गणपतीची आरती

Submitted by अभय आर्वीकर on 12 September, 2010 - 13:05

गणेशगणपतीची आरती

जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥

वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥

पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥

तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझे लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥

                                 - गंगाधर मुटे
...........................................................

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Happy

धनेषजी, "प्रसाद" विसरलोच होतो.
बघुया श्रीकृपेने काही घडते काय ते.
जर घडले तर श्रेय तुम्हालाच. Happy