सागरा प्राण तळमळला....काय हि दुर्दशा

Submitted by मनीष कदम on 7 September, 2010 - 11:17

मानवाने प्रगती केली... आणि निसर्ग त्याची किंमत मोजतोय. हे सगळं उघड्या डोळ्यांनी माणुस फक्त पहात राहणार का??????
4.jpg5.jpg06.jpg3.jpg7_0.jpg2_0.jpg

निसर्गावर होणार्‍या या मानवि अत्याचाराबद्द्ल तुमचे मत येथे मांडा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा...........छान. चांगला विषय आहे.....पण नूसतीच चर्चा केलि जाते....कृती सुद्धा अपेक्षीत आहे....तुम्ही तुमचे निर्माल्य कुठे विसर्जीत करता.... मनिष कदम ? सुरुवात आपण आपल्याकडुनच करायला हवि.

हल्ली निर्माल्यासाठी विसर्जनाच्या जागी मोठे कुंभ ठेवलेले असतात (मुलुंडला तरी आहेत) आम्ही त्यात टाकतो. समुद्रांवर अशी सोय असते का गणपतीच्या काळात?

फोटोंचा विषय चांगला आहे.

पाने-फुले-हळद-कुंकू-हार-पत्री इत्यादींचे निर्माल्य शक्यतो झाडांवनस्पतींना घालावं किंवा त्यांचं कंपोस्ट तयार करावं! मूर्ती जर पाण्यात विरघळणारी असेल तर तिचं घरच्या घरी टब/ बादलीत किंवा हौदात विसर्जन करून ते पाणी बागेत/ रोपांच्या कुंड्यांमध्ये जिरवावं. जमली तर शाडूची/ मातीची मूर्ती घरच्या घरी तयार केली तर अजून छान!

कलशांमध्ये एकत्र केल्या जाणार्‍या निर्माल्याची होणारी दैना मी अनेकदा पाहिली आहे. त्यात प्लास्टिकच्या पिशव्याही टाकतात लोक!!! शिवाय कुत्री-मांजरी तोंड घालून उचकपाचक करतात. ते कलश योग्य वेळेला रिकामे केले गेले नाहीत तर दुथडी भरून वाहतात, व त्यातील निर्माल्य रस्त्यावर येते. अनेक लोक निर्माल्य धड कलशात टाकत नाहीत, त्यामुळेही ते आजूबाजूला विखरून पडते. त्यासाठी ते झाडांनाच जिरवणे उत्तम!