उलगडला अवचित

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

तसे काहि पावसाचे दिवस आलेत असे म्हणता येणार नाही. या वर्षी मुंबईकरानी कडक हिवाळा सोसलाय. उन्हाळा तर कडक आहेच, पण काहि चुकार ढग आता हजेरी लावायला लागलेत.
१ तारखेला डॉ नलिनी, डॉ जय आणि डॉ चंपक बरोबर एलिफंटाला गेलो होतो. तिथून येताना टिपलेला हा सोनेरी क्षण

mumbai.jpg

आणि आजतर राणीच्या बागेत पांढरा आणि निळा, दोन्ही मोर पिसारा फूलवून नाचत होते. लांडोर्‍या नेहमीप्रमाणेच बेदखल होत्या पण एक खार मात्र निरखून तो नाच बघत होती. माझीही अवस्था वेगळी नव्हती म्हणा. पिंजर्‍याचा अडसर असल्याने, पुर्ण पिसारा नाही पकडता आला, कॅमेरात.

mor.jpg

विषय: 
प्रकार: 

खूपंच सुंदर फोटो दिनेशदा.

दोन्ही फोटो अप्रतिमच.
मोराचा लयी खास. Happy
असा मिळणं मुश्कील असत.
पण एकदा मोराने पिसारा फुलवला की तो बराच वेळ फुलवुन ठेवतो मग करा हवी तवढी फोटोग्राफी Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

मोराचा फोटो छान आहे. आख्खा घेता आला असता तर अजूनच मजा आली असती.

*** And on the 8th day God said: "Ok Murphy, you take over." ***

खुपच सुन्दर फोटो आहे मोरचा !

*** And on the 8th day Murphy said: "Ok God, you take over." ...God is still thinking!!! ***

फोटो छान आहेत. रन्ग सुन्दर आहेत.

मोराचा फोटो छानच आलाय. उलट सगळा पिसारा नाही आहे तेच बरे आहे. खालचा काही भाग सोडल्यास (तो पण रंगाशी मिळताजुळ्ता आहे त्यामुळे लक्ष जात नाही) वरची पूर्ण फ्रेम पिसार्‍याने भरली आहे. सगळा घेतला असता तर कोपर्‍यात दुसरे काही आले असते, त्यापेक्षा हेच छान वाटते आहे...

मावळत्या दिनकरा...
दिनेशदा, किती सुंदर फोटो आहेत. अजून थोडावेळ बघत रहिले तर... तो डाव्या कोपर्‍यातला मचवा मध्यावर आलेला असेल... आणि मावळेलही असं वाटलं...
दुसराही छानच.... पण पहिल्याने जे वेधलं ते वेधलं!
(ह फोटो सेव्ह करू?)

इतक्या डॉक्टरांसोबत असूनही तुमची सौंदर्यदॄष्टी अबाधित राहिली म्हणायची! Happy

मस्तच........... मोराचा अप्रतिम. मी एकदा खुप पुर्वी पुण्यच्या पेशवे पार्क मध्ये सफेद मोर आणि त्याच्या समोर च्या पिंजर्‍यामध्ये रंगीत मोर यांचे द्वंद्व (पिसारा फुलवुन नाचण्याचे) पहीले होते. त्याची आठ्वण झाली. पुर्ण फ्रेम मध्ये मोर घेतल्यामुळे एक वेगळीच खोली प्राप्त झालिय.

दाद, माझे इथले सगळेच लेखन, मायबोलीकरांच्या मालकीचे आहे. कुठलाही फोटो मूळ रुपात हवा असेल तरी अवश्य पाठवीन. शिवाय तिथले मचवे, म्हणजे काय अगडबंब प्रकरण होते, ते पण दाखवतो.

boat.jpg

नितिन, पांढर्‍या मोराचा फोटो मी काढलाय, पण तो इतका खास दिसत नाही.

गिर्‍या, इतके म्हणजे ईनमीन साडेतीनच की. नलिनीला मी दीड डॉक्टर म्हणतो. पण सगळ्यांचा दादा मी.

दिनेशदा,
मोराचा फोटो खुप खुप छान!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सही!
Happy