बेफिकिर -- या॑च्या काद॑बरीतील मला भावलेल्या प॑चकन्या

Submitted by रायबागान on 29 September, 2010 - 06:20

बेफिकिर या॑च्या लेखणीस सलाम,

त्या॑च्या सो से स्क , हा रा दा मा आणि श्रीनिवास पे॑ढारकर या काद॑बरीतील मला भावलेल्या प॑चकन्या हा विषय खुप दिवस मनात घोळत होता, घाबरतच त्या॑ना विचारले आणि परवानगी मिळवली.

खर तर काद॑बरी वाचताना ह्या प॑चकन्याच्या भुमिकेत मी नकळत शिरत होते आणि त्या॑च्या नजरेतून काद॑बरीच्या नायका॑ / नायिकेला पहात होते.

त्या॑च्या मनातले विचार कागदावर किती उतरतात ते पाहू.

लिखाण नक्किच बेफिकिर या॑च्या तोडीचे असणार नाही, लेखनात त्रुटि असतील त्या सगळे माबोकर माफ करतील ही आशा.

पुन्हा एकदा बेफिकिर या॑ना धन्यवाद

त्यांच्या मानसकन्या मनोगत स्वरुपात ---

मी मीनाची आई ---

========================================
लातुरहुन हे दोघे कशासाठी आले होते आणि आज बाहेर काय घडते आहे ----

आली .. आली --- माझी मीना आली

बाहेर जयजयकार होतोय -- मीना आता सर्वांची मीनाताई झालीय

मन, शरीर, बुद्धी --- बधिर, सुन्न झालय सगळ

हि प्रसिद्धी आहे की अपप्रसिद्धी --- कोणत्या तराजुत तोलु हे सर्व, बरोबर म्हणु की चुक. मुळुमुळु न रडता खंबीरपणे ऊभे रहाणे हे बरोबर की स्वतःच अब्रुचे धिंडवडे टांगणे चुक काहीच समजेनासे झाले आहे.

बाळमुठी चोखत शांतपणे पहुडलेली मीना, आम्हा दोघांभोवती फिरणारी मीना -- तारुण्यात प्रवेश केव्हा झाला आणि ---
आपल्या कामाशी काम, अशीच ती वागत होती -- हे गेल्यापासुन

" घरात कोणी आहे का? मी नंदन" --- दुपारच्या वेळेस आलेला आगन्तुक सर्वस्व घेऊन गेला.

सर्वसामान्य मीनाला -- असामान्य मीना करून गेला

नंदन येऊन गेल्याला काही दिवसच झाले आणि मीना आनंदाने सांगत आली नोकरीचे -- नक्षत्रासारखी पोर आनंदाने मोहरली आणि मी सुद्धा!! बर्‍याच दिवसांनी आला होता हा आनंद घरात

आज दुपारी नोकरीचे पत्र हातात घेताना एक अनामिक हुरहुर जाणवली -- मीनाचा चेहरा काही वेगळच सांगत होता -- कोणत्या आनंदात होती कोण जाणे पण काहीतरी नक्कीच वेगळे आहे, तसा विश्वास आहे माझा तिच्यावर, नाही पडायचे पाऊल वाकडे -- पण रात्री का जायचे आहे भाऊंकडे -- कोणी काही बाही बोलत होते त्यांच्या विषयी -- मन चिंती ते -- हेच खर

रात्रीचे अकरा वाजत आले -- मीना ये ग बाई नको लाऊ जीव टांगणीला
अरे ----- हे काय - "मीना काय झाले -- अग बोल, तुझे कपडे असे काय, झाले? -- अग बोल बोल काय झाले?" --
संपले सर्व संपले -- काय करु, शोक करु कि मीनाला सांभाळु --- आत मनात, मनातच कायमचा अन्धार आहे रात्र आहे -- कदाचित कायमची --- तीचे मन सांभळु की शारीरीक वेदना

सकाळ झाली सर्वांसाठी -- आमची रात्रच आहे, पण ही का तयार झालीय -- "कुठे निघालीस?" शुद्धच नाहीय मला काय म्हणाली ही -- समजेपर्यंत गेली ही --- विचार करण्याचेही त्राण नाही -- पडते अशीच -- काय करु आठवताहेत सर्व स्वप्न मीना साठी पाहिलेली -- माझ्या कर्तव्यपूर्तीची, तिचे नर्स होणे, तिचे लग्न --- तिच्याही मनात असेलच की राजकुमार अगदी माझ्यापासुनही लपवलेला

काय झाले हे सर्व --- हे सर्व पहाण्यासाठी मी मागे राहीले, पहाताय ना -- आपण दोघांनी तिला खुप शिकवायचे ठरवले होते, हे घर, ही वस्ती सोडुन आपण लांब जाणार होतो, पण दारू --- हो ती आपल्या घरात आली आणि तुम्हीच आम्हाला सोडुन दूर गेलात ---

विचार केला आपणही हे जग सोडुन जावे, पण मीना डोळ्यासमोर होती --

एक आई म्हणुन मी जबाबदारी पार पाडत राहिले, पण वडीलांची जबाबदारी विसरले --- हे त्याचेच फळ का? नालायक ठरले मी आज जगण्यासाठी --- आता जगुन काय करू? संपवते स्वतः ---- बस्स

"अरे मीना, बाळा कुठे गेली होतीस?"

मीनाने हॉस्पिटल मधील गोष्ट सांगितली आणि आता आश्चर्य करायची पाळी माझी होती. ही माझीच मीना आहे, कुठुन आले हे धारीष्ट --- ही सावरली --- नाही नक्कीच नाही, फक्त माझ्यासाठी ही असे भासवते आहे आणि मी चालले होते मरायला --- बाळा आज मी तुझ्या कडुन शिकतेय --- जगायला

आता मी ही आहे तुझ्या पाठीशी --- खरच कारण आता आपल्या कडे काय राहीले आहे गमवण्यासारखे आता तुझ्यासारखे माझेही ध्येय एकच -- तुझ्या पाठीशी राहून गुन्हेगारांना धडा शिकवणे आणि पुन्हा एखादया मीनाचा बळी जाऊ न देणे.

आता मीनाचे वेळी अवेळी बाहेर असणे आई म्हणुन खटकत होते पण स्त्री म्हणुन अजिबात नाही.

आश्चर्याचे धक्के बसतच होते... मीना जिल्हा उपप्रमुख ---- काय म्हणालात

मला माहिती आहे --- ह्यासाठी ही नक्कीच पुन्हा ---

पण आता ठरले आहे ध्येयाकडे फक्त लक्ष ठेवायचे ---- बस्स

आता धक्के बसत नाहीत पण वैषम्य वाटते --- कुठपर्यंत गेली आहेत ही पाळेमुळे --- पोहोचेल माझी मीना शेवटापर्यन्त --- नक्कीच ---

आता देवालाही साथ द्यायला लागेल --- होच -- ह्यालाच म्हणतात का प्रयत्नांती परमेश्वर???

शर्मिला किती सुन्दर दिसते पण --- का अशी वागली? बायकाही अशी दलाली करतात? खरच दिसते तसे नसते म्हणुनच इतक्या मुली फसल्या

अरे मिसेस भेंडे ---- काय आपणही ह्यात भरडल्या गेल्या आहात? फसवणुकीचे हे किती प्रकार? मुलीचे आई वडील म्हणुन मुलाची माहिती घ्यायलाच पाहिजे --- मीना साठी असेच झाले असते तर --- खरच आई वडील असणे आवश्यक का --- का नशीब ???

योगिता --- काय ग हे बाळा?

कोणते क्षण टाळायचे? --- मोहाचे की विश्वासाचे?

पण --- आम्ही नाही का विश्वास ठेवला - राठींवर, सदु वर आणि मीनाने स्वतःवर
आमदार -- बंडाभाऊ --- आपणही ह्यात? देशाचे भविष्य ----
मीना तु बरोबरच म्हटलेस --- आज बंडाभाऊ तुमच्या बायको बाबतीत किंवा बहिणी सोबत असे झाले असते तर? अश्या लोकांना आपण निवडुन दिले --- म्हणजे आपण सर्व सामान्यच परत दोषी ???

अन्याय ही आपल्यावर आणि दोषही आपलाच ?????

बरच झाले --- मीना तू पुन्हा कोणत्याही राजकिय पक्षात न जाता लातुरला जाण्याचा निर्णय घेतलास

अगदी माझ्या मनातला ---

१ ला भाग संपुर्ण

गुलमोहर: 

अनुस्वार असा द्या.. Happy
अं = अ . न - अंतर न सोडता..
यांच्या = या . न - अंतर न सोडता..
पंच = प . न - अंतर न सोडता..

ह्यांनी दिलाय तो अनुस्वार कसा देतात ???

शिवाय हा अनुस्वार चुक आहे असे म्हणता येणार नाही ...मोडीत असाच अनुस्वार देतात !!!

सुरश...... पहिला भाग लिहून मग त्या भागाच्या प्रस्तावनेत हे टाकायचं होतं.... असो....कधी टाकताय पहिला भाग?

धन्यवाद,
सुधारणा नक्किच करेन,
पहिला भाग लवकरच टाकेन.
पहिली कन्या - मीना कातगडेची आई

अरे वा!! सुरश, काय मस्त धागा आहे हा! त्यानिमित्ताने बेफिकीरजींच्या सगळ्या कादंबर्‍यांना उजाळा मिळेल...
पहिली कन्या - मीना कातगडेची आई येऊ द्या लवकर! वाट पाहतेय...
हा तुमचा धागा म्हणजे सिरियल्सचे प्रोमो दाखवतात ना, तसा आहे... आता जास्त उत्सुकता ताणू नका...पटापट लिहा... Happy

नाव बदलुन 'पंचस्त्रिया' करणार का? Happy
अर्थात 'मीना कातगडेची आई' ला कन्या असताना पाहीले असेल तर गोष्ट वेगळी. Happy

आणि मीनाची आई हे तसं दूर्लक्षित पात्र...बघू या सुरश जींच्या मनात काय आहे त्यांच्याबद्दल खास लिहिण्यासारखं Happy वाचण्यास उत्सुक Happy

सानी या व्यक्तीइतकं दुसरं सुंदर मन मी एकाच ठिकाणी पाहिलं! जुयी!

सुरश, माफ करावेत, मी आपल्याला 'तो सुरश' समजत होतो.

आपल्याला मनापासून शुभेच्छा!

मीना कातगडेची आई - व्वा! हे मलाही सुचलं नव्हतं!

-'बेफिकीर'!

>> नाव बदलुन 'पंचस्त्रिया' करणार का?
अर्थात 'मीना कातगडेची आई' ला कन्या असताना पाहीले असेल तर गोष्ट वेगळी.

मी सुरवातीला हीच प्रतिक्रिया देणार होते पण आपण टिळक , गांधी यांना कसे भारतमातेचे पुत्र वगैरे म्हणतो, त्या न्यायाने यांना स्त्रिया म्हणण्यास काहीच हरकत नाही.

बेफिकीर Happy धन्स हो Happy जुयी यांच्याप्रमाणेच तुम्हाला माझंही मन सुंदर वाटतंय ही भावना अतिशय सुखद आहे... Happy तुमचेही मन काही कमी सुंदर नाही...प्रत्येक पात्राच्या मनाचा इतका छान वेध तुम्ही घेता, आम्हाला हसवता, रडवता म्हणजे आमच्याही मनाचा पूर्ण कथा चालू असतांना अक्षरशः ताबाच घेता, हे कसले लक्षण आहे? सुंदर मनाचेच ना? Happy
तुम्हाला पु.ले.शु.

बापरे, नुसत काही लिहिते म्हणता एवढ्या प्रतिक्रिया ----- घाबरले

हे सर्व बेफिकिर तुमच्या मुळे

नाव बदलुन 'पंचस्त्रिया' करणार का? --- पहिला विचार तोच होता पण - पंचस्त्रिया हा शब्द्च लिहिता आला नाही Happy

टायपायला त्रास होतोय.

मग -- निलिमा तुम्ही केला तोच विचार केला --- कारण ह्या सर्वजणी बेफिकिर यांच्या मानसकन्याच Happy

आजच लिहुन संपवण्याचा प्रयत्न करेन --- पहिली कन्या Happy

बेफिकिर --- हे फक्त तुमच्यासाठी

आज बर्‍याच वर्षानी पुन्हा लिहायला सुरवात केली, कारण तुमचे लिखाण इतके प्रभावी होते कि पुन्हा लेखणी हाती आली. --- धन्यवाद

तुमच्या प्रतिक्रियेमुळे उत्साह वाढला हे खरे Happy

हे काय चालल आहे आणि ते कादंबरी विभागात का आहे ?
कोण या पाच कन्या चर्चा कराव्या इतक्या प्रसिध्द ? Uhoh

सुरश,

आपली शैली आवडली. मला असे वाटते की एखादा विशिष्ट भाग म्हणजे आपल्याला त्या विशिष्ट स्त्रीची मनस्थिती मांडायची असावी. तसे असल्यास ती नेमकी कादंबरीच होईल की नाही यावर मी काही म्हणून शकत नाही. पण आपण ते कादंबरी स्वरुपात गुंफू शकाल असे वाटते व शुभेच्छाही!

हा भाग आवडला. पुन्हा शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

बेफिकीर

आपल्याला धन्यवाद, एवढ मोठे मन सर्वांजवळ नसते.

हे खर आहे की एक भाग म्हणजे त्या स्त्रीची मनःस्थिती असेल, ते कादंबरी विभागात अशासाठी ठेवले की आपल्या कादंबर्‍या वाचल्या नंतर ह्या स्त्रीयांच्या भूमिकेतुनही कादंबरीचा आस्वाद घ्यावा. माझी लेखणी आपल्या लेखणी एवढी प्रभावी नाही, परंतु विचाराला नवी दिशा देईल, हा प्रयत्न.

वाकडी - तिकडी
हे काय चालल आहे आणि ते कादंबरी विभागात का आहे ? --- ह्या मागची भुमिका वरती मांडली आहे.

कोण या पाच कन्या चर्चा कराव्या इतक्या प्रसिध्द ? --- आपण बेफिकीर यांचे कादंबरी विभागातील लिखाण जरुर वाचा, त्यातच आपल्या प्रश्न्नाचे उत्तर मिळेल. त्या प्रसिध्दी मुळे ह्या धाग्याची / वर एवढी चर्चा झाली.

धन्यवाद

घडाभर? अहो पिंप म्हणा पिंप.>>> पुढे लिवा की राव ....

ह्या मागची भुमिका वरती मांडली आहे. >>>> मग या भुमिकेला "वरची भुमीका " म्हणुयात Proud