फालसा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

फ़ालसा

paryushak.jpg

हे नावसुद्धा आता कुणाला परिचयाचे नसेल. साधारण याच दिवसात करवंदापेक्षा छोटी, काळसर फ़ळे तयार होतात. फ़ळे चवीला आंबटगोड असतात. रानमेवाच तो, त्यामुळे माझ्या आवडीचा. पण आता ती बाजारात दिसतच नाहीत.

एकेकाळी मात्र ती बरिच लोकप्रिय होती. या फ़ळांचे सरबतपण खुप छान लागते. ( लक्षीबाई धुरंधरांच्या गृहिणीमित्र या खुप जुन्या पुस्तकात या सरबताची कृति दिली आहे. )

हे सरबत औषधी गुणाचे असते. शोष, ज्वर, दाह आदी विकारात ते गुणकारी आहे. घश्याच्या विकारावर पण गुणकारी आहे. संस्कृतमधे याला परूषक असा शब्द आहे. कोकणात हि झाडे नैसर्गिकरित्याच खुप दिसतात, पण लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. कुणी आवडीने खाताना दिसत नाही.

याची झाडे मध्यम उंचीची. पाने तळव्या एवढी आणि दंतुर कडांची असतात. फ़ुले वरच्या फ़ोटोप्रमाणे लालपिवळी असतात, पण आकाराने जेमेतेम एक सेमी असल्याने, जवळ जाऊन निरखल्याशिवाय दिसत नाहीत.

याचे शास्त्रीय नाव, Grewia asiatica म्हणजे आपल्याकडचाच वृक्ष हा. फक्त आपल्या विस्मृतीत गेलेला.
याच्या सालीचा, मुळाचा पण औषधी उपयोग केला जात असे.

विषय: 
प्रकार: 

धन्यवाद दिनेशजी!
खुप वर्षांपुर्वीची आठवण झाली....आम्ही राहुरी कृषी विद्यापिठात रहात असताना भरपुर खाल्ली आहेत हि फळे! तिकडे यावर संशोधन चालायचे म्हणुन मिळायची! नाहीतर आताशा कुठे दिसतही नाही आणि लोकाना फारशी माहितीही नाही!

नयना, म्हणजे इथल्या आणखी एका व्यक्तिला फालसा माहित आहेत तर ! आनंद झाला.

हे आहे होय फालसा. जळगाव ला फालसा सरबत मिळतं खास उन्हाळ्यात. मस्त लागतं ते अगदी. पण ते कशापासुन बनवतात हे मात्र माहिती नव्हतं. दिनेशदा तुमच्यामुळे खरच खूप छान माहिती मिळते.