Submitted by विजयकुमार on 17 September, 2010 - 03:01
आव्हान देवूनी सामोरी
उभा मदनाचा पुतळा
कुणी एकटाच गोंधळलेला
भोवती घट्ट गोतावळा ||
कैफास शरण जाता
भीड कशाची शरीरास
उठणा-या लाटा थोपविता
प्रयास पडती शरीरास ||
कुणी म्हणुनी सांगावे
मना संयम राख
वणवे पेटले वासनेचे
करिती शरीर बेचिराख ||
मोह कोसळूनी पडता
भानास येते ग्लानी
बेधुंद मनावर ओघळते
अनामिक एक मोहिनी ||
टाळू म्हणता टळेना
शरीरज्वर हा बेफाम
गार पडल्या तिमिरात
कपाळी साकळे घाम ||
विजयकुमार.........
०७/ ०९/ २०१०, मुंबई
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा