|| आधी वंदू तुज मोरया - टिळकनगर-चेंबुर येथील गणपती ||

Submitted by जिप्सी on 20 September, 2010 - 00:09

|| गणेशोत्सव २०१० – सह्याद्री मित्र मंडळ (टिळकनगर-चेंबुर) येथील श्री गणेश ||
********************************************************
********************************************************
कर्नाटक येथील हंपी मंदिराची प्रतिकृती
********************************************************

********************************************************
********************************************************

गुलमोहर: 

"आधी वंदू तुज मोरया" या सिरीजमधील शेवटचे प्रचि Happy
|| गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ||

खरच दहा दिवस आनंद निर्माण करण्यासाठी किती हात रात्रंदिवस झटतात ?
अप्रतिम देखावा. मी स्वतः हंपी पाहिल आहे. कुठेही खोटेपणाचा आभास झाला नाही इतक सुंदर मंदीर आहे हे.

धन्यवाद!!!!

कुठे आहे हा मंडप? शॉपर्स स्टॉप आहे तिथे जवळ आहे का? दर्शनाला खुप गर्दी असते का?>>>अमि, सहकार सिनेमाजवळ, समाजमंदिरात आहे हा देखावा. आता शेवटचे दोनच दिवस उरले आहेत त्यामुळे गर्दी असणारच :(. पण दुपारी गेलात कि गर्दी थोडी कमी असेल (बहुतेक :)).

वॉव. हा गणपती आम्ही लहानपणी ना चुकता पहायचो कारण घराजवळचा म्हणून. ह्याला टिळक नगरमधील कोणा असामीचे 'आशिर्वाद' असतात असे तेव्हा फेमस होते. Happy

बाकी अजुनही इतका दिव्य देखावे करतात इतक्या वर्षाने कमाल आहे. खर्च खूपच अनाठायी वाटतो पण.

अप्रतिम!

सुंदर, टिळकनगरला दरवर्षी असा सुंदर देखावा तयार करतात. >>>
येस्स. मी पण लहान असताना सलग २ वर्षांचे देखावे पाहिले होते.

ह्याला टिळक नगरमधील कोणा असामीचे 'आशिर्वाद' असतात असे तेव्हा फेमस होते>>>
येस्स. मी ही असे ऐकले आहे.