गणेशोत्सव स्पर्धा - शब्दांकुर

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 22:46

2010_MB_Shabdankur_Poster.jpg

घडले त्यांतिल किती उमगले?
अस्तित्वावर किती गोंदले?
नेणिवेत अंकुरले का रे बीज एकही?
शब्दांतुन दरवळले का रे अस्फुट कांही...?

एखादा अनुभव, एखादा विचार, तर कधी एखादा शब्दही मनात घर करतो, रुंजी घालू लागतो, झपाटून टाकतो आणि बघता बघता कविता उमलते - हा अनुभव कवींना नित्याचाच. अंधारात काजवा चमकून जावा तशी एखादी कल्पना क्षणभरासाठी डोळ्यांपुढून लकाकून जाते आणि मग चकव्या फसव्या वाटांवरूनही तिचा पाठलाग करण्याला पर्यायच उरत नाही.

मायबोलीवरच्या सिद्धहस्त कवींना या स्पर्धेच्या निमित्ताने अशाच काही नागमोडी वाटांचं हे आमंत्रण. वाट तुमची तुम्हीच चालायची आहे, आम्ही तुम्हांला देऊ त्या फक्त काही शब्दखुणा.

ही स्पर्धा दर ३ दिवसांनी निराळ्या ढंगात तुमच्या समोर येईल. एकदा एखाद्या विषयावर आधारित कविता लिहायची तर एकदा दिलेली ओळ किंवा शब्द वापरून तर एकदा दिलेल्या कवितेचं विडंबन लिहायचं. प्रत्येक दिवसाचे नियम योग्य वेळी सविस्तर दिले जातील. मर्यादा असेल चार ते आठ ओळींची आणि मुदत असेल तीन दिवसांची.

प्रत्येक फेरीतून सर्वोत्तम कवितेची निवड मंडळ करेलच, पण खरी मजा हारजीतीत नाही, तर त्या कल्पनेच्या पाठशिवणीत आहे, हे खरा कवी जाणतोच.

कोणी सांगावं, हा शब्दखेळ खेळता खेळता तुमच्या मनातलं एखादं अस्फुट तुमच्याही नकळत दरवळेलही!

------------------------------------------------------------------------------------------------------------------
शब्दांकुर : पर्ण १
शब्दांकुर : पर्ण २
शब्दांकुर : पर्ण ३
शब्दांकुर : पर्ण ४

------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का हो संयोजक एकाने एकच प्रवेशिका टाकायची की जास्त टाकल्यास चालतील?
वाटल्यास तुम्ही एकच ग्राह्य धरा पण शब्दखेळाला अडवू नका हो.. Happy

नीरजा, पर्ण-१ साठी हा तिसरा नियम बघ -

ह्या स्पर्धेसाठी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका (चारोळी/कविता) पाठवण्याची मुभा आहे.

नीधप,

तुम्ही एका शब्दांकूरसाठी कितीही प्रवेशिका पाठवू शकता. चला पुढचे लिहायला सुरु करा Happy