गणेशोत्सव २०१० : स्पर्धा निकाल

Submitted by संयोजक on 27 September, 2010 - 05:37

नमस्कार मंडळी,

गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा/कार्यक्रमांना उत्स्फूर्त दाद व प्रतिसाद दिल्याबद्दल संयोजक मंडळाकडून सर्व मायबोलीकरांचे मन:पूर्वक आभार.

या गणेशोत्सवात एकंदर ५ स्पर्धा होत्या. त्यातील ३ स्पर्धांचे निकाल परीक्षकांमार्फत व उरलेल्या २ स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत.

टाकाऊतून टिकाऊ व प्रकाशचित्र या स्पर्धांसाठी अनुक्रमे सीमा व रुनी आणि सावली व अबेडेकर यांनी तर शब्दांकुर या स्पर्धेसाठी स्वाती_आंबोळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी वेळात वेळ काढून परीक्षण केले व निकाल दिला. त्याबद्दल परीक्षकांना संयोजक मंडळाकडून परत एकदा अनेक धन्यवाद.

गणेशोत्सव स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:

अशीही जाहिरातबाजी विषय १ व २ या स्पर्धांच्या मतदानामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्याबद्दल अत्यंत दिलगीर आहोत त्यामुळे प्रत्यक्ष मतदान किती झालंय ते इथेच देतोय तरी कृपया नोंद घ्यावी.

अशीही जाहिरातबाजी:

विषय क्र. १ - दीपिका पदुकोण व दगडु तेली मसाला : विजेता - फचिन
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

(एकूण मते ५१ त्यांपैकी सर्वाधिक मते फचिन - १४; अरभाट - ११ मते; अश्विनी के - ७ मते; स्वप्ना_राज - ३ मते; रैना - २ मते; मैत्रेयी - २ मते, विक्रम३११ - २ मते; आर्च - २ मते; कविता नवरे - २ मते; दीपांजली - १ मत; नंद्या - १ मत; प्रसीक - १ मत; नवीना - १ मत; वृषा - १ मत; छाया- १ मत)

विषय क्र. २ - सन्नी देओल व उंदीर मारण्याचे औषध : विजेती - स्वप्ना_राज
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
(एकूण मते ३८ त्यांपैकी सर्वाधिक मते स्वप्ना_राज - १३; अरभाट - १० मते; अरूंधती कुलकर्णी - ९मते; ; परदेसाई - २ मते; आर्च - १ मत, वृषा - १ मत; भरत मयेकर - १ मत; प्रसीक - १ मत)

विषय क्र. ३ - लालूप्रसाद यादव व अरमानीचे सूट : विजेती - अरूंधती कुलकर्णी - झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

विषय क्र. ४ - पल्लवी जोशी व साड्या : विजेती - पौर्णिमा- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

आमने-सामने स्पर्धा :

जोडी क्र. १ - शाहिद कपूर व सैफ अली खान : विजेती - दीपांजली- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

जोडी क्र. २ - सानिया मिर्झा व शोएब मलिक : विजेता - ऋयाम- झालेले मतदान इथे पहा.
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.

टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा :

विजेती क्र. १- दीपांजली (प्रवेशिका क्र. ११)
विजेती प्रवेशिका इथे पहायला मिळेल.
विजेती क्र. २ - लाजो (प्रवेशिका क्र. ९ व प्रवेशिका क्र. १०)
विजेती क्र. ३ - धनुडी (प्रवेशिका क्र. ८) व रोझा (प्रवेशिका क्र. ६)
उत्तेजनार्थ प्रवेशिका : दीपांजली (प्रवेशिका क्र. ७)

प्रकाशचित्र स्पर्धा निकाल :

प्रकाशचित्र स्पर्धा विषय १ - विरुद्ध :

विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. १६ - सूर्यकिरण
Prachi_Viruddha_Entry_Suryakiran.jpg
परीक्षकांचे विचार:
या प्रकाशचित्रामधले त्या मुलीच्या डोळ्यातले भाव अतिशय सुंदर पकडले आहेत. त्या मुलीचा पेहराव, डोक्यावरचा तो मुकुट आणि डोळ्यातले भाव यांचा एकमेकांशी असलेला विरुद्ध संबंध फार आवडला.

विशेष उल्लेख :
प्रवेशिका क्र. ११ - योगेश२४
या प्रकाशचित्रामधला अ‍ॅन्गल फारच सुरेख आहे.

प्रकाशचित्र स्पर्धा विषय २ - एक नवी सुरुवात :

विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. ९ - गुणेश
Vidhi-294-4.jpg
अगदी एकमताने या प्रवेशिकेची निवड केलीय. विषयाची अनुरुपता, फोकस, रंग, कंपोझिशन, अ‍ॅन्गल सगळंच आवडलं.

विशेष उल्लेख :
प्रवेशिका क्र. ८ - सूर्यकिरण
या फोटोमधला विषय आवडला पण फोकस, लाईट अजून चांगला करता आला असता.

प्रकाशचित्र स्पर्धा विषय ३ - आधार :

विजेती प्रवेशिका - प्रवेशिका क्र. २ (योगेश२४)
Aadhar.jpg
रंग, कंपोझिशन, विषयाची अनुरुपता आवडली.

विशेष उल्लेख
प्रवेशिका क्र. २३ - सीमा
कंपोझिशन, अ‍ॅन्गल बदलला असता तर हा अजून छान येऊ शकला असता

शब्दांकुर पर्ण १ : संध्याकाळ

विजेती : अश्विनी के
तू पुरवलेले तेजाचे पुंजके, सूर्याची लाज राखायला
मान उंचावून पहात होतीस अस्त रोखणारे हजारो हात
सोबतीला...श्वासांची टप्पा चुकलेली लय
अचानक मागून चाहूल..अन् तिरंगी लडिवाळ वेढा
परत आली होती तुझी तेजाची रिक्त कुपी
सोबतीला...आता फक्त सांजवात

उल्लेखनीय कविता: भरत मयेकर
संध्याकाळ रेंगाळतेय
ढगांच्या किनारींवर
वार्‍याच्या लकेरताना
स्तब्ध अशा पाण्यावर.
उबदार तरुछाया
मिटतात घरट्यांत
काजळी प्रकाश मिळे
जरतारी अंधारात

शब्दांकुर पर्ण २ : गंधवार्ता

या पर्णासाठी एकही विजेती कविता नाही. परीक्षकांना खालील कविता उत्कृष्ट वाटली परंतू ती या फेरीसाठी दिलेले नियम पाळत नाही.

भरत मयेकर
वा‍र्‍यावर लहरत येतो
हलकासा सुवास,
तशाच आठवणीही
फुलांच्या, कळ्यांच्या
आणि
फुलण्याच्याही

शब्दांकुर पर्ण ३ : आता काही देणे घेणे उरले नाही

विजेता : भरत मयेकर
कधी पीस तर, कधी शिंपला, केव्हा मरवा
येण्याजाण्या कधी बहाणे केले नाही?
येताजाता, देताघेता समीप आलो
हाती धरले हात कधी, ते कळले नाही.
तुझे नि माझे आता काही उरले नाही
माझे जे जे , तुझेहि जे जे, एक जाहले
आता काही देणे घेणे उरले नाही

शब्दांकुर पर्ण ४ : विडंबन

विजेती : मामी
सांग सांग डागदरा, मुलगाच होईल काय?
क्लिनिकमध्ये पैसे चारलेत, नक्की कळेल काय?
नवरा, सासूबाईंची नियत बदलेल काय?
लाडू मिळाला नाही तर बर्फी चालेल काय?
डागदरा, डागदरा, खरं सांग एकदा
दोन वर्षांतून अ‍ॅबॉर्शन केलयं रे तिनदा ......
डागदरा उद्या आहे महत्वाचा पेपर
छातीत धडधड होत राहील, रिझल्ट लागेस्तोवर

गणेशोत्सवातंर्गत घेतलेल्या स्पर्धांमधील सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< कवितेत नुसता शब्द बसवल्याने झाले की तो त्या ओळीच्या/कवितेच्या अर्थाशी सुसंगत बसायलाही हवा? >>

श्री भरत मयेकर, येथे शब्दांकुर पर्ण २ : गंधवार्ता च्या अनुषंगाने चर्चा चाललीये, त्यामुळे तुमच्या वरील विधानाचा अर्थ त्या पर्णात भाग घेणार्‍यांना म्हणजे, विशाल कुळकर्णी, वीरा, छाया देसाई, रूयाम, अरुंधती कुळकर्णी, के अंजली, गंगाधर मुटे, शशांक प्रतापवार, जग्या, विनायक या सर्वांना कवितेच्या अर्थाशी सुसंगत असा शब्द बसवता येत नाही, असा थेट अर्थ निघतोय.

विद्यार्थी मोड ऑफ.
......
शब्दांकुर पर्ण २ : गंधवार्ता

या पर्णासाठी एकही विजेती कविता नाही. परीक्षकांना खालील कविता उत्कृष्ट वाटली परंतू ती या फेरीसाठी दिलेले नियम पाळत नाही.

भरत मयेकर
वा‍र्‍यावर लहरत येतो
हलकासा सुवास,
तशाच आठवणीही
फुलांच्या, कळ्यांच्या
आणि
फुलण्याच्याही

.............................
मला गवसलेला अर्थ ;-
हलकासा सुवास जसा वा‍र्‍यावर लहरत येतो तशाच फुलांच्या, कळ्यांच्या आणि फुलण्याच्याही आठवणीही लहरत येतात.
.............................
काही बाळबोध प्रश्न.

या कवितेला गंधवार्तेचा गंध तरी आहे काय?
गंध आहे,आठवण आहे पण वार्ता कुठे आहे?

वरील सहा ओळींचा "गंधवार्ता" या शब्दाशी दुरान्वयानेही संबध नसतांना परीक्षकांना हीच कविता उत्कृष्ट का वाटावी? Happy

फेरीसाठी दिलेले नियम न पाळणारी कविता उत्कृष्ट का वाटावी?

(टीप : या स्पर्धेच्या बाहेर ही कविता, कविता म्हणुन उत्कृष्ट असू शकते, मान्य)

भरत मयेकर पर्ण-२ चे स्पर्धक आहे.
अधिकृत नसले तरी पर्ण-२ विजेते असल्यासारखेच आहे.

अशापरिस्थीतीत
त्यांनी पर्ण-२ च्याच इतर स्पर्धकाबद्दल शेरे मारणे कितपत योग्य आणि तर्कसंगत आहे?

अरे वा, मी जिंकलो का! Happy
सर्वांना धन्यवाद. इतर विजेत्यांचेही हार्दिक अभिनंदन.

टाकावू पासून टिकावू २०१० चे निकाल सहजच वाचनात आले व ते पटले नाहीत म्हणून मत नमूद करावेसे वाटले.
कारण, मतं जाहीर करणं हा हक्क आहे व तसेच आताच येणार्‍या गणेश उत्सवात स्पर्धा घेताना व प्रवेशिका निवडताना अशी चुक टाळली जावू शकते व ह्याचा विचार केला जाईल.
त्यामुळे शिळ्या कढीला उत पुन्हा कशाला वाटले तरी तथ्य नक्कीच आहे ह्या मतात असे वाटले म्हणून, Happy

प्रथम म्हणजे, टाकावून टिकावू स्पर्धचे मूळ नियम व प्रवेशिका निवडतानाचे "निकष" ह्यात खूपच तफावत आहे.

ज्या प्रवेशिकेला प्रथम पारोतोषिक मिळाले हि सौंदर्याच्या बाबतीन दुमत नाही अशी असली तरी परीक्षकांनी "स्वतःच" लावलेल्या निकषावर सुद्धा बाद ठरतेय नः ३ व अन्य काही मुद्द्यावर, विशेष म्हणजे जो सर्वात महत्वाचा मुद्दा ठरतो टाकावू पासून टीकावू स्पर्धेत. तो कसा?

प्रवेशिका निवडताना लावलेले निकष,

१. नाविन्य/क्रिएटिव्हिटी
२. उपयुक्तता
३.साहित्याची सहज उपलब्धता
४.भेट देण्यायोग्य आहे अथवा नाही
५.वस्तु करण्याची काठीण्य पातळी
६.पर्यावरणाला पुरक

मुद्दा नः ३ वर बादः बक्षिस नः १ हि प्रवेशिकचे सामान म्हणजे मेहेंदीचे कोन हे काही प्रत्येक घरात पडून नसतात. ते काही रोज उपलब्ध नसतात सर्वांच्या घरात कारण रोज मेहेंदी काढत नाहीत जसे बाटल्या पाण्याच्या वा ज्यूसच्या(काचेच्या/जॅमच्या) उपलब्ध असु शकतात. त्यामुळे कोन ही सहज उपलब्धता नसते/नसु शकते.
वस्तू टिकावू बनवण्याचे लागणारे सिलर्स हे "खास" विकत आणावे लागतील. ते सहज असेच उपलब्ध नसणार व सिलर्स नाही लावले तर वस्तू टिकणारच नाही. म्हणजे टिकावू होणे कठिण. त्यात सिलर्स हे नॉन टॉक्सिक पदार्थापासून बनले वापरले तर ठिक अन्यथा पर्यावरणाला अपाय होवू शकतो.

हि स्पर्धा संपलीय व निवड झाली आहे पण, "मूळ मुद्दा" हा आहे की,
परीक्षक जशी वेळात वेळ काढून मेहनत घेतो ह्या प्रवेशिका निवडण्याच्या कामासाठी तसेच स्पर्धक सुद्धा उत्साहाने वेळ काढून स्पर्धेत भाग घेतो. स्पर्धा ही शेवटी स्पर्धा आहे मानून खेळीमेळीची घेतली तरी "मेहनत" हि असतेच. व त्याला न्याय देणं जरूरीचे असावे.
परीक्षकांचा निर्णय बंधनकारक व अंतिम असला तरी स्पर्धकाच्या मेहनतीने व त्याने भाग घेतल्याने स्पर्धेला महत्व प्राप्त होते व उत्स्वाला शोभा येते. "स्पर्धकच नसतील तर परीक्षक काय कामाचा?"
तेव्हा स्पर्धक सुद्धा महत्वाचा ठरतो. तेव्हा परीक्षकांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे तरी घ्या चालवून असा कल चुकीचा आहे. मग स्पर्धा घेवूच नका उतावळे निर्णय देण्याएवजी. Happy

स्पर्धक जर अश्या निर्णयाणे नाखुष राहिले व पटले नाहीत तर भाग घेण्यास उत्सुक रहाणार नाहीत. व असे प्रकारच टाळायचे असतील तर फक्त "कलादालन" विभाग म्हणून ठेवा.

Pages