कलाबाश

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

kalabash_tree.jpg

कलाबाश, हा शब्द खुप ओळखीचा वाटतोय ना. पण त्याचा अर्थ नेमका नाही सांगता यायचा. कदाचित तो कलाबक्ष, अश्या एखाद्या ऐतिहासिक व्यकिरेखेची आठवण करुन देत असावा.

kalabash_tree_leaves.jpg

झाडांच्या बाबतीत हा शब्द मी ऐकला तो नायजेरियात. एकदा मला तिथल्या बाजारात दुधी भोपळा मिळाला. मी त्याचा हलवा केला. माझी हाऊसमेड सगळे बघत होती, तिचा प्रश्न अर्थातच, हे तूम्ही खाता ? मी होकार दिला व विचारले तूम्ही काय उपयोग करता ? तर ती म्हणाली, हा फ़ारच कोवळा आहे, आम्ही तो वेलीवर पुर्ण वाढवतो, सूकवतो. सूकला कि आतून पोखरतो आणि मग त्याचा पाणी भरुन ठेवण्यासाठी उपयोग करतो. यात भरून ठेवलेले पाणी म्हणे खुप गार होते.

पुढे झाडांच्या बाबतीत पण हे नाव वाचले. अगदी सुंदर असे हे झाड. हिरव्यागार पानांमूळे छान दिसते. आकारानेही सुबक. आता झाड बघितले कि त्याची फ़ुले कशी असतील, हा विचार मला छळत राहतो, मग तिथे चकरा सुरु होतात. या झाडानेही फ़ुले दाखवलीच, पण तिथेही वेगळेपण आहेच.

kalabash_fule.jpg

फ़ुले हि अशी मातीच्या रंगाची. थेट खोडालाच लागलेली. आतून किंचीत शुभ्र. वास अगदी उग्र. घाणेरडा वाटेल असा. का बरे असावीत अशी वेडीविद्री फ़ुले ? विचार करता माझे मन मलाच म्हणू लागले, तू कोण लागून गेलास ? तूझ्यासाठी थोडीच फ़ुलली आहेत हि फ़ुले ? तू काय करणार आहेस या फ़ुलांचे ?

kalabash_ful.jpg

बघाना, माणुस म्हणजे कोण हो, या झाडांच्या नजरेत काय किम्मत माणसाची ? शून्य. मुळात झाडांची फ़ुले काय माणसाच्या नजरसुखासाठी थोडीच फ़ुलतात ? ती तर जाहिरात असते. त्या झाडाच्या परागीभवनासाठी. आणि त्यांचे फ़ुलणे असते या मित्राना आकर्षून घेण्यासाठी.

आता अशी फ़ुले कोणाला आकर्षित करुन घेऊ शकतात ? हि फ़ुले उमलतात रात्रीची आणि याचे परागीभवन करतात, वटवाघुळे. त्यामुळे हा रंग, आकार आणि गंधदेखील त्यांच्यासाठीच. वटवाघळे म्हणजे काहि फुलपाखरांसारखा नाजुक किटक नाही, त्यामुळे त्याना बसणे सोयीचे व्हावे म्हणुन हि फ़ुले भक्कम खोडावरच येतात.

Crescentia cujete असे याचे शास्त्रीय नाव. या झाडाला भलीमोठी फ़ळेही लागतात. खाण्यासाठी उपयोग होत नसला तरी कठिण कवचामुळे, सुकल्यावर साठवण्यासाठी उपयोग होतो. ( म्हणजे कुठेतरी पहिला संदर्भ आहेच कि, आणि दुधी भोपळ्याच्या वेलाला कलाबाश क्रीपर असे नावही आहे.)

अशीच खास वटवाघळांच्या सोयीसाठी फ़ुले येणारे दुसरे एक झाड असते, त्याचे नाव सॉसेज ट्री. मराठीत वाघुळफ़ुले. कालच्याच रविवारी, बसमधून दिसले, दादरच्या पाच बागेजवळ. आता फ़ुलांचा फ़ोटो मिळवायला जायलाच हवे.

विषय: 
प्रकार: 

दिनेशदा, हे झाड आहे कुठे? बघितल्यासारखे वाटतेय...

हाय भाग्य,
हे झाड आपल्याकडे फक्त राणीच्या बागेत दिसले. मूळात ते दक्षिण अमेरिकेतले. तिथे शोभेसाठी लावतात. ऑस्ट्रेलियात पण तशीच लागवड केली असणार.

दिनेश,

काहितरी नविन पाहिल्याचा आनंद झाला. राणीबागेत एकदा फेरी मारायला हवी आणि न ओळखता येणा-या झाडांचे फोटो काढून टाकायला पाहिजे इथे, आता सांगा माहिती म्हणून.

झाडाचे रुप आणि फुलांचे रुप - काही मॅचिंग होत नाहिय. एवढ्या सुंदर झाडाला अशी फुले? वटवाघळेच खातात म्हणून काय झाले? जरातरी रुप नको? फुलांचा रंग आणि पाकळ्या पाहुन मला त्या सगळ्यात मोठ्ठ्या फुलाच्या फोटोची आठवण झाली. इ-मेल मधून पाठवले होते फोटॉ कोणीतरी. ते सुध्धा असेच घाणेरड्या वासाचे आहे.

साधना.

फळांचा उपयोग खाण्यासाठी होत नसला तरी गराचा उपयोग औषधी असतो. अस्थम्यावर वापरतात. फ्लोरिडात ही झाडं आहेत. जवळपास दिसलं तर फोटो टाकीन.

आभार Mrinmayee. याचे फळ खुप मोठे असते एवढेच माहित होते. फोटो बघितलाय. ( उपयोग माहित नव्हता ) पण इथे नाही लागत फळं. इथे ते झाड अपरिचितच आहे.
साधना, येत्या रविवारी सकाळी राणीच्या बागेत जायचा प्लॅन आहे. शर्मिला येणार आहे. जमेल का ?

अरेरे, ह्या रविवारी मी आंबोलीला जातेय आठवड्यासाठी... खरंच मिस करेन मी एवढी चांगली ट्रीप.. मला एकदा माहिमच्या निसर्ग उद्यानातही जायचे आहे. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा सांगा.
साधना.

दिनेशदा, आठवडाभर रंगीबेरंगीवर यायलाच जमले नाही. आत्ताच वर वाचले आणि चुकल्यासारखे झाले. मला नक्कीच जमले असते. आता कल्याणवरुन भायखळा तेही मेगाब्लॉगच्या कचाट्यातुन जरा अश्यकच आहे. मी राणीच्या बागेत येईपर्यत तुमची सगळी बाग फिरुन होईल. असो, येथेच छायाचित्रांवर व माहितीवर समाधान करुन घेतो. कलाबाश सुंदरच दिसतोय.

मुम्बईतही अशी वॄक्ष सम्पदा आहे. हे माहीत नव्हते. रोज लोकल मधून जाताना असलं काही आम्हाला दिसतच नाही.

******************************************************************************************************************************

*** And on the 8th day Murphy said: "Ok God, you take over." ...God is still thinking!!! ***

वा छानच माहिती मिळाली..