मुक्काम पोस्ट - श्री दत्तगुरु ठिकाण - नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी)

Submitted by स्मितहास्य on 13 September, 2010 - 04:24

पाऊस नुकताच संपत आलेला... आणि त्यात आलेली ३ दिवस सुट्टी.
डोक्यात बेत रंगु लागले आणी बेत ठरला नर्सोबाच्या वाडीचा (तीच ती नृसिंहवाडी) दत्तगुरुंच ठिकाण.

नर्सोबाची वाडी, श्री दत्त म्हणजे (ब्रम्हा-विष्णू-महेश) यान्च रुप. याच श्री दत्तगुरुन्च्या पादुका नर्सोबाच्या वाडीत आहेत.
हे ठिकाण आहे, मुम्बईहून अन्दाजे ३८६ कीमी, सान्गलीहून २२ कीमी, आणी कोल्हापुरहून ४५ कीमीवर.
छत्रपती शिवाजी टर्मीनसहून सुटणारी (सन्ध्याकाळी ८.३० वा) सह्याद्री एक्सप्रेस (व्हीटी - कोल्हापुर) दादरला पकडली आणी आमचा प्रवास सुरु झाला. मुम्बईहून अंदाजे ३८६ किमी वर असलेल्या मिरजेला (सकाळी ६.३०) उतरून आम्ही वाडीला (४०-५० किमी) जायची बस पकडली आणी मनाने एकाच ठाव घेतला "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा". एक वेगळीच ओढ लागली होती. बोचरी थन्डी आणी बाहेर हिरवाकन्च निसर्ग लक्ष वेधून घेत होता. जागोजागी उसाचे फड दिसत होते. नुकताच जाग आलेली गाव खूप छान दिसत होती. एकन्दरच मन खूप प्रसन्न होत.

दत्तगुरुंच्या ध्यानस्मरणात असतांनाच वाडीला कधी आलो कळालच नाही. सामान ठेवून सुचिर्भुत होऊन महापूजा आटोपली. (भक्तनिवासाची सोय आहे. गरम पाणी, एक बादली रु.१५) या किमतीत मिळते. अत्यन्त स्वच्छ अशा त्या परिसरात मन एकदम शान्त झाल होत. मन्दीराच्या आवारात ४-५ अशी छोटी मन्दीर आहेत. औदुम्बराची झाडे प्रकर्षाने आढळतात. न्रुसिह सरस्वती स्वामीन्नी येथे १२ वर्षे वास्तव्य केले होते. न्रुसिह सरस्वती स्वामी हे दत्तगुरुन्च्या १६ अवतारान्पैकी एक. ईतर ठिकाणासारखी येथे दत्तगुरुन्ची मुर्ती नाही, त्यान्च्या पादुका हेच येथील आकर्षण.

क्रुष्णा आणी पन्चगन्गेच्या तीरावर असलेली ती श्री दत्तगुरुन्ची पाऊले जेव्हा महापुजेदरम्यान याही देही याची डोळा पाहिली तेव्हाची स्थिति काय वर्णावी.......
या पादुका दुध, दही, पन्चाम्रुत यान्नी धुऊन मग त्यावर फुलान्ची आच्छादने घालतात वर मग शाल अन्थरून मुखवटा ठेवला जातो. अस म्हणतात की क्रुष्णेला कीतीही पुर आला तरी ती काही दत्तगुरुन्च्या पाउलापर्यन्त पोहोचु शकत नाही.... त्या पाउलान्चे आपण फोटो घेउ शकत नाही तरी मी ते घेतलेच. आणी कायमची ती माउली माझ्या मनात उमटवली.... क्रुष्णा नदी नेहमीप्रमाणे सन्थ वाहत होती (सन्थ वाहते क्रुष्णामाई) याचा उलघडा तिथे झाला.. तिचे पात्र खूप मोठे, ईतके की पाण्यात उतरणारा क्षणभर विचार करेल...

क्रुष्णेच्या पलिकडच्या तिरावर अजून एक दत्तान्च एक मन्दिर आहे. त्याचा ईतिहास असा,
दत्तगुरुन्च्या काळात वाडीत एक अत्यन्त गरीब स्त्री होती. दतगुरु जेव्हा तिच्याकडे भिक्शा मागावयास गेले, तेव्हा दारिद्र्यापोटी आलेल्या गरीबीमुळे तिच्याकडे दत्तगुरुन्ना देण्यास काहीही नव्हते. तेव्हा तिथून पुढे जातान्ना दत्तगुरुन्नी तिच्या ओसरीत लावलेला घेवड्याचा वेल मुळासकट उपसून टाकला. त्यान्च्या अशा वागण्याने ती स्त्री अतिशय दु:खी झाली.. कारण तीचा जो काही उदर्निर्वाह होत असे तो त्या वेलिवरच. पण तिच्या नवर्‍याने तीची समजुत घातली (दत्तगुरुन्नी अस केल म्हणजे कहितरी नक्कीच हेतु असेल). या विचाराने त्याने त्या वेलीजवळची माती सारवण्यास सुरुवात केली असता, त्यास द्रव्याने भरलेला हन्डा तिथे सापडला. याची विचारणा दत्तगुरुन्जवळ करताच ते म्हणाले की तुझ दारिद्र्य दूर करण्यासाठी मी ते केलेल आहे. पण जर का याचा उल्लेख कुणाजवळ करशील तर पुन्हा दरिद्री होशील. शेवटी स्त्रीच ती, केला तीने झाल्या गोष्टीचा उल्लेख आणी पुन्हा दरीद्री झाली.
तर ती वेल उपटलेली जागा क्रुष्णेच्या पल्याड आहे. (वेळेअभावी तेथे जाणे झाले नाही :()

वेळ होता आमच्याकडे म्हणून मग वाडीहून सांगली आणी तेथून औदुम्बर असा प्रवास ठरला. या प्रवासातही निसर्ग सुखावत होता. सांगलीहून बस मिळेना (खूप अन्तराने बसेस आहेत) म्हणून मग एक कार केली आणी मार्गस्थ झालो. वाटेत म्हसोबाचे एक मन्दिर लागले तिथे जाऊन आलो आणी पुढे निघालो. कोयनेच्या तीरावर वसलेल हे श्री दत्तगुरुन्च आणखी एक ठीकाण. तिथल दर्शन घेतल आणी माघारी फिरलो.
अशी ही आमची यात्रा अतिशय प्रसन्न, सुखद आणी आठवणीत राहणारी ठरली. आपणासही या यात्रेचा योग लवकरच येवो आणी श्री दत्तगुरुन्ची पाउले आपल्या घरी सुख-सम्रुद्ध्ही-सम्पन्नता घेउन येवोत हीच दत्तगुरुन्च्या चरणी प्रार्थना.... "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"

याच प्रवासाची ही काही प्रकाशचित्रे....

नोटः प्रचि साधारण ८० असल्याकारणाने सदर सादर होण्यास वेळ लागेल त्याबद्दल क्षमस्व.

प्रवासचित्रे (मुम्बई-नरसोबाची वाडी)

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७
नरसोबाची वाडी बस स्थानक

प्रचि ८

स्थळ नरसोबाची वाडी
प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११
सकाळी ७.०० वा.

प्रचि १२

प्रचि १३
ईथल्या स्थानिक विक्रेत्याने सान्गीतल की ह्या रुद्राक्शान्ना हा असा आकार नैसर्गीकरीत्या येतो.

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
मुख्य मन्दीरच्या आवारात एक शिवलिन्ग

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१
स्थानिक दुकान

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
मुख्य मन्दीर

प्रचि २५
एका बाजूने

प्रचि २६
याच त्या आपल्या श्री दत्तगुरुन्च्या पादुका

प्रचि २७
अशा रितीने पदुकान्ची पुजा करून मग मुखवटा चढवला जातो.

प्रचि २८
क्रुष्णामाई

प्रचि २९
भक्तनिवासामधून

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४
देवळाचा परिसर

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८
बाप्पा आले तेव्हा

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२
बस स्थानकाबाहेर

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७
जागोजागी असलेले ऊसचे फड

प्रचि ४८
प्रवासचित्रे (वाडी-ओउदुम्बर)
बाप्पा प्रवासात

प्रचि ४९

प्रचि ५०

प्रचि ५१

प्रचि ५२
श्री क्षेत्र ओउदुम्बर (ऐलतीरवरुन पैलतीरावर)

प्रचि ५३

प्रचि ५४
मुख्य मन्दीर

प्रचि ५५

प्रचि ५६
श्री दत्तगुरुन्ची मुर्ती

प्रचि ५७
न्रुसिह सरस्वती स्वामी

प्रचि ५८

प्रचि ५९

प्रचि ६०

प्रचि ६१
पोट्पूजा (राजगीर्‍याचा लाडू)

प्रचि ६२
श्रम

प्रचि ६३
प्रवासचित्रे (मिरज-मुम्बई)

प्रचि ६४

प्रचि ६५

प्रचि ६६

प्रचि ६७

प्रचि ६८

प्रचि ६९

प्रचि ७०

प्रचि ७१

प्रचि ७२

प्रचि ७३

प्रचि ७४

प्रचि ७५

प्रचि ७६

प्रचि ७७

प्रचि ७८

प्रचि ७९

प्रचि ८०
हा छोट्या कोलान्ट्या उड्या मारुन पैसे मिळवत होता आपल्या आईच्या आणी छोट्या बहीणीच्या उदरनिर्वाहासाठी.... या वयात....

गुलमोहर: 

फारच सुंदर... प्रचि ५२, ६३, ६५, ६९ विशेष आवडले...

नरसोबाची वाडी बस स्थानक>>>
एव्हडे स्वच्छ बस स्थानक आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले...

Happy

१० वर्षांपुर्वी गेले होते तेव्हा कृष्णेच्या पाण्यात सगळ्या पायर्‍या बुडल्या होत्या. नीट दर्शनच झाले नव्हते.

ती घेवड्याच्या वेलाची गोष्ट म्हणजे श्रीगुरुचरित्र १८वा अध्याय.

मस्तच.
मिरजेहून वाडी २० किमी आहे. तसेच वाडीचा पेढा, कवठाची बर्फी व 'कर्दंट' प्रसिध्द आहेत.
येथील बासुंदीही मस्त असते. वाडीला कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम होतो.
औदुंबरचा परिसर पण मस्तच आहे.

मला फोटूच जास्त आवडले Happy मस्तहेत
(बर, ती लागिरलेली माणसे झाडावर वगैरे चढून बस्तात ते कुठे इथेच का?)

मस्त ..

माझे गाव कुरुंदवाड. वाडीच्या नदीत पोहण्यात बालपण गेले.. Happy छान वाटले फोटो पाहून..

घेवड्याच्या वेलीचा शेवट- कुणाला सांगू नको नाहीतर पुन्हा सगळे जाईल, असे काही ऐकले नव्हते....

टेंबे स्वामींचा मठ, पाटील महाराजांचा मठ हेही बघण्यासारखे आहे.. वाडीचे जैन मंदिर देखील छान आहे.

लिंबुभाऊ , ते ठिकाण हे नव्हे... ते गाणगापूर... ( घाणगापूरचा एस एम एस म्हणून मायबोलीवरच एक कथा आहे... मिळाल्यास वाचा... Happy ) वाडीत तसले डांब, झाडे नाहीत...

वाडीपासून कुरुंदवाडमार्गे खिद्रापूरला जाता येते. तिथे कोपेश्वराचे सुंदर मंदिर आहे... खिद्रापूरजवळच्या परिसरात दक्षाचा 'तो' यज्ञ झालेला होता. त्यावेळी दक्षाने शंकराला अद्वातद्वा बोलून दुखवले. उमेने यज्ञात उडी घेतली... तांडव नृत्यानंतर राग शांत करण्यासाठी शंकर जिथे ध्यानस्थ झाले, ते म्हणजे कोपेश्वराचे मंदिर..

सगळ्यान्चे आभार.....

चंदन, नरसोबाची वाडी बस स्थानक>>>
एव्हडे स्वच्छ बस स्थानक आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले... >>>> माणस कमी रे.... त्यामुळे.... Happy

अश्विनी के, ती घेवड्याच्या वेलाची गोष्ट म्हणजे श्रीगुरुचरित्र १८वा अध्याय. >>> ओह्ह...... हे महित नव्हत..... धन्स.. Happy

मंगेश, वाडीची बासुंदी आणी कवठाची बर्फी खाल्ली का नाही ... >>> हे माहीतच नव्हत... Sad

प्रतिभा, बर, ती लागिरलेली माणसे झाडावर वगैरे चढून बस्तात ते कुठे इथेच का?)
- गाणगापूर (कर्नाटक) >>>> अनुमोदन...... आम्ही जाऊन आलो होतो बर्‍याच वर्षापुर्वी.... अगदी मान जाईल एवढ्याच जागेतून ती मुर्ती बघता येते..... आणी एकच चेहरा आहे ना या मुर्तीचा???

लिंबू, झाडावर तू सुद्धा चढून बसशील>>>>>> Happy Happy Happy Happy

गाणगापुरात एक भलामोठा वॄक्ष आहे त्याचा पारही तितकाच मोठा.... त्या झाडावर ही लगरलेली माणसे चढून बसतात आणी मग परत खाली कस यायच हा विचार पडतो त्यान्ना... Happy

जयु, मी सांगलीची . फोटो पाहून गावी जायची ईच्छा तीव्र झालीए. >>> अगदी खरोखर जाऊन ये.... खूप सुन्दर निसर्ग फुललाय तिकडे... एकदम प्लेसेन्ट वातावरण..... Happy

>>> लिंबू, झाडावर तू सुद्धा चढून बसशील
अं? नाही, अवघड आहे आता या वयात! झाडावर चढणे वगैरे जमणार नाही
पण अजुनही "झाड" धरू शकेन याची खात्री हे बर्का Proud

वाडीची बासुंदी - हो हल्ली पुण्यात पण मिळते ही आणि खूपच मस्त असते. तोंडाला पाणी सुटलंय. प्रचि १९ शेंदरीचं फुल आहे ना? मी कित्येक वर्ष शोधतेय हे झाड. मी लहान असताना होतं आमच्याकडे.

मीन्वा, गणेश, योगेश, किश्या, GauriC >>> आभार.

किश्या, आता परत बाईकवर फिरु नकोस....... आत्ताच आपटलायस ना.....

मीन्वा, प्रचि १९ मधल फूल तिथल्याच एका भटजीन्च्या घराच्या अन्गणात उमललेल होत.. नाव माहीत नाही. पण दिनेशदाना तर नक्कीच माहित असेल.. बघुया ते ईथे चक्कर मारेपर्यन्त...... Happy

स्मितहास्य, फोटो खूप छान आहेत. सुरुवातीच्या काही फोटोंमध्ये खूप ग्रेन दिसतायत, नंतर नाही जाणवत.

त्या पाउलान्चे आपण फोटो घेउ शकत नाही तरी मी ते घेतलेच.>>> हे कळले नाही.

आऊटडोअर्स, धन्स.. Happy
त्या पाउलान्चे आपण फोटो घेउ शकत नाही तरी मी ते घेतलेच.>>> हे कळले नाही. >>> म्हणजे, तीथे फोटो काढण्यास मनाई आहे. आपण जराजरी काही हालचाल केली तरी लगेच तिथले लोक "ओ फोटो काढू नका असे म्हणायला लागतात".
तरीसुद्ध्हा महापुजेदरम्यान सगळ्यान्ची नजर चुकवून मी ते फोटो घेतले... Happy

छान आहेत फोटो!
दर भारतवारीत वाडीला जाऊन येतोच, आता ह्यावेळीच जमेल का नाही माहित नाही, जरा गडबडीत आहे येती वारी. नेहमी येताना तिथला खवा, गुलकंद घेऊन येतो Happy

आशय, राखी, किशोर, राधिका>>> आभार..
दर भारतवारीत वाडीला जाऊन येतोच, आता ह्यावेळीच जमेल का नाही माहित नाही, जरा गडबडीत आहे येती वारी. नेहमी येताना तिथला खवा, गुलकंद घेऊन येतो >>>>वारी जरी गडबडीतअसली तरी थोडा वेळ काढाच म्हणतो मी... आणी जाउन याच... Happy

Pages