अशीही जाहिरातबाजी - १

Submitted by संयोजक on 3 September, 2010 - 14:00

आजचा विषयः दीपिका पदुकोण आणि दगडु तेली मसाला

2010_MB_Jahiratbaajee_Deepika_Datema_Poster1.jpg

नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.
४. आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. एकदा प्रकाशित केल्यानंतर प्रवेशिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल करु नयेत, केल्यास स्पर्धेसाठी ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
५. जाहिरात वर्तमानपत्र, मासिकं किंवा अंतर्जाल इ. साठी आहे असे समजून बनवायची आहे. त्यासाठी फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी आहे.
६. जाहिरातीसाठी मजकूराबरोबरच स्वत: काढलेले चित्र/छायाचित्र याचा समावेश करु शकता. मजकूरासाठी शब्दमर्यादा १५० शब्द आहे.
७. अंतिम विजेता वाचकांच्या मतदान पद्धतीने ठरविला जाईल.
८. विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपिका सोफ्यावर बसलेली आहे. हातातल्या आल्बमची पानं उलटून गालातल्या गालात हसते. मग आपल्यावर कॅमेरा आहे हे कळताच आश्चर्यचकित झाल्याची (न जमणारी!) अ‍ॅक्टींग करते. "हा माझा मित्र सल्लू आणि मैत्रिण कॅटरिनाच्या निकाहचा आल्बम. काय गोड दिसताहेत ना दोघं?". फोटोत बनियान घातलेला सलमान आणि नखशिखांत बुरख्यात एक बाई - बहुतेक कॅटरिना.

मग दीपिका गंभीरपणे म्हणते - काही महिन्यांपूर्वी हा निकाह होणारच नाही असं वाटलं. कारण सल्लूच्या दोन्ही आयांचा आग्रह होता की होणार्‍या सुनबाई सुगरण हव्यात. बिच्चारी कॅटरिना! कधी अंडंपण उकडलं नाही तिने जन्मात,ती कसला स्वयंपाक करणार. मला विचारायला लागली. मी म्हटलं, बाई ग, तुला व्हिस्की-बिस्किबद्दल माहिती हवी असेल तर सिध्दार्थला विचारून सांगते. हे स्वयंपाकाचं मला माहित नाही. पण माझ्या एका मैत्रिणीने मला दगडू तेली मसाला वापरून बघायला सांगितलं. मी वापरून पाहिला आणि माझी सुगरण म्हणून ख्यातीच झाली. लगेच मी कॅटरिनाला हा मसाला वापरून पहायला सांगितलं. मुळ्याच्या भाजीपासून सलमानने मारून आणलेल्या Black Buck पर्यंत सगळं ह्या मसाल्याने टेस्टी होतं. सल्लूच्या दोन्ही आया खूष, लगेच जवळचा मुहूर्त बघून निकाह झाला.

वरातीत कोणतं गाणं वाजत होतं सांगा पाहू - कॅटरिना कुक हुई, सलमान तेरे लिये, ले तेली मसाला हुई सलमान तेरे लिये. चला, मी जाते आता स्वयंपाकघरात. सिध्दार्थ आज मित्रांना घेऊन येतोय जेवायला.तो सुध्दा माझ्या स्वयंपाकावर खुश आहे. मग तुम्ही कधी आणताय दगडू तेली मसाला?

स्थळ - तेली स्टुडीओ
पात्र - दिपिका आनि पल्लवी
कार्यक्रम - शिळे अन्न खपवताना

दिपिका - ह्या बासी (स्पेशल) एपिसोड मधे शिळे पदार्थ कसे खपवायचे ते आपण पल्लवी ताईंकडून शिकणार आहोत.
पल्लवी (ताई? एक तुच्छ कटाक्ष टाकून) - नमस्कार. कसे वाटतये?
दिपिका (मला काय धाड भरलीये?) - छान. कुठली डिश शिकवणार?
पल्लवी - एक मसाला वापरुन ५-६ पदार्थ दाखवणार आहे. एक जोरदर टाळ्या होवून जाउ द्या.
दिपिका (अग बये केस बाजुला कर आणि बघ, इथे प्रेक्षक समोर नसतात. तेल लावत जा ना. मला बघ. आई नी कसे चप्प तेल लावून दिले आहे.) - ऑ?
पल्लवी - चपापून...सांगते हं.
मसाला - शिळ्या ब्रेडचे तुकडे, कांदा, टोमॅटो, मीठ आणि दतेम एकत्र करा. शिळि भाजी खपवायची असेल तर ती पण टाका.
१. फ्रँकी - शिळ्या पोळी त हा मसाला भरुन
२. कटलेट - मसाल्याच्या चापट्या करुन
३. दाबेली - पावात मसाला भरुन
४. उत्तप्पा - तव्यावर पीठ टाकून मसाला पसरा.
५. मसाला इड्ली - पीठात हा मसाला घालून इड्ल्या
६. भरवां मिरची - शिळ्या पिठ्ल्यात देतम टाकून मिर्चीत भरा

तेल-टीप : हे पदार्थ तव्यावर परतताना तेल घालायची गरज नाही.

दिपिका - (MDH च्या तालावर)
फ्रँकी असो किवा यम्मी कटलेट
दाबेली असो किवा मसाला उत्तप्पा
मसाला इड्ली ssss किवा भरवां मिरच
शिळे खपवा मस्त मस्त
DTM...DTM!

माझी जाहिरात -

शोलेचा सीन. सिद्धार्थ धर्मेंद्रच्या रोलमध्ये, दिपिका बसंतीच्या रोलमध्ये.

गब्बरः (बसंतीच्या समोर बाटली फोडत) आज तू खूब नाचेगी! नाच! हीहाहा..
सिद्धार्थः बसंती, इन कुत्तोंके सामने मत नाचना!!
दिपिका: अरे मै आज की नारी हूं! मुझे नाचना वाचना नहीं आता!

असं म्हणून समोर पडलेल्या काचेच्या तुकडे पायाच्या अंगठ्याने सिगरेट ठेचावी तसे ठेचून त्यांचा चुरा करते, आणि सिद्धार्थपाशी जाऊन त्याला सोडवायला लागते. (गब्बर, सांबा, कालिया एकदम भयचकित)

गब्बरः सांबा, कालिया, पकड लो इस को!!
ते दोघे तिला पकडायला जातात. दिपिका सांबाला डाव्या हाताने आणि कालियाला उजव्या हाताने डोक्यावर हाणते (मागे ढाण् ढाण् असा हातोडा मारल्याचा आवाज) दोघेही बेशुद्ध पडतात.

गब्बरः (घाबरुन) ये गांववाले आजकल लडकियोंको किस चक्की का आटा खिलाते है?

मागून अचानक मौसी प्रकट होते.

मौसी: अरे कौनसा भी आटा हो या सब्जी, मै तो बचपनसे इसे दगडू तेली मसालाही खिलाती आयी हूं! स्वाद ही स्वाद, (स्वत:च्या बायसेप्स दाखवत) पत्थर की पॉवर, और प्यार ही प्यार!!

(प्यार म्हटले की दिपिका सिद्धार्थच्या गळ्यात पडते)
दिपिका: (लाजत) और मै भी इसको यही खिलाऊंगी!!

गब्बरः लेकिन तुम आज की नारी होते हुएं भी खाना पकाओगी?
दिपिका: (आनंदाने) हां!! ये तो है दगडू तेली मसाला का कमाल!! खाना पकाना बिल्कुल आसान!

सिद्धार्थः तो मौसी मै ये रिश्ता पक्का समझूं??
मौसी फक्त हसते.

लग्नाचा 'सात फेरे' वाला सीन -
गब्बर, सांबा आणि कालिया कमरेला गोळ्यांच्या मॅगजिन्सच्याऐवजी दगडू तेली मसाल्याची पाकिटं बांधून दिपिका आणि सिद्धार्थवर अक्षता टाकतात.

सांबा आणि कालिया: (आनंदाने) सरदार, आजसे हम आपका नमक नहीं, दगडू तेली मसालाही खायेंगे!!

--समाप्त--

Proud

कभी खुशी कभी घम मधल्या सारखं बंकींगहम पॅलेस ला लाजवेल असं हेSSSSSSS भलं मोठ्ठं घर. देव्हार्‍या जवळ आरतीचं ताट घेऊन उभी असलेली दिपिका. मागे रेशमानी गुंडाळलेल्या अनेक साळकाया माळकाया आणि त्यांच्यासोबत उगीच उभे असलेले तसलेच रेशमी झगे आपलं झब्बे. अचानक वार्‍याचा झोत येतो आणि दिपिकाचं नाक वर जातं (म्हणजे वास घ्यायला हो. चेहरा सोडून नाही काही उडत).
दिपिका: आले वाटतं हे!!
मागे उभी असलेली एक रेशमाची गुंडाळी आश्चर्य व्यक्त करण्याचा पुर्ण प्रयत्न करत विचारती होते: अय्या!! तुला गं कसं कळलं?
दिपिका(लाजून): अगं त्यांच्या मसाला युक्त घामाचा वास पोचला ना इथपर्यंत. काल त्यांना डब्यात दगडू तेली मसाल्यात केलेली भाजी दिली होती. २४ तास उलटून गेलेत तरी अंगाचा वास काहि जात नाही काही!!! फारच इमानी मसाला आहे!!!
मागच्या अनेक गुंडाळ्या एकत्रचः आता कळलं तुझ्या नवरा पोझिशनिंग सिस्टीमचं रहस्यं!!!
मागे दारात शाहरूख सारखा कोणीतरी उभा!!
आणि बॅकग्रौंडला दिपिकाचं वाक्यं: "घरातल्या प्रत्येकाला शोधून देई. दतेमचा जवाब नाही!!!"

शाहरुख (फोनवर दिपिकाला) : अगं आज दुपारी ४ वाजता आम्ही येणार आहोत तुला पहायला. मम्मी-डॅडि ला इंप्रेस करायला कहीतरी खमंग - चटपटीत बनव.
दिपिका : यु डोन्ट वरी. (आणि डोळा मारते) .

शारुख व त्याचे आई- वडिल येतात दिपिकाच्या घरी. दिपिका त्यांना वेगवेगळे चटपटीत पदार्थ वाढते.
वाढत असतांना, दिपिकाची आई शारुखच्या आईला, "सगळ्ळा स्वैंपाक दिपा नेच केलाय बरं."
शा. वडिल : (ढेकर देत) काय कमाल आहे पोरिच्या हातात. आमच्या कडुन तर रिस्ता पक्का समजा.

दिपिका लाजुन स्वैंपाक घरात पळुन जाते. (कॅमेर्‍याकडे पाहत म्हणते)
"ही कमाल तर दगडु तेली मसाल्याची."

(आता कॅमेरा फक्त मसालाच्या पुड्यावर, मागुन शाहरुखचा आवाज)
"नको नवर्‍याशी हुज्जत, वाढवी जेवणाची लज्जत"."आजच घरी आणा द द द...दगडु तेली मसाले".
"आता प्रत्येक १००० ग्रॅम दगडु तेली मसाल्या सोबत, ५० ग्रॅम दगडु खोबर्‍याच तेल मोफत."
"आधिक माहितीसाठी जवळच्या शोरुम ला भेट द्या किंवा लॉग ऑन करा www.DagaduTeliMasale.com "

फचिन, Rofl

स्थळ : एक पार्ल्यातल अस दिसणार देशी घर. खिडकीतून दिसणारा बाहेरचा सीन मात्र फारीन. (यात डायरेक्टरला ग्राहकाची पत दाखवायची आहे. स्थळ, काळ, पात्रे, संवाद यात साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. चेहर्‍यात साम्य आढळल्यास तो भ्रम समजावा. कुणाला स्वतः दीपिका असल्याचे भासल्यास तो जाहिरातीचा परिणाम समजावा. यात मम्मी ही आई या अर्थी पण अभिप्रेत आहे.)

बाबा, आणि त्यांच्या पार्टीत त्यांचा बाब्या, विरूद्ध एक मम्मी(एक आक्का) (जाहिरात बरी दिसावी म्हणून दीपिका) अशी जुगलबंदी नाचत नाचत चालू आहे.

मम्मीआक्का: बाबा कान्ट डान्स साला. बाबा कान्ट डान्स साला.
बाबा आणि पार्टी : ममी कान्ट मेक मसाला. ममी कान्ट मेक मसाला.

मम्मीआक्का: बाबा कान्ट डान्स साला. बाबा कान्ट डान्स साला.

बाबा आणि पार्टी : ममी कान्ट मेक मसाला. ममी कान्ट मेक मसाला. ममी कान्ट मेक मसाला. ममी कान्ट मेक मसाला.ममी कान्ट मेक मसाला. ममी कान्ट मेक मसाला. (काहिही अ‍ॅक्शन न घेता तेच तेच उगाळण्याची बाबांची खोड दिग्दर्शकाला दाखवायची आहे. जाहिरात यशस्वी करण्याच्या दृष्टीने हे अनिवार्य आहे.)

तोपर्यंत मम्मी नाचत नाचत कॉम्प जवळ जाउन काहीतरी टायपते.
लगेचच एक धोतर घातलेला वैद्या सारखा दिसणारा माणूस अवतीर्ण होतो. उपरण्यात दडवलेली वस्तू मम्मी च्या हातात चपळाईने देउन आपली दक्षिणा घेउन पुन्हा अंतर्धान पावतो.

मम्मी हातातल मसाल्याच पाकिट फडकवत विजयी मुद्रेने नाचायला लागते.

मम्मी कॅन गेट मसाला. मम्मी कॅन गेट मसाला.
दगडू तेSS लीम साला, दगडू तेSSली मसाला,

इकडे
१. बाबा हरलेले पाहून बाब्या मम्मीच्या पार्टीत सामिल झालेला असतो. (मम्मीचा विजय दाखवणे जाहिरात यशस्वी करण्याच्या दृष्टीने अनिवार्य आहे.)
२. बाबा कॉम्प वर बघतात तर त्यात त्यांना एका "विपू" त द्तेमा ची ऑर्डर दिसते.
३. वैद्या सारखा दिसणारा माणूस फेरारीतून आमची कोठेही शाखा नाही म्हणत फिरत असतो.
४. मम्मीचा डान्स चालू असतो

बाबा कान्ट डान्स साला. बाबा कान्ट डान्स साला.
मम्मी कॅन गेट मसाला. मम्मी कॅन गेट मसाला.
दगडू तेSS लीम साला, दगडू तेSSली मसाला,

खरंच काय ब्रिलियंट, कल्पक लोक आहात रे s s s s s s
प्रचंड आवडला हा धागा....

अरभाटचे मंकाळ आणि पिल्ले म्हणजे कम्माल...____/\____ धन्य हो... Rofl नंतरच्या जाहिरातीतली पंचलाईन आणि दिपिकाचे बांधलेले केस म्हणजे Rofl अत्तिशय मस्त जाहिरात..सिम्पली ब्रिलियंट...

प्रसिक, तुस्सी भी ग्रेट हो...what are you watching shendi??? Rofl

छाया, पहिली जाहिरात बनवणे म्हणजे चॅलेंज असते, ते तू केलेस..तुझे अभिनंदन Happy

रैना, या या ! अलभ्य लाभ ! कसं चाललं आहे तुमचं? सिनेमे वगैरे मिळतायेत ना?

हो हो ! सध्यातरी (आवंढा) मिळतायेत हो ! तुमचं कसं चाललयं? काय स्वैपाक चाललाय वाटतं.>>> Rofl

कविता, फिगर अन जिगर दोन्ही फक्त प्रपोज करे पर्यंतच, पुरुषाच्या प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हेच खरं Sad >>> भारीच Lol

मैत्रेयी, गाणं भारीच Lol

केदार
, आदेशभाऊ आणि दिपिका, भारी कल्पक कॉम्बो आणि त्यांच्या तोंडची भाषा....वहिणी>>> Rofl

अश्विनी, माझिया प्रियेलाssss स्वैपाक जमेना. >>> Rofl

नंद्या, दि: अं बरं बरं, दोन गड जिंकले नव्हते, दुसरा सांगा बरं.
नाही माहिती ना ... अहो 'द' गड. Lol

स्वप्ना, कॅटरिना कुक हुई, सलमान तेरे लिये, ले तेली मसाला हुई सलमान तेरे लिये.>>> Lol

वृषा, ती (कंसातली) वाक्यं म्हणजे Rofl

फचिन, तुम भी कम्माल हो बॉस Lol

नविना, मागच्या अनेक गुंडाळ्या एकत्रचः आता कळलं तुझ्या नवरा पोझिशनिंग सिस्टीमचं रहस्यं!!!>>> Lol

कमलाकर, "नको नवर्‍याशी हुज्जत, वाढवी जेवणाची लज्जत"."आजच घरी आणा द द द...दगडु तेली मसाले".>>> Rofl

विक्रम
, भारीच आहे तुमची पण जाहिरात Lol

एवढे मस्त मनोरंजन केल्याबद्दल धन्स लोक हो Happy

काय एक से एक जाहिराती आहेत Lol

मला कुणीतरी खर्र खर्र सांगा... हा दगडु तेली मसाला खर्रच इतका टेस्टी असतो का?
यंदाच्या देशवारीत २-४ पाकिट घेऊन येइन म्हणते Proud

Pages