मी कोण ?

Submitted by प्रकाश पोळ on 25 September, 2010 - 12:07

मी कोण,
मला नेहमी प्रश्न पडतो,
उत्तरच मिळत नाही,
खुप शोधावसं वाटतं,
पण गणितच उळत नाही.
नंतर लक्षात येतं,
मी आहे एक उपेक्षित माणूस,
कधी धरणग्रस्त, कधी शेतकरी,
तर कधी गिरणी कामगार.
भुमिका कशाही असल्या तरी,
पदरी उपेक्षाच,
सरकारकडून, समाजाकडून.
अन्यायाविरुद्ध पेटून उठतो,
परंतु पंखच छाटले जातात.
स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर यायचं,
घरदार, बायकामुलं सोडून,
कित्येकानी हुतात्मे व्हायचं,
बाकीच्यानी आश्वासनं झेलायची,
आशा-निराशेच्या वादळात जे मिळतं ते घ्यायचं,
तेवढ्यावरच समाधान मानायचं,
कारण मी आहे एक "उपेक्षित" माणूस.

गुलमोहर: