आपण मस्त सिगारेट फुन्कावी !!

Submitted by प्रकाश१११ on 25 September, 2010 - 07:13

आपण मस्त सिगरेट फुन्कावी
बाकी विचारच करू नये कसला
आपणच कशाला करावी ह्या
देशाची काळजी
साले सगळेच ---छाप पुढारी
पचा-पचा थुंकतात भाषणाच्या चिंध्या
नि शिकवतात गांधीचा स्वार्थत्याग
आपल्या माजलेल्या देहावरचा घाम टिपत
आपण तर वेतागलो बुवा ह्या देशात
फळनार्या फुकट पुढार्यांना

कशाला शिकलो आपण एवढे जीवाचे रान करून
नि बरबाद केला बापाचा पेसां
रात्रीचा दिवस केला
नि परिक्षा दिली कसली नि कसली
होळी करून घेतली शेवटी तब्ब्येतीची
नि हातात शेवटी कागदाची भेंडोळी
पोटासाठी नुसती वणवण
त्याची सुरळी करून घालू म्हटले
तर आपले गांडू मन
हातात दगुड पण घेऊ देत नाही
कशासाठी जगायचे असले भंगार आयुष्य ?
कुणासाठी?
मग शप्पत वाटते
आपण मस्त सिगारेट फुन्कावी
बाकी विचारच करू नये कसला !!!!
मग होऊ द्या तुमच्या आदर्शाची होळी
नि जाऊद्या हा देश
जेथे भरकटत जाईल तेथे ....!!!!

गुलमोहर: 

एक शहाणा सिगरेटी फुकायला सांगतोय आणि दुसरा शहाणा डॉक्टर असुन त्याला उत्तम विचार म्हणतोय.... चांगलय चांगलय!

अहो वैधानिक इशारा तरी द्या खाली!

प्रतिक्रिया मिळाल्या
आभार .सिगारेट ओढणे आरोग्याला हानिकारक आहे
ह्याची का कुणाला कल्पना नसते.?
मित्रा आजचा तरुण ईतका भयभीत झाला आहे
की खूप शिकून सुद्धा त्याला नोकरीसाठी काय काय भोगावे लागते ?
कल्पना असेलच. त्याची ही प्रतिक्रिया आहे.

कोण म्हणतो आजचा तरुण भयभीत झाला आहे.... उगाच काहीबाही चित्रं रंगवू नका!
आणि या सगळ्यावर तुमच्यामते सिगरेटी फुंकण हा उपाय आहे का?

@bumrang biggrin.gif

हल्ली आधी काय वाचावं हे ठरवावं लागतं! कविता की प्रतिसाद!

प्रकाश - 'उबगावस्था' पोचली, पण फारच गद्य आहे.

-'बेफिकीर'!

हा रोगापेक्षा इलाज भारी झाला ना राव?

"सिगारेट फुंकणे" हे शेवटी व्यसनच. त्याचे उदात्तीकरण नाही केले जाऊ शकत. Happy

"सिगरेट फुंकणं " इथं वैफल्याचं प्रतिक म्हणूनच वापरलं असावं अशी आपली माझी धारणा. एका विशिष्ठ टप्प्य्यावरच्या मनोवस्थेची अभिव्यक्ती यापलिकडे जाऊन त्यातून निष्कर्ष कशाला काढा !उद्या कुणी घरा घरात "रणशिंग फुंका" म्हटलं, तर त्याला आवाजाचं प्रदूषण होईल असं बजावायचं का ?
<<'उबगावस्था' पोचली, पण फारच गद्य आहे.>> सहमत.

आपण मस्त सिगारेट फुन्कावी.

वाचली कविता.मुक्तक.काय असेल ते.[!!]

डोक्याला झिणझिण्या आल्या.वास्तव वाटले.

कवी लिहितो ते स्वताचे आहे असे नाही वाटत मला.

लेखकाचा ,कवीचा परकाया प्रवेश असतो. तो ! त्यात समरस होतो

त्याचे बोट धरून तो कोठे जातो हे तो अनुभवतो. ते लिहितो.

वास्तव कटू असते ,असे वाटते.

जे तरुणांना भासते ते ह्याने शब्दाकीत केले

मि बूमर्यांग यांनी माझ्या प्रतिक्रियेत "उत्तम विचार" यापूढे दिलेली सात उदगार्वाचक चिन्हे पाहिली नाहीत!!! हे शहाण पणाचे लक्षण नक्कीच नाही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!