मनोगत....संयोजकांचे !!!

Submitted by संयोजक on 22 September, 2010 - 08:49

गणेशोत्सव संयोजक मंडळाची घोषणा झाली आणि एक वेगळंच वातावरण तयार झालं. यावर्षीच्या संयोजक मंडळातील सदस्यांनी याआधी गणेशोत्सवात कधीच काम केलेलं नसल्याने सगळ्यांमध्येच एक वेगळाच जोश होता. स्पर्धा-कार्यक्रम ठरवण्याचा उत्साह, नवनवीन कल्पना, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठीची धडपड, गणेशोत्सव दरवर्षीइतकाच उठावदार तरीही नाविन्यपूर्ण व्हावा यासाठीची खटपट आणि या सगळ्याबरोबर अपरिहार्यपणे येणारी, सगळं नीट पार पडेल ना ही धाकधुक या सगळ्याचीच आज सांगता होत आहे. हा गणेशोत्सव यशस्वी करण्यामागे अनेकांचे योगदान आहे, त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम गणेशोत्सव संपल्यावर होत असला तरी अत्यंत महत्वाचा.

गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा-सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तुमची मनमोकळी दाद-प्रतिसादच संयोजकांचा उत्साह वाढवत होते. मागच्या वर्षी सुरु झालेल्या प्रकाशचित्रांच्या झब्बूला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून याही वर्षी हा प्रकार ठेवण्यात आला होता. त्याला मायबोलीकरांनी याही वर्षी भरभरून प्रतिसाद दिला. तर मागच्या वर्षी पाककृती व STY ला मिळालेला प्रतिसाद बघून यावर्षी हे कार्यक्रम न ठेवता त्याऐवजी 'कथाबीज' हा मुद्यांवरून गोष्ट लिहिण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

गणेशोत्सव संयोजक मंडळासाठी हा एक अतिशय वेगळा आणि सुरेख अनुभव ठरला. आम्हां सर्वांना या उपक्रमात काम करायची संधी दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे मनःपूर्वक आभार. अ‍ॅडमिनवेबमास्टरांच्या मदत व सल्ल्यांमुळेच आम्हांला काम करणे सोपे झाले. सल्लागार रुनी पॉटर यांनी प्रसंगी मंडळाला धीर दिला, कौतुक केले तर जिथे गरज होती तिथे आमचे कानही उपटले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. रुनी पॉटर तसेच मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या मुख्य संयोजक पन्ना यांचा अनुभव आम्हाला अत्यंत मार्गदर्शक ठरला. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. काही जुन्या-जाणत्या मायबोलीकरांनीही आम्हांला वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन केले त्यांचेही मनापासून आभार. गणेशोत्सवात सगळ्या जाहिराती व पोस्टर्स 'किरण फॉन्ट' शिवाय पूर्ण होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे किरण फॉन्टच्या निर्मात्यांचेही अनेक आभार.

परंपरेप्रमाणे हा गणेशोत्सव देखिल श्राव्य व लिखित सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च होता. श्राव्य कार्यक्रमांमध्ये मो, अगो, हिम्सकूल व उपासक यांनी प्रीतिची गाणी देऊन गणेशोत्सव सुरेल केला. योग यांनी त्यांच्या नवीन अल्बम 'गण गण गणांत' मधील गाणी उपलब्ध करुन दिली. या सुरेल योगदानाबद्दल मो, अगो, हिम्सकूल, उपासकयोग यांचे खूप खूप आभार. गणेशोत्सवात वाजवण्यासाठी 'नाशिक ढोल'ची क्लीप उपलब्ध करून दिल्याबद्दल केदार जोशींचेही आभार.

लिखित विभागात राफा यांनी आयशॉटची वही शोधून त्याच्या गणेशोत्सवाच्या आठवणी मायबोलीकरांपुढे मांडल्या. सई केसकर यांनीही त्यांच्या बालपणीचा गणेशोत्सव सगळ्या मायबोलीकरांसमोर सादर केला. या गणेशोत्सवासाठी प्रिया पाळंदे यांनी ॐ नमोजी आद्या हा मराठी चित्रपटातील गणेशावर आधारीत गाण्यांचा लेख देऊन जुन्या मराठी गाण्यांच्या आठवणी जाग्या केल्या. याबद्दल राफा, सई केसकर, प्रिया पाळंदे यांचे आभारी आहोत.

याव्यतिरिक्त कहाणी व मखराची बखर, एक्झिक्युटीव्ह मॅचमेकींग, नावानंतर काय आहे, गौरीचा गणपती हे लेख दिल्याबद्दल अनुक्रमे अरुंधती कुलकर्णी, मंजूडी, पौर्णिमाजेलो यांचे तर स्वप्ना_राजने खास तिच्या शैलीत जुन्या हिंदी चित्रपटांतील काही अधुर्‍या राहिलेल्या प्रेमकहाण्यांची आठवण करून देऊन मायबोलीकरांना भूतकाळात नेलं त्याबद्दल स्वप्ना_राज यांचे संयोजकातर्फे अनेक आभार.

सावली यांनी दिलेल्या 'ओरिगामी गणेश' मुळे या गणेशोत्सवात बर्‍याच जणांना नवीन काहीतरी शिकायला मिळालं. चिनूक्सच्या डॉ. तात्याराव लहानेंवरील लेखामुळे मायबोलीकरांना त्यांच्या अफाट कार्याची थोडीशी ओळख झाली. सावलीचिनूक्स यांचेही संयोजक मंडळ आभारी आहे.

मोठ्या मायबोलीकरांबरोबरच छोट्या बच्चेकंपनीला म्हणजेच छोट्या मायबोलीकरांनाही त्यांच्या अंगी असलेल्या नाना कला इतरांनाही दाखवता याव्यात या एकमेव उद्देशाने यावर्षी 'किलबिल' हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ठेवला होता. त्याला या छोट्या मायबोलीकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन यशस्वी केले व 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून दिले. या छोट्या दोस्तांचे आणि त्यांच्या मायबोलीकर पालकांचे मंडळ मनःपूर्वक आभारी आहे. याचबरोबर छोट्या बच्चेकंपनीकरता कथाकथन दिल्याबद्दल हेमांगी वाडेकर यांचेही मंडळ आभारी आहे.

आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या गणेशोत्सवातील टाकाऊतून टिकाऊ, प्रकाशचित्र स्पर्धा व शब्दांकुर या स्पर्धांच्या परीक्षणाची जबाबदारी घेतलेल्या परीक्षकांचे मनापासून आभार.

याखेरीज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या गणेशोत्सवात सहभागी असलेल्या कोणाचा उल्लेख अनवधानाने राहिला असेल तर त्यांनाही मंडळातर्फे अनेक धन्यवाद.

अरे हो, पण हे झाले मंडळाचे हितगुज. इतर मायबोलीकरांना वाचक, स्पर्धक म्हणून हा गणेशोत्सव कसा वाटला हे जाणून घ्यायलाही आम्हाला खूप आवडेल. काय त्रुटी होत्या, काय आवडलं, काय सुधारणा करता येतील, एखाद्या कार्यक्रमाऐवजी हे हवं होतं किंवा हे नसतं तर चाललं असतं या आणि अशा प्रकारच्या सर्व सूचना/मते/टीका यांचे स्वागत आहे. आपले प्रतिसाद पुढच्या गणेशोत्सवासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील याची आम्हाला खात्री आहे.

धन्यवाद,
संयोजक मंडळ - मायबोली गणेशोत्सव २०१०

ता. क. स्पर्धांच्या मतदानासाठी ह्या दुव्यावर पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

संयोजक मंडळाचे अन सर्व स्वयंसेवकांचे, कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि आभार! खूप खूप मजा आली Happy

स्पर्धा, खेळ, कार्यक्रम, गाणी सगळ्याचेच उत्तम आयोजन. सर्वच कार्यक्रम बहारदार झाले.:)

संयोजक मंडळ नविन असून कुठेही नवखेपणा जाणवला नाही. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मायबोलीवरील बरेच छुपे कलाकार पुढे आले! Happy

सुंदर झाला नेहमीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव. संयोजकांचं नवखेपण अजीबात जाणवलं नाही. घरी गणपती बसत नसले तरी देखिल गणेशाच्या आगमनाचा आनंद पुरेपूर उपभोगता आला.

सगळ्या स्पर्धा, उपक्रम आवडले. किलबिलमुळे बालकलाकारांच्या अफलातून सुंदर कलाकृती बघायला, ऐकायला मिळाल्या.

संयोजक मंडळाला मनःपूर्वक धन्यवाद!

छानच झाला ह्यावेळचा गणेशोत्सव. जाहिराती विशेष आवडल्या!
संयोजक मंडळाचे अभिनंदन! Happy

१. उत्तम संयोजन.
२. मस्त स्पर्धा
३. बहारदार झब्बू विषय.
४. गणपती विषयी लिखाण, वेगवेगळे कन्सेपट्स छानच
५. जोरदार पार्टिसिपेशन
६. छोटुल्यांची चित्र, स्तोत्र, आरती, आणि गाणी हा तर गणपतीने दिलेला मोठ्ठा प्रसाद होता.

संयोजकांना धन्यावाद. पण मायबोलीचे खूप खूप आभार. घरापासून लांब राहून घराच वातावरण निर्माण करून दिल्याबद्दल.

संयोजकांचे अभिनंदन आणि आभार. जाहिरातीपण कल्पक होत्या. ह्या जाहिरातींची संकल्पना कोणाची आणि जाहिरात बनवणार्‍या कलाकाराची ओळख करुन द्याल का?
सगळ्या स्पर्धात भाग घ्यायला जमला नाही पण नाविन्यपुर्ण होत्या. हा एकंदरीत नेटवरचा सोहळा अनुभवल्यानंतर खरेच म्हणावेसे वाटते ... बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या.

छान झाला गणेशोत्सव. सगळे संयोजक नविन होते हे खरच अजिबात जाणवले नाही. झब्बूचे काही विषय मस्त होते. जाहिराती पण छान होत्या. वेल डन संयोजक!

मायबोली गणेशोत्सव खूप खूप आवडला. भारतापासून दूर असूनही गणपतीच्या दिवसांमधील चैतन्य अनुभवायला मिळालं. संयोजक मंडळाला मनापासून धन्यवाद Happy

सर्व संयोजकांचे अभिनंदन आणि खुप खुप आभार.
मला या गणेशोत्सवात सर्वात जास्त आवडले ते बालकलाकारांची किलबिल.
(सर्व सहभागी ज्युनिअर माबोकर आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन आणि आभारसुद्धा :)).

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! विविध प्रकारच्या कला सादर करणारा एक देखणा उत्सव सादर केल्याबद्दल संयोजकांचे अनेक आभार. अजून सगळं वाचून, पाहून, ऐकून झालं नाही ते एका परीने बरंच झालं. आता दिवाळीपर्यंत पुरवून घेईन Happy

यावर्षी थोडासाअ मिसच केला इथला गणेशोत्सव.. पण दणक्यात झाला हे तर दिसलेच..
झब्बुचे सगळे विषय मस्त होते.. जाहिरातीही सुंदर!!
टाकाऊतून टिकाऊ हा फार उपयुक्त उपक्रम होता! खूप आवडला!
बाकीचे राहिलेले आता हळूहळू बघितले जाईल..

या वर्षीही खूप मजा आली!
संयोजक मंडळींना मानलं! दरवर्षासाठी माबो वर च्या गणेशोत्सवाबद्दल उत्सुकता वाढतंच जाणार निश्चितचं.
सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद!
जाता जाता.. आमच्या घरच्या गणपतीसमोर ची संगीत सेवा
(चित्रीकरण, आभार: श्री. श्याम मणियार)
http://sharing.theflip.com/session/1d533320445e763c59c07386c8a83753/vide...

पुढच्या वर्षी लवकर या!!!

संयोजक मंडळाचे मनःपुर्वक अभिनंदन आणि आभार! छान झाला उत्सव. सगळ्या लेखांना बाप्पाची रेखाचित्रे द्यायची कल्पना आवडली, जाहिराती छान होत्या, झब्बुचे विषय पण छान होते. कथाबीज ही कल्पना फारच आवडली. एकुणात दणक्यात झाला उत्सव. अभिनंदन सर्वांचेच.

गणेशोत्सव छान झाला. त्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन. Happy
कथाबीज आणि शब्दांकूर ह्या स्पर्धा आवडल्या. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमावर बाप्पाचे रेखाटन देण्याची कल्पना मस्तच होती ! प्रत्येक स्पर्धेच्या बाफवर पोस्टर देण्याची कल्पनाही आवडली. आजची मतदानाची रिक्षा मस्त होती. Happy

आधीच्या जाहिराती खास करून कहाणीची इमेज, नर्तिकेचं चित्र असलेली इमेज, अगदी सुरुवातीला आलेली केशरी रंगाची इमेज खूप आवडल्या होत्या आणि एकदम प्रोफेशनल होत्या, त्यामुळे मुर्ती सजावटीबाबत अपेक्षा खूपच वाढल्या होत्या. पण मुर्ती सजावटीत कापली गेलेली समई, दुसर्‍या बाजूची अर्धवट दिसणारी गुलाबदाणी ह्या गोष्टी खटकल्या. ह्या इमेजवर अजून खूप काम करता आले असते असं वाटलं. फोटोग्राफी स्पर्धांचे विषय सर्वसमावेशक वाटले नाहीत. माझ्याकडचा कुठलाच फोटो त्यात 'बसला' नाही. Happy
झब्बू हा प्रकार मागच्या वर्षीचा जसाच्या तसा घेण्याऐवजी काही वेगळ्या स्वरूपात घेतला असता तर आवडलं असतं.

मो, अगो, योग ह्यांची आणि बालकलाकारांची गाणी उत्सवा दरम्यान बर्‍याचदा ऐकली. Happy
परत एकदा सगळ्या कलाकारांना आणि संयोजकांना धन्यवाद..

पराग, झब्बू प्रकाराला पब्लिक डिमांड होती. गेल्या वर्षीचा भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊनच याही वर्षी ठेवण्यात आला असेल आणि यंदाही लोकांनी त्यात चांगला भाग घेतलाच की.

खूपच छान झाला गणेशोत्सव. झब्बूचे सगळेच विषय आवडले. प्रकाशचित्र स्पर्धांचे पण विषय छान होते.
टातुटि ची कल्पना पण खूप छान. किलबिल, गाणी पण खूप आवडली. एकदम दणक्यात झाले सगळेच कार्यक्रम.
संयोजक मंडळाचे अभिनंदन!

छान झाला गणेशोत्सव. संयोजक मंडळाचे अगदी मनापासून आभार. Happy
सार्वजनिक गणेशोत्सव कसा असावा ह्याचे चांगले उदाहरण आहे मायबोलीवरचा गणेशोत्सव.
गणेशोत्सव म्हटले की मायबोलीवर काहीतरी चांगले वाचायला, ऐकायला मिळणार याची खात्री वाटते आता. यावर्षीही चांगले चांगले वाचायला, ऐकायला मिळाले. श्राव्य हा प्रकार फारच उत्तम आहे. दरवर्षी नवनवीन गुणी कलाकारांचे गाणे ऐकायला मिळत आहे. किलबिल हा प्रकारही आवडला. मुलांनी छान प्रकार सादर केले. 'अशीही जाहिरातबाजी'ची कल्पना आवडली. यावेळचे झब्बूचे विषय अगदी मस्त होते. आवडले. बाकी लेखांमधली, जाहिरातींमधली आणि इतर सगळीकडची सजावट उत्तम होती.

पण मलाही थोडेसे हिमांशूसारखेच वाटले. कार्यक्रम थोडे कमी केले तर आहेत त्यांचा नीट आस्वाद घेता येईल. अजूनही माझे 'किलबिल' आणि 'टाकाऊतून टिकाऊ' मधले सगळे पाहून झालेले नाहीये. म्हणजे तक्रार काही नाहीये, पण मला असे सुचवावेसे वाटते की झब्बू हा प्रकार कमी करावा. प्रत्येक दिवशी नवीन विषय देण्यापेक्षा दर दोन दिवसाला नवीन विषय देणे योग्य वाटते. म्हणजे मग आधीच्या विषयाचे सगळे फोटो बघून होतात आणि मग पुढचा विषय येतो.

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!

हिम्सकूल, फचिनशी मी ही सहमत. झब्बूला रोज एक नवीन विषय देण्यापेक्षा ११ दिवसांत ४,५ विषय ठेवावेत जेणेकरुन सगळ्या स्पर्धांना, कार्यक्रमांना न्याय मिळेल. माझंही बरंच वाचून, बघून व्हायचं आहे अजून.

खुप छान झाला गणेशोत्सव. संयोजकांचे आभार आणि अभिनंदन. सगळे कार्यक्रम खुपच छान झाले.
जाहिराती आणि प्रत्येक लेखासोबत असलेली गणपतीची रेखाटनेही अतिशय सुंदर झाली होती. लहान मुलांच्या स्पर्धा न ठेवता गुणदर्शन ठेवले ते खुप छान झाले. रोज सकाळी कधी नविन प्रोग्रॅम येणार याची वाट बघत असायचे !

एक सुचवावेसे वाटते- गणेशोत्सव ग्रुपमधे भाग घेतल्याशिवाय काही दिसत/ किंवा भाग घेता येत नाही. त्यामुळे काही जणांचे हे कार्यक्रम चुकले असणार. कविता आणि कथाबिज दोन्हीला अजुन खुप प्रतिसाद अपेक्षित होता. नेहेमीच्या कथा कविता लेखकांची तिथे थोडी अनुपस्थिती जाणवली.

पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.

>>गणेशोत्सव ग्रुपमधे भाग घेतल्याशिवाय काही दिसत/ किंवा भाग घेता येत नाही.
ग्रुप जरी असला तरी सर्व धागे सार्वजानिक आहेत. सगळ्यांना दिसत असले पाहिजेत.
[मी दोन्/चार पाने बघून खात्री केलेली आहे]

very well done.. congratulations ... keep it up!

गणपती बाप्पा मोरया आणि पुढल्या वर्षी लवकर या!

हा माझा पहिलाच माबो गणेशोत्सव होता. खूपच मजा आली. संयोजकांचे अतिशय उत्कृष्ट व्यवस्था ठेवली होती. सर्वांचे अभिनंदन आणि आभार!

मस्त झाला गणेशोत्सव. एकदम दणक्यात. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी रोज प्रकाशीत होत होत्या, म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा, झब्बुंची घोषणा, जाहिराती, धमाल उपक्रम (संवादाचे) आणि सर्वात वरची कडी म्हणजे ह्या वेळेचा किलबिल विभाग! एक से एक एट्री आहे. अजुन बरच वाचुन , बघुन व्हायचय. कारण रोज काय बघु आणि काय नको असं व्हायचं. सर्व संयोजकांचे अभिनंदन, एव्हढा देखणा गणेशोत्सव साजरा केल्या बद्दल.

सहिच झाला गणेशोत्सव आणि त्या बद्दल संयोजकांचे आभार आणि अभिनंदन.....
सर्वच कार्यक्रम मस्त होते पण प्रकाशचित्रांचा झब्बु हा कार्यक्रम फारच मस्त होता....:)

.

Pages