मायबोली गणेशोत्सव २०१० - जाहिरात दालन

Submitted by संयोजक on 21 September, 2010 - 20:50

गणेशोत्सवातील जाहिरातींची प्रथा यावेळच्या संयोजक मंडळानेही सुरु ठेवली. यावर्षीच्या जाहिरातीही मायबोलीकरांना आवडल्या, कल्पक वाटल्या असे बर्‍याच जणांनी सांगितले. या सगळ्याच जाहिराती एकत्र बघायला मिळाव्यात यासाठीच हे जाहिरातींचे दालन ...

Ad_HG_Ganesh_2010.gifaikaGaneshDevaNew.jpgAmntran.jpgSansRutik_Ad-2010.jpg2010_MB_GundyabhauAd_0.jpg2010-KidsActivity-Final.jpgKids-Activity-Ad-2-2010.jpgTT-Ad-1-Final.-2010jpg.jpg2010-TT-Ad2-Final.jpg2010_MB_Amne-Samne-Cricket-Ad2-2.jpg2010_MB_Amane-Samane-Ramdevbaba-final.jpgSamashyapurti Ad 1.jpg2010_MB_Kaayasphurti_Ad2.jpgPraChi-2010.jpg2010_MB_PrachiAd2.jpgBipasha-Pitambaree_Mad_Ads_Ad_2010.jpg2010_Mb_MadAds_Sehwag.jpg2010_MB_Voting_Poster.jpg2010_MB_Ganesha2.jpg2010_MB_Ganesha3.jpg2010_MB_Ganesha4_small.jpg2010_MB_GaneshaForK.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

खर्‍या अर्थाने ह्या जाहिरात दालनातल्या एकेक जाहिरातींमुळे ह्या वेळेस गणेश उत्सवाला एक वेगळीच रंगत आली. अन ह्या जाहिरातींच्या कल्पनाही सुंदर होत्या. खरोखर धन्यवाद सर्व संयोजकांचे.

या वर्षीही रंगतदार दालनांनी गणेशोत्सवाची रंगत वाढवली. झब्बू असोत अथवा प्रकाशचित्रांच्या स्पर्धा, किलबिल् मधील सर्व बच्चे कंपनीने गायलेले स्तोत्र/गाणी, छोट्या मायबोलिकरांनी केलेले बाप्पा, टाकाउतून टिकाउ मधील स्पर्धकांनी सादर केलेल्या संकल्पना सुरेखच. अशा स्पर्धा यशस्वीपणाने आयोजित करणार्‍या सर्व संयोजकांचे अभिनंदन व शुभेच्छा. Happy मोरया.

जाहिराती फार सुंदर आणि कल्पक होत्या. उत्कृष्ट. अभिनंदन.
पितांबरी वगैरे बाबत कॉपीराईट असतो का अशी एक शंका होती.

मला हे जाहिरातींचं दालन आवडलं !
प्रत्येक गोष्टीबरोबर, गाण्याबरोबर एक गजाननाचे रेखाटन आहे, ते सुद्धा खूपच छान !

यंदाच्या जाहिराती खरच एक सो एक झाल्यात... हे दालन देण्याचे प्रयोजन पण मस्तच... माझ्यासारख्या उशिरा येणार्‍यांना सगळ्या जाहिराती बघायला मिळाल्या इथे एकत्र..

आणि नंद्याला अनुमोदन.. ती गणपतीची चित्रं पण मस्त झालीयेत.. जमलं तर ती पण सगळी एकत्र टाका इथेच..

लोकाग्रहास्तव गणपतीची रेखाचित्रे दिली आहेत. मायबोलीकरांनी भरभरून केलेले कौतुक आणि मनापसून दिलेली दाद यामुळे सर्व संयोजक मंडळाने घेतलेल्या कष्टांचे सार्थक झाल्याची भावना आहे Happy
मनापासून धन्यवाद Happy

सर्व जाहिराती/ रेखाटने एकदम मस्त आणि कल्पक. ह्या जाहिरातींची संकल्पना कोणाची आणि जाहिरात बनवणार्‍या कलाकाराची ओळख करुन द्याल का?
पुनश्च एकदा अभिनंदन !

खरंतर संयोजक मंडळातील कोणती कामे कोणी केली हे सांगायची पद्धत नाही. परंतू वर विचारलंय म्हणून लिहितोय.

यावेळच्या गणेशोत्सवातील जाहिरातींचा विभाग अंजली, मिनी व मिनोतीने सांभाळला होता. सर्व लेखांवर/गाण्यांवर केलेली गणपतीची रेखाटने ही अंजलीने स्वतः केली आहेत. तर मिनी व मिनोतीने हे काम पहिल्यांदाच केले आहे. बर्‍याचशा जाहिरातींचा मजकूर हा ज्ञातीने लिहिला आहे.

सुंदर आणि मजेशीर जाहिराती.
अंजली, मिनी,मिनोतीचं अभिनंदन. ह्या निमित्ताने त्यांच्यातले छुपे कलाकार बाहेर पडले.

अतिशय सुंदर आणि कल्पक जाहीराती.
अंजली , मिनी , मिनोती , ज्ञाती तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आहे.

हे जाहिरात-दालन म्हणजे सुद्धा इथून पुढे गणेशउत्सवातली पर्वणी होणार Happy अतिशय कल्पक होत्या सगळ्या जाहिराती अंजली,मिनी, मिनोती, ज्ञाती खरोखर सुंदर....आऊटडोअर्स, अंजली, ज्ञाती, पूर्वा, मन-कवडा, मिनी, मिनोती अभिनंदन तुम्हा सगळ्यांचच.

छान होत्या सगळ्याच जाहिराती!! अंजली, तुझी रेखाटनं तर क्लासच!!

अ‍ॅडमीन, एक सुचवावंस वाटतय.. मायबोलीवर इतके विविध उपक्रम राबवले जातात. त्या त्या उपक्रमांच्या निमित्ताने इतक्या कल्पक जाहिराती बघायला मिळतात. इथे मला ववि ची दवंडी, टि शर्ट विक्रीच्या जाहिराती, मराठी भाषा दिनाच्या जाहिराती आणि गेले काही दिवाळी अंकाच्या जाहिरातीही आठवतायत. आपण मायबोलीवर 'एक कायमस्वरूपी जाहिरात दालन' चालू केले तर? सगळ्या जाहीराती एकत्र बघायला मिळतील.

या गणेशोत्सवातील जाहिराती या मी मायबोलीवर आजपर्यंत बघितलेल्या जाहिरातीतील सर्वोत्तम आहेत Happy
संयोजक मंडळाचे आणि या जाहिरातींसाठी परिश्रम घेतलेल्या सगळ्यांचे अभिनंदन!