टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. ८ - धनुडी

Submitted by संयोजक on 18 September, 2010 - 04:38

साहित्य : वापरलेली एन्व्हेलप्स, व्हाउचरचे उरलेले कागद, रंगीत जाहिरातींचे कागद ( थोडक्यात कुठलीही रद्दी), कात्री, फेव्हीस्टीक .

ह्या अशा उरलेल्या कागदापासुन मी फुलं, प्राणी, आणि मग ते वापरुन भेटकार्ड करते. ह्या कार्डाचा कागदही, शेअरच्या कंपनींचे रिपोर्ट्स येतात त्यांचे वापरते. रिपोर्टच वरचं कव्हर जरा जाड आणि गुळगुळीत असतं. फुलं, प्राणी वगैरे मी नं आखताच कापते. आत्ता माझ्याकडे प्राण्यांचा फोटो नाहिये, म्हणुन फुलाचाच फोटो टाकते, आणि त्यापासुन बनवलेलं भेटकार्डाचा फोटो देते. ( हे मी माझ्या मुलासाठी वाढदिवसांचं केलं होतं)

Taakautun Tikaau_entry_DhanuD.JPGTaakautun Tikaau_entry_DhanuD2.JPGTaakautun Tikaau_entry_DhanuD3.JPGTaakautun Tikaau_entry_DhanuD4.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

मस्त Happy

सहिच Happy

अरेच्या प्रकाशीत झालय की , पण ते गणेश उत्सवाच्या प्रमुख पानावर दिसत नाहिये म्हणुन मला वाट्लं की अजुन प्रकाशीत व्हायचय. मी उगीचच संयोजकांना मेल पाठ्वला.
आणि धन्यवाद सर्वांचे. आमच्या ऑफिसमधे एअरलाइनची तिकीटं ज्या पाकिटातुन येतात त्या कागदाचा वापर करुन हि माणंसं कापली आहेत.

छान बनलीत फुले..

पण इथे हे टिकाऊ प्रकार कसे केलेत ते सांगणेही गरजेचे आहे ना??? सांगितले नाही तर आमच्या घरचे टाकाऊ टिकावू कसे बनतील??

साधना, ह्या एका बाबतीत मी एकदम मठ्ठ आहे, मला नी ट लिहीता येत नाही , तर स्टेप बाय स्टेप काय कर्म सांगणार? ह्या आधी कोणीतरी क्विलींगची माहीती दिली होती ना , तशा प्रकारची बारीक पट्ट्या कापुन घेउन , थोडी वर जागा सोडुन , जवळ जवळ कापत जाते. फुलांच्या मधला प्रकारही अगदी बारीक पट्टीची घट्ट गुंडाळी करते आणि चिकटवत जाते. हे मला दाखवता येईल , लिहुन सांगणं कठीण्च आहे.

धनु Happy