माझी फुलांची रांगोळी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 September, 2010 - 04:50

आमच्या साखरचौतीच्या गणपतीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. खुप फुले उरली होती त्यातुनच ही रांगोळी काढली झर्ब्रेरियाची फुले आदल्या दिवशी वाहिलेल्या कंठीतुन काढली. त्यावरच ते मणी होते. खालची टोकेरी पाने गेलार्डीयाच्या काडीतील कापुन घेतले. हिरविगार गोलकार पाने आमच्य कंपाउंडच्या झाडाची काढली आहेत. त्यावर तगडीच्या कळ्या लावल्या आहेत. तसेच मध्ये मध्ये गेलार्डीया आणि ऑरगंडी ची फुले लावली आहेत. ऑरगंडीच्या फुलांच्या खाली कडू मेहंदीची पाने लावली आहेत. हयावर्षीची ही रांगोळी खास आकर्षण ठरली होती.

Rangoli2.JPGRangoli3.JPGRangoli4.JPGRangoli_0.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

योगेश, जागू अमरवेलीचा चष्मा, आमचाही लहानपणीचा
उद्योग असायचा. मी राजस्थानमधे आणखी एक वेगळी
मेंदी बघितली होती. आपल्या मेंदीपेक्षा मोठी आणि सुगंधी फुले
होती. पण होती मेंदीच.

सारा, वर्षू, हीमॅन, चंचल, चिंतामणी, आशुतोष, आरती, सुनिता, सत्यजित धन्यवाद.
दिनेशदा, योगेश राजस्थानी मेहंदीही स्पेशलच असते. अगदी लहान होते तेंव्हा मेहेंदीचे झाड माहीत नव्हते. मग कुठलातरी पाला गोळा करायचे आणि पाट्यावर वाटून हाताला लावुन बघायचे रंगते का पण रंगायची नाही. मग समजायला लागल तेंव्हा मेहंदीचा पाला वाटून त्यात लिंबु पिळून, कात टाकुन त्या वाटलेल्या मेहंदीचे गोळे हातावर लावायचे आणि रात्रभर हात बांधुन ठेवुन सकाळी धुवुन टाकायचा. असा मस्त रंग यायचा आणि वेगळा सुगंधही यायचा तेंव्हा आणि पण आता ह्या बाजारी मेहेंदीला तो रंगच नाही. तेंव्हा मेहेंदीच्या पानांचा खुप प्रकारे मेहेंदी लावण्यासाठी उपयोग केला. मेहेंदीचा पाला सुकवुन त्याचीही पुड केली होती. मेहेंदीचे तेलही केले होते. आता खुप कमी दिसतात ही झाड.

मेहेंदीचा पाला सुकवुन त्याचीही पुड केली होती. मेहेंदीचे तेलही केले होते. आता खुप कमी दिसतात ही झाड.>>>>> मी ऐकलंय कि काविळीवर सुद्धा मेंहदीच्या पानाचा उपचार केला जातो???

योगेश, कावीळवर माहीत नाही कशाप्रकारे उपयोग करतात पण पावसाळ्यात जास्त पाण्यात राहून पायाला जेंव्हा कुये पडतात तेंव्हा हा मेहेंदीचा पाला वाटून किंवा बाजारातली मेहेंदीपुड भिजवुन लावली की कुयांना लगेच आराम पडतो. शेतात काम करणार्‍या माणसे, बायकांचे पाय नेहमी लाल असायचे मेहेंदी लावल्याने.

Pages