटी सापडेल. किंवा Bush and India असे गूगल केल्यासहि सापडेल.
"Worldwide there is increasing demand. There turns out to be prosperity in developing world, which is good. It's going to be good for you because you'll be selling products into countries -- big countries perhaps -- and it's hard to sell products into countries that aren't prosperous. In other words, the more prosperous the world is, the more opportunity there is.

It also, however, increases demand. So, for example, just as an interesting thought for you, there are 350 million people in India who are classified as middle class. That's bigger than America. Their middle class is larger than our entire population. And when you start getting wealth, you start demanding better nutrition and better food. And so demand is high, and that causes the price to go up. "

हे असे अर्धवट बोलायचे! त्याला कुणि विचारत नाही की त्या ३५० मिलियन लोकांना अन्न कोण पुरवते? असे किती अन्न एकंदरीत ते लोक खातात? अमेरिकेतले ३०० मिलियन किती खातात? Tonnage wise?

याच्यात आधी त्याने असे म्हंटले आहे की सर्व जगात, अमेरिका इतर राष्ट्रांना अन्न पुरवठा किंवा अन्नासाठी लागणार्‍या पैशांची जास्तीत जास्त मदत करते. खरे असेल.
मला भारतात रहाणार्‍या एकाने सांगितले की भारतात पुरेसे अन्न पिकते, पण ते महाग असते! म्हणून चीनमधून तांदूळ नि इतर अनेक पदार्थ आणण्यात येतात कारण ते स्वस्त पडतात!

  1. lalu: भारतातील मध्यम वर्ग आणि त्याची वाढणारी सुबत्ता हे आजच्या किंमती वाढण्याचे एक कारण आहे अशा अर्थाचे बुश यांचे विधान आहे.
  2. http://www.expressindia.com/latest-news/Rising-food-prices-After-Rice-Bu...
  3. http://www.nytimes.com/2008/05/14/business/worldbusiness/14food.html?em&...
  4. सेन यांचा लेख वाचला, पण मला त्यात नवीन काही कळाले नाही. (ऑस्ट्रेलीया) दुष्काळ, जमिनीला विश्रांती नाही किंवा बेसुमार रासायनीक खतांचा वापर म्हणुन मग जमीनीची सकसता कमी, वाढणारी पोटांची संख्या हे मुद्दे पण महत्वाचे आहेत पण खोलात जाण्याचे कष्ट सेन यांनी नाही घेतले, उपाय सुचवणे तर दुरच राहिले. भारतातील मध्यम वर्गाची सुबत्ता हे जर आजच्या तुटवड्याचे कारण आहे असे समजु, तर आजवरच्या कुपोशीत, अर्धपोशीत अफ्रिकेच्या उपासमारीला अमेरिकेची सुबत्ता काराणिभुत आहे असे म्हणावे लागेल. भारताने धान्याच्या निर्यातीवर बंदी आणली कारण आधी स्वतःची पोटे (३५ ते ५० % तरी अर्धपोटी) भरणे महत्वाची.
  5. जगात असा खुप मोठा भुभाग आहे ज्यांचा वापर होतच नाही. रशीया, कॅनडा चा कितीतरी भु-भाग हा असाच पडिक (सर्वच काही शेती साठी योग्य नाही पण बराच असावा हा अंदाज) आहे, जगात खुप लोकं काम/ रोजगारा साठी भटकत आहेत, हे दोघे एकत्र आले तर?

तसे खुद्द अफ्रिकेतहि अश्या जागा असतील जिथे धान्य पिकू शकेल. पण तिकडे तर सर्वत्र अंदाधुंदी, genocide चालू आहे. ती संपल्याशिवाय तिथले लोक शेती करण्याकडे कसे लक्ष देणार? का बरे त्या अफ्रिकेतले पुढारी असे वागतात? का ते आपआपसात मारामार्‍या करतात? का नाही शेती करत? का? का? का?!

झक्की, व्हाईट हाऊस च्या लिन्क बद्दल धन्यवाद. उदय, मला त्या लिन्क्स नको होत्या, त्यात मूळ भाष्याऐवजी त्याचे interpretation असते.
आणि हे बाकी कारणांपैकी एक कारण असू शकते, ते पण त्याने 'interesting thought' म्हणून मांडलंय. हे interesting आहे. Proud
देशातच मागणी वाढली त्यामुळे निर्यात बंद झाली आणि त्या वस्तूंचे भाव जगाच्या बाजारात वाढले- या निष्कर्षामध्ये चूक काय आहे ते मला कळले नाही.

तुम्ही फार तार्किक विचार करता! प्रत्यक्षात अमेरिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते किती टन खातात, नि भारतातील मध्यमवर्गिय किती टन खातात, हे कुणि सांगितले नाही. म्हणजे अमेरिकन जर जरा कमी खातील तर बरे असे म्हणण्याऐवजी भारताला दोष दिला की 'सुटले'! शिवाय असे किती धान्य भारत निर्यात करत असे? आता किती करतात?
नि हे इराकचे युद्ध करून जगात गोंधळ कुणि माजवला? स्वतःच्या देशात तेल असताना , ते न वापरता, जागतिक बाजारात तेल विकत घ्यायचे, नि तेहि इतके की त्यामुळे भाव वाढतात.
उद्या भारताने अणुशक्तिने विद्युत्शक्ति केली, स्वतःच्या देशात तेल सापडवून रिफायनरीज बांधल्या तर पुनः भारताने पोल्यूशन वाढवले म्हणून बोंब मारणारच. जरी त्यांची संख्या अमेरिकेतल्या रिफायनरीज पेक्षा कमी असेल तरी.
अक्षरशः दुसर्‍याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही! पण बोलत रहायचे, ठाम पणे, (की नाठाळपणे?)

देशातच मागणी वाढली त्यामुळे निर्यात बंद झाली आणि त्या वस्तूंचे भाव जगाच्या बाजारात वाढले- या निष्कर्षामध्ये चूक काय आहे ते मला कळले नाही.
---- देशात मागणि वाढली, हे कबुल. पण ती कशामुळे वाढली? देशातले उत्पादन हे पुर्ण जोमात आहे, काहीच अनपेक्षीत नासाडी नाही असे झाले कां? भारताचे अंतर्गत धान्य उत्पादन आणि लोकां पर्यंत केले गेलेले वाटप यांचे प्रमाण १९९१ - २००८ या काळात काय आहे?

मध्यम वर्गाची सुबत्ता वाढली ती एका दिवसात/ महिन्यात वाढली कां? आणि जरी अशी सुबत्ता वाढली म्हणुन त्यांचा आहार वाढला हे पटत नाही. मला कुणि सांगितले की २००१ मधे भारतात क्ष% लोकं अर्धपोटी होते, २००७ साली भारतात "क्ष पैकी" य% लोकांचा आर्थिक स्तर सुधारला आणि मग ते पुर्ण आहार घ्यायला लागले, तर मला ते थोडे तरी पटेल... मध्यम वर्ग हा कालही (१९९१, २००१, २००७) चांगला खाता-पिता होता, आणि आजही आहे, (logicaly) तो पोटाला लागेल तेव्हढेच खाणार (आणि वाया घालवणार). क्ष% लोकांमधुन मध्यम वर्गात किती लोक गेलेत हे खुप महत्वाचे? हे फारच कमी होते आहे, श्रीमंत-गरिब ही दरी भयानक वाढते आहे. आता काहींचा आर्थिक स्तर उंचावला म्हणुन इतर पुरक व्यावसाय करणार्याना त्याचा फायदा होतो, आणि ते देखील या य% लोकंमधे येतील. हा data कुणाकडे आहे कां? अशा data वर जर सेन किंवा बुश यांचे विधान असेल तर मला बघायला नाही मिळाले.

मागणी वाढली हे कबूल आहे ना? मग बुश तेच म्हणतोय की. 'आहार वाढला' असं कुठं म्हणतोय?
मुद्दा असा, की दखल घेऊन चर्चा करण्याइतके ते विधान महत्वाचे नाही. Happy 'आम्ही पिकवतो ते आम्ही खाऊ, तुम्ही करा काय करायचे ते' म्हणायचे. Happy

मुद्दा असा, की दखल घेऊन चर्चा करण्याइतके ते विधान महत्वाचे नाही >>>>

हे तत्वतः बरोबर असले तरी अशी विधाने तो फार करतो. उदा द्यायचे झाले तर अशातच त्याने ऑईल ११० वर गेल्यावर ( आज १४५ वर आहे) विधान केले होते की भारत आणि चिन यामुळे ऑईल ची मागनी वाढलीये व त्याचा तोटा अमेरिकन जनतेला होतोय. आता हे विधान कोणाही सोम्याला बरोबरच वाटेल कारण ब्रिक कंट्रीज ची मागनी जास्त आहे पण त्याच वेळेस रोजच्या तेल उत्पादनामध्ये वाढ होत नाही हे त्याने सांगीतले नाही कारण त्याला माहीतीच नसावी बहुदा वा माहीतीचा अर्धवट वापर ( त्याला हवा तसा वापर) केला गेला. गेल्या तिन वर्षात भारताची मागनी जेवढी वाढली त्याचा ९४ टक्के मागनी जर्मनीची कमी झाली. म्हणजे असनार्या तेलाच्या मागनीत काहीही फरक पडला नाही पण हा आपला बोंबलतो की भारताने वाढवली म्हणौन.

आता हे विधान पण वरच्या विधानासारखे आहे पण ऑईल आपन रोज फॉलो करत नसल्यामुळे आपल्या मिडीयाने लक्ष दिले नाही व त्यामुळे ऐक नविन थेअरी निर्मान (ऑईलची किंमत का वाढते ह्याची) झाली. जी चुकीची आहे. म्हणुन अशा विधानांचा वेळीच विरोध व्हायला हवा.

मुद्दा असा, की दखल घेऊन चर्चा करण्याइतके ते विधान महत्वाचे नाही.
हे खरे आहे.
हा data कुणाकडे आहे कां? अशा data वर जर सेन किंवा बुश यांचे विधान असेल तर मला बघायला नाही मिळाले.

हेहि तितकेच महत्वाचे नाही का? निदान राष्ट्राध्यक्षांसारख्या व्यक्तीने तरी अशी विधाने करण्यापूर्वी ते कितपत खरे आहे हे तपासून बघायला नको का? उगाच दुसर्‍या देशांना दोष द्यायचा?
अहो, हे असले 'हे महत्वाचे नाही, ते महत्वाचे नाही' असे करता करता, पूर्वी मुसलमान नि नंतर ब्रिटिशांनी सबंध भारत बळकावला! मुसलमानांचा त्रास तर अजून आहे, तरी आपण 'एव्हढे काही वाईट नाही झाले' असू दे. असेच म्हणत बसणार का?
का म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला असे सोडायचे? माझ्या मते वर उल्लेखलेली सर्व माहिती गोळा करता आली तर त्याच्या विधानाचे खंडन करता येईल. मी स्वतः पैसे देऊन वशिंग्टन पोस्ट, नि न्यू यॉर्क टाईम्स मधे पहिल्या पानावर छापून अमेरिकनांना सांगेन की तुमचा राष्ट्राध्यक्ष किती बेजबाबदार विधाने करतो!

>>मी स्वतः पैसे देऊन वशिंग्टन पोस्ट, नि न्यू यॉर्क टाईम्स मधे पहिल्या पानावर छापून अमेरिकनांना सांगेन की तुमचा राष्ट्राध्यक्ष किती बेजबाबदार विधाने करतो!
ते त्यांना कळले आहे आधीच. Biggrin फक्त हे विधान केल्याचे माहित नसेल. त्याचे आता ६ महिने राहिले. उगाच पैसे फुकट घालवू नका.
>>अहो, हे असले 'हे महत्वाचे नाही, ते महत्वाचे नाही' असे करता करता, पूर्वी मुसलमान नि नंतर ब्रिटिशांनी सबंध भारत बळकावला!
असल्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देताना महत्वाच्या गोष्टी बाजूला राहिल्या असतील, म्हणून झाले असे असे. Happy
~D

हे वाचा नि मग भारताला बोला! या लेखातील दुसरा परिच्छेद वाचा. पहिला सोडून द्या. जरा धीर धरून scroll down करा. नाहीतर म्हणाल कॉलेज कोच चा नि अन्नधान्याचा काय संबंध?

थोडक्यात म्हणजे Total american food waste is $48 billion per year..... "We waste between a quarter and a half of all food we produce."

घ्या. जेव्हढे अन्न वाया घालवतात त्याच्या अर्धे जरी जागतिक बाजारात आणले तर?
http://www.parade.com/articles/editions/2008/edition_07-20-2008/Intellig...